Influencer म्हणजे काय ? | Influencer Meaning in Marathi

सोशल मीडिया एक असे प्लॅटफॉर्म आहे, ज्यावर आपण आपल्या दैनंदिन जीवनातील बराचसा वेळ घालवत असतो. प्रत्येक व्यक्ती चा सोशल मीडिया वापरण्याचा हेतु हा नक्कीच वेगळा असतो. अनेक लोक म्हणजे मनोरंजनासाठी तर, अनेक ज्ञान मिळवण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करत असतात.

कोणत्याही हेतूने का असेना, परंतु सोशल मीडिया वापरत असताना Influencer हा शब्द आपल्या कानावर कधी ना कधी नक्कीच आला असेल, आपल्यापैकी अधिक तर लोकांना या शब्दाचा अर्थ माहीत नसेल, कदाचित माहीत असेलही परंतु व्यवस्थित नाही, म्हणून या लेखात आपण influencer meaning in Marathi पाहणार आहोत,


Influencer म्हणजे काय ? (influencer Meaning in Marathi)

इन्फ्ल्यून्सर (influencer) म्हणजे अशी व्यक्ती किंवा व्यक्तिमत्त्व जे, स्वकौशल्याने लोकांना किंवा लोकांच्या समुदायाला ठरावीक गोष्टीकडे प्रभावित करू शकते.

थोडक्यात सांगायचे झाले तर influence म्हणजे प्रभाव आणि influencer म्हणजे प्रभावित करणारे व्यक्तिमत्व.

जसे की क्रिस्तियानो रोनाल्डो हा एक जगप्रसिद्ध फुटबॉल पटू आहे, ज्याचे संपूर्ण जगात चाहते आहेत. क्रिस्टियानो च्या फुटबॉल खेळण्याच्या कौशल्यामुळे आज अनेक लोक फुटबॉल खेळायला पसंती देत आहेत. इथे क्रिस्तियानो हा एक इन्फ्ल्यून्सर आहे, जो स्वतःच्या फुटबॉल खेळण्याच्या कौशल्य द्वारे लोकांना फुटबॉल कडे प्रभावित म्हणजे influence करत आहे.

influencer व्यक्तिमत्त्व कोणत्याही क्षेत्रातील असू शकते, जसे की क्रिकेट, मोडेलिंग, Singer, IAS ऑफिसर, इंजिनीयर आणि अधिक.


सोशल मीडिया Influencer म्हणजे काय ?

गेल्या दहा वर्षात सोशल मीडियाचा वापर आणि महत्त्व अगदी झपाट्याने वाढताना दिसत आहे. 2019 च्या जानेवारी महिन्यात तयार केलेल्या एका रिपोर्टनुसार, वर्तमान काळात तीन अब्ज पेक्षा जास्त लोक म्हणजे जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी 43 टक्के लोकसंख्या सोशल मीडियाचा वापर करत आहे.

सोशल मीडियाचा अधिक वापर लोकांद्वारे केला जात असल्यामुळे सोशल मीडियाचा प्रभाव लोकांच्या जीवनावर पडताना आपल्याला दिसत आहे.

लोक आपल्या जीवनातील महत्वाचे निर्णय घेण्याकरिता सोशल मीडिया इन्फ्ल्यून्सर च्या मार्गदर्शनाला प्राधान्य देताना दिसत आहेत. आता इथे एका महत्त्वाच्या प्रश्नाची उत्पत्ती होते, ते म्हणजे सोशल मीडिया इन्फ्ल्यून्सर म्हणजे काय ?

तर सोशल मीडिया इन्फ्ल्यून्सर म्हणजे असे लोक जे स्वतःच्या ज्ञानाचा आणि कौशल्यांचा वापर करून सोशल मीडियावर Text, Video आणि Images स्वरूपात साहित्य तयार करतात. हे साहित्य कोणत्याही क्षेत्रातील असू शकते, जसे की स्पोर्ट, एज्युकेशन, सिंगिंग.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे सोशल मीडियाचा वापर करून Influencer अगदी क्षणार्धातच हजारो लाखो लोकांपर्यंत पोहोचू शकतो. यात इन्फ्ल्यून्सर ला कोणत्याही प्रकारचा खर्च येत नाही.

इंस्टाग्राम, फेसबुक, ट्विटर, यूट्यूब ह्या काही सोशल मीडिया साइट आहेत, ज्यांचा अधिक वापर influencers द्वारे केला जातो.


Influencer मार्केटिंग म्हणजे काय ?

influencer मार्केटिंग हा एक सोशल मीडिया मार्केटिंग चा प्रकार आहे, ज्याला influence मार्केटिंग म्हणून देखील ओळखले जाते.

जसे की आपण जाणतो, आज जवळजवळ प्रत्येक क्षेत्र इंटरनेट आणि तंत्रज्ञानाने व्यापले गेले आहे, ज्यामुळे अनेक अशी कामे आहे, जी आपण घरबसल्या पार पाडू शकतो. जसे की ऑनलाईन खरेदी विक्री.

ग्राहक घरबसल्या हव्या त्या वस्तूंची खरेदी विक्री स्वस्त दरात करू शकतो, ग्राहकाच्या सोयीकरिता व्यावसायिकही त्यांचा व्यवसाय ऑनलाइन आणत आहेत.

अनेक कंपन्या जेव्हा त्यांचे नवनवीन प्रॉडक्ट लॉन्च करतात, तेव्हा त्या प्रॉडक्टचे प्रमोशन करण्याकरिता कंपनी टीव्हीवर जाहिरात देण्याऐवजी influencer मार्केटिंगचा अवलंब करणे पसंत करतात, ज्यामध्ये कंपनी स्वतःच्या प्रॉडक्टचे प्रमोशन अथवा जाहिरात एखाद्या इन्फ्ल्यून्सर द्वारे करून घेते आणि प्रॉडक्ट ची माहिती इंटरनेट अथवा सोशल मीडिया वर प्रसारित करते.

यामुळे कंपनीला डायरेक्ट Sell जनरेट होण्यास मदत मिळते. स्वतःच्या प्रोडक्ट चा खप वाढवण्यासाठी इन्शुरन्सर मार्केटिंग हा एक स्वस्त आणि उत्तम उपाय मानला जातो.

आपण जेव्हा एखादे फेसबुक पेज अथवा यूट्यूब चैनल ला फॉलो करत असतो, तेव्हा फेसबुक पेज अथवा यूट्यूब चैनल ऍडमिन द्वारे विविध प्रोडक्टची जाहिरात केलेली दिसून येते, यालाच तर मार्केटिंग म्हटले जाते.


Influencer किती प्रकार चे असतात ?

1. सेलिब्रिटी influencer

सेलिब्रिटी इन्फ्ल्यून्सर हे व्यक्तिमत्त्व एखादे फिल्म ऍक्टर, कलाकार, खेळाडू, गीतकार, चित्रकार असू शकते. सेलिब्रिटी हे व्यक्तिमत्त्व आपल्या साधारणता टीव्ही किंवा फ्लेक्स मध्ये दिसून येते.

सेलिब्रिटी इन्फ्ल्यून्स हे सोशल मीडियावर अधिक ऍक्टिव्ह असतात, असे अनेकदा निदर्शनास आले आहे. सेलिब्रिटी इन्फ्ल्यून्सर हा सहसा त्यांच्या सोशल मीडिया अकाउंट किंवा अकाउंट वरील फॉलोवर्स चा उपयोग विविध कंपनीच्या प्रचारासाठी करतात. ज्या मोबदला ते कंपनीकडून ठराविक रक्कम आकारतात.

अनेकदा कंपनीकडून influencer ला मिळणारी रक्कम सोशल मीडिया फॉलोवर्स च्या संख्येवर देखील अवलंबून असते, म्हणजे जितके जास्त फॉलोवर्स तितकी जास्त रक्कम जाहिरातीसाठी इन्फ्ल्यून्सर द्वारे आकारली जाते.

2. व्यवसायिक अथवा उद्योगपती इन्फ्ल्यून्सर

व्यवसायिक अथवा उद्योगपती इन्फ्ल्यून्सर यांना इंडस्ट्रियल लीडर म्हणून देखील ओळखली जाते, ज्यांना त्यांच्या ज्ञानामुळे आणि कौशल्यामुळे समाजात मानाचे स्थान असते.

उदाहरणार्थ मुकेश अंबानी आणि रतन टाटा यांना वर्तमान काळात भारतातील इंडस्ट्रियल लीडर म्हणून ओळखले जाते, हे उद्योगपती सोशल मीडिया अथवा व्यवसाय वगळता इतर ठिकाणी ॲक्टिव्ह नसते, तरी अशा व्यक्तिमत्त्वांना फॉलो करणाऱ्यांची संख्या समाजात भरपूर आहे.

3. साहित्य निर्माते (content creator)

कंटेंट क्रियेटर हे इंटरनेटच्या जगातील एक महत्त्वाचे घटक असतात, जे ऑनलाईन रित्या Text, Video, Images, Memes, आणि Gif स्वरुपात साहित्य तयार करत असतात, जसे की broadcaster, blogger, youtuber, blogger आणि अधिक.

content creator अथवा साहित्य निर्माते हे ही सोशल मीडियावर सतत Active असून, ते स्वतःची एक Community अथवा Follower’s चे नेटवर्क तयार करत असतात, तयार केलेल्या कम्युनिटीवर साहित्य निर्मात्या त्यांनी तयार केलेले साहित्य प्रसारित केले जातात.

अनेकदा Content मध्ये विविध कंपनीचे प्रोडक्ट चे देखील प्रमोशन दिसून येते. वर्तमान काळात हर्ष अग्रवाल हे कन्टेन्ट क्रिएटर आहेत, जे सध्या ब्लॉगिंग क्षेत्रात कार्यरत आहेत.

4. लहान स्तरीय इन्फ्ल्यून्सर (Micro Influencer)

ज्या influencer चे सोशल मीडियावर 50 ते 70 हजारांच्या घरात फॉलोवर्स असतात, त्यांना लहान स्तरीय इन्फ्ल्यून्सर म्हणून ओळखले जाते.

लहाने स्तरीय इन्फ्ल्यून्सर त्यांच्या क्षेत्रात महारती आहेतच, असे नसते, तर अनेकदा एकंदरीत होणाऱ्या वायरल पोस्टमुळे त्यांचे नाव सोशल मीडियावर जळकते.

मायक्रो इन्शुरन्सर चे सोशल मीडियावर बेसिक अकाउंट असते, जे मनोरंजनासाठी अथवा वैयक्तिक वापरासाठी तयार केलेले असते, प्रसिद्धी मिळवणे अथवा फॉलोवर्स जमवणे असा कोणत्याही प्रकारचा उद्देश मायक्रो इन्शुरन्स चा नसतो.


सोशल मीडिया इन्फ्ल्यून्सर कसे बनावे ?

सोशल मीडिया हे आधुनिक जगातील असे साधन आहे, जे एकाच वेळी लाखो – करोडो लोकांना एकसाथ जोडण्याची क्षमता ठेवते. तसेच सोशल मीडिया वापरण्यात सोप्पे आणि मोफत असल्याने, कोणीही व्यक्ती याचा वापर करू शकतो.

सोशल मिडियाची ही खासियत पाहता अनेक लोक सोशल मीडिया इन्फ्ल्यून्सर बनण्याची तीव्र इच्छा बाळगतात सोशल मीडिया इं सिलेन्सर कसे बनावे या संबंधित माहिती आपण खालील प्रमाणे पाहणार आहोत,

1. सोशल मीडिया इन्फ्ल्यून्सर बनण्याची प्रक्रिया ही विषय निवडण्यापासून सुरू होते. सोशल मीडियावर आपल्याला साधारणत Content तयार करायचा असतो. आपण जो Content तयार करणार आहोत, तो कोणत्या विषयावर अथवा क्षेत्र संबंधित असेल, याचा निश्चय करणे फार गरजेचे असते.

विषय निवडताना आपल्याला त्या क्षेत्राशी संबंधित कोणती कौशल्ये अवगत आहेत, त्या विषयात अथवा क्षेत्रात आपले मन लागते का, आणि त्या क्षेत्रात आपण समाधानी आहोत का, अशा अनेक गोष्टींचा विचार करून विषय निवडायचा असतो.

इतर व्यक्ती एखाद्या क्षेत्रात सोशल मीडियावर ट्रेनिंगला आहे, म्हणून मी देखील तोच विषय अथवा क्षेत्र निवडेल, ही पद्धत अगदी चुकीची आहे. या पद्धतीचा वापर करून निवडलेल्या क्षेत्रात यशस्वी होण्याची शक्यता फार कमी असते.

2. विषय निवडल्यावर दुसरा टप्पा येतो, तो म्हणजे स्वतः चे सोशल मीडिया अकाउंट, ग्रुप आणि पेज तयार करण्याचा, जे अगदी मोफत असते. इथे केवळ अकाउंट उघडून भागात नाही, तर अकाउंट आणि प्रोफाईलला योग्यरीत्या Optimize देखील करावे लागते.

फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर हे काही प्रसिद्ध सोशल मीडिया site’s आहेत, ज्यावर आपण आपले अकाऊंट तयार करू शकतो.

खरा आणि सुशोभित Biodata तयार करणे, योग्य प्रोफाइल सेट करणे, कव्हर फोटो सेट करणे, अकाउंटला चांगले Optimize करण्याचे मार्ग आहेत.

3. अकाउंट तयार झाल्यावर वेळेत ती content तयार करून इंटरनेटवर पोस्ट करण्याची, परंतु Content तयार करण्याआधी, आपल्या audience ला काय हवे आहे, आणि किती हवे आहे, याबाबत रिसर्च करणे गरजेचे असते. कारण अशाच लहान लहान रिसर्चमुळे आपल्या द्वारे तयार केलेल्या Content वरील engagement वाढते, आणि स्ट्रॉंग community बनण्यास मदत मिळते.

4. लोकांना स्वतःच्या सोशल मीडिया नेटवर्कमध्ये आकर्षित करण्यासाठी दर दिवशी नवनवीन Content तयार करून पोस्ट करा. दर दिवशी Content तयार करण्यासोबतच तुमच्या प्रेक्षकांच्या संपर्कात रहा, जसे की सोशल मीडियावर लाईव्ह जाणे, प्रेक्षकां सोबत चॅटिंग करणे इत्यादी. यामुळे आपले Followers आपल्या कन्टेन्टवरती ॲक्टिव राहतील.

तर या काही लहान लहान गोष्टी आहेत, ज्या आपल्याला एक उत्तम सोशल मीडिया influencer बनण्यास मदत करतात.

Leave a Comment