जागतिक बँकेची स्थापना कधी झाली ?

आर्थिक व्यवहार हा आपल्या दैनंदिन जीवनाचा एक मूलभूत भाग बनला आहे. दैनंदिन जीवनात होणारे आर्थिक व्यवहार हे साधारणतः ऑनलाईन आणि ऑफलाईन ह्या दोन्ही पद्धतींमध्ये होत असतात, ज्याचा मुख्य स्रोत बँक असतो.

आज भारतात जवळ जवळ प्रत्येक नागरिकाचे बँकेत खाते आहे अथवा बँकेचे सदस्यत्व आहेत, परंतु जगात अशी देखील बँक आहे, जी व्यक्तीला नव्हे तर संपूर्ण देशाला सदस्यत्व देते, ह्या बँकेला आपण जागतिक बँक (World Bank) म्हणून ओळखतो.

या लेखात आपण जागतिक बँकसंबंधीत विविध माहितीचा आढावा घेणार आहोत,


जागतिक बँक म्हणजे काय ?

जागतिक बँके ही आंतराष्ट्रीय स्तर कार्यरत एक संस्था आहे, जी विकसनशील देशांना, त्यांची आर्थिक स्तिथी सुधारण्याकरिता कर्ज, आर्थिक क्षेत्रासंबंधित सल्ला आणि संशोधन प्रदान करते. ह्यामागे जागतिक बँकेचा एकच मुख्य हेतू असतो, तो म्हणजे गरीब किंवा आर्थिक रित्या कमजोर देशांना त्यांच्या परिस्तितीतून बाहेर येण्यासाठी व परिस्तिथी हाताळण्यासाठी प्रोत्साहित व सक्षम बनवणे.

वर्तमान काळात जागतिक लोकसंखेच्या एकूण लोकसंख्येपैकी ३ % पेक्षा अधिक लोकसंख्येचे एक दिवसीय उत्पन्न हे १५० रुपयांपेक्षाही कमी आहे, त्यात वाढ करणे आणि जगातील प्रत्येक देशांच्या आमदनीत ४० % पेक्षा अधिकची वाढ करून संर्वांगीण आर्थिक विकास साधने ही दोन उद्दिष्ठे २०३० पर्यंत पूर्ण करण्याचा संकल्प जागतिक बँकेने हाती घेतला आहे.


जागतिक बँकेचा इतिहास

दुसऱ्या विश्वयुद्धानंतर जगाला आर्थिक रित्या पुन्हा मजबूत करण्यासाठी १९४४ दरम्यान Monetary & Financial Conference अंतर्गत जागतिक बँकेची स्थापना करण्यात आली होती. स्थापनेच्या दोन वर्षांनंतर म्हणजेच साल १९४६ मध्ये जागतिक बँकेने त्याचे कामकाज सुरू केले व पश्चिम युरोपीय देशाला पहिले कर्ज दिले, अशा प्रकारे जागतिक बँकेचे सुरुवात झाली.

साल १९५० दरम्यान जागतिक बँकेने विकसनशील देशांमध्ये विमानतळ, पाणी पुरवठा, जलविद्युत धरणे, रस्ते अशा अनेक महत्वपूर्ण प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करून महत्वाची भूमिका बजावली होती.

जागतिक बँक ही एकच संस्था अथवा गट नसून, INRD (International Bank For Reconstruction & Development), ICSID (International Centre For Settlemnt Of Investment Disputes), IFC (International Finance Corporation), MIGA (Multilateral Investment Guarantee Agency) आणि IDA (International Development Association) ह्या पाच संस्थांचे मिश्रण आहे. प्रत्येक संस्था अथवा गट हा आंतराष्ट्रीय बाजारात विविध कार्य पार पडत असतो.

साल १९६८ ते १९८१ ह्या कालावधीत जागतिक बँकेचे अध्यक्ष रॉबर्ट मॅकेनमारा ह्यांच्या अध्यक्षतेखाली बँकेने “शास्वत विकास” साधण्यासाठी एक संकल्पना तयार केली, ज्या अंतर्गत विकसनशील देशांमध्ये आर्थिक पाया मजबूत करण्यासोबतच पर्यावरण सरक्षावर देखील माहिती प्रदान केली जात होती. ह्या संकल्पनेमुळे विकसनशील देशांमध्ये, विकसित देशांमधून गुंतवणूक वाढण्यास मदत मिळाली. अशा विविध संकल्पनांमुळेच जागतिक बँकेचा विस्तार होत गेला, ज्यामुळेच जागतिक बँकेला आंतराष्ट्रीय स्तरावर एक अधिकृत आणि मौल्यवान असे स्थान प्राप्त झाले आहे.

वर्तमान काळात अमेरिका, जपान, युनायटेड किंगडम, फ्रान्स आणि जर्मनी ह्या देशांची नियुक्ती जागतिक बँकेच्या Executive Directors ह्या पदी झाली आहे.


जागतिक बँकेची स्थापना कधी झाली ?

जुलै १९४४ मध्ये International Bank For Reconstruction & Development ची म्हणजेच स्थापना एका conference अंतर्गत अमेरिका ह्या देशात करण्यात आली, ज्याला कालांतराने वर्ल्ड बँक आणि वर्ल्ड बँक ग्रुप ह्या नावाने ओळखले जाऊ लागले.

John Maynard Keynes आणि Harry Dexter White ह्यांना जागतिक बँकेचे संस्थापक म्हणून ओळखले जाते. john हे पेशाने एक अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी आणि गुंतवणूकदार तर, harry हे अर्थशास्त्रज्ञ होते.


कर्ज आणि धोरण

१९८० दरम्यान आलेल्या आर्थिक संकटाच्या काळात अनेक विकसनशील देशांनी, बहुपक्षीय संस्थांकडून आपली आर्थिक बाजू सावरण्यासाठी कर्ज घेतलं होते, परंतु जागतिक अर्थव्यवस्थेत आलेली मंदी, वस्तुंना मिळणार कमी भाव, तेलाच्या किमतींमध्ये होणारा चढउतार आणि जास्त व्याजदर, ज्यामुळे विकसनशील देश घेतलेलं कर्ज फेडण्यास असक्षम होते, अशा विकट परिस्थितीत जागतिक बँकेने महत्वाची भूमिका बजावल्याचे सांगितले जाते.

विकसनशील देशांची आर्थिक बाजू पूर्वरित करण्यासाठी बँकेने विकासनशील देशांमध्ये सामाजिक आणि आर्थिक धोरण तयार करण्यास सुरुवात केली, व त्या धोरणांमध्ये जास्तीत जास्त सहभाग घेण्याचा प्रयत्न केला.

विकसनशील देशांनी, बहुपक्षीय संस्थांकडून घेतलेले कर्ज मिटविण्याची अट म्हणून जागतिक बँकेने विकसनशील देशांमध्ये  “Structural Adjustment Programs” नामक धोरण सुरु करण्याची संकल्पना समोर आणली. ह्या धोरणांमध्ये शिक्षण आणि आरोग्य खर्चात कपात करणे, किंमती नियंत्रण निर्मूलन, सरकारी उद्योगांचे खासगीकरण, व्यवसाय उदारीकरण, आर्थिक क्षेत्र नियंत्रम मुक्त करणे ह्या अटींचा समावेश होता.

हे धोरण जरी आर्थिक स्थिरता स्थापन करण्यासाठी विकसनशील देशांवर लादले असले, तरी ह्या धोरणांमुळे वारंवार गरिबीत वाढ, बेरोजगारीत वाढ, देशावर वाढते देय असे विपरीत परिणाम दिसण्यास सुरुवात झाली. ह्या संकटांवर आळा घालण्यासाठी जागतिक बँकेने विकसनशील देशांमधील रस्ते, बंदर सुविधा, विद्यालय, रुग्णालय ह्यासारख्या देशाच्या पायाभूत गरजांसाठी कर्ज देण्यास सुरुवात केली.

विविध देशाची वर्तमान स्थिती पाहून जागतिक बँक, त्या देशाच्या आर्थिक विकासाठी कर्ज आणि धोरण लागू करते, गरज लागल्यास अनेकदा धोरणात बदलही होत असतात.


जागतिक बँकेसंबंधीत तथ्य

जागतिक बँक कर्ज, मार्गदर्शन आणि ज्ञान प्रदान करून सरकारी संस्था, प्रादेशिक बँका आणि खासगी क्षेत्रांमधील मोठमोठ्या कंपनीसोबत मिळून कार्य करते.

साल १९९० मध्ये जागतिक लोकसंख्येच्या एकूण लोकसंख्येपैकी ५० % टक्के पेक्षा अधिक लोकसंख्या गरिबीत जगत होती, जागतिक बँकेमुळे हा आकडा वर्तमान काळात १० टक्क्यांवर पोहोचला आहे.

जागतिक बँक ही INRD, ICSID, IFC, MIGA आणि IDA ह्या पाच आंतराष्ट्रीय संस्था एकत्र येऊन तयार झाली आहे.

आज पासून ७० वर्षांपूर्वी जागतिक बँकेची स्थापना झाली होती आणि सुरुवातीच्या काळात ह्या संस्थेला “The International Bank For Reconstruction & Development” ह्या नावाने ओळखले जात होते.

२०१५ मध्ये जागतिक बँकेने संपूर्ण जगात ३०२ धोरणांची आखणी केली आहे, ज्याचे एकूण मूल्यांकन हे १०,००० लाख रुपये इतके होते.

जागतिक बँकेचे सदस्यत्व निधी आणि इतर स्वमालमत्तेतून निधी असे काही उत्पन्न स्रोत आहेत.

वर्तमान काळात जगातील १८९ देश हे जागतिक बँकेचे सदस्य आहेत, ज्यातील युनायटेड किंगडम, जपान, अमेरिका, जर्मनी आणि फ्रान्स हे काही प्रमुख सदस्य आहेत.

जागतिक बँकेचे मुख्यालय जरी अमेरिकेतील वॉशिंग्टन येथे असले तरी, जागतिक बँकेचे अधिक तर कर्मचारी विविध देशातील जागतिक बँकेच्या कार्यालयातून कार्य पार पाडत असतात.


FAQ

1. वर्तमान काळात जागतिक बँकेचे अध्यक्ष कोण ?

उत्तर : David Malpass हे जागतिक बँकेचे वर्तमान काळातील अध्यक्ष आहेत.

2. जागतिक बँकेचे स्थापना कोणत्या साली झाली ?

उत्तर : जागतिक बँकेची स्थापन १९४४ साली झाली.

3. जागतिक बँकेने भारताला किती कर्ज दिले आहे ?

उत्तर : जागतिक बँकेने भारताला १२,७४६.७१ दशलख रुपये इतके कर्ज दिले आहे.

4. जागतिक बँकेचे मुख्यलाय कोठे आहे ?

उत्तर : अमेरिकेतील वॉशिंग्टन मध्ये जागतिक बँकेचे मुख्य कार्यालय आहे.

5. जागतिक बँकेच्या भांडवलात भारताचा किती वाटा आहे ?

उत्तर : भारताचा जागतिक बँकेत २.७७ % इतका वाटा होता, जो कालांतराने वाढून २.९१ % इतका झाला आहे, ज्याने भारत जागतिक बँकेत ११ व्या क्रमांकाचा सर्वात मोठा Share Holder बनला आहे.

6. जागतिक बँकेचे पहिले अध्यक्ष कोण ?

उत्तर : Eugene Meyer हे जागतिक बँकेचे पहिले अध्यक्ष होते.

7. जागतिक बँकेचे संस्थापक म्हणून कोणाला ओळखले जाते ?

उत्तर: John Maynard Keynes आणि Harry Dexter White ह्यांना जागतिक बँकेचे संस्थापक म्हणून ओळखले जाते.

अधिक लेख –

1. भारतीय रिझर्व्ह बँकेचे कार्य कोणते ?

2. NPA चा फुल फॉर्म काय ?

3. अर्थशास्त्र म्हणजे काय व याचे प्रकार कोणते ?

4. उदारीकरण म्हणजे काय ?

Leave a Comment