झाडे लावा झाडे जगवा निबंध | jhade Lava jhade jagva

झाडे म्हणजे निसर्गाचा एक अविभाज्य भाग. निसर्गा शिवाय झाडे नाही आणि झाडां शिवाय निसर्ग नाही, हे तर आपण सर्वजण जाणतोच, पण हे जाणून देखील दुर्लक्ष करत असल्यामुळे, आज झाडांचे अस्तित्व संपुष्टात येत आहे, ह्याचे एकमेव आणि खरे कारण म्हणजे आपण मानवजात, आपण कितीही नाकारले तरी हे सत्य आहे जे कधीच बदलणार नाही.

आजपासून आपण फार नव्हे, तर अगदी दहा ते पंधरा वर्षांपूर्वी पाहिले, तर आज एवढे प्रदूषण नव्हते वातावरण देखील शुद्ध असायचे, परंतु केवळ दहा वर्षांमध्ये असे नेमके घडले तरी काय ज्याने झाडे कमी झाली आणि प्रदूषण वाढले, असा प्रश्न नेहमीच माझ्या समोर येत असायचा, याची माहिती प्राप्त करता माझ्या असे लक्षात आले की, ज्या विकासाच्या मागे आणि तंत्रज्ञानामागे आपण धावत आहोत हेच प्रदूषण आणि झाडांच्या मुख्य कारणांपैकी एक आहेत.

जागतिक पातळीवर युद्ध तयारी करताना मोठ मोठे शस्त्र आणि बॉम्ब तयार करण्यात येत आहेत, ज्यांची चाचणी मानवी वस्तीपासून दूर निसर्गात केली जात आहे, ज्याने मानवाला हानी पोहोचू नये, पण कळत नकळत माणसाला जीव देणारे झाड मात्र ह्याला विनाकारण नक्कीच बळी पडत आहेत.

आपला भारत देश लोकसंख्येच्या बाबतीत जागतिक पातळीवर दुसरा सर्वात मोठा देश आहे, आणि पहिला क्रमांक आला चीन आहे. भारताची लोकसंख्या 130 कोटी पेक्षा अधिक असून, लोकांची राहण्याची सोय करण्यासाठी दररोज हजारो एकर जमिनीवरील झाडांची कत्तल करून तेथे मानव वस्ती वसवली जात आहे.

अधिक लोकसंख्या असल्यामुळे चीन मध्ये देखील खूप मोठ्या प्रमाणात जंगलतोड झाली, ज्यामुळे प्रदूषण नियंत्रणात आणणे अशक्य झाल्यामुळे चीनमध्ये प्रदूषणाची इतका प्रभाव वाढला की, आज दर दिवशी जवळ जवळ दीड ते दोन हजार पेक्षा अधिक लोक केवळ प्रदूषणामुळे मृत्युमुखी पडत आहे, आणि जर अशीच जंगल तोड चालू राहिली, तर भारतावरच नव्हे तर संपूर्ण जगावर चीन सारखी विकट परिस्थिती येण्यास काही फार वेळ लागणार नाही.

दर वर्षी राज्य सरकार सहित केंद्र सरकार जंगल वाचविण्यासाठी करोडो रुपयांचे प्रकल्प हाती घेत आहेत, त्यातही निव्वळ भ्रष्टाचारच. म्हणजे मोफत मिळतंय ते आधी नष्ट करायचे आणि नष्ट झाल्यावर तेच वाचवण्यासाठी नारे लावायचा आणि पैसे खर्च करायचे आणि हीच वृत्ती नेहमीच आपल्याला धोकादायक ठरत आली आहे.

भारतातील महान वैज्ञानिक जगदीश चंद्र बोस यांनी एक संकल्पना जगासमोर मांडली, ती म्हणजे झाडे देखील सजीव आहेत, मग त्यांची हत्या केल्यावर शिक्षा का होत नाही याचे देखील नवलच आहे, म्हणजे माणसाची हत्या झाली की जन्मठेप आणि झाडांची कत्तल केल्यावर फक्त पाच हजार रुपये दंड म्हणजे झाडांच्या जीवाची किंमत पाच हजार रुपये आहे, हे देखील मानवाने ठरवलेच, यावरून समजते की पृथ्वी आणि मनुष्य यांचा अंत काही दूर नाही.

शाळेत असताना झाड आणि निसर्ग आपला मित्र आहे ते सर्वांनाच शिकवले जाते, झाडे मोफत आपल्याला जीवनावश्यक गोष्टी पुरवतात हि गोष्ट आणि ह्याचे महत्त्व देखील सांगितले जाते, परंतु जंगलतोडीला विरोध करणे शिकवले जात नाही, यामुळेच आज झाडे लावा झाडे लावा असे नारे देण्याची वेळ आपल्यावर आली आहे.

इतर निबंध :

1. तंत्रज्ञानाची किमया मराठी निबंध

2. संगणक मराठी निबंध

3. माझा आवडता सण

Leave a Comment