गुगलचा शोध कोणी लावला ? | Google cha shodh koni lavla

जगातील सर्वात जास्त वापर होणाऱ्या सर्च इंजिन पैकी गूगल एक आहे. आज सर्च इंजिनच्या एकूण मार्केट कॅप  पैकी ८०% पेक्षा अधिक मार्केट कॅप एकट्या गुगलने व्यापला आहे.

आज हजारो व्यवसाय गुगल वर आधारित आहेत, अनेक लोकांना रोजगार मिळत आहे. दर दिवशी गुगल वर २ ट्रिलियन पेक्षा अधिक सर्चेस होतात, म्हणजेच एका मिनिटाला तीन करोड पेक्षा अधिक.

संपूर्ण जगात गूगल चा  वापर केला जातो, अशा ह्या इंटरनेटच्या जगात क्रांती घडवून आणणाऱ्या गुगल बद्दल आपण या लेखात माहिती पाहणार आहोत, जसे की गुगलचा इतिहास गुगल काय आहे, गुगल चा शोध कोणी लावला, गुगलच्या प्रसिद्ध सेवा आणि गूगल किती पैसे कमावतो व कसे ?


गूगल काय आहे ?

गूगल हे एक सर्च इंजिन वेबसाईट आहे, जी लोकांनां इंटरनेट सोबत जोडण्याचे काम करते. लोक आपले प्रश्न गूगल वेबसाईट समोर मांडतात आणि अगदी काही सेकंदातच गूगल त्यांची उत्तरे शोधून देतो.

गूगल काही वर्षांपूर्वी केवळ सर्च इंजिन सेवाच लोकांपर्यंत पोहोचवत होता, परंतु कालांतराने आज गूगल विविध सेवा पुरवत आहे, त्यातीलच एक लोकप्रिय सेवा म्हणजे G-Mail.


गूगल चा इतिहास

गूगल ची स्थापना हि ” BackRub ” नावाच्या प्रोजेक्ट दरम्यान १९९६ मध्ये झाली होती, त्याकाळी लैरी पेज आणि सर्गेई ब्रिन हे दोघेही कैलिफोर्निया मधील स्टैनफोर्ड विश्वविद्यालय मध्ये पीएचडी करत होते.

आश्चर्याची बाब म्हणजे, गूगल हे लैरी पेज आणि सर्गेई ब्रिनह्यांनी तयार केले नसून ह्यांनी केवळ संकल्पना मंडळी होती, गूगलसाठी Programming लिहून स्टॉक हसन ह्यांनी ते तयार केले होते, परंतु गूगल कंपनी चे रेजिस्ट्रेशन होऊन एक कॉर्पोरेट कंपनी बनण्याआधीच हसन ह्यांनी गूगल हा प्रोजेक्ट सोडला, कारण त्याला रोबोटिक्स मध्ये आपले करियर करायचे होते.

जेव्हा प्रोजेक्ट साठी विषय निवडला जात होता, तेव्हा लैरी पेज आणि सर्गेई ब्रिन ह्या दोघांनी असे वेब पेज तयार करण्याची कल्पना केली होती, जे लोकांना त्यांचे उत्तर झटपट मिळवून देईल, हि कल्पना पेज आणि ब्रिन ह्यांनी त्यांच्या पर्यवेक्षक (Supervisor) ह्यांच्या समोर मांडली आणि त्यांनी देखील पेज आणि ब्रिन ह्यांना प्रोत्साहित केले, त्यानंतर ह्याच वेबपेज संकल्पना स्टॉक हसन ह्यांच्या समोर मांडण्यात आली, जी समजून घेऊन त्यांनी ह्यासाठी प्रोग्रामिंग कोड लिहिण्यास सुरुवात केली.

गूगल चे पहिले version हे १९९६ साली ऑगस्ट महिन्यात publish करण्यात आले होते, हे version स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी च्या वेबसाईट वर प्रसारित करण्यात आले होते.

गूगल जेव्हा पहिल्यांदा इंटरनेट वर प्रसारित केले गेले होते, तेव्हा त्याच्या डोमेन चे नाव Google.Stanford.Edu असे होते, ह्यांनंतर १५ सप्टेंबर १९९७ मध्ये गूगल ला स्टॅनफर्ड युनिव्हर्सिटी च्या वेबसाइट मधून वेगळे करून त्याचे स्वतंत्र रित्या प्रसारण केले गेले आणि google.com ह्या नावाने इंटरनेट वर रजिस्टर देखील करण्यात आले.

स्वतंत्र डोमेन रेजिस्ट्रेशन नंतर गूगल चा कारभार स्वतंत्र रित्या करण्याचा निर्णय घेण्यता आला आणि गूगल ची रवानगी ४ सप्टेंबर १९९८ मध्ये पेज आणि ब्रिन ह्यांच्या मित्राच्या गॅरेज मध्ये करण्यात आली आणि तेच गूगल चे पहिले ऑफिस होते.

१९९८ च्या शेवट पर्यंत गूगल मध्ये एकूण ६० करोड पेक्षा अधिक वेबपेज ऍड झाले होते, ज्यामुळे गूगल हे इतर सर्च इंजिन च्या तुलनेत अधिक आणि अचूक माहिती युसर ला उपलब्ध करून देऊ लागले होते.

१९९९ च्या सुरुवातीलाच ब्रिन आणि पेज ह्यांनी गूगलला १० लाख रुपयांत विकण्याचा प्रस्ताव excite.com समोर च्या CEO समोर मांडला होता, Excite.com हे देखील १९९९ च्या दरम्यान एक प्रसिद्ध वेबसाईट होती. हा प्रस्ताव Excite.Com च्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याने फेटाळला, हा प्रस्ताव फेटाळल्याच्या काही महिन्यांनी गूगल चे ऑफिस बदलण्यात आले.

२००० साल येई पर्यंत गूगल ने विविध प्रोजेक्ट लाँच केले आणि त्यात गूगलला यश देखील मिळू लागले, त्यातीलच गूगल चा सर्वात मोठा आणि यशस्वी प्रोजेक्ट होता तो म्हणजे गूगल क्रोम ( Chrom Browser ), त्यानंतर गूगल संपूर्ण जगात एका नव्या रूपात उभा राहिला आज घराघरात गूगल पोहोचला आहे.


वैशिष्ट्ये

Google ही जगातील सर्वात मोठी आणि सर्वात प्रसिद्ध तंत्रज्ञान कंपन्यांपैकी एक आहे. त्याच्याकडे विविध उत्पादने आणि सेवा आहेत आणि त्याच्या यशाचे श्रेय अनेक प्रमुख वैशिष्ट्यांना दिले जाऊ शकते:

1. शोध इंजिन वर्चस्व

Google त्याच्या शोध इंजिनसाठी प्रसिद्ध आहे, जे ऑनलाइन शोधासाठी समानार्थी बनले आहे. हे अब्जावधी वेब पृष्ठे अनुक्रमित करते आणि मिलिसेकंदांच्या बाबतीत संबंधित शोध परिणाम प्रदान करते, ज्यामुळे ते जगभरातील वापरकर्त्यांसाठी शोध इंजिन बनते.

2. उत्पादन विविधता

त्याच्या शोध इंजिनच्या पलीकडे, Google Gmail (ईमेल सेवा), Google नकाशे (मॅपिंग आणि नेव्हिगेशन), YouTube (व्हिडिओ शेअरिंग), Google ड्राइव्ह (क्लाउड स्टोरेज), Google दस्तऐवज (दस्तऐवज सहयोग) आणि इतर अनेक उत्पादने आणि सेवांची विस्तृत श्रेणी ऑफर करते. हा वैविध्यपूर्ण पोर्टफोलिओ Google ला व्यापक प्रेक्षकांची पूर्तता करण्यास आणि विविध बाजारपेठांमध्ये लक्षणीय उपस्थिती राखण्यास अनुमती देतो.

3. इनोव्हेशन आणि संशोधन

Google नाविन्यपूर्णतेसाठी आणि तंत्रज्ञानाच्या सीमा पुढे ढकलण्यासाठी त्याच्या वचनबद्धतेसाठी ओळखले जाते. कंपनी संशोधन आणि विकासामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करते, ज्यामुळे सेल्फ-ड्रायव्हिंग कार (वेमो), आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) प्रगती आणि बरेच काही यांसारखे ग्राउंडब्रेकिंग प्रकल्प सुरू होतात.

4. डेटा आणि वैयक्तिकरण

Google त्याच्या शोध इंजिन आणि इतर सेवांद्वारे मोठ्या प्रमाणावर वापरकर्ता डेटा गोळा करते. हा डेटा कंपनीला शोध परिणाम, जाहिराती आणि शिफारसी वैयक्तिकृत करण्यास अनुमती देतो, वापरकर्ता अनुभव वाढवतो आणि गोपनीयता आणि डेटा सुरक्षिततेबद्दल चिंता वाढवतो.

5. जाहिरात महसूल

Google च्या कमाईचा एक महत्त्वपूर्ण भाग त्याच्या AdWords आणि AdSense प्लॅटफॉर्मद्वारे जाहिरातींमधून येतो. जाहिरातदार त्यांच्या जाहिराती Google च्या शोध परिणामांमध्ये आणि भागीदार वेबसाइटवर प्रदर्शित करण्यासाठी कीवर्डवर बोली लावतात, ज्यामुळे कंपनीसाठी भरीव उत्पन्न मिळते.

6. क्लाउड सेवा

Google Cloud Platform (GCP) ही Google ची क्लाउड संगणन सेवा आहे, जी व्यवसाय आणि विकासकांना विस्तृत पायाभूत सुविधा, प्लॅटफॉर्म आणि सॉफ्टवेअर सेवा प्रदान करते. Amazon Web Services (AWS) आणि Microsoft Azure सारख्या प्रतिस्पर्ध्यांच्या मागे असताना, GCP सतत वाढत आहे आणि ट्रॅक्शन मिळवत आहे.

7. मुक्त स्रोत योगदान

Google मुक्त-स्रोत सॉफ्टवेअर म्हणून अनेक प्रकल्प आणि साधने जारी करून मुक्त-स्रोत समुदायामध्ये सक्रियपणे योगदान देते. हा दृष्टीकोन टेक समुदायामध्ये सहयोग आणि नावीन्य वाढवतो.

8. कॉर्पोरेट संस्कृती

Google त्याच्या अनोख्या कॉर्पोरेट संस्कृतीसाठी प्रसिद्ध आहे, नावीन्य, कर्मचारी सर्जनशीलता आणि आरामशीर कामाचे वातावरण यावर जोर देते. हे कर्मचार्‍यांना “20% वेळ” सारख्या उपक्रमांद्वारे वैयक्तिक प्रकल्पांवर वेळ घालवण्यास प्रोत्साहित करते, जेथे अभियंते त्यांच्या स्वतःच्या कल्पनांचा पाठपुरावा करण्यासाठी त्यांच्या कामाच्या तासांपैकी 20% समर्पित करू शकतात.

9. संपादन

गेल्या काही वर्षांमध्ये, Google ने लहान स्टार्टअप्सपासून ते महत्त्वाच्या कॉर्पोरेशनपर्यंत अनेक कंपन्या ताब्यात घेतल्या आहेत. या संपादनांमुळे Google ला त्याच्या उत्पादन ऑफरचा विस्तार करण्याची, प्रतिभावान टीम्स मिळवण्याची आणि मौल्यवान तंत्रज्ञानामध्ये प्रवेश करण्याची अनुमती मिळाली आहे.


गुगलचा शोध कोणी लावला ?

गूगल चा शोध १९९६ मध्ये सेर्गी ब्रिन आणि लॅरी पेज ह्या दोघांनी मिळून लावला होता, जे कॅलिफोर्नियामधील स्टॅनफोर्ड विद्यापीठाचे विद्यार्थी होते.

जेव्हा गूगल चा शोध लागला, तेव्हा हे केवळ एखाद्या वेबसाईट प्रमाणे होते, परंतु १९९८ मध्ये गूगल चे रेजिस्ट्रेशन करून गूगल ला प्राइवेट कंपनीचे रूप देण्यात आहे, ह्यानंतर २००४ मध्ये गूगल नोंदी शेअर मध्ये करून त्याचा IPO ( Initial Public Offering ) लाँच केला गेला.

इंटरनेट च्या जगातील आज गूगल एक सर्वात मोठी कंपनी आहे आणि सुंदर पिचाई हे गूगल चे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत जे भारतीय आहेत.


गूगलच्या प्रसिद्ध सेवा

गूगल द्वारे वापरकर्त्यांना हजारो च्या संख्येत सेवा पुरवल्या जातात परंतु इथे आपण काही अशा सेवा पाहणार आहोत ज्या खूप प्रसिद्ध आणि मोफत देखील आहे.
नाव कार्य
Gmail ई-मेल पाठवणे
Adsense हे एक ऍड नेटवर्क आहे
Android मोबाईल मध्ये वापरली जाणारी ऑपरेटिंग सिस्टिम
Chrome Browser वेब ब्राउर आहे
Google Assistant गूगल वापरकर्त्यांच्या प्रश्नांचे तोंडी निरासरण करणे
Google Calendar तारीख दाखवणे
Class Room शैक्षणिक उद्देश्य
Google Drive युजर चा डेटा सेव्ह करण्यासाठी मोफत स्टोरेज प्रदान करते.
Duo विडिओ कॉल अँप
Google Images इमेजेस शोधून देणे
News बातम्यांचा आढावा देणे
Google Translator एक भाषेतील संभाषणाचे रूपांतर दुसऱ्या भाषेत करणे
You Tube विडिओ पाहणे आणि तयार करणे
Blogger मोफत वेबसाईट तयार करणे
Business दुकान ऑनलाईन सेटअप करण्यासाठी

गूगल दरवर्षी किती पैसे कमवतो ?

गूगल हे केवळ एक सर्च इंजिन सेवाच प्रदान करत नाही, तर ते विविध प्रकारच्या Paid सेवा देखील पुरवते, तसेच गूगल चे काही hardware प्रॉडक्ट देखील बाजारात उपलब्ध आहेत, जसे कि  Pixelbook (लॅपटॉप) , pixel (मोबाईल), pixel buds (वायरलेस ईअर फोन) आणि अधिक.
Google Ads,  Google Shopping, You Tube, Google Mobile हे काही गूगल च्या उत्पन्नाचे प्रमुख स्रोत मानले जातात, ज्यातून गूगल ची अधिक तर कमाई होते.
एका रिपोर्ट नुसार २०२१ मध्ये गूगल ने एकूण $१२०१ बिलियन डॉलर म्हणजेच ८७.५५ लाख करोड रुपय कमवले आहेत.

आपण काय शिकलो ?

  • गूगल चा शोध लॅरी पेज आणि सेग्री ब्रिन ह्यांनी १९९६ मध्ये लावला होता.
  • गूगल कंपनी ची नोंदणी २००४ मध्ये Share मार्केट मध्ये करून २००४ सालीचा IPO लाँच करण्यात आला होता.
  • गूगल ने २०२१ मध्ये ८७ लाख करोड इतके रुपये कमवले.
  • गूगल तयार करण्यात स्टॉक हसन ह्यांचा देखील मोलाचा वाट होता, परंतु त्यांनी हा प्रोजेक्ट मधूनच सोडला होता.
  • गूगल एक सर्च इंजिन आहे.
  • गूगलवर मिनिटाला ३ करोड पेक्षा अधिक काही न काही Search केले जाते आणि दिवसातुन २ अब्ज.

अधिक लेख :

1. फेसबुकचा शोध कोणी लावला ?

2. युट्युब चा शोध कोणी लावला ?

3. कॅमेराचा शोध कधी लागला ?

4. बल्बचा शोध कोणी लावला ?

Leave a Comment