HR चा फुल्ल फॉर्म काय ? | HR Full Form In Marathi

वर्तमान काळात भारतात लोक नोकरीपेक्षा व्यवसायाला अधिक प्राधान्य देताना दिसत आहेत. कोणत्याही व्यवसायाची सुरुवात करणे, ही कठीण गोष्ट नसते, परंतु तो व्यवसाय टिकवणे आणि विस्तारणे ही कठीण गोष्ट असते.

कोणताही व्यवसाय अथवा कंपनी यशस्वी बनविण्यास अनेक घटक कारणीभूत असतात, जसे कि उत्तम कर्मचारी, योग्य अनुशासन आणि अधिक.

कंपनी सुरळीत रित्या कार्यरत रहावी व कंपनीत अनुशासन टिकून राहावे, ह्या करीत कंपन्यांद्वारे HR ची निवड केली जाते.

HR ही संकल्पना अनेकांसाठी नवीन आहे, ती सर्वांच्याच परिचयाची व्हावी याकरिता, या लेखात आपण HR संबंधितच विविध माहितीचा आढाव घेणार आहोत,


HR म्हणजे काय ?

HR हा कोणत्याही व्यवसायाचा एक महत्वाचा भाग असतो, जो नवीन कर्मचाऱ्यांना भरती करणे, त्यांना कामासंबंधित प्रशिक्षण देणे, त्यांच्या कागदपत्रांची तपासणी करणे आणि त्यांच्या फायद्याकरिता विविध कार्यक्रमांचे व्यवस्थापन करणे अशी विविध कामे ठराविक व्यवसाय अथवा कंपनी करीता पार पाडत असतो.

वर्तमान काळात न केवळ भारतातील तर, संपूर्ण जगातील व्यवसाय क्षेत्रात अगदी वेगाने बदल होत आहेत, ज्यामुळे कुशल आणि योग्य कर्मचाऱ्याची कंपनी करीता निवड करणे हे फार आव्हानात्मक काम असते, जे पार पाडण्यासाठी कंपनी HR ची निवड करते.

जॉन आर. कॉमन्स ह्यांनी प्रथम “The Distribution Of Wealth” या त्यांच्या पुस्तकात HR च्या संकल्पनेचा उल्लेख केला होता, हा काळ साधारतः १८९३ चा होता. ह्या दरम्यान HR विभाग इतके विकसित नव्हते. कालांतराने HR ची गरज आणि महत्व कंपन्यांना भासू लागले.


HR Full Form In Marathi

H – Human
R – Resource

HR या इंग्रजी लघु शब्दाचे विस्तारित रूप “Human Resource” असे असून, याचा मराठी अर्थ “मानव संसाधन” अथवा “मानवीय संसाधन” असा होतो.


HR चे पाच प्रकार

1. Recruiters

ठराविक कंपनी अथवा एजेन्सी करीता योग्य उम्मेदवारे निवडणे, हे HR Recruiter चे कार्य असते. या मध्ये HR, उम्मेदवाराची मुलाखत घेणे, त्याचा पगार ठरविणे, त्यांच्यासोबत संपर्क साधने अशी काही महत्वपूर्ण कामे पार पाडत असतो.

2. HR Assistant

HR Assistant हा HR विभागातील सहयोगी असतो, जो HR व्यवस्थापक आणि संचालक ह्यांना विविध कार्यांमध्ये मदत करणे, कर्मचाऱ्यांच्या उपस्थिती आणि अनुपस्थितीचा आराखडा तयार करणे, कर्मचाऱ्यांचा दैनंदिन अहवाल तयार करणे, नवीन कर्मचारी भरती प्रक्रियेत मदत करणे, नोकरी पदाचे वर्णन लिहिणे, अर्जदारांसोबत संवाद साधने अशी काही कामे पार पाडतो. HR Assistant चे कार्य ठरविक नसते, तर विविध कार्यांमध्ये HR Assistant ला सहभाग घ्यावा लागतो.

3. HR Manager

HR Manager हे संपूर्ण विभागाचे निरीक्षण करत असतात. विभागातील कर्मचाऱ्यांच्या कामावर नजर ठेवणे, कामाकरिता योग्य रणनीती तयार करणे, विभागातील समस्या दूर करणे, कर्मचाऱ्यांना विविध कामात सल्ला देणे, अशी कामे HR Manager द्वारे पार पाडली जातात. अनेकदा HR Manager मुलाखत देखील घेतात.

4. Director Of HR

कंपनीतील मानवी संसाधन विभागाचे पर्यवेक्षण करणे, विभागातील कर्मचाऱ्यांचे नियोजन करणे, विभागाबद्दल कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याला अहवाल देणे, डेटाबेस चे नियोजन करणे, विभागासंबंधित बजेट तयार करणे, नियमांचे पालन होत आहे कि नाही ह्याची दक्षता घेणे, अशी कामे कंपनीच्या HR Director द्वारे पार पाडली जातात.


HR चे कार्य

1. कर्मचाऱ्यांची भरती

कोणत्याही कंपनीतील महत्वाचा घटक म्हणजेच त्या कंपनी मधील कर्मचारी. वर्तमान काळात व्यावसायिक क्षेत्रात इतके स्पर्धात्मक वातावरण निर्माण झाले आहे, कि प्रत्येक कंपनी योग्य आणि कुशल कर्मचारी भरती करण्यासाठी विविध उपाय योजना राबवत आहे, ज्यात HR महत्वाची भूमिका बजावतो, कारण कोणत्याही कंपनी करीता HR भरती प्रक्रिया पार पडत असतो.

नवीन कर्मचाऱ्यांची भरती घेण्यापूर्वी कोणत्या पोस्टसाठी, किती कर्मचारी हवेत ह्याची पुष्टी करतो. याची खात्री झाली कि मग HR भरती प्रक्रियेसाठी विविध विभाग धारकांचा सल्ला घेतो, व मार्केट चे विश्लेषण करतो.

या नंतर उम्मेदवारांपर्यंत नोकरी संबंधित माहिती पोहोचावी, याकरिता जाहिरातही प्रसारित केल्या जातात. जाहिरातीनंतर कंपनीतील रिक्त पदांसाठी उम्मेदवाराचे आवेदन येते, ज्यातील योग्य उम्मेदवारची निवड केली जाते.

2. वेतन प्रक्रिया

प्रत्येक कंपनीमध्ये एक तारीख तारखेला तेथील कर्मचाऱ्यांना वेतन दिले जाते. वेतन संबंधित प्रक्रिया देखील HR द्वारेच पार पाडली जाते. पगार वाटपात आकडेमोड हि सर्वात महत्वाची बाब असते, त्यामुळे ही जवाबदारी योग्य रित्या पार पाडावी लागते. यानतंर कर्मचाऱ्याला योग्य वेळी आणि योग्य वेतन मिळाले कि नाही ह्याची देखील दक्षता घ्यावी लागते. मुळात पैशांचा हिशोब अगदी चोख ठेवावा लागतो.

3. अनुशासनात्मक कारवाई

कोणत्याही कंपनीला जर यशस्वी मार्गाने चालायचे असेल तर, तेथील कर्मचाऱ्यांमध्ये शिस्त अथवा अनुशासन असणे फार गरजेचे असते. कारण जो पर्यंत एखादे काम अथवा प्रक्रिया शिस्तबद्ध पद्धतीने चालवली जात नाही, तो पर्यंत ती प्रक्रिया यशस्वी रित्या पूर्ण होण्याची शक्यता फार कमी असते.

कंपनीतील कर्मचाऱ्यांना शिस्तबद्दल ठेवणे व शिस्तभंग झाल्यावर कर्मचाऱ्यावर योग्य ती कारवाई करणे ही HR ची फार महत्वाची भूमिका असते. कारवाई दरम्यान लहान चूक देखील कंपनी समोर विविध संकटे उभी करू शकते, त्यामुळे योग्य तो विचार करून निर्णय घेणे फार गरजेचे असते, या करीत कंपनी एक योग्य न्यायबद्द आणि शिस्तप्रिय HR ची निवड करत असते.

4. धोरणांमध्ये बदल

जर ठराविक क्षेत्रात कंपनीला टिकून राहायचे असेल तर, कंपनीची धोरणे योग्य असणे आणि योग्य धोरणांवर अमल असणे गरजेचे असते, त्यामुळे कंपनीच्या धोरणांमध्ये वेळोवेळी बदल करणे फार गरजेचे असते, तसेच कंपनी संबंधित HR चे हे महत्वपूर्ण कार्य देखील मानले जाते. HR न केवळ योग्य धोरण ठरवतो तर, कर्मचाऱ्यांकडून धोरणावर अमल देखील करून घेत असतो.


HR चे महत्व

लहान कंपनी अथवा नव्या कंपन्यांमध्ये HR विभागाकडे दुर्लक्ष केले जाऊ शकते, परंतु तोच व्यवसाय अथवा कंपनी जेव्हा विस्तारत जाते, तेव्हा मात्र कंपनी मधील कर्मचाऱ्यांच्या व्यवस्थापनात अनेक बाधा येऊ लागतात.

कर्मचारी व्यवस्थापन (Staff Management) करण्यात बराचसा अवधी लागतो, तसे कर्मचाऱ्यांचे व्यवस्थापन करण्यास काही कौशल्यांची गरज असते, ज्याची कमतरता HR द्वारे दूर केली जाऊ शकते.

जस-जसा व्यवसाय वाढीस लागतो, अगदी तसेच कंपनीवर कामांचा भार देखील वाढतो, त्यामुळे कंपनी संबंधित प्रत्येक निर्णयात संस्थापकाला लक्ष देता येत नाही, त्यातले-त्यात कंपनीतील कर्मचाऱ्यांचे दैनंदिन व्यवस्थापन, नवीन कर्मचारी भरती, संपूर्ण स्टाफ चे मॅनेजमेंट करणे अशा महत्वपूर्ण गोष्टींकडे देखील दुर्लक्ष करता येत नाही, त्यासाठी कौशल्य पूर्ण व्यक्तीची म्हणेजच HR ची गरज असते, त्यामुळे योग्य व्यक्तीची HR पदी निवड करणे फार महत्वाचे असते.

जरी एखाद्या कंपनीत HR ची नियुक्ती झाली, परंतु HR कौशल्य पूर्ण नाही, तर अशात कंपनीचे मॅनेजमेंट हळू हळू बिघडू लागते, ज्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये निराशा पसरू शकते, ज्याचा परिणाम त्यांचा कामावर व कंपनीच्या यशावर पडू शकतो. जर HR एक योग्य आणि प्रभावी व्यक्ती, असेल तर कंपनीचे भविष्य उज्वल बनते.

अधिक लेख –

1. WIFI चा फुल फॉर्म काय ?

2. USA चा फुल फॉर्म काय ?

3. AM PM चा फुल फॉर्म काय ?

4. ED चा फुल फॉर्म काय ?

Leave a Comment