गणक यंत्राचा शोध कोणी लावला ?

गणिती आकडेमोड करण्यासाठी आणि व्यावहारिक दृष्टया महत्वपूर्ण असलेल्या गणक यंत्राची नेमकी संकल्पना काय व गणक यंत्राचा शोध कोणी लावला अशा गणक यंत्रासंबंधित विविध माहितीचा आढावा आपण या लेखाद्वारे घेणार आहोत,


गणक यंत्र म्हणजे काय ?

गणक यंत्राला इंग्रजीत “Calculator” असे म्हटले जाते. गणक यंत्र हे सॉफ्टवेअर किंवा इलेक्ट्रॉनिक हार्डवेअर डिव्हाईस स्वरूपात असू शकते, जे गुणाकार, भागाकार, वजबाकी आणि बेरीज यांसारखी गणिती आकडेमोड करण्यास सक्षम असते. पूर्वी गणक यंत्र हे एक भिन्न यंत्र होते, परंतु आज गणक यंत्राचा उपयोग आपण मोबाईल, लॅपटॉप, टॅबलेट सारख्या यंत्रामध्ये देखील सॉफ्टवेअर स्वरूपात करू शकतो.

गणक यंत्राचा शोध कोणी लावला

गणक यंत्राचा उपयोग मानवी जीवनात इतक्या प्रमाणात होऊ लागला आहे, की जणू गणक यंत्र हा मानवी जीवनाचाच एक भाग बनला आहे. जेथे जेथे व्यावहारिक प्रसंग उद्भवतो, तेथे तेथे गणक यंत्राचा उपयोग होऊ लागला आहे. गणक यंत्रामुळे मोठ मोठी गणिती आकडेमोड अगदी वेगाने आणि अचूक होऊ लागल्यामुळे, आपल्या मौल्यवान वेळेची खूप बचत होत आहे या व्यतिरिक्त व्यवहारात अचूकता नांदू लागली आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांपासून ते व्यवसायिकांपर्यंत सर्वच जण गणक यंत्र उपयोगात आणत आहेत.


गणक यंत्राचे प्रकार

गणक यंत्राचा शोध लागल्यापासून ते आतापर्यंत त्यात कालांतराने अनेक बदल घडत आले आहेत परिणामी आज विविध प्रकारचे गणक यंत्र बाजारात उपलब्ध आहे. या विविध प्रकारच्या गणक यंत्राचा आढावा आपण खालीलप्रमाणे घेणारा आहोत,

  • अबॅकस गणक यंत्र
  • साधारण गणक यंत्र
  • वैज्ञानिक गणक यंत्र
  • ग्राफिक गणक यंत्र
  • मुद्रण गणक यंत्र
  • ऑनलाईन गणक यंत्र

1. अबॅकस गणक यंत्र

अबॅकस हे एक त्वरित अंक गणिती गणना करण्यासाठी वापरले जाणारे एक सर्व साधारण उपकरण आहे, ज्याचा शोध प्राचीन काळात लागला होता. एका संशोधनातून हे सिद्ध झाले आहे की, अबॅकसच्या उपयोगामुळे बौद्धिक विकासाला देखील चालना मिळते.

अबॅकस “Abacus” या शब्दाची उत्पत्ती “अबॅक्स” या ग्रीक शब्दापासून झाली आहे. अबॅक्स चा मराठी अर्थ “मोजणी कोष्टक अथवा तक्ता” असा होतो.  अबॅकस नामक हे उपकरण आयताकृती लाकडी फ्रेमपासून तयार केले जाते, ज्यामध्ये लहान लहान मण्यांचा उपयोग केला जातो. या गणक यंत्राच्या उपयोगामुळे एकाग्रता वाढते. अबॅकस गणक यंत्राचा (Abacus Calculator) अधिक उपयोग हा नेत्रहीन लोकांना होतो, जे डिजिटल गणक यंत्र वापरण्यास असक्षम आहेत.

2. सर्वसाधारण गणक यंत्र

वर्तमान काळात वापरला जाणारा गणक यंत्राचा हा एक सर्व साधारण प्रकार आहे. या गणक यंत्राला इंग्रजीत “Basic Calculator” असे म्हटले जाते. गुणाकार, भागाकार, वजाबाकी आणि बेरीज यांसारखी सर्वसाधारण गणितीय गणना पार पाडण्यासाठी या सर्वसाधारण गणक यंत्राचा उपयोग अधिक दिसून येतो.

या प्रकारच्या गणक यंत्रामध्ये साधारणतः ८ ते १२ अंकी डिस्प्ले आणि इनपुटसाठी मोजकी बटणे यांचा समावेश असतो. या प्रकारचे गणक यंत्र हे सेल अथवा चार्जिंग वर चालतात.

3. वैज्ञानिक गणक यंत्र

वैज्ञानिक गणक यंत्राचा (Scientific Calculator) उपयोग हा विज्ञान, अभियांत्रिकी गणितातील समस्या सोडविण्यासाठी केला जातो. या व्यतिरिक्त काही वैज्ञानिक गणक यंत्रांमध्ये अधिकच्या फीचर्सचा समावेश असल्यामुळे, याद्वारे त्रिकोणमितीय, वीजगणित, आणि सांख्यिकीय गणिती समस्या सोढविल्या जाऊ शकतात.

वैज्ञानिक गणक यंत्राचा शोध जगात प्रथम साल १९६८ मध्ये लागला होता. पहिल्या वैज्ञानिक गणक यंत्राचे नाव “HP-9100A” असे होते, या नंतर बाजारात विविध कंपन्यांद्वारे वैज्ञानिक गणक यंत्र तयार करण्यात आले.

बहुतेक वैज्ञानिक गणक यंत्रात बेसिक गणक यंत्राप्रमाणेच सिंगल लाईन डिस्प्ले असतात, तर या डिस्पलेची क्षमता ही साधारणतः एका वेळी १० ते १२ अंक स्क्रीनमध्ये सामावून घेण्याची असते. या व्यतिरिक्त जे उच्च दर्जाचे (Advance) वैज्ञानिक गणक यंत्र असतात, त्यामध्ये बुलियन गणित, हेक्साडेसिमल गणना, अपूर्णांक गणना, संभाव्यता, जटिल संख्याची आकडेमोड, भौतिक स्थिरांकाची गणना, एकक परिवर्तन, मेट्रिक्स गणिती आकडेमोड करण्याची सुविधा असते.

4. ग्राफिक गणक यंत्र

ग्राफिक गणक (Graphic Calculator) यंत्र हे वैज्ञानिक गणक यंत्राच्या तुलनेत अधिक ऍडव्हान्स असते असे आपण म्हणू शकतो. ग्राफिक गणक यंत्राद्वारे एकाच वेळी आलेख तयार करणे आणि समीकरणे सोडविणे शक्य झाले आहे. जगातील सुप्रसिद्ध गणक यंत्र निर्मित कंपनी कॅसिओद्वारे साल १९८५ मध्ये प्रथम ग्राफिक गणक यंत्राची निर्मिती करण्यात आली होती, ज्याला “FX-7000G” असे नाव देण्यात आले होते.

बेसिक गणक यंत्राच्या तुलनेत याचा डिस्प्ले मोठा असतो, ज्याने एकाच वेळी एकापेक्षा अधिक ओळींचे समीकरण पाहता येते. जटिल ग्राफिक गणना करण्यासाठी अनेक गणक यंत्र उच्च दर्जाच्या LCD स्क्रीन आणि वेगवान CPU सहित बाजारात उपलब्ध आहेत. काही ग्राफिक गणक यंत्रांना संगणकांसोबत जोडण्याची सुविधा देखील कंपनीद्वारे प्रदान केली जाते.

5. मुद्रण गणक यंत्र

मुद्रण गणक यंत्र (Printing Calculator) हे वर्तमान काळात एक लोकप्रिय असे यंत्र आहे, ज्यामध्ये आपण स्क्रीन वर आकडेमोड पाहण्यासोबतच प्रिंट देखील काढू शकतो. हे यंत्र काहीसे पेमेंट मशीन प्रमाणे आहे, जे पेट्रोल पंपावर पेमेंट स्वीकारण्यासाठी वापरले जाते.

मुद्रण गणक यंत्र हे बॅटरी आणि चार्जिंगवर देखील चालू शकते, यामध्ये एक कागदी रोल असतो, जो वेळोवेळी छापील प्रत तयार करण्याचे काम जातो. याचा अधिक तर उपयोग व्यवसायिकांद्वारे ग्राहकाला पावती देण्यासाठी केला जातो. मुद्रण गणक यंत्रांवर आपण केलेल्या आकडेवारीची हिस्ट्री (History) देखील पाहू शकतो.


गणक यंत्राचे भाग

एका मॉडर्न गणक यंत्रामध्ये कोणकोणत्या भागांचा समावेश होतो, याचा आढावा आपण खालीलप्रमाणे घेणार आहोत,

इनपुट :- इनपुट म्हणजे गणक यंत्राचे असे भाग, ज्याद्वारे गणक यंत्राला आज्ञा अथवा कमांड दिली जाते, यामध्ये गणक यंत्रातील बटन आणि स्पर्श संवेदनशील सर्किट यांचा समावेश होतो.

आउटपुट :- गणक यंत्रातील निकाल ज्या भागांद्वारे युजरपर्यंत पोहोचवला जातो, अशा भागांना आउटपुट असे म्हटलं जाते, यामध्ये साधारणतः गणक यंत्राच्या डिस्प्ले स्क्रीनचा समावेश होतो.

ऊर्जा स्रोत :- बॅटरी, सेल अथवा चार्जिंग हे गणक यंत्राचे ऊर्जा स्रोत असतात, ज्याद्वारे गणक यंत्राला कार्य करण्यास विद्युत ऊर्जेचा पुरवठा होतो.

प्रोसेसर :- गणक यंत्रामध्ये जे काही टास्क पार पडले जातात ते प्रोसेसरच्या साहाय्याने. गणक यंत्रात प्रोसेसर हा एक मायक्रोचिप स्वरूपात असतो.

तर हे काही गणक यंत्राचे सर्वसाधारण भाग आहेत.


गणक यंत्राचा शोध कोणी लावला ?

इतिहासाचा व्यवस्थित आढावा घेतल्यास असे दिसून येते की, अबॅकस हे जगातील पहिले गणक यंत्र आहे. शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार अबॅकसचा शोध इजिप्त मध्ये ४ ते ५ हजार वर्षांपूर्वी लागला होता, परुंतु याचा निर्माता कोण हे एक मोठे कोडे आहे.

आधुनिक गणक यंत्राचा विचार केल्यास याची उत्पत्ती प्रथम १७ व्या शतकादरम्यान झाली. “पास्कलाइन” हे आधुनिक जगातील पहिले गणक यंत्र म्हणून ओळखले जाते, ज्याचा शोध फ्रेंच गणितज्ञ ब्लेझ पास्कल यांनी साल १६४२ ते १६४४ या दरम्यान लावला होता. पास्कलाइनद्वारे तयार केलेल्या गणक यंत्राद्वारे केवळ वजाबाकी आणि बेरीज या दोनच प्रकारच्या गणिती क्रिया केल्या जाऊ शकत होत्या.

ब्लेज पास्कल यांनी गणक यंत्राचा शोध त्यांच्या वडिलांसाठी लावल्याचे सांगितले जाते. पास्कल चे वडील हे कर संग्राहक होते, जे व्यवहारादरम्यान या यंत्राचा उपयोग करत होते, ज्यामुळे या गणक यंत्राला पहिले व्यावसायिक यंत्र या नावाने देखील ओळखले जाते.


फायदे

कॅल्क्युलेटर अनेक फायदे देतात जे त्यांना विविध क्षेत्रांमध्ये आणि दैनंदिन जीवनात अपरिहार्य साधने बनवतात. येथे कॅल्क्युलेटरचे काही प्रमुख फायदे आहेत:

1. कार्यक्षमता आणि गती

कॅल्क्युलेटर जटिल गणिती आकडेमोड जलद आणि अचूकपणे करू शकतात. ते मॅन्युअल गणनेच्या तुलनेत लक्षणीय वेळ वाचवतात, विशेषत: मोठ्या संख्येने किंवा जटिल सूत्रांचा समावेश असलेल्या गणनेसाठी.

2. अचूकता

मॅन्युअल गणनेमध्ये सामान्य असलेल्या मानवी चुकांचा धोका कमी करून कॅल्क्युलेटर उच्च पातळीची अचूकता प्रदान करतात. अभियांत्रिकी, विज्ञान, वित्त आणि लेखा यांसारख्या क्षेत्रांमध्ये हे विशेषतः महत्वाचे आहे जेथे अचूकता महत्त्वपूर्ण आहे.

3. जटिल गणना

कॅल्क्युलेटर जटिल गणितीय क्रिया हाताळण्यास सक्षम आहेत, जसे की त्रिकोणमितीय कार्ये, लॉगरिदम, घातांक आणि बरेच काही. ही गणने मॅन्युअली केल्यास वेळखाऊ आणि त्रुटी-प्रवण असतील.

4. आलेख आणि व्हिज्युअलायझेशन

बर्‍याच प्रगत कॅल्क्युलेटरमध्ये ग्राफिंग क्षमता असते ज्या वापरकर्त्यांना फंक्शन्स, समीकरणे आणि डेटाचे प्लॉट आणि व्हिज्युअलाइझ करण्याची परवानगी देतात. हे विशेषतः गणित, भौतिकशास्त्र आणि अभियांत्रिकी यासारख्या क्षेत्रांमध्ये उपयुक्त आहे.

5. समस्या सोडवणे

कॅल्क्युलेटर वापरकर्त्यांना विविध विषयांमधील समीकरणे आणि समस्यांचे द्रुतपणे निराकरण करण्यात मदत करतात. शैक्षणिक सेटिंग्जमध्ये, ते विद्यार्थ्यांना गणनेवर जास्त वेळ घालवण्याऐवजी संकल्पना समजून घेण्यावर लक्ष केंद्रित करण्याची परवानगी देऊन शिकण्याची सोय करतात.

6. पोर्टेबिलिटी

आधुनिक कॅल्क्युलेटर कॉम्पॅक्ट आणि पोर्टेबल आहेत, ज्यामुळे ते वाहून नेण्यासाठी सोयीस्कर साधने बनतात. ही पोर्टेबिलिटी विशेषतः व्यावसायिक, विद्यार्थी आणि प्रवासात गणना करणे आवश्यक असलेल्या प्रत्येकासाठी मौल्यवान आहे.

7. डेटा विश्लेषण

सांख्यिकीय कार्यांसह सुसज्ज कॅल्क्युलेटर डेटा सेटचे विश्लेषण करण्यासाठी, सरासरीची गणना करण्यासाठी, मानक विचलनासाठी आणि इतर सांख्यिकीय उपायांसाठी आवश्यक आहेत. ते व्यवसाय, अर्थशास्त्र आणि सामाजिक विज्ञान यासारख्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर वापरले जातात.

8. प्रोग्रामिंग आणि अल्गोरिदम

काही कॅल्क्युलेटर प्रोग्रामिंग क्षमता देतात, जे वापरकर्त्यांना साधे प्रोग्राम लिहिण्यास आणि कार्यान्वित करण्यास अनुमती देतात. पुनरावृत्ती होणारी गणना आणि कार्ये स्वयंचलित करण्यासाठी हे उपयुक्त आहे.

9. आर्थिक गणना

वित्त आणि लेखांकनासाठी डिझाइन केलेले कॅल्क्युलेटर कर्ज, व्याजदर, गुंतवणूक आणि इतर आर्थिक व्यवहारांशी संबंधित गणना करू शकतात, ज्यामुळे जलद आणि अचूक आर्थिक नियोजन करता येते.

10. शैक्षणिक साधन

शैक्षणिक सेटिंग्जमध्ये, गणित आणि इतर विषय शिकवण्यात कॅल्क्युलेटर महत्त्वाची भूमिका बजावतात. ते संकल्पना दृश्यमान करण्यात, गृहीतके तपासण्यात आणि परिणामांची पडताळणी करण्यात मदत करू शकतात.

11. अष्टपैलुत्व

कॅल्क्युलेटर विविध प्रकारांमध्ये उपलब्ध आहेत, साध्या अंकगणितासाठी मूलभूत मॉडेलपासून प्रगत वैज्ञानिक आणि जटिल गणनांसाठी आलेख कॅल्क्युलेटरपर्यंत. हे अष्टपैलुत्व वापरकर्त्यांना त्यांच्या विशिष्ट गरजांसाठी योग्य साधन निवडण्याची परवानगी देते.

12. पैशाचे वेळेचे मूल्य

फायनान्शिअल कॅल्क्युलेटर पैशाच्या गणनेचे वेळेचे मूल्य हाताळू शकतात, वापरकर्त्यांना गुंतवणूक, कर्जे आणि इतर आर्थिक बाबींबाबत माहितीपूर्ण निर्णय घेण्यास मदत करतात.

13. वैज्ञानिक संशोधन

वैज्ञानिक संशोधनात, कॅल्क्युलेटरचा वापर डेटावर प्रक्रिया करण्यासाठी आणि विश्लेषण करण्यासाठी, सिम्युलेशन करण्यासाठी आणि विविध घटनांचे मॉडेल करण्यासाठी केला जातो, ज्यामुळे विविध वैज्ञानिक क्षेत्रातील प्रगतीमध्ये योगदान होते.

14. वापरणी सोपी

अनेक कॅल्क्युलेटर वापरकर्ता-अनुकूल इंटरफेस आणि अंतर्ज्ञानी बटणांसह डिझाइन केलेले आहेत, ज्यांना गणिताचे विस्तृत ज्ञान नसलेल्या व्यक्तींसाठी देखील ते प्रवेशयोग्य बनवतात.

सारांश, कॅल्क्युलेटर विविध अनुप्रयोगांमध्ये कार्यक्षमता, अचूकता, अष्टपैलुत्व आणि सुविधा देतात. ते व्यावसायिक, विद्यार्थी आणि गणिती आणि संख्यात्मक कार्ये नियमितपणे हाताळणाऱ्या प्रत्येकासाठी आवश्यक साधने आहेत.


FAQ

1. जगातील पहिले गणक यंत्र कोणते ?

उत्तर : अबॅकस हे जगातील पहिले गणक यंत्र आहे, ज्याचा शोध इजिप्तमध्ये हजारो वर्षांपूर्वी लागल्याचे सांगितले जाते.

2. इलेक्ट्रॉनिक गणक यंत्राचा शोध कोणत्या वर्षी लागला ?

उत्तर : इलेकट्रोनिक गणक यंत्राचा शोध साल १९६७ मध्ये लागला.

3. गणक यंत्रात कोणत्या प्रकारच्या डिस्प्लेचा उपयोग केला जातो ?

उत्तर : गणक यंत्रात साधारणतः LCD (Liquid-Crystal Display) आणि LED (Light-Emitting Diode) या दोन प्रकारच्या डिस्प्लेचा अधिक उपयोग दिसून येतो.

4. ऑनलाईन गणक यंत्र म्हणजे काय ?

उत्तर : ऑनलाईन गणक यंत्र हे एका सॉफ्टवेअर स्वरूपात असते, ज्याचा आढावा मोबाईल, लॅपटॉप, टॅब्लेटसारख्या यंत्रांद्वारे घेतला जाऊ शकतो.

अधिक लेख –

1. पेन चा शोध कोणी लावला ?

2. सेमीकंडक्टर म्हणजे काय व याचे उपयोग कोणते ?

3. इलेक्ट्रॉनिक्स म्हणजे काय व याचे प्रमुख घटक कोणते ?

4. ई कचरा म्हणजे काय ?

Leave a Comment