खाजगीकरण म्हणजे काय ?

आज प्रत्येक देश विकासाच्या मार्गावर चालताना दिसत आहे. देशाच्या विकासासाठी अनेक घटक हे कारणीभूत ठरत असतात. वर्तमान काळात जवळ जवळ प्रत्येक देशात खाजगीकरणाला प्राधान्य दिले जात आहे आणि विकासाच्या दृष्टीने हे महत्वाचे देखील ठरत आहे.

जगात सर्वप्रथम साल १९३० मध्ये जर्मनमधील “The Economist Magzine” द्वारे खाजगीकरणाची संकल्पना जगासमोर आणण्यात आली होती, तेव्हापासून या संकल्पनेचा अगदी वेगाने विस्तार होत आहे.

या लेखात आपण खाजगीकरण ही नेमकी संकल्पना काय आहे, याचा विस्तारीत आढावा सोप्या शब्दात घेणार आहोत,


खाजगीकरण म्हणजे काय ?

खाजगीकरण म्हणजे एक अशी प्रक्रिया आहे, ज्यामध्ये सरकारी क्षेत्र अथवा उद्योग हे खाजगी क्षेत्रातील कंपन्यांकडे हस्तांतरित केले जातात. या प्रक्रियेत अशा उद्योगांचे खाजगीकरण केले जाते, जे सरकारच्या नियंत्रणाखाली अथवा मालकी हक्कात असतात.

सार्वजनिक क्षेत्र अथवा उद्योग हे ठराविक देशातील सरकार अथवा सरकारी संस्थेद्वारे चालवल्या जाणाऱ्या आर्थिक व्यवस्थेचाच एक भाग असतात. खाजगीकरणामध्ये साधारणतः सरकारी मालमत्तेची विक्री केली जाते अथवा ठराविक कालावधीसाठी सरकारी मालमत्ता खाजगी कंपन्यांना भाडेतत्त्वावर दिली जाते.

जेव्हा एखादे सरकारी क्षेत्र खाजगी क्षेत्रात परावर्तित होते, तेव्हा खाजगी क्षेत्रातील स्पर्धात्मक वातावरणामुळे अधिक कार्यक्षम पद्धतीला प्रोतसाहन दिले जाते, ज्यामुळे ग्राहकाला उत्तम सुविधा कमी किमतीत पुरविल्या जातात. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे खाजगी क्षेत्रात भ्रष्टचाराचा वावर नसतो.


खाजगीकरणाची प्रक्रिया

एखाद्या सरकारी कंपनी अथवा संस्थेचे खाजगीकरण कोणकोणत्या पद्धतीने केले जाऊ शकते, याचा आढावा आपण खालीलप्रमाणे घेणार आहोत,

1. लिलाव

सरकारी मालमत्ते मोबदला अधिकाधिक निधी मिळविण्यासाठी सार्वजनिक लिलाव सरकारद्वारे आयोजित केला जातो, यामध्ये अगदी सामान्य जनतेपासून ते मोठमोठया व्यावसायिकांचा सहभाग असू शकतो.

2. शेअर्सची विक्री

सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांचे ipo लॉंच करून शेअर विकले जातात. सरकार शेअर विक्रीच्या माध्यमातून ठराविक संस्थेचा सर्व आर्थिक क्रियापालांचा संपूर्ण अधिकार खाजगी गुंतवणूकदाराकडे सोपवते.

3. खरेदी अधिकार व भाडेपट्टी

खाजगीकरणाची ही एक प्रसिद्ध अशी पद्धत आहे. या पद्धतीत एखादी खाजगी कंपनी काही अटींनुसार सरकारी मालमत्तेचा ताबा मिळवते, परंतु मालकी हक्क हा सरकारकडेच असतो. सरकारी मालमत्तेतून खाजगी कंपनीला जो नफा मिळतो, त्यातील काही रक्कम कंपनी सरकारला मालमत्ता भाडे म्हणून देते. अगदी सोप्या शब्दात सांगायचे झाले तर, ज्या प्रमाणे आपण घर अथवा गाडी भाड्याने देतो अगदी तसेच या पद्धतीती घडते.

4. टेंडर

खाजगी कंपन्यांकडून सरकारी मालमत्तेकरिता उत्तम ऑफर्स येण्यासाठी या पद्धतीचा अवलंब केला जातो. ही पद्धत काही प्रमाणात लिलावासारखीच असते. जो खरेदीदार सरकारी मालमत्तेसाठी जास्त रक्कम मोजण्यास तयार होतो, त्याला संपत्तीचा ताबा सोपवला जातो. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या व्यवहारात ठराविक खरेदीदारच सहभागी होऊ शकतात.

5. वाटाघाट

जेव्हा सरकार सरकारी मालमत्तेचे खाजगीकरण करण्यासाठी ठराविक संस्थेसोबत व्यवहार करते, या पद्धतीला वाटाघाट पद्धत असे म्हणतात. या पद्धतीचे वैशिष्ठ्य असे की इथे विक्रेता आणि खरेदीदार दोघेही हजर असतात जे फायदेशीर अटी सहमत करण्यासाठी महत्वाचे मानले जाते.


भारतीय खाजगीकरण संकल्पना

भारतात अधिकतर प्रतिनिधित्व या प्रक्रियेवर आधारित खाजगीकरण पार पडते. या पद्धतीत सरकार खाजगी क्षेत्रातील कंपन्यांना सरकारी मालमत्ता ही लीजवर, अनुदानाद्वारे अथवा फ्रेंचाइजीच्या जबाबदाऱ्या सोपवते. कंपनीची सूत्रे जरी खाजगी कंपनीची असली तरी, मालकी हक्क सरकारचाच असतो. खाजगी कंपनी त्या मालमत्तेसंबंधित सर्व दैनंदिन कामकाजाचे व्यवस्थापन करते आणि ग्राहकांना सेवा पुरविण्याची भूमिका बजावते. या प्रक्रियेत सरकारचा संपूर्ण सहभाग पाहायला मिळतो.

सरकारद्वारे विस्थापन या प्रक्रियेचा सहारा घेतला जातो, या प्रक्रियेनुसार सरकार खाजगी कंपन्यांना अशा क्षेत्रात प्रवेश करण्यास सक्षम करतात, ज्या क्षेत्राचे अथवा विभागाचे सर्व व्यवस्थापन आणि नियंत्रण पूर्वी केवळ सरकारी यंत्रणेकडेच होते.

खाजगीकरणाच्या निर्गुंतवणूक संकल्पनेचा देखील मोठा प्रभाव पाहायला मिळतो. सरकार सरकारी मालमत्ते बाबतीत निर्गुंतवणूकीचे धोरण राबवते, ज्यामुळे सरकारी मालमत्तेची थेट विक्री होण्यास मदत मिळते. निर्गुंतवणूक धोरणामुळे न केवळ सरकारचा भार कमी होतो, तर सोबतच आर्थिक उभारणी देखील होते. काही प्रकरणांमध्ये निर्गुंतवणुकीत संपूर्ण खाजगीकरण समाविष्ट नसते.


खाजगीकरण कारणे

कोणत्या कारणांमुळे सरकार खाजगीकरणाचा निर्णय घेते, याचा आढावा आपण खालीलप्रमाणे घेणार आहोत,

1. खर्च कपात

सरकारी क्षेत्रांचे खाजगीकरण होण्याचे मुख्य कारण म्हणजे निधीची बचत अथवा खर्च कपात करणे. सरकारी यंत्रणेच्या तुलनेत खाजगी कंपन्यांकडे कमी खर्चात ध्येय गाठण्याचे लक्ष्य असते. जे खाजगी कॉन्ट्रॅक्टर असतात त्यांना भरपाई आणि फायदा यामध्ये अधिक लवचिकता असते, ज्याचा मोठा परिणाम एकूण प्रकल्पाच्या खर्चावर दिसून येतो.

2. जोखीम हस्तांतरण

सरकार ठराविक रकमेसाठी सरकारी कंपनीचा मालकी हक्क आणि नफ्यासोबत कंपनीसंबंधित जोखीम देखील खाजगी कंपनीकडे हस्तांतरित करते, यामुळे सरकारकडे केवळ वेळेच्या-वेळी भाडेपट्टी घेण्याची जबाबदारी राहते. कंपनीचे हस्तांतरण होताना सरकार आणि खाजगी कंपनीत एक करार होतो, हा करार जर खाजगी कंपनीकडून पाळला गेला नाही तर न केवळ खाजगी कंपनीला दंड भरावा लागतो, तर सोबतच बाजारातील कंपनीची प्रतिष्ठित छबी बिघडते, यामुळे खाजगी कंपनीकडे दोनच पर्याय उरतात ते म्हणजे तोटा सहन करणे अथवा दंड भरणे.

3. महसूल स्रोत

रस्ते, पूल अथवा इतर सरकारी क्षेत्र खाजगी कंपन्यांना भाडे तत्वावर देऊन, सरकार स्वतःसाठी एक महसूल स्रोत निर्माण करते. कारण ठराविक कालावधीत खाजगी कंपन्या सरकारला भाडेपट्टी प्रदान करत असतात. या महसुलाचा उपयोग सरकारला कर्ज फेडणे अथवा इतर सामाजिक हित साधणाऱ्या योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी होतो.

4. वेळेची बचत

खाजगीकरणाचा एक महत्वाचा हेतू म्हणजे प्रकल्प वेळेत पूर्ण करणे. सरकार एकाच वेळी अनेक सरकारी कामांचे कॉन्ट्रॅक्ट विविध खाजगी कंपन्यांना देऊ शकतात, ज्यामुळे न केवळ वेळेची बचत होते, तर सोबतच सरकार एकाच वेळी सर्व प्रकल्पांवर स्वतःची पारख ठेऊ शकते.
खाजगीकरण फायदे

5. उत्तम कार्यक्षमता

खाजगी क्षेत्रातील कंपन्यांचा कोणत्याही प्रकारचा राजकीय हेतू नसतो, तर त्यांचे एकच मुख्य ध्येय असते ते म्हणजे नफा. खाजगी क्षेत्रातील वाढत्या स्पर्धेमुळे, कंपन्यांचे अधिक लक्ष हे स्वतःची कार्यक्षमता वाढविण्यावर असते. या व्यतिरिक्त खाजगी कंपन्यांद्वारे त्यांच्या कर्मचाऱ्यांची निवड ही शिक्षणाच्या आधारे होते न की जात अथवा आरक्षणाच्या आधारावर, त्यामुळे कंपन्यांना एक उत्तम आणि पदासाठी पात्र अशा कर्मचाऱ्यांची निवड करता येते, ज्यामुळे खाजगी कंपन्यांची कार्यक्षमता वाढीस लागते.

6. कामातील सुसूत्रता

खाजगीकरण या प्रक्रियेमुळे कंपनीचे व्यवस्थापन उत्तम होण्यास मदत मिळते. खाजगी संस्था अथवा कंपनीच्या व्यवस्थापनाची संपूर्ण जबाबदारी ही कंपनीच्या मालकांची असते, ज्यामुळे कार्यक्षम व्यवस्थापन करणे आणि कामात सुसूत्रता आणणे हे कंपनीच्या संस्थापकांवर अवलंबून असते. खाजगी कंपन्यांच्या कामात सरकारी विभागाच्या तुलनेत अधिक सुसूत्रता पाहायला मिळते, याचे मुख्य कारण म्हणजे योग्य उम्मेदवार आणि प्रशिक्षण. कामात सुसूत्रता नांदत असल्याने उत्पादकतेत अडथळा येण्याची शक्यता फार कमी होते.

7. उत्तम ग्राहक सेवा

जसे की आपण जाणतो, खाजगी कंपन्यांचा एकच मुख्य हेतू आपल्याला दिसून येतो तो म्हणजे नफा. नफ्यात वाढ करण्यासाठी कंपन्या त्यांच्या ग्राहक सेवेवर अधिक लक्ष केंद्रित करतात, कारण जो पर्यंत ग्राहक वस्तू व सेवांच्या उपभोगाने संतुष्ट होणार नाहीत तो पर्यंत वस्तू आणि सेवांच्या विक्रीत वाढ होणार नाही हे खाजगी कंपन्यांना परिपूर्ण माहीत आहे. सरकारी विभाग अथवा कंपन्यांमध्ये उत्तम ग्राहक सेवा या गोष्टीकडे इतके लक्ष दिले जात नाही. खाजगीकरणामुळे ग्राहकांना न केवळ उत्तम सेवा मिळतात, तर सोबतच यासाठी ग्राहकांना कमी किंमत देखील द्यावी लागते.

8. आर्थिक सहाय्यता

जेव्हा सरकार एखादी सरकारी मालमत्ता भाडेतत्वावर खाजगी कंपनीकडे सोपवते, तेव्हा कंपनीकडून सरकारला ठराविक कालावधीनंतर ठराविक रक्कम ही भाडेपट्टी मिळू लागते, यामुळे कोणत्याही प्रकारचा खर्च न उद्भवता सरकारला उत्पन्न निर्माण होत राहते, यामुळे देशाच्या अर्थव्यस्थेला साहाय्य मिळते.

9. भ्रष्टचाराचा अभाव

भारतातील “Coal India” कंपनीत घडलेला भ्रष्टचार हा भारतातील सर्वात मोठा भ्रष्टचार मानला जातो, ज्यामध्ये अनेक राजकारणी देखील सहभागी होते. खाजगीकरणामुळे कंपनीचा ताबा हा खाजगी कंपनीला हस्तांतरित होतो, इथे राजकारण्यांचा बिलकुल सहभाग नसतो, ज्यामुळे भ्रष्टचाराचा प्रश्नच उद्भवत नाही.


खाजगीकरण तोटे

1. नियंत्रण

जेव्हा एखादी सरकारी कंपनी खाजगीकरण प्रक्रियेअंतर्गत खाजगी कंपनीत परावर्तित होते, तेव्हा त्यावर जनता अथवा सरकारचे कोणत्याही प्रकारचे नियंत्रण राहत नाही, ज्यामुळे कंपनी संबंधित सर्व महत्वपूर्ण निर्णय घेण्याचा अधिकार हा गुंतवणूकदारांना मिळतो. या कारणाने अनेकदा वस्तू व सेवांच्या किमतींत वाढ दिसून येते.

2. अपयश

खाजगीकरण हे केवळ मालकी हक्क हस्तांतरित करण्यास कारणीभूत ठरते. खाजगीकरणामुळे कंपनी यशस्वी रित्या चालेलच याची ग्वाही मिळत नाही, ज्यामुळे अनेकदा खाजगी कंपन्यांना मोठ्याप्रमाणात नुकसान देखील सहन करावे लागते.

3. विभाजन

खाजगीकरणामुळे एका विशाल विभागाचे अथवा कंपनीचे अनेक लहान लहान उद्योगांमध्ये विभाजन होते, हे विभाजन कार्यक्षमेवर परिणामकारक ठरते, यासोबतच कंपनीच्या व्यवस्थापनातील जबाबदारी देखील कोठेतरी कमी होताना दिसून येते. अशा परिस्थिती कंपनीला तोटा होण्याची दाट शक्यता उद्भवते. सर्वात मुख्य गोष्ट म्हणजे कोणतीही खाजगी कंपनी या तोट्याची जबाबदारी घेण्यास समोर येत नाही.


FAQ

1. भारतात सर्वप्रथम कोणत्या सरकारी कंपनीचे खाजगीकरण झाले ?

उत्तर : भारतात सर्व प्रथम Indian Telephone Industries (ITI) या सरकारी कंपनीचे खाजगीकरण झाले.

2. खाजगीकरणाची सुरुवात कधी झाली ?

उत्तर : खाजगीकरण ही संकल्पना जर्मनमध्ये साल १९३० मध्ये उदयास आली व तेव्हापासूनच ती वाढीस लागली.

3. भारतातील सर्वात मोठे खाजगीकरण कोणते ?

उत्तर : एअर इंडिया आणि भारत पेट्रोलियम या दोन कंपन्यांच्या खाजगीकरणाला भारतातील सर्वात मोठे खाजगीकरण मानले जाते.

4. भारतात एकूण किती कंपन्यांचे खाजगीकरण झाले आहे ?

उत्तर : एका रिपोर्टनुसार २०१७ -१८ पर्यंत भारतात एकूण ३३१ कंपन्यांचे खाजगीकरण झाल्याचे सांगितले जाते.

5. जगात कोणत्या देशात सर्वाधिक प्रमाणात खाजगीकरण पार पडले आहे ?

उत्तर : चीन या देशात जगात सर्वाधिक प्रमाणात खाजगीकरण पार पडले आहे.

अधिक लेख –

1. अर्थशास्त्र म्हणजे काय व याचे प्रकार कोणते ?

2. उदारीकरण म्हणजे काय व याची वैशिष्ठ्ये कोणती ?

3. जागतिकीकरण म्हणजे काय ?

4. सेवा क्षेत्र म्हणजे काय व याचे प्रकार कोणते ?

Leave a Comment