इंग्रजी शिकण्याचे 6 सोप्पे मार्ग | How to Learn English in Marathi

संपूर्ण जगात भारत हा असा एकुलता एक देश आहे, जेथे सर्वाधिक विविध जाती धर्माचे लोक राहतात. संपूर्ण भारतामध्ये एकूण २१ पेक्षा अधिक भाषा बोलल्या जातात, त्यातीलच एक म्हणजे इंग्रजी.

How to learn English in Marathi

इंग्रजी हि भारतीय संस्कृती मधील मूळ भाषा नसून ती अमेरिकेची राष्ट्रीय भाषा आहे, तसेच इंग्रजी ला आंतराष्ट्रीय व्यापाराची भाषा म्हणून देखील घोषित करण्यात आले आहे.

जगातील सर्वाधिक इंग्रजी भाषा बोलणारा देश हा अमेरिका तर दुसरा देश हा भारत आहे.

भारतामध्ये इतर भाषांना इतके महत्व दिले जात नाही, जितके इंग्रजीला दिले जाते म्हणूनच आज भारतात इंग्रजी बोलणाऱ्या लोकांची संख्या अधिक आहे.

अनेक लोक इंग्रजी ला अवघड भाषा समजतात आणि ह्याच भीतीने ते लोक इंग्रजी बोलू शकत नाही, म्हणून ह्या लेखात आपण इंग्रजी शिकण्याचे 6 सोप्पे मार्ग पाहणार आहोत जे नक्कीच तुम्हाला इंग्रजी शिकण्यात खूप मदत करतील.

1. नियमित इंग्रजी वाचणे

कोणतीही भाषा शिकण्याचा पहिला टप्पा हा वाचण्यापासून सुरु होतो, इंग्रजी च्या बाबतीत देखील तसेच आहे. जर तुम्ही अगदीच सुरुवाती पासून इंग्रजी शिकत आहेत, तर प्रथम is, the, it, go, come अशा लहान शब्दांना वाचण्याचा प्रयत्न करा आणि नंतर हळू हळू मोठे शब्द वाचायला घ्या.

कोणीतही गोष्ट मनापासून केली नाही कि त्याचा काहीच उपयोग होत नाही अशाच लोक इंग्रजी शिकण्यासाठी इंग्रजी पुस्तके वाचण्याचा सल्ला देतात परंतु हे सर्वानाच जमेल असे नसते.

इंग्रजी शिकण्यासाठी तुम्ही तुमच्या परीने इंग्रजीत जोक, गोष्टी, शायरी वाचू शकता ह्याने कंटाळा येणार नाही आणि वाचनात रस तयार होईल.

2. इंग्रजी चित्रपट पाहणे

आपली मायबोली हि मराठी भाषा आहे, जी आपण व्यवस्तिथ बोलतो. मराठी भाषा हि आपण शाळेची सुरुवात करण्याआधी पासून बोलत आहोत, ह्यासाठी आपण कोणत्याही प्रकारचा अभ्यास केला नाही कारण जन्मापासूनच आपल्या अवती भवती लोक मराठी बोलत असत आणि तेच ऐकून आपण मराठी शिकलो.

इंग्रजी शिकण्यासाठी देखील आपण हाच उपाय वापरू शकतो, पंरतु आपल्या आजूबाजूला तर लोक इंग्रजी बोलत नाहीत मग आपण कसे शिकणार? ह्याचे उत्तर म्हणजे इंग्रजी चित्रपट बघण्यास सुरुवात करा.

इंग्रजी चित्रपटात अगदी बेगने इंग्रजी बोलत असतील आणि ते तुम्हाला समजत नसेल तर इंग्रजी कार्टून बघण्यास सुरुवात करा. मी इंग्रजी शिकताना छोटा भीम आणि बेन टेन हे इंग्रजी कार्टून पाहत होतो कारण ह्यामध्ये अगदी सामान्य इंग्रजी भाषा वापरली जाते जी लगेच लक्षात येते तसेच कार्टून मध्ये परिस्थिती नुसार ते काय बोलले ह्याचा पण अंदाज लावू शकतो,  ज्याने मला इंग्रजी शिकण्यात फार मदत केली आणि तुम्हाला देखील होईल केवळ दररोज कमीत कमी एक ते दीड तास कार्टून पाहण्यास सुरुवात करा.

3. नियमित स्वतः वाक्य तयार करणे

एखाद्या कामात आपण जोपर्यंत स्वतः प्रयत्न करत नाही, तोपर्यंत आपल्याला यश मिळत नाही किंवा त्याचा काहीच फायदा होत नाही, भाषा शिकताना देखील हाच नियम लागू होतो.

दररोज रिकाम्या वेळेत मनातल्या मनात लहान लहान  इंग्रजी वाक्य तयार करण्याचा प्रयत्न करा, तुम्ही ते वही वर देखील लिहू शकता, ह्यामुळे आपल्याला इंग्रजी बोलताना खुप फायदा होईल. सर्वात उत्तम उपाय म्हणजे आज प्रत्येक जण Whats App वापरतो, आणि दिवसातील अनेक तास चॅटिंग करण्यासाठी घालवतो, जेव्हा तुम्ही चॅटिंग कराल तेव्हा इंग्रजी मध्ये वाक्य तयार करून संदेश पाठवण्याचा प्रयत्न करा, ह्यामुळे तुमचा खूप चांगला सराव होईल आणि कंटाळा देखील येणार नाही.

4. इंग्रजी शब्दांचा आढावा घेणे.

अनेक लोक तुम्हाला सांगत असतील कि दररोज १० इंग्रजी शब्द पाठ करत रहा, कारण ह्याने तुम्हाला इंग्रजी बोलता येईल, परंतु ह्याचा अनेकदा काहीच फायदा होत नाही. तुमच्या दैनंदिन जीवनात जेव्हा तुम्ही इंग्रजी ऐकत असाल किंवा वाचत असाल तेव्हा जो शब्द समजत नाही त्याचा लगेच मराठी अर्थ शोधा, ह्यासाठी तुम्ही गूगल ट्रान्सलटे चा वापर करू शकता, ह्यामुळे तुम्हाला शब्द पाठ करण्याची गरज राहणार नाही आणि शब्द देखील लगेच तुमच्या लक्षात राहील.

अनेकदा जेव्हा तुम्ही शब्द पाठ करत असता ते कालांतराने तुम्ही विसरून जाता, परंतु जेव्हा एखाद्या गोष्टीचा आढावा तुम्ही स्वतःहून घेता आणि त्याचा सतत वापर करता, तेव्हा ती गोष्ट आयुष्यभर तुमच्या लक्षात राहते.

5. लिहिणे

आठवड्यात एकूण सात दिवस असतात, ह्या सात दिवसातून तुम्हाला जो सोईस्कर वाटेल तो दिवस आणि वेळ निवडा आणि एका कागदावर स्वतःहून इंग्रजीतून निबंध, पत्र, जोक लिहिण्याचा प्रयत्न करा, ज्याने तुमची इंग्रजी सुधारण्यास खूप मदत मिळेल.  सुरुवातीला ५० शब्दांचे पात्र किंवा जोक, नंतर १०० शब्द असे शब्दांची संख्या वाढवत रहा, ह्याने असा फायदा होईल कि तुमच्यात एक आत्मविश्वास येईल आणि इंग्रजी सोप्पी वाटू लागेल.

6. आत्मविश्वास वाढावा.

आपण इंग्रजीत चुकीचं बोललो कि, लोक आपल्यावर हसतील, ह्या भीतीने लोक इंग्रजी चा वापर करण्यास अथवा इंग्रजी बोलण्यास घाबरतात. ह्यावर सर्वोत्तम उपाय म्हणजे FaceBook. फेसबुक द्वारे आपण जगातील कोणत्याही व्यक्तीशी मैत्री करू शकतो. ह्याचाच फायदा आपल्याला घ्यायचा आहे. इतर देशातील लोकांशी मैत्री करून त्यांच्याशी इंग्रजीत संवाद साधण्याचा प्रयत्न करा, ह्याने कोणासमोर तुमचे हास्य होणार नाही आणि तुमचा आत्मविश्वास वाढेल. एकदा का आत्मविश्वास आला कीं माणूस न येणारी गोष्ट देखील सहज करून दाखवतो.

वरील दिलेले उपाय हे साधे आणि सोप्पे आहेत, जे खूप परिणामकारक देखील आहेत, याचा वापर करून तुम्ही इंग्रजी शिकण्याचा शुभारंभ करू शकता, तसेच हे उपाय तुम्हाला कसे वाटले हे कंमेंट द्वारे नक्की कळवा.

Leave a Comment