इतिहास म्हणजे काय व इतिहासाचे प्रकार कोणते ?

काळाचे मुख्यतः भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ ह्या तीन भागात विभाजन झाले आहे. ह्या तिन्ही काळामधील जो भूतकाळ असतो, ह्याला विशेष महत्व दिले जाते, कारण भूतकाळावरून आपला वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ कसा असेल ह्याचा अंदाज लावता येतो. भूतकाळाला इतिहास देखील म्हटले जाते.

इतिहासाची नेमकी व्याख्या काय, महत्त्व काय, इतिहासाचे प्रकार कोणते अशा विविध घटकांसंबंधीत माहिती आपण ह्या लेखात पाहणार आहोत,

अनुक्रमणिका


इतिहास म्हणजे काय ?

भूतकाळातील घटना अथवा परिस्थितीची स्मृती, त्याचे सादरीकरण, आणि स्पष्टीकरण म्हणजेच इतिहास होय. अगदी सोप्या शब्दात सांगायचे झाले, तर इतिहास म्हणजे भूतकाळ होय.

लिखित संग्रह, मौखिक विचार, पौराणिक कलाकृती, पर्यावरणीय स्थिती हे काही घटक आहेत, ज्याद्वारे भूतकाळाचा अथवा इतिहासाचा आढावा घेतला जातो.

इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी शिस्तबद्ध पद्धतीचा वापर करावा लागतो. ही शिस्तबद्ध पद्धत भूतकाळात घडलेल्या घटनांचे वर्णन व त्याचे विश्लेषण करण्यास मदत करते.

इतिहासातील घटनांचे विश्लेषण अथवा वर्णन हे ठराविक व्यक्ती अथवा इतिहासकार मार्फत होत नसून, साधारणतः इतिहासकार ठराविक घटनेबाबत वाद-विवाद करतात, ज्यातून घटनेच्या विश्लेषनाचा अंतिम टप्पा गाठला जातो. अनेकदा इतिहासकार केवळ इतिहासाचा अभ्यास नव्हे, तर त्यातून मिळणाऱ्या कौशल्यातून वर्तमानकाळातील समस्या देखील कमी करण्याचा प्रयत्न करत असतात.

कोणत्याही संस्कृतीतील कथा म्हणजे एक प्रकारे संस्कृतीचा इतिहास अथवा भूतकाळ असतो, हे जाणून घेणे फार महत्त्वाचे असते. अशा कथा दंतकथा म्हणून ओळखल्या जातात.

या कथा संवादा मार्फत एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत विस्तारत असतात. इतिहास हा अवशेषां वरून सिद्ध होत असल्याने, अशा कथांचा आणि इतिहासाचा अनेकदा काहीही संबंध जुळून येत नाही.


इतिहासाचे प्रकार

1. सामाजिक इतिहास

समाजाच्या भूतकाळाला विविध स्वरूपात पाहण्याची पद्धत म्हणजेच सामाजिक इतिहास होय. समाज म्हणजेच लोकांचा एकत्र आलेला समूह होय. येथे लोक एकत्र येण्याची विविध कारणे असू शकतात जसे की, कुटुंब व्यवस्थापन, व्यवहार, लोकांची सुरक्षितता इत्यादी.

लोकांचा समूह, समूहाचे दैनंदिन जीवन, समूहाचा समाजावर अथवा देशावर पडलेला प्रभाव या सर्व घटकांचा समावेश सामाजिक इतिहासाच्या अभ्यासक्रमात असू शकतो.

2. राजकीय इतिहास

राजकीय इतिहास म्हणजे ठराविक देश, प्रांत किंवा राज्यातील भूतकाळात घडलेल्या राजकारणा संबंधित घटना. इथे साधारणतः राज्यशास्त्र आणि राज्यशास्त्र संबंधित इतर घटकांचा आढावा घेतला जातो. राजकीय इतिहासासंबंधित अभ्यासक्रम हा भारतात प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण पद्धतीत शिकवला जातो.

3. धार्मिक इतिहास

धार्मिक इतिहास या घटकात साधारणतः असे पाहिले जाते की, ठराविक धर्माने कशा प्रकारे एखाद्या भूभागाला अथवा देशाला व्यापून तेथील घटनांना आकार दिला आहे, अथवा रचल्या आहेत.

कोणत्याही धर्मात लोकांचे मुख्यतः दोन गट आपल्याला दिसून येतात, त्यातील पहिला गट म्हणजे आस्तिक आणि दुसरा गट म्हणजे नास्तिक. आस्तिक म्हणजे देवाधर्मावर विश्वास ठेवणारे आणि नास्तिक म्हणजे धर्मातील देवांवर विश्वास न ठेवणारे अथवा त्यांच्या अस्तित्वावर शंका निर्माण करणारे.

धर्माची योग्य परिभाषा माहीत नसल्याने, अनेकदा जागतिक पातळीवर धर्म हे संघर्षाचे कारण बनू शकते. भारताचा धार्मिक इतिहास पाहता, तो पूर्णतः भारतातील मंदिरे आणि देव यांच्याशी जोडला गेला आहे.

4. आर्थिक इतिहास

आर्थिक इतिहासात ठराविक देश अथवा प्रदेशाच्या भूतकाळातील आर्थिक स्थिती आणि धनसंपत्ती या घटकांचा समावेश होतो. कोणत्याही देशाचा आर्थिक इतिहास पाहता त्यामूळे इतर अनेक घटनांचा उलगडा होताना दिसतो, याचे सर्वोत्कृष्ट उदाहरण म्हणजे भारत होय.

पूर्वी भारत जगातील सर्वात श्रीमंत देश होता. भारताची श्रीमंत पाहता भारतावर अनेक परकीय आक्रमण झाले, त्यामुळे भारताचा नवीन धार्मिक, सामाजिक आणि राजकीय इतिहास उदयास आला.


इतिहासाची साधने

इतिहासाची साधने म्हणजे काही असे घटक, ज्याद्वारे इतिहासाचा आढावा अथवा दखल घेतली जाऊ शकते. इतिहासाची साधने मुख्यता तीन भागात विभागली गेली आहेत, याबद्दल माहिती आपण खालील प्रमाणे पाहणार आहोत,

1. भौतिक साधने

भौतिक साधनामध्ये वस्तू आणि वास्तूंचा समावेश होत असतो. भौतिक साधनांना पुरातत्वीय साधने या नावाने देखील संबोधले जाते.भौतिक साधनांमध्ये हस्तांतर करून कोणत्याही प्रकारचे बदल घडवून आणता येत नाही, आणि हेच याचे मुख्य वैशिष्ट्य असते.

भौतिक साधनांमध्ये उत्खननात सापडलेले अवशेष, नानी (Coin), मोठी स्मारके अथवा मुर्त्या, वास्तू, वास्तूंवर आढळलेल्या हस्तकला, आलेख, आलेखांमध्ये स्तंभालेख, गुहेत सापडलेले लेख म्हणजेच गुहालेख, मंदिरे, मूर्ती, धातूंवर आढळलेले लेख म्हणजेच धातूलेख यांचा समावेश असू शकतो.

2. लिखित साधने

अक्षर अथवा लिहून जतन केलेल्या साधनांना आपण लिखित साधने म्हणू शकतो. लिखित साधने ही मुख्यतः दोन प्रकारे असु शकतात, पहिले म्हणजे धार्मिक आणि दुसरे म्हणजे धर्मनिरपेक्ष.

भारतात सापडलेली लिखित साधने ही साधारणतः संस्कृत भाषेतील असतात, लिखित साधनांमध्ये वेद, ग्रंथ, काव्यकथा, यांचा समावेश असू शकतो.

3. मौखिक साधने

मौखिक साधने ही संवादाच्या माध्यमातून विस्तारत असतात, ज्यात कालांतराने बदल होण्याची दाट शक्यता असते, त्यामुळे मौखिक साधनांवर पूर्णतः विश्वास ठेवता येत नाही. मौखिक साधने साधारणतः कविता, पोवाडे, अभंग, भाषण या स्वरूपात आढळतात.


इतिहासाचे महत्त्व

इतिहास न केवळ आपल्या वर्तमानासाठी तर आपल्या भविष्यासाठी देखील फार महत्त्वाचा असतो. इतिहासामुळे आपण कोण आहोत, आपली संस्कृती काय आहे, संस्कृतीचे वैशिष्ट्य काय आहे, हे जाणून घेण्यास फार मदत मिळते.

आजचा एकविसाव्या शतकातील समाज आणि समाजातील जवळ-जवळ सर्व लोक जितके विकासाच्या मार्गाने पुढे जात आहेत, तितकेच ते आपल्या इतिहासा पासून दूर होताना दिसत आहेत. एक प्रकारे लोकांनी त्यांच्या इतिहासापासून पाठ फिरवली आहे, असे आपण म्हणू शकतो.

आपण आपल्या पूर्वजांना विसरत आहोत, त्यांना परिभाषेत करण्याऐवजी आपण स्वतःला परिभाषेत करत आहोत, ज्यामुळे आपल्या पूर्वजांचे महत्त्व आपल्या जीवनात कालांतराने कमी होताना दिसत आहे.

इतिहासातील कोणतीही गोष्ट आता आपल्या काही कामाची नाही, अशी विचारधारा आजच्या माणसाची होत आहे, ज्यामुळे मौल्यवान असतानाही ऐतिहासिक वस्तू आणि वास्तू यांचे महत्त्व कमी होत आहे.

आपण आपल्या इतिहासापासून कितीही दूर गेलो, तरी त्याचे आपल्या जीवनात अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. असे म्हटले जाते की, जो व्यक्ती आपल्या इतिहासा सोबत जोडला गेलेला असतो, त्याचा त्याच्या वर्तमान काळाकडे पाहण्याचा एक प्रभावी दृष्टिकोन असतो, तसेच जो इतिहास जाणतो तो व्यक्ती त्याचे भविष्य रचू शकतो.

जसे की आपण जाणतोच, सनातन धर्म ज्याला आज आपण हिंदू धर्म म्हणून ओळखत आहोत, हा पृथ्वीवरील सर्वात जुना आणि पहिला धर्म आहे. हिंदू धर्माची संस्कृती आणि इतिहास नक्कीच इतर धर्मांच्या तुलनेत प्रभावी आहे.

हिंदू धर्माचा प्रभाव कमी करण्याचे अनेक प्रयत्न झाले, ज्याची सुरुवात आजपासून जवळ जवळ १००० ते १५०० वर्षांपूर्वी झाली. भारतावर विविध प्रशासकांनी हल्ले केले आणि भारतातील ऐतिहासिक वस्तू आणि वास्तू नष्ट करण्याचा प्रयत्न केला, ज्यांमध्ये एलेग्जेंडर, बाबर, मोहम्मद घोरी यांचा समावेश होता. कालांतराने या शासकांना हिंदूधर्मातील नेतृत्वाद्वारे विरोध करण्यात आला आणि हिंदू धर्माचे पुनर्वसन करण्यात आले, याचा उल्लेख आपल्याला अनेक पुस्तकांमध्ये आढळून येतो.

जर वर्तमान शिस्तबद्ध आणि प्रभावी बनवायचा असेल तर इतिहासासोबत एकरूप राहणे, फार महत्त्वाचे आहे.


इतिहास अभ्यासण्याचे फायदे

इतिहासाचा अभ्यास केल्याने अनेक फायदे मिळतात जे फक्त भूतकाळ समजून घेण्यापलीकडे विस्तारतात. इतिहास शिकण्याचे काही प्रमुख फायदे येथे आहेत:

1. मानवी वर्तन आणि समाज समजून घेणे

इतिहास मानवी वर्तन, सामाजिक संरचना आणि सांस्कृतिक गतिशीलतेबद्दल अंतर्दृष्टी प्रदान करतो. भूतकाळातील समाजांचा अभ्यास करून, आजच्या मानवी संवाद आणि समाजांना आकार देणारे घटक आपण अधिक चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकतो.

2. गंभीर विचार आणि विश्लेषण

ऐतिहासिक घटना, स्रोत आणि कथांचे विश्लेषण करण्यासाठी गंभीर विचार कौशल्ये आवश्यक आहेत. इतिहासाचे विद्यार्थी पुराव्याचे मूल्यांकन करणे, गुंतागुंतीच्या परिस्थितीचा अर्थ लावणे आणि तर्कशुद्ध निष्कर्ष काढणे शिकतात.

3. दृष्टीकोन आणि सहानुभूती

इतिहास शिकणे वेगवेगळ्या काळातील, संस्कृती आणि पार्श्वभूमीतील लोकांच्या अनुभवांबद्दल लोकांना उघड करून सहानुभूती आणि व्यापक दृष्टीकोन विकसित करण्यास मदत करते. हे विविध दृष्टिकोनांची प्रशंसा करण्याची क्षमता वाढवू शकते.

4. चुका आणि यशातून धडे

ऐतिहासिक चुका आणि यशाचा अभ्यास वर्तमान आणि भविष्यात निर्णय घेण्यास मार्गदर्शन करू शकते. काही क्रियांचे परिणाम समजून घेऊन, आम्ही अधिक माहितीपूर्ण निवडी करू शकतो.

5. सांस्कृतिक जागरूकता आणि सहिष्णुता

इतिहास संस्कृती आणि समाजांच्या विविधतेबद्दल अंतर्दृष्टी प्रदान करतो. हे ज्ञान सांस्कृतिक जागरूकता, सहिष्णुता आणि जीवनाच्या विविध मार्गांबद्दल सखोल प्रशंसा वाढवते.

6. सूचित नागरिकत्व

इतिहासाची मजबूत पकड व्यक्तींना सुजाण नागरिक होण्यासाठी सज्ज करते. हे त्यांना नागरी चर्चांमध्ये गुंतण्याची, वर्तमान घटनांचे संदर्भ समजून घेण्यास आणि लोकशाही प्रक्रियेत सहभागी होण्यास अनुमती देते.

7. पुनरावृत्ती प्रतिबंध

“जे इतिहासापासून शिकत नाहीत ते त्याची पुनरावृत्ती करण्यासाठी नशिबात असतात” ही म्हण भूतकाळातील चुका टाळण्यासाठी इतिहासाच्या अभ्यासाचे महत्त्व अधोरेखित करते.

8. प्रगतीसाठी प्रशंसा

ऐतिहासिक संघर्ष आणि प्रगतीबद्दल जाणून घेतल्याने मानवी हक्क, तंत्रज्ञान आणि शासन यासारख्या जीवनातील विविध पैलूंमधील प्रगती आणि सुधारणांबद्दल कौतुकाची भावना वाढू शकते.

9. सांस्कृतिक वारसा जतन

इतिहास परंपरा, कला, साहित्य आणि कालांतराने हरवलेल्या भाषांचे दस्तऐवजीकरण करून सांस्कृतिक वारसा जतन करण्यात मदत करतो.

10. स्त्रोत मूल्यमापन आणि संशोधन कौशल्ये

इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी विविध स्रोतांचे मूल्यमापन आणि अर्थ लावणे आवश्यक आहे, जे संशोधन कौशल्ये आणि विश्वसनीय आणि पक्षपाती माहितीमध्ये फरक करण्याची क्षमता विकसित करतात.

11. संप्रेषण कौशल्ये

निबंध लिहिणे, संशोधन सादर करणे आणि ऐतिहासिक विषयांवर चर्चा करणे संवाद कौशल्य वाढवते. विद्यार्थी जटिल कल्पना प्रभावीपणे आणि पटवून देण्यास शिकतात.

12. समस्या सोडवण्याची क्षमता

ऐतिहासिक घटनांचे विश्लेषण करताना अनेकदा मूळ कारणे आणि उपाय ओळखणे समाविष्ट असते. हे विविध विषयांवर लागू होणारी समस्या सोडवण्याची कौशल्ये विकसित करते.

13. ओळख आणि आपलेपणाची भावना

एखाद्याच्या स्वतःच्या सांस्कृतिक आणि पूर्वजांच्या इतिहासाबद्दल जाणून घेतल्याने ओळखीची आणि आपलेपणाची भावना वाढू शकते, व्यक्तींना त्यांच्या मुळाशी जोडता येते.

14. रोल मॉडेल्सपासून प्रेरणा

अशा ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वांचा अभ्यास केल्याने ज्यांनी प्रतिकूलतेच्या विरोधात महान गोष्टी साध्य केल्या त्या व्यक्तींना आव्हानांवर मात करण्यासाठी आणि त्यांच्या ध्येयांचा पाठपुरावा करण्यास प्रेरित करू शकतात.

15. अंतःविषय कनेक्शन

इतिहास हा साहित्य, कला, तत्त्वज्ञान आणि विज्ञान यासारख्या इतर विषयांशी जवळून जोडलेला आहे. इतिहास शिकण्यामुळे अंतःविषय अंतर्दृष्टी आणि कनेक्शन होऊ शकतात.

16. बौद्धिक कुतूहल

ऐतिहासिक चौकशी अनेकदा वैचित्र्यपूर्ण प्रश्न आणि गूढ निर्माण करते, बौद्धिक कुतूहल आणि शिक्षणाची आजीवन प्रेम वाढवते.

शिक्षण आणि वैयक्तिक अन्वेषणामध्ये इतिहासाचा समावेश केल्याने चांगल्या गोलाकार व्यक्तींना योगदान मिळू शकते जे जगाच्या गुंतागुंतीवर नेव्हिगेट करण्यासाठी, माहितीपूर्ण निर्णय घेण्यासाठी आणि समाजासाठी सकारात्मक योगदान देण्यासाठी अधिक सुसज्ज आहेत.


FAQ

1. इतिहासाचे जनक असे कोणाला म्हटले जाते ?

उत्तर : “हेरोडोटस” याना इतिहासाचे जनक म्हणून ओळखले जाते.

2. इतिहासाचे भाग किती व कोणते ?

उत्तर : प्राचीन इतिहास, मध्ययुगीन इतिहास आणि आधुनिक इतिहास हे इतिहासाचे तीन भाग आहेत.

3. आधुनिक इतिहासाचा कालखंड कोणता ?

उत्तर : इ.स. १४५० ते १८०० हा आधुनिक इतिहासाचा कालखंड मानला जातो.

4. जगाच्या इतिहासातील सर्वात जुनी संस्कृती कोणती ?

उत्तर : जगाच्या इतिहासात भारतीय संस्कृती ही सर्वात जुनी आणि प्रभावी संस्कृती मानली जाते.

अधिक लेख –

1. अर्थशास्त्र म्हणजे काय व याचे प्रकार कोणते ?

2. उदारीकरण म्हणजे काय ?

3. समाज म्हणजे काय ?

4. संविधान म्हणजे काय ?

Leave a Comment