HDFC चा फुल फॉर्म काय ? | HDFC Full Form In Marathi

भारतात अगदी अल्प कालावधीत बँकिंग क्षेत्रात फार मोठमोठे बदल झाले आहेत. हे बदल नक्कीच फायदेशीर आहेत. वर्तमान काळात भारतात अनेक सरकारी व Private बँका कार्यरत आहेत. ज्यातील HDFC ही एक अशी बँक आहे, जी कमी वेळात मोठ्या प्रमाणात विस्तारली आहे.

सुरुवातीला HDFC ही एक गृहनिर्माण वित्तीय संस्था होती, जी गृह कर्ज प्रदान करत होती, परंतु कालांतराने ह्या संस्थेचे रूपांतर Private Sector बँकेत झाले, आणि वर्तमान काळात HDFC हि भारतातील सर्वात मोठी Private Sector बँक आहे.

ह्या लेखात आपण HDFC संबंधित विविध प्रकारच्या माहितीचा आढावा घेणार आहोत,


HDFC Full Form in Marathi

H – Housing – गृहनिर्माण
D – Development – विकास
F – Financial – वित्तीय
C – Corporation – संस्था

HDFC ह्या इंग्रजी अक्षरांचे विस्तारित रूप “Housing Development Financial Corporation” हे असून ह्याचा मराठी अर्थ “गृह निर्माण विकास वित्तीय संस्था” असा होतो.


HDFC चा इतिहास

HDFC बँकेची स्थापना आज पासून २५ ते २६ वर्षांपूर्वी म्हणजेच १९९४ दरम्यान झाली. बँकेची नोंदणी ही महाराष्ट्रातील मुंबई नोंदणी कार्यालयात करण्यात आली होती.

नोंदणीनंतर बँकेने १ जानेवारी १९९५ पासून Scheduled बँक म्हणून स्वतःचे कामकाज सुरु केले. HDFC ही भारतातील पहिली खासगी बँक आहे, ज्याला रेसर्व बँक ऑफ इंडिया (RBI) कडून मान्यता मिळाली.

१९९७ च्या काळात HDFC ही एक नामांकित Housing Finance कंपनी होती, ज्याची प्रसिद्धी न केवळ राष्ट्रीय तर आंतराष्ट्रीय बाजारात देखील होती. ह्या प्रसिद्धीचे मुख्य कारण म्हणजे HDFC ने कर्ज क्षेत्रात प्राप्त केलेली विविध कौशल्य आणि स्थापन केलेले स्वतःचे प्रभुत्व.

HDFC ने Finance क्षेत्रात केलेली अद्वितीय कामगिरी, शेअर होल्डर्स ची वाढती संख्या, उत्तम अनुभव आणि संतुष्ट ग्राहक, ह्या सर्व गोष्टींमुळे HDFC चे रूपांतर कालांतराने बँकेत झाले, आणि अशा प्रकारे एक गृह निर्माण वित्तीय संस्थेतून एक बँक निर्माण झाली. २३ मे २००८ मध्ये HDFC ला रिसर्व बँक ऑफ इंडिया तर्फे संपूर्ण प्रक्रियेनीशी एक Private बँक म्हणून मान्यता मिळाली.

२६ फेब्रुवारी २००० मध्ये HDFC आणि times Bank LTD ह्या दोन बँक एकमेकात विलीन झाल्या. बँकिंग क्षेत्रात हे पहिल्यांदाच घडले होते, कि दोन private सेक्टर मधील बँक एक मेकात विलीन होत आहेत.

सध्याच्या काळात HDFC ची नोंदणी भारतातील NSE (National Stock Exchange) , BSE (Bombay Stock Exchange), अमेरिकेतील NYSE (New York Stock Exchange) इत्यादी Stock Exchanges मध्ये आहे, ह्यावरून आपण HDFC च्या विशालतेचा अंदाज लावू शकतो.


HDFC द्वारे पुरविल्या जाणाऱ्या सेवा

HDFC बँकेद्वारे आपल्या ग्राहकांना विविध प्रकारच्या सेवा पुरविल्या जातात, ह्या सेवा नेमक्या कोणत्या आहेत,  ह्या संबंधित माहिती आपण खालील प्रमाणे पाहणार आहोत,

1. बँक खाते

HDFC बँक आपल्या ग्राहकांना विविध प्रकारचे खाते खोलण्याची मुभा अथवा सुविधा देते, ह्यामध्ये Saving Account, Current Account, Salary Account, Rural Account, NRI Account, Fix Deposit Account, Re-curing Deposit Account इत्यादी Accounts चा समावेश आहे.

प्रत्येक Account चे एक वेगळे  वैशिष्ठ्य आहे. ग्राहक आपल्या गरजेनुसार बँकेत हवे त्या प्रकारचे खाते सुरु करू शकतात. HDFC बँकेद्वारे पुरविल्या जाणाऱ्या बँक खाते सेवेतील, प्रत्येक खाते एकमेकांपेक्षा कसे वेगळे आहेत, हे आपण खालील प्रमाणे पाहणार आहोत,

Saving Account

Saving Account ज्याला आपण बचत खाते असे देखील म्हणतो, हे एक सामान्य खाते प्रकार आहे, जे आपल्याला आपल्या ठेवीवर ठराविक टक्के व्याज मिळवून देते. बचत खात्यात आपण आपल्या गरजेनुसार रक्कम जमा करू शकतो, अथवा काढू शकतो. बँक खातेदाराला खात्यासंबंधित इतर सेवा देखील पुरवते जसे कि डेबिट कार्ड, पासबुक, चेक बुक इत्यादी.

Saving Account वापरताना बँकेच्या काही अटी आपल्याला मान्य कराव्या लागतात, जसे की मर्यादित रकमेची देवाणघेवाण, मर्यादित रक्कम ATM मधून काढणे आणि अधिक.

Current Account

जे लोक त्यांच्या दैनंदिन जीवनात अधिक आर्थिक व्यवहार पार पाडत असतात, अशा लोकांसाठी Current Account ची सुविधा उपलब्ध करून दिली जाते. Current Account मध्ये transaction ची अथवा, पैसे deposit करण्याची मर्यादा नसते.

Current Account ह्या खात्याचा अधिक तर वापर व्यवसायिकांद्वारे केला जातो. Current Account ला Demand Deposit Account असे देखील म्हटले जाते. भारतात आपण ५,००० ते २५,००० हजार रुपयांची ठेवी जमा करून बँकांमध्ये आपले Current Account सुरु करू शकतो.

Salary Account

Salary Account हे आपल्याला, आपण ज्या संस्थेत अथवा कंपनी मध्ये कार्यरत आहोत, तेथून सुरु करून दिले जाते. हे एक प्रकारचे विशेष बचत खाते आहे, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. Salary Account विशेषतः वेतन भोगी लोकांसाठी असते. नियोक्त्याकडून आपल्याला कर्मचाऱ्यांना दर माह वेतन देण्याचा हा एक सोईस्कर मार्ग आहे. salary account कोणतीही ठेवी न जमा करता देखील सुरु करता येते. खात्यासोबत खातेदाराला बँकेकडून इतर सुविधा देखील प्रदान केल्या जातात.

Rural Account

लहान शेतकरी प्रवर्गाला देखील बँकिंग सेवांचा लाभ घेता यावा, ह्याकरिता rural account सेवा सुरु करण्यात आली आहे. अगदी ० रू. ठेवी सहित आपण हे खाते सुरु करू शकतो. Rural Account खातेदाराला भारत सरकार द्वारे पुरविल्या जाणाऱ्या योजनांचा लाभ देखील दिला जातो.

NRI Account

NRI (Non-Resident Indian) खाते सेवा हि साधारणतः अशा लोकांसाठी उपलब्ध करू देण्यात आली आहे, जे भारतीय रहिवासी नाहीत. जे लोक विदेशातून भारतात शिक्षण, अथवा नोकरी, व्यवसायाच्या हेतूने आले आहेत, त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून NRI खाते सुविधा पुरवली जाते.

Fix Deposite Account

Fix Deposite Account ला FD म्हणून देखील ओळखले जाते. ह्या खात्या अंतर्गत आपल्याला ठराविक रक्कम ठराविक कालावधी पर्यंत बँक खात्यात ठेवावी लागते, ज्यावर आपल्याला ५ -७ % टक्क्याचे व्याज बँके तर्फे दिले जाते.

समजा, जर आपण १,००,००० रुपयांची ठेवी, जर १ वर्षासाठी Fix Deposite खात्यात ठेवली, तर त्या आधी आपल्याला ती काढता येत नाही आणि जरी काढली तरी आपल्याला त्यावर मिळणारे व्याज दिले जात नाहीत. HDFC बँकेत आपण कमीत कमी ५००० रुपयांची FD करू शकतो.

Reccuring Deposite Account

Reccuring Deposit account हे एखाद्या policy प्रमाणे असते, जेथे खातेदार दर माह ठराविक रक्कम ठराविक कालावधी पर्यंत Deposit करतो, जसे कि २ – ५ वर्ष. ठराविक कालावधी नंतर खातेदांराने जमाकेलेली रक्कम खातेदाराला एकसाथ मिळते. हे खाते त्या व्यक्तींसाठी आहे, जे कोणतीही policy न घेता दरमहा बचत करू इच्छितात. Recuuring Deposit Account खोलण्यासाठी वयोमर्यादा नसते.

2. बँकिंग

वर्तमान काळात न केवळ HDFC बँक, तर भारतातील सर्व बँका बँकिंग म्हणजेच बँके संबधित कामे करण्यासाठी खातेदाराला ऑनलाईन आणि ऑफलाइन असे दोन पर्याय उपलब्ध करून देत आहेत.

ऑफलाईन बँकिंग पद्धत सोईस्कर असली, तरी वेळ घेणी असल्यामुळे, ऑनलाईन बँकिंगकडे वळणाऱ्या लोकांची संख्या कालांतराने वाढत आहे.

ऑफलाईन बँकिंग करिता आपल्याला बँकेत विविध फॉर्म उपलब्ध असतात, ज्याद्वारे आपली बँकेसंबंधित कामे पार पाडली जातात.

ऑनलाईन बँकिंग पद्धतीत, बँकेद्वारे आपल्याला user id आणि पासवर्ड दिला जातो. ह्या id पासवर्ड च्या मदतीने आपण बँकेच्या official website वरून आपले बँकेचे खाते हाताळू शकतो, सोबतच पैशांची देवाणघेवाण, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्डसाठी apply करणे, कर्जासाठी apply करणे अशी बँकेसंबंधित सर्व कामे पार पाडू शकतो, ज्यामुळे आपल्या मौल्यवान वेळेची बचत होते.

बँकेद्वारे पुरविल्या जाणारे id पासवर्ड स्वतः पुरतीच मर्यादित ठेवायचा असतो, ज्याने आपल्या व्यतिरिक इतर व्यक्ती आपले बँक खाते हाताळू शकणार नाही.

3. कर्ज

इतर बँकेप्रमाणे HDFC बँक देखील सुरक्षित कर्ज (Secure Loan) आणि असुरक्षित कर्ज (Unsecured Loan) असे दोन प्रकारचे कर्ज आपल्या ग्राहकांना देते. कर्जाच्या प्रकारावरूनच कर्जाचे व्याजदर किती असेल, हे ठरवले जाते, म्हणजेच सुरक्षित कर्जाचे व्याजदर कमी तर, असुरक्षित कर्जाचे व्याजदर जास्त असतात.

सुरक्षित कर्ज म्हणजे एखादी मालमत्ता गहाण ठेऊन घेतलेले कर्ज आणि असुरक्षित कर्ज म्हणजे कोणतीही मालमत्ता गहाण न ठेवता घेतलेलं कर्ज.

गृह कर्ज, मालमत्तेवर कर्ज, policy वर कर्ज, गोल्ड लोण, शेअर आणि म्युचुअल फंड वर घेतलेले कर्ज, fix deposit वर घेतलेले कर्ज, ही काही सुरक्षित कर्जाची उदाहरणे आहे.

वैयक्तिक कर्ज, व्यावसायिक कर्ज, शैक्षणिक कर्ज, वाहन कर्ज, ही काही असुरक्षित कर्जाची उदाहरणे आहे.

HDFC द्वारे मिळणाऱ्या विविध कर्जावर किती व्याजदर आकारले जाते, ह्या संबंधित माहिती आपण खालील तक्त्यात पाहणार आहोत

कर्ज व्याजदर (वार्षिक)
गृह कर्ज (Home Loan) ६.७० %
मालमत्तेवर कर्ज (Loan Against property) ७.५० % ते ९.१५ %
policy वर कर्ज (Loan Against Policy) १८%
गोल्ड लोण (Gold Loan) ८. ५० % ते १५.९७%
शेअर आणि म्युच्युअल फंड वर कर्ज (Loan Against Share and Mutual Fund) ९. ९०%
वैयक्तिक कर्ज (Personal Loan) १०. ५० % ते २१.००%
व्यावसायिक कर्ज (Business Loan) १५. ७५ %
शैक्षणिक कर्ज (Education Loan) ८. ६४ %
वाहन कर्ज (Vehicle Loan) ७.९५ %

4. क्रेडिट कार्ड

ऑनलाईन इंटरनेट बँकिंगच्या आधारे किंवा स्वतः HDFC बँकेत जाऊन देखील आपण क्रेडिट कार्ड साठी apply करू शकतो. आपल्या income नुसार आपल्याला ठराविक रकमेची कार्ड लिमिट दिली जाते. क्रेडिट कार्ड वापरल्यानंतर ५० दिवसांच्या आत,  जर आपण बँकेला पैसे परत केले, तर आपल्याला कोणत्याही प्रकारचे व्याज द्यावे लागत नाही, व ५० दिवसांच्या कालावधी नंतर आपल्याकडून ३.४ % इतके व्याजदर आकारले जाते.

5. गुंतवणूक

HDFC बँक आपल्याला Demat Account देखील खोलून देते, ज्या आधारे आपण म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारात पैसे गुंतवू शकतो. HDFC बँक अगदी एकही रुपया न घेता आपले Demat Account खोलून देते. तसेच ह्या Demat Account चे वार्षिक Maintenance शुल्क ७५० रुपये इतके आकारले जातात.


तथ्य (Facts)

  • HDFC हि भारतातील ५ व्या क्रमांकाची सर्वात मोठी private बँक आहे.
  • १९९४ दरम्यान हसमुख पारेख ह्यांनी HDFC ची स्थापन केली होती, परंतु तेव्हा HDFC ही बँक नसून एक गृह वित्तीय संस्था होती.
  • वर्तमान काळात संपूर्ण भारतात HDFC च्या एकूण ३,६०० पेक्षा अधिक शाखा आहेत.
  • वर्तमान काळात HDFC मध्ये एकूण ७० हजार पेक्षा जास्त कर्मचारी काम करत असून, ह्यातील २० टक्के संख्या हि स्त्रियांची आहे.
  • एका रिपोर्ट नुसार जगातील ५० सर्वात मोठ्या बँकांच्या यादीत HDFC ४५ व्या क्रमांकावर आहे.

HDFC बँकेचे संपूर्ण भारतात किती ATM आहेत ?

HDFC बँक ही वर्तमान काळात, भारतात सर्वाधिक ATM मशीन असलेली बँक आहे. संपूर्ण भारतात HDFC बँकेचे एकूण १३,५०० पेक्षा अधिक ATM मशीन आहे, आणि हा आकडा कालांतराने वाढतच आहे.

Leave a Comment