स्वतंत्र दिन ( १५ ऑगस्ट ) माहिती | Independence Day Information in Marathi

भारतात विविध जाती-धर्माचे लोक राहत असल्यामुळे, येथे विविध धर्माचे अनेक सण आणि समारंभ साजरे केले जातात. असाच एक दिवस भारतात साजरा केला जातो, हा दिवस कोणताही सण किंवा उत्सव नाही, पण एखाद्या सण पेक्षा कमी ही नाही, तो दिवस म्हणजे १५ ऑगस्ट. आपण १५ ऑगस्ट हा दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करतो. भारताला १५ ऑगस्ट १९४७ मध्ये इंग्रज आणि त्यांच्या जुलमी राजवटीपासुन स्वातंत्र्य मिळाले, ह्या मुळेच या दिवसाला स्वातंत्र्य दिवस देखील म्हटले जाते.


15 ऑगस्ट चा इतिहास

१९४७ सालचा १५ ऑगस्ट हा स्वतंत्र दिवस पाहण्यासाठी न केवळ अनेक वर्षांचा कालावधी लागला, तर अनेक प्राण्यांची आहुती देखील देण्यात आली, अशा या १५ ऑगस्ट चा इतिहास आपण खालीलप्रमाणे अगदी थोडक्यात  पाहणार आहोत,

इंग्रजांनी भारतावर तब्बल १५० वर्षे राज्य केले, असे म्हटले जाते.  याचा अर्थ १८ व्या शतकापासून ते १९४७ पर्यंत, परंतु अनेकांना कल्पना नसेल की, इंग्रज त्या पूर्वीपासून भारतावर त्यांचे नियम लादण्याचा प्रयत्न करत होते.

१६ व्या शतकात ब्रिटनची राणी एलिझाबेथ च्या स्वाक्षरी निशी ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली आणि १६० च्या दरम्यान औद्योगीकरण आणि व्यापार वाढीमुळे ईस्ट इंडिया कंपनी भारतात दाखल झाली. भारतात तेव्हा राजेशाही होती. भारतात अमाप धन आहे, परंतु येथील राजांचे आपापसात जुळत नाही हे इंग्रजांच्या लक्षात आहे.

१६४० ला मद्रासमध्ये आणि नंतर १६९० च्या सुमारास कोलकत्ता अशाप्रकारे कंपनी च्या नावाखाली आणि व्यापाराच्या नावाखाली इंग्रजांनी हळूहळू संपूर्ण भारतातस्वतःचा विस्तार केला होता.

१६०० च्या दशकात मराठे आणि मोगल यांच्यात सतत युद्धे होत होती. इंग्रजांचा हेतू योग्य नाही हे छत्रपती शिवाजी महाराजांना समजले, त्यानंतर मराठयांद्वारे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली इंग्रजांची हाकलपट्टी सुरू झाली, त्यामुळेच १६०० व्या शतकात इंग्रजांना स्वतःचा इतका विस्तार करता आला नाही.

दुसरीकडे मराठे विरुद्ध मुघल हे युद्ध चालू होते. ३ मार्च १७०७ मध्ये मोगल बादशहा औरंगजेबाच्या मृत्यूनंतर औरंगजेबच्या सरदारांमध्ये सत्तेसाठी लालसा निर्माण झाली, सोबतच भारताच्या राजकारणात अस्थिरता जाणवू लागली, त्यामुळेच इंग्रजांचे लक्ष व्यापाराकडे कमी आणि भारतातील राजकारणाकडे जास्त वळू लागले.

१७५७ मध्ये आणि १७६४ मध्ये झालेल्या प्लासी आणि बक्सार च्या युद्धात इंग्रजांचा विजय झाला, ज्यामुळे इंग्रजांची भारतात सत्ता स्थापन झाली.

अठराव्या शतकात संपूर्ण भारतात निजाम, मराठा आणि हैदरअली या तीन बलाढ्य सत्ता होत्या, प्रथम इंग्रजांनी मराठा आणि निजाम ह्यांच्ग्या मदतीने हैदर-अली ची सत्ता संपुष्टात आणली आणि न केवळ संपुष्टात आणली तर नष्ट  देखील केली.

हैदरअलीचे साम्राज्य नष्ट झाल्यानंतर, १७७५ ते १८१८ या कालावधीत इंग्रज विरुद्ध मराठे असे तीन महाभयानक युद्धे झाली, ह्यातील पहिल्या युद्धात महादजी शिंदे यांनी इंग्रजांचा पराभव केला, दुसऱ्या युध्दात इंग्रजांनी मराठ्यांचा पराभव केला आणि तिसऱ्या युद्धात दुसरा बाजीराव यांचा पराभव करून इंग्रजांनी मराठी सत्तेवर विजय मिळवला आणि त्या जागी आपली ब्रिटिश सत्ता स्थापन केली.

मराठी सत्तेवर विजय मिळवल्यानंतर भारतात इतर ठिकाणी ही इंग्रजांनी स्वतःचा विस्तार केला, तेव्हा मराठ्यांच्या सत्ते नंतर, सिख वगळता भारतात कोणीच स्थानिक राज्यकर्ते उरले नव्हते. त्या काळी शिखांचे राजे महाराजा रणजीत सिंह होते, जोपर्यंत महाराजा रंजितसिह यांचे राज्य होते, तोपर्यंत शिखांवर कोणालाच राज्य करता आले नाही. १८३९ मध्ये महाराजा रणजीत सिंह यांच्या मृत्यूनंतर सिंहासनासाठी मतभेद सुरू झाले आणि याचाच फायदा घेत इंग्रजांनी सिख सत्तेवर देखील वर्चस्व प्रस्थापित केले.

साल १८५६ येता येता इंग्रजांनी जवळजवळ संपूर्ण भारतावर सत्ता स्थापन केली होती आणि स्वतःचे एकछत्री अंमल प्रस्थापित केले होते.

१८५७ चा काळ हा भारत स्वातंत्र्यासाठी सर्वात महत्त्वाचे मानला जाते, कारण ह्याच साली म्हणजे १८५७ मध्ये मेरठ या ठिकाणी स्वतंत्र भारतासाठी पहिल्यांदा विद्रोह झाला आणि हा विद्रोह अमर शहीद मंगल पांडे यांच्यामुळे झाला, म्हणूनच दरवर्षी १० मे हा दिवस आपण क्रांती दिवस म्हणून साजरा करतो.

मेरठ मध्ये उडालेल्या या स्वातंत्र्याच्या ठिणगीने संपूर्ण भारतात आगीचे रूप धारण केले होते आणि या स्वतंत्र भारताच्या पहिल्या चळवळीला खूप उग्र रूप देखील धारण झाले होते, यामुळे ब्रिटिश राजवट कमकुवत होऊ लागली होती, अशात इंग्रजांनी स्वतःची राजवट वाचविण्यासाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला होता, तो म्हणजे ब्रिटिश राजवटीतील काही राज्य भारतीय राजांना परत द्यावी, त्यामुळे या चळवळीला थोडे सौम्य रूप धारण झाले होते. भारत स्वतंत्र होण्यामागे १८५७ च्या उठावाचा मोलाचा वाटा आहे.

१८५७ च्या उठावानंतर ईस्ट इंडिया कंपनीचा सर्व कारभार इंग्‍लंडच्या ब्रिटीश सरकार कडे गेला. उठावामुळे अस्थिर झालेली ब्रिटिश सत्ता कालांतराने स्थिरावत गेली. १८५७ चा उठाव इंग्रजांनी मोडूनतर तर काढला, पण यामुळे प्रत्येक भारतीयाच्या मनात स्वातंत्र्याची आग पेटली आणि भारत स्वतंत्र करण्यासाठी विविध प्रयत्न सुरु झाले, ज्यामुळे भारत एक संघराज्य आहे, अशी भावना उदयास आली.

याच दरम्यान भारतातील पहिल्या राजकीय पक्षाची स्थापना झाली, ज्याचे नाव इंडियन नॅशनल काँग्रेस असे होते.  धर्मभेद, प्रांतभेद आणि वंशभेद मिटवून आपण सर्व एकच आहोत, अशी भावना लोकांच्या मनात तयार करणे हाच  या पक्षाचा मुख्य हेतू होता आणि त्यानुसारच या पक्षाची वाटचाल देखील सुरू होती.

या काळात विश्व युद्ध देखील सुरू होते. पहिल्या विश्वयुद्धानंतर ब्रिटिशांद्वारे एक आयोग नेमण्यात आले, ज्याद्वारे दडपशाही सुलभ व्हावी यासाठी विविध नियम तयार करण्यात आले, परंतु नियमांचा स्वीकार न करता व त्यांना न जुमानता पंजाबमधील अमृतसर येथे १३ एप्रिल १९१९ रोजी २०,००० लोकांची सभा जालियनवाला बाग येथे भरविण्यात आली. येथे जमलेले वीस हजार लोकांच्या जमावर जनरल डायर याने गोळीबार केला, ज्यात हजारो लोक मृत्यूमुखी पडले, तर कित्येक जण अपंग झाले, आजही ही घटना जालियनवाला बाग हत्याकांड या नावाने प्रसिद्ध आहे.

या घटनेचा विरोध म्हणून गांधीजींच्या नेतृत्वाखाली असहकार चळवळ सुरु झाली, ज्याचे मुख्य उद्देश ब्रिटिश सरकारसाठी काम करायचे नाही आणि त्यांना मदत होईल अशी कोणतेही पाउल उचलायचे नाही, असा होता हे आंदोलन सलग दोन वर्षे सुरू होते.

असहकार चळवळीला आळा घालण्यासाठी, काँग्रेस पक्षाला स्वतंत्र रित्या निवडणूक लढविण्याची परवानगी ब्रिटिश सरकारने दिली, परंतु केवळ निवडणूक लढवण्याचे स्वातंत्र्य होते, संपूर्ण देश स्वतंत्र झाला नव्हता, या गोष्टीला नेहरू आणि इतर तरुण नेत्यांचा विरोध होता, कारण तरुण नेते हे  घेतले तर पूर्णच स्वतंत्र घ्यायचे ह्या विचार धारेचे होते.

सुभाष चंद्र बोस यांनी इतर तरुण मंडळींना सोबत घेऊन इंडियन इंडिपेंडन्स लिगची स्थापना केली आणि संपूर्ण भारतात संपूर्ण स्वातंत्र्या साठी प्रचार केला. १९२९ मध्ये काँग्रेसच्या अध्यक्षपदी जवाहरलाल नेहरू यांची निवड झाली आणि नेहरूंच्या नेतृत्वाखाली समस्त भारतीयांनी, भारताला संपुर्ण स्वतंत्र मिळवून द्यायची शपथ घेतली.

डिसेंबर १९२८ मध्ये भगतसिंग आणि त्यांचे साथीदार राजगुरू यांनी एका २३ वर्षीय ब्रिटिश ऑफिसरची पोलीस  ठाण्याबाहेर हत्या केली, यात ठार झालेला अधिकारी जॉन सॉंडर्स हा लाला लजपत राय यांच्या मृत्यूला जबाबदार आहे, अशी खात्री भगतसिंग आणि त्यांच्या साथीदारांना होती. एका आंदोलनात दरम्यान लाठी चार्ज करण्यात आला होता ज्यात लाला लजपत राय जखमी झाले होते आणि दोन आठवड्यानंतर हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला होता आणि या लाठीचार्जला जॉन हा जबाबदार आहे हे भगतसिंग आणि त्यांच्या साथीदारांना ठाऊक होते.

या घटनेनंतर भगतसिंग आणि त्यांचे साथीदार फरार झाले. एप्रिल १९२९मध्ये त्यांनी दिल्लीतील विधानसभेमध्ये बॉम्ब फोडल्याच्या गुन्ह्याखाली त्यांना अटक करण्यात आली आणि १४ मार्च १९३१ मध्ये भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू ह्याना फाशी देण्यात आली, या निर्णयाला संपूर्ण देशाने विरोध दर्शवला होता.

१९३९ साली झालेल्या दुसऱ्या विश्व युद्धात ब्रिटिश राजवटीचे कंबरडे मोडले, सोबतच देशांतर्गत विरोध सुरूच होता, त्यात 1942 मध्ये भारत छोडो या आंदोलनास सुरुवात झाली, हे आंदोलन 1945 पर्यंत सुरू राहिले, ते ब्रिटिश सरकारच्या हाताळण्याच्या आवाक्याबाहेर जाऊ लागले आणि शेवटी ब्रिटिशांनी १९४६ मध्ये भारतातील नेत्यांच्या हाती मध्यवर्ती सरकारची सूत्रे सोपवून टाकली आणि भारत सोडण्यापूर्वी हिंदू-मुसलमान अशी फूट ब्रिटिश राजवट पाडून गेली ज्यामुळे भारत पाकिस्तान फाळणी झाली.  १५ ऑगस्ट १९४७ ला भारताला स्वतंत्र देश म्हणून घोषित करण्यात आले आणि पंडित जवाहरलाल नेहरू या स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान ठरले.


सांस्कृतिक कार्यक्रम

भारतात १५ ऑगस्ट हा दिवास एखाद्या समारंभाप्रमाणे साजरा केला जातो, म्हणजेच या दिवशी काही ठराविक कार्यक्रम केले जातात, त्यानंतर आणखी प्रोग्रॅम्स चे आयोजन देखील केले जाते.

सकाळी उठताच कानावर देशभक्ती गीतांचे स्वर पडतात आणि मन अभिमानाने भरून येते. या दिवशी लोक आपली पारंपरिक वस्त्रे घालून एक साथ देतात आणि तिरंग्याला वंदन करून राष्ट्रगीत म्हणतात. राष्ट्रगीत झाल्यावर लोक एकमेकांना स्वतंत्र दिनाच्या शुभेच्छा देतात.

या दिवशी दुकाने, मोठमोठे मॉल्स देखील तिरंग्या प्रमाणे तीन रंगाने सजवले जातात, तसेच खरेदीवर विविध आकर्षक ऑफर्स देखील ठेवतात, ज्यामुळे लोकांचे आकर्षण वाढते आणि आकर्षण वाढले की खरेदी वाढते आणि खरेदी वाढली की देशाच्या आर्थिक व्यवस्थेचा पाया आणखी मजबूत होतो अनेक लोक तर या दिवशी मोठमोठ्या राशी दान देखील करतात. ज्यामुळे देशाच्या आर्थिक दृष्टीने ह्या दिवसाला एक वेगळेच महत्व प्राप्त होते.

लहान मुलांच्या आणि विद्यार्थ्यांच्या मनात देशभक्तीची बीज रोवण्यासाठी अधिकतर शाळेत भाषणांचा कार्यक्रम आयोजित होतो, सोबतच अनेक शाळा तर लहान मुलांच्या रॅली देखील काढतात, ज्या मध्ये मुलांद्वारे “भारत माता की जय” असे नारे आपल्या कानी ऐकू येतात. अशाच लहान-लहान कार्यक्रमांमुळे देशाचे भविष्य घडते.


दिल्लीतील परेड

संपूर्ण भारतीयांना आकर्षित करणारी परेड ही भारताची राजधानी असलेल्या दिल्लीत पार पडते. पंतप्रधान, मुख्यमंत्री, राष्ट्रपती, गृहमंत्री, उपराष्ट्रपती अशा प्रमुख व्यक्तिमत्व असलेल्या लोकांच्या उपस्थितीत ही परेड पार पडते.

मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान हे या परेडचे आकर्षण नसून भारताची जीव कि प्राण असलेले भारतीय जवान आणि पोलीस दल यांच्या द्वारे हि परेड सादर केली जाते. आश्चर्यजनक स्टंट आणि भारतीय रक्षकांची परफेक्ट टाइमिंग हे या परेडचे मुख्य आकर्षण आहे आणि खासियत देखील. संपूर्ण भारतातील लोकांची नजर ह्या परेड वर आणि परेड मधील आश्चर्यचकित करणाऱ्या बाबींवर टिपलेली असते.

प्रत्येकाला परेड पाहण्यासाठी दिल्लीत जाणे शक्य नसते, म्हणूनच या दिवशी प्रत्येक न्युज चॅनलवर दिल्लीतील परेडची लाईव्ह कास्टिंग केली जाते, त्यामुळे जगातील कोणत्याही कोपऱ्यात राहत असलेला भारतीय ही परेड पाहू शकतो. जवानांद्वारे केल्या जाणाऱ्या स्टंट मध्ये बाईक स्टंट असतो जो पाहताना अक्षरशः धडकी भरून येते, ज्यामध्ये एका बाईक वर सात ते बारा जवान विविध आकृती धारण करून वाहन चालवतात, अशी ही दिल्लीतील परेड भयारोह तर असते, पण सोबतच मनोरंजक आणि धाडसी देखील असते.


15 ऑगस्ट चे महत्व

१५ ऑगस्ट हा दिवस भारतासाठी फार महत्त्वाचा आहे, कारण ह्याच दिवशी म्हणजे 15 ऑगस्ट 1947 मध्ये भारताला इंग्रजांपासून सुटका मिळाली आणि भारताला स्वतःचे निर्णय घेण्याचा अधिकार मिळाला. यापूर्वी भारतीय राजकारणातील अगदी लहानात लहान निर्णय हे केवळ इंग्रज घेत होते. १५ ऑगस्टपासून भारताचा राज्यकारभार स्वतंत्र झाला आणि भारतात लोकतंत्र म्हणजे लोकशाहीचा जन्म झाला. या नंतर भारतात कोणताही निर्णय घेण्याआधी जनतेचा विचार होऊ लागला आणि आज संपूर्ण जगात भारत हा सर्वात मोठा लोकतंत्र असलेला देश आहे. भारतात निवडणुकांमध्ये निवडले जाणारे उमेदवार देखील जनतेच्या मतानुसार निवडले जातात, जे उमेदवार जनता निवडेल तेच उमेद्वारे राज्य कारभाराचा गाडा सांभाळतील, यामुळे जनतेवर कोणाचाही दबाव उरला नाही आणि म्हणूनच भारतासाठी विकासाची दारे उघडी झाली.

Leave a Comment