GST म्हणजे काय ? | GST Meaning in Marathi

GST हा एक असा इंग्रजी शब्द आहे, जो आपण आपल्या दैनंदिन जीवनातील व्यवहारात सतत वापरत असतो. GST हे मुळात एक सूक्ष्म रूप आहे.

2017 ला GST ची संकल्पना भारतात आली होती, तेव्हा ही संकल्पना लोकांसाठी नवीन होती, वेळेनुसार GST ची संकल्पना लोकांच्या ओळखीची झाली. आजही अनेक लोकांसाठी GST ही नवीन संकल्पना आहे, असे अनेकदा निदर्शनास आले आहे.

GST न केवळ व्यवसायाच्या दृष्टीकोनातून, तर देशाच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून देखील महत्त्वाची आहे, त्यामुळे GST बद्दल जास्तीत जास्त लोकांना माहीत असणे गरजेचे आहे.

या लेखात आपण GST च्या संबंधित विविध माहितीचा आढावा घेणार आहोत (GST information in marahi), जसे की GST म्हणजे काय, GST चा फुल फॉर्म, GST चे प्रकार, GST चे फायदे, तोटे इत्यादी.


GST म्हणजे काय ? (GST Meaning In Marathi)

GST हा एक प्रकारचा कर (tax) आहे, जो भारतातील जवळजवळ सर्व वस्तू आणि सेवांवर लादला जातो. GST हा एक व्यापक आणि बहुस्तरीय कर आहे, GST ला व्यापक यासाठी म्हटले जाते, कारण GST मध्ये इतरही विविध प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर यांचा समावेश असतो, याला बहुस्तरिय कर यासाठी म्हटले जाते, कारण वस्तू व सेवा पुरविण्याच्या प्रत्येक टप्प्यात GST लादली जाते व ठराविक टप्प्यानंतर घेतलेला कर परत देखील केला जातो.

पूर्वी कर हे वस्तू व सेवा उत्पादकांकडून घेतले जात होते, परंतु GST ची संकल्पना ही अगदी उलट आहे. GST साधारणतः उत्पादकांवर लादली जात नसून, वस्तू व सेवांचा उपभोग घेणाऱ्यांवर म्हणजेच ग्राहकांवर लादली जाते.

GST ही 0%, 5%, 12%, 18% आणि 28% अशा विविध टप्प्यात घेतली जाते. पेट्रोल, डिझेल, Alcohol आणि वीज या उत्पादनांवर GST लादली जात नसून राज्य सरकार या उत्पादनांवर कर आकारत असते.

सर्वात जास्त GST म्हणजेच 28% GST ही तंबाखू युक्त पदार्थ, महागड्या गाड्या अर्थात ऐशो आरामाच्या वस्तू व सेवांवर लादली जाते, 0%-3% टक्के GST ही सोने, चांदी, हिरे आणि रत्न ह्यांवर आकारली जाते.


GST चे विविध प्रकार

GST प्रणालीनुसार GST चार विविध प्रकारात विभागली गेली आहे, ज्याबद्दल थोडक्यात माहिती आपण खालील प्रमाणे पाहणार आहोत,

1. SGST (State Goods & Service Tax)

SGST हा कर आंतरराज्य होणाऱ्या व्यवहारांवर लादला जातो. SGST हा कर न केवळ वस्तू व सेवाच्या उत्पादनांवर तर आयात निर्यातीवर देखील लादला जातो. SGST साठी काही अधिनियम लागू करण्यात आले असून, त्या अधिनियमान्वये ही प्रणाली कार्यरत आहे.

SGST जरी राज्यांतर्गत वस्तूंवर आकारली जात असला तरी, SGST गोळा करण्याची जवाबदारी ही पूर्णतः केंद्र सरकारची असते. कर गोळा केल्यानंतर तो केंद्राद्वारे राज्यांमध्ये विभागला जातो.

समजा, महाराष्ट्रतील एका व्यापाऱ्याने 1000 रुपयांची एक वस्तू ग्राहकाला विकली, व 19% GST धरून व्यापार्‍याने ग्राहकाकडून 1,180 रुपये आकारले. या 1,180 रुपयांपैकी 18% टक्के म्हणजे ते 180 रुपये कर स्वरूपी रक्कम केंद्र सरकार स्वीकारते व केंद्र सरकार कडून राज्यांमध्ये ही रक्कम विभागण्यात येते.

2. IGST (Integrate Goods & Service Tax)

IGST हा GST चाच एक प्रकार असुन IGST राज्यांतर्गत होणाऱ्या व्यवहारांवर लादला जातो. राज्यांतर्गत पुरविल्या जाणाऱ्या सेवा व वस्तूंवर IGST आणि IGST हे दोन्ही कर लादले जातात. IGST हे न केवळ राज्यांतर्गत व्यवहारावर लादले जाते, तर राज्याव्दारे खरेदी केलेल्या किंवा विकलेल्या वस्तू आणि सेवांवर देखील IGST कर लादला जातो. सोप्या शब्दात सांगायचे झाले तर दोन राज्यांमध्ये झालेल्या व्यवहारांवर IGST लादली जाते.

3. CGST (Central Goods & Service Tax)

SGST प्रमाणेच CGST हा कर देखील राज्यांतर्गत होणाऱ्या व्यवहारांवर लादला जातो. केंद्रीय GST ही CGST कायद्यांतर्गत नियंत्रित केली जाते.

4. UTGST (Union Territory Goods & Service Tax)

UTGST किंवा केंद्रशासित प्रदेश वस्तू आणि सेवा कर हा भारतातील केंद्रशासित प्रदेशातील व्यवहारांवर लादला जातो. भारतात UTGST कर साधारणतः दमन दिव, अंदमान निकोबार बेट, चंदिगड, नगर हवेली, दादरा आणि लक्षद्वीप या केंद्रशासित प्रदेशांमध्ये आकारला जातो.

केंद्रशासित वस्तू व सेवा कराचे संचालन UTGST कायद्यांतर्गत केले जाते. भारतातील केंद्रशासित प्रदेशांमध्ये SGST आणि UTGST हे दोन्ही प्रकारचे कर आकारले जातात.


GST Full Form In Marathi

G – Goods

S – Service

T – Tax

GST ह्या संक्षिप्त रूपाचा इंग्रजीतील फुल फॉर्म “Goods Service Tax” असून याचा मराठी अर्थ “वस्तू व सेवा कर” असा होतो.


भारतात GST केव्हा सुरू करण्यात आली ?

भारतीय संविधानातील अधिनियम 1 आणि 100 च्या दुरुस्ती अंतर्गत 1 जुलै 2017 मध्ये भारतात GST सुरू करण्यात आली. या दरम्यान भारताचे पंतप्रधान नरेंद्र दामोदरदास मोदी हे होते.

1 जुलै 2017 पासून भारतातील राज्य सरकार आणि केंद्र सरकारद्वारे घेतल्या जाणाऱ्या इतर करांच्या जागी GST चा अवलंब करण्यात आला. GST वरील कराचे शुल्क GST अधिनियम आणि GST Council द्वारे ठरविण्यात येते. या Council मध्ये सर्व राज्यांचे व केंद्राचे अर्थमंत्री उपस्थित असतात.

GST मध्ये सर्व प्रकारच्या अप्रत्यक्ष करांना एकजूट केले जाते. GST ला आचरणात आणून, भारताची अर्थव्यवस्था 2.4 Trillion $ इतकी विस्तरण्याचे भारतीय सरकारचे ध्येय आहे. GST चा तर अवलंब केला, परंतु भारतात या संकल्पनेला मोठ्या प्रमाणात विरोध दर्शवण्यात आला असून टिका देखील करण्यात आल्या आहेत.


GST चे फायदे

1. अप्रत्यक्ष करांचा प्रभाव फार कमी झाला

GST ला सर्व समावेशक कर असे देखील म्हटले जाते, कारण ह्यामध्ये अप्रत्यक्ष कर यांचा देखील समावेश असतो. GST चे मुख्य उद्दिष्ट म्हणजे अप्रत्यक्ष करांचा प्रभाव कमी करणे आहे. यामुळे कराचा Cascading प्रभाव देखिल कमी होताना दिसत आहे.

2. उत्पन्न मर्यादेत झालेली वाढ.

GST आचरणात येण्याआधी VAT ( Value Added Tax ) संरचनचे अंतर्गत, जर एखाद्या कंपनीचा TurnOver 5 लाखांपेक्षा जास्त असल्यास, त्या कंपनीला वस्तू किंवा सेवा निर्मितीच्या प्रत्येक टप्प्यात Tax द्यावा लागत होता. कंपनीसोबत, जर सेवा प्रदाता म्हणजेच Service Provider चा turnover 10 लाखांपेक्षा अधिक असल्यास, त्याला VAT अंतर्गत टॅक्स भरावा लागत होता. ही turnover ची मर्यादा प्रत्येक राज्यात भिन्न होती.

समजा, A आणि B ह्या दोन कंपन्या आहेत. B ही कंपनी एक मोबाईल कंपनी आहे, ह्या कंपनी चे सर्व मोबाईलचे उत्पादन हे, A या कंपनीत होते. इथे A ही कंपनी उत्पादक कंपनी आहे तर, B ही सर्विस प्रोव्हायडर कंपनी आहे. जर A कंपनी चे turnover 5 लाख आणि B चे Turnover 10 लाखांपेक्षा कमी असल्यास, ह्या दोनही कंपनीना VAT अंतर्गत प्रत्येक टप्प्यात tax भरावा लागणार नाही.

GST आचरणात आल्यापासून कंपनीची Turnover मर्यादा ही 20 लाख ते 75 लाख इतकी करण्यात आली आहे. म्हणजेच जर कंपनीचा टर्नवर 20 लाख ते 75 लाखांपेक्षा अधिक असेल तरच कंपनीना VAT अंतर्गत कर भरावा लागणार. GST मुळे व्यवसाय आणि व्यवसायिकांना हा एक मोठा फायदा झाला आहे.

3. अर्थव्यवस्थेला लागणारा हातभार

लहान व्यवसायिकांच्या Turnover मर्यादेत वाढ झाल्यामुळे व्यवसाय विस्तार वाढू लागला आहे, याचा फायदा देशाच्या अर्थव्यवस्थेला होताना दिसत आहे.

4. GST ची सर्वप्रणाली ऑनलाइन कार्यरत आहे.

जसे की आपण जाणतोच, हल्ली सर्वत्र अधिक तर कामे ही ऑनलाईन पद्धतीने होत आहेत, ज्यामुळे कामे अगदी सोपी आणि सुलभ होत आहेत.

इतर कामाप्रमाणे आपण GST ची कामे देखील घरबसल्या ऑनलाइन पद्धतीने करू शकतो. GST रजिस्ट्रेशन करणे, जे GST प्रणालीत सर्वात महत्वाचे असते, हे अगदी काही steps मध्ये पूर्ण होत असल्यामुळे वेळ आणि पैसा दोघांची बचत होत आहे.

ऑनलाइन GST प्रक्रिया ही नवीन व्यावसायिकांसाठी तर अधिक सोयीची मानली जाते, कारण Turnover ची मर्यादा वाढल्यामुळे नवीन व्यवसायिकांना VAT प्रणालीसाठी व इतर विविध प्रकारच्या नोंदणी करण्याची काहीच गरज उरली नाही.


GST चे तोटे

1. Operational खर्चात झालेली वाढ.

GST आचरणात आल्यापासून व्यवसायिकांना त्यांचा व्यवसाय चालू ठेवण्यासाठी GST संबंधित सॉफ्टवेअर वापरावे लागतात, व त्यांच्या व्यवसायाचा हिशेब देखील ठेवावा लागतो. ERP ( enterprise resource planning ) सॉफ्टवेअर वापरण्यासाठी ते विकत घ्यावे लागतात, जे थोडे महाग असतात. तसेच हे सॉफ्टवेअर वापरण्यासाठी योग्य त्या मार्गदर्शनाची गरज असते, ज्यात व्यावसायिकांचा बराचसा पैसा आणि वेळ खर्च होत जातो.

2. उत्पादन कराची कमी झालेली मर्यादा

GST आचरणात येण्याआधी 1.5 कोटी व त्यापेक्षा अधिक पैशाची उलाढाल करणाऱ्या व्यवसायांना उत्पन्न कर भरावा लागत होता, परंतु GST आचरणात आल्यानंतर ही मर्यादा 40 लाख इतकी करण्यात आली, जे मोठ्या व्यावसायिकांसाठी तोट्याचे ठरले.

3. GST अधिनियमांचा वाढलेला अतिरिक्त भार.

GST संबंधित सर्व कामे ऑनलाइन पद्धतीने होत असल्यामुळे प्रत्येक व्यवसायिकाला GST Portal वर जाऊन व्यवसायाची नोंदणी करणे फार गरजेचे आहे. रजिस्ट्रेशन कागदपत्रे व इतर कागदपत्रे गोळा करण्याचे काम हे थोडे कंटाळवाणे असते.

ज्या कंपन्या Contract Based GST Registration सारखी कामे पार पडतात, अशा कंपन्यांवर कागदपत्रांचा अनावश्यक भार वाढला आहे. ऑनलाइन GST ची कामे जरी वेगवान पद्धतीने होत असली तरी, त्या कामांची संपूर्ण प्रक्रिया जाणणे थोडे किचकट आहे, ज्यामुळे जे नवीन व्यावसायिक आहेत त्यांना या कामात अनेक अडचणी येऊ शकतात.

4. दंडात्मक कारवाई

जर एखादा व्यवसाय GST पोर्टलवर नोंदविला नसेल, तर अशा परिस्थितीत अनेकदा व्यवसाय अनाधिकृत मानला जातो व सोबतच व्यावसायिक आणि व्यवसायावर शासनाद्वारे दंडात्मक कारवाई देखील केली जाते.


FAQ

1. भारतात GST कोणी व कधी लागू केली ?

उत्तर : २०१६ मधील सप्टेंबर महिन्यातील विधान मंडळाकरून मान्यता मिळवून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांनी १ जुलै २०१७ मध्ये भारतात GST कायदा लागू केला.

2. GST चे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते ?

उत्तर : Dr. Asim Kumar Dasgupta ह्यांना GST चे जनक म्हणून ओळखले जाते.

3. भारतात GST प्रथम कोणत्या राज्यात लागू झाली ?

उत्तर : १२ ऑगस्ट २०१६ दरम्यान भारतातील आसाम राज्यात सर्वप्रथम GST कायदा लागू करण्यात आला.

4. GST चा कमाल (Maximum) दर किती आहे ?

उत्तर : २८% हा gst चा कमाल दर आहे.

5. GST चे 3 प्रकार कोणते ?

उत्तर : CGST SGST हे GST चे तीन प्रकार आहेत.

अधिक लेख –

1. GDP म्हणजे काय व GDP चे प्रकार कोणते ?

2. डिजिटल अर्थव्यवस्था म्हणजे काय ?

3. भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये कोणती ?

4. सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र

Leave a Comment