इंस्टाग्राम म्हणजे काय व ते कसे वापरावे ?

दैनंदिन जीवनात आपण मोबाईल, टॅबलेट आणि संगणक अशा उपकरणांद्वारे विविध प्रकारच्या Application चा आढावा घेत असतो. इंस्टाग्राम हे जगात सर्वाधिक प्रमाणात वापरले जाणारे Application आहे. अधिकतर लोक इंस्टाग्रामचा उपयोग करत असल्यामुळे त्यांना या Application बद्दल माहीती आहे, परंतु ज्यांना या ॲप बद्दल काहीच कल्पना नाही, अशा लोकांना इंस्टाग्रामचा परिचय व्हावा, यासाठी आपण या लेखात इंस्टाग्राम संबंधित विविध माहितीचा आढावा सोप्या शब्दात घेणार आहोत,


इंस्टाग्राम म्हणजे काय ?

इंस्टाग्राम हा एक सुप्रसिद्ध असा सोशल मीडिया मंच आहे, ज्याची सुरुवात २०१० मध्ये झाली होती. केविन सिस्ट्रॉम आणि माईक क्रिएगर हे इंस्टाग्रामचे निर्माते आहेत, ज्यांनी इंस्टाग्राम तयार केले आणि ते लोकांपर्यंत पोहोचवले. इंस्टाग्राम चे वैशिठ्य पाहता लोक इंस्टाग्रामकडे अगदी वेगाने आकर्षित होऊ लागले, इंस्टाग्रामची ही प्रसिद्धी पाहता साल २०१२ मध्ये फेसबुक या नामांकित कंपनीने इंस्टाग्रामला ७ हजार कोटी रुपयांमध्ये विकत घेतले.

इंस्टाग्राम म्हणजे काय

इंस्टाग्राममध्ये युजर फोटो शेअर करणे, चॅटिंग करणे, एकमेकांच्या इंस्टाग्राम खात्याला फॉलो करणे अशी विविध कामे करू शकतो. जेव्हा एखादा व्यक्ती तुमच्या इंस्टाग्राम खात्याला फॉलो करतो, तेव्हा तुम्ही तुमच्या खात्यावर काहीही पोस्ट केले की त्याची सूचना ही तुमच्या Follower पर्यंत पोहोचते.

इंस्टाग्राममध्ये जितके फिचर आपण आज अनुभवत आहोत, तितके फीचर इंस्टाग्रामच्या सुरुवातीच्या काळात युजरसाठी उपलब्ध नव्हते, अगदी मोजक्याच फिचर सह इंस्टाग्राम युजर त्याचे इंस्टाग्राम खाते हाताळत होता.


इंस्टाग्राम मार्केटिंग म्हणजे काय ?

जेव्हा कंपनी अथवा संस्थेद्वारे त्यांच्या वस्तू व सेवांच्या (Product) मार्केटिंग अथवा जाहिरातींसाठी इंस्टाग्रामची निवड केली जाते, या प्रक्रियेला इंस्टाग्राम मार्केटिंग असे म्हटले जाते. अगदी सोप्या शब्दात सांगायचे झाले तर, इंस्टाग्रामच्या माध्यमातून वस्तू व सेवांचे (Product) केले जाणारे प्रमोशन अथवा मार्केटिंग म्हणजेच इंस्टाग्राम मार्केटिंग होय.

इंस्टाग्राम मार्केटिंगसाठी साधारणतः अशा इंस्टाग्राम खातेदाराची निवड केली जाते, ज्याच्या इंस्टाग्राम खात्यावर लाखोंच्या संख्येत Followers असतात.

अधिक Followers असलेल्या खातेदाराची निवड झाल्यानंतर साधरणतः दोन पद्धतींचा उपयोग करून वस्तू व सेवांची (Product) मार्केटिंग केली जाते. पहिली पद्धत म्हणजे खातेदार कंपनीच्या प्रॉडक्ट संबंधित विडिओ तयार करून पोस्ट करतो किंवा दुसरी पद्धत म्हणजे वस्तू व सेवा (Product) संबंधित एक बॅनर ऍड तयार करून ती खातेदाराच्या खात्यावर पोस्ट केली जाते.

खातेदार कंपनीची जाहिरात करण्यासाठी हजारो ते लाखो रुपयांपर्यंतची रक्कम आकारू शकतो. वर्तमान काळात अनेक लोक इंस्टाग्रामचा उपयोग करून इंस्टाग्राम मार्केटिंगच्या सहाय्याने घरबसल्या हजारो लाखो रुपये कमवत आहेत.


इतिहास

इंस्टाग्राम ची सुरुवात २०१० मध्ये केविन आणि माईक यांच्याद्वारे “Burbn” या नावाने झाली होती. केविन आणि माईक यांनी तयार केलेला हा अँप काहीसा “Foursquare” नामक अँप प्रमाणे होता. “Foursquare” ही देखील एक सोशल नेटवर्किंग साईट आहे, ज्याचा उपयोग व्यावसायिक उद्देशाने अधिक केला जातो. आपण तयार केलेला अँप हा “Foursquare” प्रमाणे आहे, हे लक्षात येताच माईक आणि केविन ने “Burbn” मध्ये फोटो शेअरिंग (Photo Sharing) चा नवीन फिचर ऍड केला. या व्यतिरिक्त त्यांनी अँप चे नाव बदलून इंस्टाग्राम असे ठेवले. “Instant Camera and Telegram” हे इंस्टाग्राम चे संक्षिप्त रूप असल्याचे सांगितले जाते.

१६ जुलै २०१० संध्याकाळी ०५:२६ मिनिटे ही ती वेळ होती, जेव्हा इंस्टाग्रामवर जगातील पहिली पोस्ट अपलोड करण्यात आली. ही पोस्ट इंस्टाग्राम चे निर्माते माईक यांनी केली होती. पोस्ट स्वरूपात त्यांनी एक फोटो अपलोड केला होता.

६ ऑक्टोबर २०१० मध्ये इंस्टाग्राम ISO साठी तयार करण्यात आला, तत्पूर्वी इंस्टाग्राम केवळ Android Version  मध्येच चालवता येत होते.

इंस्टाग्रामची वाढती प्रसिद्धी पाहता इंस्टाग्राम निर्मात्यांनी इंस्टाग्रामचा विस्तार करण्याचा विचार केला आणि यासाठी त्यांनी फेब्रुवारी २०११ मध्ये ७ दशलक्ष डॉलरची गुंतवणूक विविध गुंतवणूकदारांकडून मिळवली. ३ एप्रिल २०१२ मध्ये Android डिव्हाईससाठी इंस्टाग्राम चे नवीन व्हर्जन प्रकाशित करण्यात आले. ९ एप्रिल २०१२ मध्ये फेसबुक कंपनीद्वारे इंस्टाग्रामला १ बिलियन डॉलर (1 Billion $) मध्ये विकत घेण्यात आले.

जून २०१५ दरम्यान इंस्टाग्रामचा उपयोग Window OS मध्ये देखील करता यावा, यासाठी इंस्टाग्राम चे वेबसाईट पृष्ठ (Layout) तयार करण्यात आले. २०१६ येता-येता इंस्टाग्राम ची प्रसिद्ध इतकी वाढली होती, की इंस्टाग्रामच्या युजर्सची संख्या करोडोंच्या घरात पोहोचली होती.

४ मे २०१७ मध्ये इंस्टाग्रामद्वारे Filter Image अपलोड करण्याचा फिचर प्रकाशित केला गेला. २०१८ मध्ये ऍडम मोस्सेरी यांची इंस्टाग्राम हेड मधून निवड करण्यात आली.

२०२० मध्ये इंस्टाग्राम ने विडिओ कॉलिंग (Video Calling), आणि रील्स (Reels) सारखे सुप्रसिद्ध फिचर प्रकाशित केले, ज्यानंतर इंस्टाग्रामची प्रगती दुप्पट गतीने होऊ लागली.


इंस्टाग्राम वैशिष्ट्ये

इंस्टाग्राम च्या ५ प्रसिद्ध वैशिट्यांचा (Features) आढावा आपण खालील प्रमाणे घेणार आहोत,

1. फिल्टर्स (Filters)

इंस्टाग्राम चे फोटो फिल्टर हे इंस्टाग्राम चे मुख्य आकर्षण समजले जाते. इंस्टाग्रामद्वारे या फिचरमध्ये फोटोसाठी ४० विविध प्रकारच्या फिल्टर्सचा समावेश केला गेला आहे. प्रत्येक फिल्टरद्वारे फोटोसाठी एक वेगळा आणि आकर्षित लूक (Look) आणि फील (Feel) तयार करता येतो.

2. विडिओ पोस्ट (Video Post)

जेव्हा केविन यांनी इंस्टाग्रामची सुरुवात केली होती, तेव्हा पासून म्हणजेच अगदी सुरुवातीच्या काळापासून विडिओ पोस्ट हा फिचर इंस्टाग्राममध्ये वापरला जात आहे. या फिचरद्वारे युजर २ सेकंदांपेक्षा अधिक आणि १५ सेकंदांपेक्षा कमी कालावधीचा विडिओ पोस्ट करू शकतो. विडिओ फाईल ही MP4 अथवा MOV फॉरमॅटमध्ये असणे गरजेचे आहे. इंस्टाग्राम खात्यावर विडिओ पोस्ट केल्याने फॉलोवर्स वाढण्याची दाट शक्यता असते.

3. स्टोरी (Story)

२०१७ मध्ये इंस्टाग्रामद्वारे हा फिचर प्रकाशित केला गेला. या फिचरद्वारे आपण आपल्या दिवसातही सर्व क्षण हे सामायिक करू शकतो. आपण स्टोरीद्वारे जे फोटो शेअर करतो, ते ठराविक कालावधीसाठीच दृश्यमान असतात. आपले जे फॉलोवर्स आहेत, त्यांच्या सॊबत आपल्या जीवनातील काही ठराविक क्षण वाटण्यासाठी या फिचर चा उपयोग करता येतो.

4. इंस्टाग्राम लाईव्ह (Live)

इंस्टाग्राम लाईव्हद्वारे युजर रिअल टाइममध्ये विडिओ प्रसारित करू शकतो. एकाच वेळी युजर हजारो लोकांसोबत बोलू शकतो. वर्तमान काळात संपूर्ण जगात दररोज १०० दशलक्षपेक्षा (1 Million) अधिक इंस्टाग्राम खाते धारक या फिचरचा उपयोग करत आहे. ऑगस्ट २०१७ मध्ये इंस्टाग्राम ने हा फिचर प्रकाशित केला होता आणि प्रकाशित केल्यापासूनच या फिचरला उत्तम प्रतिसाद मिळताना दिसत आहे.

5. IGTV

IGTV ला “Instagram TV” असे देखील म्हटले जाते. इंस्टाग्राम चे हे फिचर काहीसे युट्युब सारखे आहे. IGTV द्वारे इंस्टाग्राम युजर स्वतःचे एक चॅनेल तयार करू शकतो, जसे युट्युबमध्ये करता येते अगदी तसेच. या चॅनेलवर युजर १५ सेकंड ते ६० मिनिटे इतक्या कालावधीचा विडिओ तयार करून अपलोड करू शकतो. या फिचरद्वारे इंस्टाग्राम युजरला विडिओ स्वरूपातील साहित्य निर्माण करण्यासाठी प्रोत्साहित केले जात आहे.


इंस्टाग्राम कसे वापरावे ?

इंस्टाग्राम वापरण्यापूर्वी आपल्याला आपले इंस्टाग्राम खाते खोलावे लागते, यासाठी आपल्याकडे मोबाईल क्रमांक किंवा ई-मेल आयडी या दोघांपैकी एक गोष्ट असणे गरजेचे आहे. मोबाईल नंबर अथवा ई-मेल आयडीद्वारे रजिस्टर केल्यानंतर आपल्या आपले नाव, डिस्क्रिप्शन, प्रोफाइल फोटो अशा गोष्टींसाठी कृति करावी लागते.

एकदा का आपले इंस्टाग्राम खाते तयार झाले की, आपल्या आवडती व्यक्तिमत्वाला जसेकी अभिनेता, राजकारणी, यांना आपण फॉलो करू शकतो. सर्वात महत्वाची गोष्ट अशी की आज जवळजवळ प्रत्येक प्रसिद्ध व्यक्तिमत्व हे इंस्टाग्राम वापरत आहे.

या व्यतिरिक्त इंस्टाग्राममध्ये आपल्याला आपले खाते वैयक्तिक (Private) करण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला जातो. आपण आपले खाते वैयक्तिक (Private) केल्यास आपल्या व्यतिरिक्त आपल्या पोस्ट इतर तिसरा व्यक्ती पाहू शकत नाही.  इंस्टाग्राममध्ये आपण विडिओ आणि फोटो अशा दोन्ही स्वरूपात साहित्य (Content) पोस्ट करू शकतो.

जेव्हा लोक फोटो अथवा विडिओ स्वरूपी कन्टेन्टवर दोन वेळा टॅप करतात, तेव्हा एक हृदयाच्या “❤”आकाराचे चिन्ह उत्पन्न होते, या प्रक्रियेला लाईक करणे असे म्हटले जाते. एखाद्या पोस्टला जितके जास्त लाईक मिळतात, तितकी त्या पोस्टची लोकप्रियता आहे असे समजले जाते.

जर आपल्या इंस्टाग्राम खात्यावर फॉलो करणाऱ्यांची संख्या ही हजारो लाखोंच्या घरात असेल तर आपल्याला विविध कंपनींकडून त्यांच्या वस्तू व सेवा (Product) प्रमोशनसाठी ऑफर्स येतात, प्रमोशनच्या मोबदला आपल्याला कंपनींकडून ठराविक रक्कम दिली जाते. आज जगभरातील बहुसंख्य लोक हे इंस्टाग्रामद्वारे घरबसल्या हजारो रुपये कमवत आहेत.

आपण स्वतःचे इंस्टाग्राम पेज देखील तयार करू शकतो, हे काहीसे फेसबुक पेज प्रमाणे असते. पेज म्हणजे एक प्रकारचा ग्रुप होय. इंस्टाग्राम पेज आपण कोणत्याही ठराविक विषयावर तयार करू शकतो व लोकांचा एक मोठा समूह तयार करू शकतो.

आपण आपल्या फ्रेंड लिस्टमधील (Friend List) मित्रांना मेसेज करणे, टॅग करणे, फोटो शेअर करणे या कृती पार पाडू शकतो. तसे पाहायला गेलो तर इंस्टाग्राम इंटरफेस (Interface) हे युजर फ्रेंडली (User Friendly) असल्यामुळे तो लगेच लोकांच्या लक्षात येतो, या व्यतिरिक्त काही सेटिंग्स (Setting) करून आपण आपल्या मातृभाषेत देखील इंस्टाग्राम हाताळू शकतो, ज्यामुळे आपल्यासमोर इंस्टाग्राम वापरताना इतक्या अडचणी येत नाहीत.


इंस्टाग्राम डाउनलोड

पूर्वी म्हणजे इंस्टाग्रामची सुरुवात झाली होती, तेव्हा इंस्टाग्राम हे केवळ Android युजर्ससाठीच उपलब्ध होते, परंतु इंस्टाग्रामची वाढती प्रसिद्धी पाहता ६ ऑक्टोबर २०१० मध्ये ISO व्हर्जन तर २०१२ मध्ये डेस्कटॉप व्हर्जन लॉन्च करण्यात आले. या व्यतिरिक्त आपण स्वतःच्या इंस्टाग्राम खात्याचा आढावा वेबसाईटच्या माध्यमातूनही घेऊ शकतो.


तथ्य (Facts)

 • फेसबुक(Facebook), युट्युब (Youtube), व्हाट्सअप (Whats App), वीचॅट (wechat) आणि फेसबुक मेसेंजर (Facebook Messenger) नंतर इंस्टाग्राम (Instagram) हे जगातील सहाव्या क्रमांकाचे सर्वाधिक प्रमाणात वापरले जाणारे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे.
 • २०२१ च्या एका रिपोर्टनुसार अमेरिकेत इंस्टाग्राम वेबसाईटला जगात सर्वाधिक वेळा भेट दिली गेली आहे.
 • इंस्टाग्राम हा “Apple App store” वर जगात ५ व्या क्रमांकाचा सर्वाधिक वेळा डाउनलोड केला गेलेला अँप आहे.
 • Adam Mosseri” हे  इंस्टाग्राम चे वर्तमानकालीन मुख्य कार्यकारी अधिकारी आहे.
 • वर्तमान काळात इंस्टाग्राममध्ये ४५० पेक्षा अधिक कर्मचारी काम करत आहेत.
 • ६ ऑक्टोबर २०१० मध्ये इंस्टाग्राम वर जगातील पहिली पोस्ट केली गेली होती.
 • २०२० मध्ये इंस्टग्रामने एकूण १५ हजार कोटी रुपये कमावले होते.
 • इंस्टाग्रामवर दर दिवशी ५०० दशलक्ष इतके ऍक्टिव्ह युजर्स (Active Users) असतात.
 • “Cristiano Ronaldo” नामक फुलबॉल पट्टूचे इंस्टाग्रामवर जगात सार्वधिक Followers आहेत. Cristiano Ronaldo यांच्या इंस्टाग्राम Followers ची एकूण संख्या ही ४४०.४१ दशलक्ष इतकी आहे.
 •  २०० दशलक्षपेक्षा अधिक व्यावसायिक खाते इंस्टाग्रामवर आहे.
 • इंस्टाग्रामवर सर्वाधिक प्रमाणात लाईक केलेला फोटो हा एका अंड्याचा आहे. या फोटोला ५५ दशलक्षपेक्षा लाईक मिळाले आहेत.
 • इंस्टाग्राम चे सर्वाधिक वापरकर्ते भारत आणि अमेरिका या देशात आहेत.

FAQ

1. इंस्टाग्राम चे संस्थापक कोण ?

उत्तर : केविन सिस्ट्रॉम हे इंस्टाग्राम चे संस्थापक आहेत, जे पेशाने एक कॉम्पुटर प्रोग्रॅमर (Computer Programmer) आहेत.

2. इंस्टाग्राम चे मुख्य कार्यलय कोठे आहे ?

उत्तर : अमेरिकेतील Menlo Park, CA येथे इंस्टाग्राम चे मुख्य कार्यालय आहे.

 3. इंस्टाग्रामचा सर्वात सुप्रसिद्ध फिचर (Feature) कोणता ?

उत्तर : २०२० मध्ये प्रकाशित केलेला “Instagram Reels” हा इंस्टाग्राम चा एक सुप्रसिद्ध फिचर आहे.

4. इंस्टाग्रामची सुरुवात कोणत्या वर्षी झाली ?

उत्तर : इंस्टाग्राम ची सुरुवात २०१० मध्ये “Burbn” या नावाने झाली आणि कालांतराने याचे नाव बदलून “Instagram” असे ठेवण्यात आले.

5. इंस्टाग्राम युजर्सची एकूण संख्या किती ?

उत्तर : एका जागतिक रिपोर्टनुसार जगात इंस्टाग्राम युजर्सची एकूण संख्या ही १ बिलियन इतकी आहे.

6. इंस्टाग्राम वर सर्वाधिक वापरला जाणारा हॅशटॅग (#) कोणता ?

उत्तर : “#love” हे इंस्टाग्रामवर सर्वाधिक प्रमाणात वापरले जाणारे हॅशटॅग आहे, जे २ बिलियनपेक्षा अधीक वेळा वापरले गेले आहे.

7. फेसबुक ने इंस्टाग्रामला किती पैशांमध्ये विकत घेतले ?

उत्तर : फेसबुक ने इंस्टाग्रामला २०१२ मध्ये १ बिलियन डॉलर मध्ये विकत घेतले होते.

अधिक लेख –

1. व्हाट्सअप माहिती मराठी

2. फेसबुकचा शोध कोणी लावला ?

3. युट्युब चा शोध कोणी लावला ?

4. Social Media म्हणजे काय ?

Leave a Comment