घरबसल्या ऑनलाईन (Online) पैसे कमवण्याचे मार्ग

इंटरनेटच्या शोधामुळे जागतिक पातळीवर तंत्रज्ञान क्षेत्रात अगदी वेगाने सकारात्मक बदल घडून आले. तंत्रज्ञानाचा पाया देखील इंटरनेटलाच म्हटले जाते. इंटरनेटला मराठीत आंतरजाल असे म्हणतात. आंतरजाल हे मुळात संगणकाचे खूप मोठे जाळे आहे जे संपूर्ण जगात पसरले आहे.

ह्या इंटरनेटमुळे जगातील एक सर्वात मोठी समस्या दूर होऊ लागली आहे, ती म्हणजे बेरोजगारी.  होय ! इंटरनेटमुळे ऑनलाइन काम करुन पैसे कमविण्याचे मार्ग निर्माण झाले आहेत.

या लेखात आपण असे काही ऑनलाईन कामाबद्दल माहिती घेणार आहोत, जे करण्यात अगदी सोप्पे आहेत म्हणजे काही महिन्यांच्या अभ्यासातून कोणीही हि कामे सहज करू शकेल आणि मुबलक प्रमाणात पैसे देखील कमावू शकेल, तसेच आपण जी कामे पाहणार आहोत ती सुरु करण्यासाठी तुम्हाला कमी खर्च किंवा कोणताच खर्च देखील येणार नाही.

8 ऑनलाईन पैसे कमवण्याचे मार्ग

यूट्यूब (Youtube)

आज प्रत्येक मोबाईल मध्ये युट्युब अँप चा वापर होतो. युट्युब हे जगातील सर्वात मोठे व्हिडिओ सर्च इंजिन आहे आणि पैसे कमावण्याचा एक उत्तम मार्ग देखील.

युट्युब ची सुरुवात 14 फेब्रुवारी 2005 मध्ये झाली असून, chad Hurley, jawed Karim आणि steve chen हे युट्युब चे निर्माते आहेत. लोकांना व्हिडीओ स्वरुपात कंटेंट अगदी सहज उपलब्ध व्हावा यासाठी युट्युब ची निर्मिती झाली होती आणि हा प्रयत्न यशस्वी देखील ठरला.

आज संपूर्ण जगात 2.3 बिलियन म्हणजे दोन अब्ज पेक्षा अधिक लोक युट्युब चा वापर करत आहेत. युट्युब केवळ मनोरंजनाचे नव्हे तर शिक्षणाचे देखील उत्तम प्लॅटफॉर्म म्हणून ओळखले जाते. युट्युबमुळे हल्ली लोक घर बसल्या लाखो रुपये कमवत आहेत

युट्युब द्वारे पैसे कमावण्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा यूट्यूब चैनल बनवायचे असते,जे अगदी मोफत आहे, तुमचे चैनल तयार झाल्यावर त्यावर तुम्हाला व्हिडिओ अपलोड करून 1000 ( Subscribers ) सबस्क्रायबर आणि 4000 तास ( Watch Time ) वॉच टाईम पूर्ण करावा लागतो, त्यानंतर गुगल द्वारे तुमच्या You Tube व्हिडिओज वर जाहिराती दाखवल्या जातात ज्याचे तुम्हाला पैसे मिळतात. जितके जास्त लोक तुमचे विडिओ पाहतील तितक्या जास्त जाहिराती तुमच्या विडिओ वर दाखवल्या जातात ज्याचे पैसे देखील जास्त मिळतात.

जो ही व्हिडिओ तुम्ही युट्युब वर अपलोड कराल, तो तुमचा स्वतःचा असला पाहिजे, म्हणजे तुम्ही इतर कोणाचेच व्हिडिओ चोरून तुमच्या यूट्यूब चैनल वर अपलोड करू शकत नाही, हे बेकायदेशीर असते, असे आढळल्यास तुमचे चैनल बंद करण्यात येते किंवा त्यावर जाहिराती दाखवल्या जात नाहीत, ज्याने तुम्ही पैसे देखील कमवू शकत नाही. तुम्ही तुमच्या व्हिडिओद्वारे paid प्रमोशन देखील करू शकता हे खूप फायदेशीर असते

ब्लॉगिंग (Blogging)

आज प्रत्येक व्यक्तीकडे मोबाईल आहे, ज्यामुळे इंटरनेटचा वापर देखील खूप पटीने वाढला आहे. इंटरनेटचा वापर हा केवळ मनोरंजनासाठी तर शैक्षणिक हेतूने देखील मोठ्या प्रमाणात होतो, दर दिवशी लाखो लोक इंटरनेट कोणत्या ना कोणत्या माहितीच्या शोधात असतात.  तुम्हाला माहीत आहे का की जी माहिती आपल्याला इंटरनेटवर प्राप्त होते, ती माहिती कोठून येते, तर ती माहिती जे लोक इंटरनेटवर लिहितात त्यांना ब्लॉगर असे म्हणतात.

ब्लॉगर प्रथम एक वेबसाईट बनवतात, ज्याला ब्लॉग असे म्हटले जाते आणि नंतर ब्लॉगर त्या वेबसाइट म्हणजेच ब्लॉग वर माहिती प्रसारित करतात, आणि जेव्हा आपण इंटरनेटवर काहीही शोधतो त्या संबंधित माहिती आपल्याला इंटरनेट वर दिसून येते.

हल्ली अनेक लोक ब्लॉगिंगला करियर म्हणून निवडत आहेत, खास करून तरुण पिढी. आपण जी वेबसाईट किंवा ब्लॉग बनवतो त्यावर काही ॲड नेटवर्कद्वारे जाहिराती दाखवल्या जातात, ज्याचे आपल्याला पैसे मिळतात, तसेच आपण आपल्या वेबसाईटचे paid प्रोमोशन देखील करू शकतो म्हणजेच पैसे घेऊन इतर website किंवा कंपनी च्या जाहिराती आपल्या ब्लॉग मध्ये लावू शकतो.

Blogging करण्यासाठी Blogger.com, wordpress.com, आणि Wix.com हे काही उत्तम प्लॅटफॉर्म मानले जातात, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे Blogging करून पैसे कमवणे हे थोडे वेळ घेणे आहे, म्हणजे तुमच्या वेबसाईट पासून पैसे कमवण्यासाठी तुम्हाला कमीत कमी सहा महिने वेळ देणे फार गरजेचे आहे, कधी कधी तर  या पेक्षा देखील अधिक कालावधी लागू शकतो.

ऍफिलिएट मार्केटिंग (Affiliate Marketing)

हल्ली अगदी वेगाने ट्रेंड करणारी फिल्ड म्हणजे एबिलिटी मार्केटिंग होय, यामध्ये आपल्याला दुसऱ्यांचे प्रॉडक्ट स्वतःच्या पद्धतीने ऑनलाइन विकायचे असतात, ज्यावर आपल्याला कमिशन मिळते. कमिशन ची अमाऊंट अगदी प्रॉडक्टच्या किमतीच्या ५० % टक्के देखील असू शकते.

Affiliate Marketing हे काम तुम्ही एकही रुपया खर्च न करता देखील करू शकता, ह्यासाठी तुम्ही सोशल मीडिया आणि ब्लॉगचा वापर करून प्रॉडक्ट विकू शकता.

अनेक कंपनी affiliate प्रोग्राम चालवतात, ह्यातील भारतात Amazon, Ali Express आणि Flipkart या काही प्रसिद्ध कंपन्या आहेत, कोणत्याही कंपनीचे Affiliate प्रोग्राम join करणे, फार सोपे असते आणि मोफत देखील.  तसेच हे काम सुरू करण्याच्या पहिल्या दिवसापासून तुम्ही पैसे कमवू शकतात, यावर कोणतीही मर्यादा नसते म्हणजे तुम्ही जितके जास्त सेल generate कराल तितके जास्त पैसे तुम्हाला मिळतील.

Affiliate मार्केटिंग करण्यासाठी प्रथम ज्या कंपनीचे तुम्ही Affiliat प्रोग्राम जॉईन केले आहे, तिथून कोणत्याही एका प्रॉडक्टची खरेदी लिंक मिळवा आणि व्हाट्सअप, फेसबुक, ट्विटर अशा प्लॅटफॉर्म द्वारे तुमच्या पद्धतीने त्या लिंक लोकांपर्यंत पोचवा, जर कोणी या लिंकचा वापर करून खरेदी करेल तेव्हा तुम्हाला पैसे मिळतील.

फेसबुक (Facebook)

फेसबुक हे जगात लोकांद्वारे सर्वाधिक वापरले जाणारे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे.  २०२१ च्या एका जागतिक रिपोर्टनुसार असे समोर आले आहे की, जगातील 2.8 बिलियन म्हणजे जवळजवळ तीन अब्ज लोक फेसबुकचा वापर दैनंदिन जीवनात करतात, हल्लीच फेसबुक ने एक ऍड नेटवर्क सुरू केले आहे, ज्याचे नाव फेसबुक ऑडियन्स नेटवर्क ( Facebook Audience Network ) असे आहे.

फेसबुकच्या या सर्विस मुळे ऑनलाइन पैसे कमविण्याची नवीन संधी निर्माण झाली आहे, हे अगदी गुगल ऍडसेन्स प्रमाणेच कार्य करते.

फेसबुक द्वारे पैसे कमविण्यासाठी प्रथम आपल्याला एक फेसबुक पेज बनवावे लागते. ह्यानंतर फेसबुक पेजचे फॉलोवर वाढविण्याकडे लक्ष द्यायचे असते, त्या नंतर तुम्ही तुमच्या फेसबुक पेजवर विविध गोष्टींचे प्रमोशन करून किंवा वस्तू विकून घरबसल्या पैसे कमवू शकता.

तसेच फेसबुक ऑडियन्स नेटवर्क चा उपयोग करून तुमच्या फेसबुक पेजवर जाहिराती दाखवून पैसे कमवू शकता यासाठी फक्त तुम्हाला तुमच्या फेसबुक पेजवर जास्तीत जास्त लोक आणायचे असतात ज्याने तुमच्या फेसबुक ग्रुप ची एंगेजमेन्ट वाढेल, तसेच फेसबुक वर स्वतःचे प्रोडक्स किंवा इतरांच्या प्रोडक्स च्या जाहिराती दाखवून त्यांची विक्रीवर करून देखील तुम्ही मुबलक नफा मिळवू शकता.

फ्रीलान्सिंग (Freelancing)

फ्रीलान्सिंग म्हणजे स्वतंत्र रीत्या काम करणे आणि फ्रीलान्सिंग करणाऱ्या व्यक्तीला फ्रीलान्सर असे म्हटले जाते. यामध्ये मालक आणि नोकर दोन्ही तुम्हीच असता. तुम्हाला जे काही ज्ञान आहे, त्यावर आधारित सेवा तुम्ही लोकांना पुरवून पैसे कमवू शकता.

फ्रीलान्सिंग ही दोन प्रकारे केले जाते, पहिले म्हणजे ऑनलाइन पद्धतीने आणि दुसरी म्हणजे ऑफलाइन पद्धतीने. ऑफलाईन म्हणजे घरोघरी सेवा पुरवणे, पण तुम्हाला जर घरबसल्या काम करून पैसे कमवायचे असतील, तर ऑनलाईन फ्रीलान्सिंग हा तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू आहे.

तसेच ऑनलाईन काम करण्यासाठी आपल्याला जास्त साहित्याची गरज देखील भासत नाही, केवळ एक संगणक आणि इंटरनेट कनेक्शन. जर तुमच्याकडे संगणक नसेल तर, तुम्ही त्या जागी मोबाईलचा वापर देखील करू शकता, फक्त मोबईल स्क्रीन लहान असल्यामुळे काम करण्याचा वेग थोडा कमी होईल, या व्यतिरिक्त काहीही फरक पडत नाही.

फ्रीलान्सिंग मध्ये तुम्ही कोणतीही सेवा पुरवू शकतात जसे की, वेब डेव्हलपमेंट ( Web Development ) , कन्टेन्ट रायटिंग ( Content Writing ), फोटो एडिटिंग ( Photo Editing )आणि अधिक. एका रिपोर्टनुसार भारतात Freelancing करणारा व्यक्ती दरवर्षी  २०,००,००० रु पर्यंत कमवु शकतो.

ऑनलाइन फ्रीलान्सिंग करणे हे फारच सोपे आहे, आज इंटरनेटवर अनेक अशा वेबसाईट्स आहेत, ज्याद्वारे आपण फ्रीलान्सिंग करू शकतो. Upwork, Fiver, Freelancer हे काही प्रसिद्ध फ्रीलान्सिंग प्लॅटफॉर्म आहेत, यावर केवळ अकाउंट खोलायच असते जे अगदी मोफत असते आणि तुम्ही कोणती सेवा किती दरात पुरवता याची माहिती अकाउंट वर जमा करायचे असते.

तुम्ही जितके चांगले काम कराल तितके जास्त रेटिंग तुम्हाला मिळतात, त्यामुळे तुम्हाला अधिक काम मिळण्याची संभाव्यता असते.

वेब डिसाईन (Web Design)

जसे की आपण जाणतोच की आजचे २१ वे शतक हे तंत्रज्ञानाचे आणि विकासाचे म्हणून ओळखले जाते. तंत्रज्ञान आणि विकासाचा महत्त्वाचा घटक म्हणजे इंटरनेट होय.

आज संपूर्ण जग इंटरनेटला आपल्या दैनंदिन जीवनाचा एक भाग बनवत आहे, ज्यामुळे लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी व्यवसायदेखील ऑनलाइन होऊ लागले आहेत.

जर एखादा व्यवसाय इंटरनेटवर घेऊन जायचा असेल तर, त्यासाठी वेबसाईट खूप गरजेची असते, त्यामुळे व्यावसायिकांचा अधिक जोर वेबसाइट बनविण्यावर आणि न केवळ बनवण्यावर तर सुंदर आणि रेखीव बनवण्यावर असतो, अशात एक उत्तम कामाची संधी निर्माण होते ती म्हणजे Web Designing.

वेबसाईट डिझाईन करणाऱ्या व्यक्तीला वेब डिझायनर असे म्हटले जाते, वेबसाईट बनवण्याचे प्रमाण वाढल्यामुळे वेब डिझायनर ची गरज देखील खूप पटीने वाढली आहे आणि वाढत आहे.

वेबसाईट डिझायनर करण्यासाठी तुम्हाला HTML, CSS आणि Javascript ह्या काही प्रोग्रामिंग लैंग्वेज ची पूर्ण माहिती असणे फार गरजेचे असते. या प्रोग्रामिंग लैंग्वेज शिकण्यास फार सोप्प्या असतात, अगदी ५ ते ६ महिन्यांत ह्या Programming Language तुम्ही सहज शिकू शकता आणि एक उत्तम वेब डिझायनर देखिल बनू शकता.

वेब डिझायनर बनण्यासाठी न केवळ प्रोग्रामिंग भाषा येणे गरजेचे असते, तर त्यासाठी तुमचे माईंड देखील क्रिएटिव्ह असले पाहिजे.

डेटा एन्ट्री (Data Entry)

डेटा एन्ट्री हे काम तर नक्कीच सर्वांच्या परिचयाचे असेल, हे असे काम असे आहे, ज्यावर शाळेत आपल्याला मुबलक अभ्यासक्रम उपलब्ध होता, तसेच डेटा एन्ट्री चे काम करण्यासाठी कोणत्याही स्किल ची गरज भासत नाही, फक्त तुम्हाला टायपिंग आणि मायक्रोसॉफ्ट एक्सेल चा वापर करता आला पाहिजे.

कस्टमर आपल्याला डेटा आणि फॉरमॅट देतो, त्या फॉरमॅट नुसार आपल्याला डेटा एन्ट्री करायची असते, हे काम करण्यासाठी आपल्याला केवळ संगणकाची गरज भासते, त्या व्यतिरिक्त इंटरनेट.  इंटरनेटवर विविध वेबसाईट आहे जी तुम्हाला काम देतात आणि पैसेही. डेटा एन्ट्री करणे हा घरबसल्या काम करून पैसे कमावण्याचा सर्वात सुलभ मार्ग आहे.

शेअर मार्केट (Share Market)

भारतातील लोक शेअर बाजारात खूपच कमी गुंतवणूक करतात, याचे मुख्य कारण म्हणजे लोकांच्या मनातील भीती. लोकांना वाटते की, शेअर मार्केट म्हणजे तोटा, तर अनेकांना असे वाटते की शेअर मार्केटसाठी उच्च दर्जाचे ज्ञान लागते, परंतु असे काहीही नाही.

शेअर मार्केट मध्ये जर तुम्हाला गुंतवणूक करायची असेल, तर मोजून दहा ते बारा मुद्दे लक्षात घ्यावे लागतात, याबद्दल देखील माहिती देण्यासाठी इंटरनेटवर काही ठराविक आणि मोफत वेबसाइट जे तुम्हाला माहिती उपलब्ध करून देतात जसे कि Ticker.Finology.com, TickerTep.com, MoneyControl.com आणि अधिक.  गेल्या वीस वर्षात भारतातील अनेक लोक केवळ शेअर बाजारात गुंतवणूक करून अब्जोपती झाले आहेत, त्याचे सर्वोत्कृष्ट उदाहरण म्हणजेच राकेश झुनझुनवाला.

शेअर मार्केटमध्ये तुम्ही अगदी शंभर रुपयापेक्षा कमी मध्ये गुंतवणूक सुरू करू शकता, यासाठी तुम्हाला केवळ डिमॅट आणि ट्रेडिंग अकाउंट ची गरज भासते, ट्रेडिंग अकाउंट द्वारे तुमच्या शेअरची खरेदी आणि विक्री होते आणि तुम्ही घेतलेले शेअर्स डिमॅट अकाउंटमध्ये जमा केले जातात. Angel Broking, Zerodha, Upstox, Grow हे काही शेअर मार्केट मध्ये इन्वेस्ट करण्यासाठी प्रसिद्ध प्लॅटफॉर्म आहेत, यातील काही मोफत तर काही खर्चिक आहेत.

शेअर मार्केट चे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे याद्वारे तुम्ही तुमचे पैसे न केवळ दुप्पट तर १०० पट देखील करू शकता, आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेअर मार्केटमध्ये प्रवेश करताना कधीही लॉन्ग टर्म इन्व्हेस्ट करणे फायदेशीर ठरते.

ऑनलाईन कामाचे फायदे

  • ऑनलाईन काम करताना तुम्हीच मालक आणि तुम्हीच तुमचे नोकर असता.
  • प्रवास करून कामावर जावे लागत, नसल्यामुळे प्रवासाचा खर्च वाचतो.
  • ऑनलाइन काम करताना तुमच्या शिक्षणाकडे कोणीच पाहत नसून तुम्ही कसे काम करता ह्याकडे पाहिले जाते.
  • तुम्ही अमर्यादित पैसे ऑनलाइन काम करून कमवू शकता.
  • तुमच्या कामाची वेळ आणि जागा तुम्हालाच ठरवायची असते.
  • तुम्हाला हव्या त्या व्यक्तीसोबत तुम्ही काम करू शकता.
  • जास्त साहित्याची गरज भासत नाही त्यामुळे आपला खर्च वाढतो.
  • तुम्हाला कोणालाही फोर्स करावे लागत नाही, ग्राहक स्वतःहून तुमच्याकडे येतात.
  • तुम्हाला स्वतःला आणि तुमच्या कुटुंबाला वेळ देता येतो.

Leave a Comment