FD म्हणजे काय व FD चे फायदे कोणते ?

बँकांना त्यांची विविध कामे पार पाडण्यासाठी निधीची गरज असते. बँक विविध मार्गाने निधीचे नियोजन आणि व्यवस्थापन करत असते. असाच एक बँकेचा निधी स्त्रोत म्हणजे मुदत ठेवू खाते होय, ज्याला आपण FD खाते असे देखील म्हणतो.

हे FD खाते म्हणजे काय व या खात्यांचा बँक आणि ठेवीदारांना कसा फायदा होतो, अशा विविध माहितीचा आढावा आपण या लेखाद्वारे घेणार आहोत,

अनुक्रमणिका


FD म्हणजे काय ?

Fixed Deposit अथवा FD हा गुंतवणूकदारांसाठी एक उत्तम पर्याय आहे, जो भारतातील गैर बँकिंग वित्तीय संस्था आणि बँक यांच्याद्वारे मंजूर करण्यात आला आहे. गुंतवणूकदार अगदी सहज रित्या FD मध्ये गुंतवणूक करू शकतात, ज्यावर त्यांना नियमित बचत खात्यापेक्षा अधिक व्याज त्यांना मिळते.

FD म्हणजे काय

अगदी सोप्या भाषेत सांगायचे झाले तर, FD हे एक प्रकारचे बँक खाते आहे, जेथे ग्राहक एक ठराविक रक्कम ठराविक काळासाठी डिपॉसिट करतो, ज्यावर त्याला ठराविक % व्याजदर दर वर्षी मिळते.

समजा, रमेश ने “अबक” या बँकेत एक Fixed Deposit खाते खोलले व त्या खात्यात रमेशने १० लाख रुपये १० वर्षांसाठी डिपॉसिट केले. रमेशला अबक ही बँक Fixed Deposit खात्यावर ५ % टक्के व्याजदर देत आहे. तर अशात रमेशला दर वर्षी अबक या बँकेकडून १० लाख रुपयांवर ५ % म्हणजेच ५० हजार रुपये व्याज मिळेल.

FD ही नवीन गुंतवणूकदारांसाठी एक आकर्षक अशी योजना आहे, जी गुंतवणूकदाराला एकरकमी निधी जमा करण्यास व त्या निधीची अगदी सुरक्षित रित्या वाढ करण्यास सक्षम करते. किती रक्कम किती कालावधी साठी गुंतवायची हा निर्णय घेण्याचा अधिकार हा पूर्णतः ग्राहक अथवा गुंतवणूकदाराचा असतो.

ग्राहक FD खात्यावर मिळणारे व्याज हे वार्षिक रित्या अथवा FD मोडताना एकत्र प्राप्त करू शकतो.


FD Full Form in Marathi

F – Fixed
D – Deposit

FD चा फुल फॉर्म Fixed Deposit असा असून याचा मराठी अर्थ मुदत ठेवी असा होतो.


FD चे प्रकार

बँक ठेवीदारांना विविध प्रकारचे FD खाते उपलब्ध करून देते, ज्यांचा आढावा आपण खालीलप्रमाणे घेणार  आहोत,

1. मानक मुदत ठेवी

आज जवळ जवळ भरतीतील प्रत्येक बँक त्यांच्या ग्राहकांना मानक मुदत ठेवी (Standard Fixed Deposit) हा पर्याय उपलब्ध करून देत आहे. यामध्ये ग्राहक एक ठराविक रक्कम ठराविक कालावधीसाठी गुंतवू शकतो, ज्यावर बँक ग्राहकाला ठराविक % व्याज मूळ रकमेवर प्रदान करते. व्याजाची टक्केवारी ही साधारणतः ४ % ते ८ % या दरम्यान असू शकते. अनेकदा व्याजाची टक्केवारी ही ग्राहक किती रक्कम डिपॉसिट करत आहे, यावर देखील ठरवली जाते.

वैशिष्टये :-

 • रक्कम ठराविक मुदतीसाठी डिपॉसिट केली जाते.
 • ठेवी ठेवण्याचा कालावधी किमान ७ दिवस ते १० वर्ष इतका असू शकतो.
 • रक्कम डिपॉसिट करण्याआधीच व्याजाची टक्केवारी बँकेद्वारे निश्चित केली जाते.
 • मानक मुदत ठेवींमध्ये (Standard Fixed Deposit) मिळणार व्याजदर हा नक्कीच बचत खात्यावर मिळणाऱ्या व्याजदरापेक्षा जास्त असतो.

2. कर बचत मुदत ठेवी

कर-बचत मुदत ठेवी (Tax-Saving Fixed Deposit) ही मानक मुदत ठेवी (Standard Fixed Deposit) पेक्षा फार वेगळी आहे, यामध्ये ग्राहक अथवा गुंतवणूकदार ५ वर्षांपेक्षा कमी कालावधीसाठी पैसे डिपॉसिट करू शकत नाही. तसेच कर बचत मुदत ठेवीमध्ये केलेली गुंतवणूक भारतीय कर सवलत कायदा U/S 80 C साठी पात्र ठरते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र रक्कम ही जास्तीत जास्त दीड लाख रुपये (१,५०,००० रुपये) इतकी असू शकते. ग्राहक केवळ एकरकमी डिपोसिट या योजने अंतर्गत करू शकतो.

3. विशेष मुदत ठेवी

ही मुदत ठेवी काही विशेष कालावधीसाठी प्रदान केली जात असल्यामुळे, याला विशेष कर ठेवी (Special Fixed Deposit) म्हणून संबोधले जाते. विशेष कर ठेवींवर ग्राहक अथवा गुंतवणूकदाराला नेहमीपेक्षा अधिक व्याजदर मिळते, ज्यामुळे ही योजना गुंतवणूकदरांमध्ये जास्त प्रसिद्ध आहे.

वैशिष्ठ्य :-

 • नेहमीपेक्षा अधिक व्याजदर ग्राहकाला अथवा गुंतवणूकदाराला दिला जातो.
 • गुंतवणूक ज्या ठराविक कालावधी पर्यंत आहे, तत्पूर्वी FD खात्यातून पैसे काढता येत नाहीत.
 • या योजनेचा लाभ घेण्यासाठी विशेष FD खात्यांतर्गत गुंतवणूक करावी लागेल.

4. संचयी मुदत ठेवी

संचयी मुदत ठेवी (Cumulative Fixed Deposit) योजनेत ग्राहकाला व्याजाची रक्कम ही एकत्र FD खात्याच्या मुदतपूर्तीच्या वेळी मिळते. तोपर्यंत मिळणार व्याजदर हा मुदतीमध्ये चक्रवाढ करत असतो. यामध्ये ग्राहकाला उच्च व्याजदर मिळते.

समजा, ग्राहकाने १,००,००० रुपये इतकी रक्कम १० % व्यजदरावर ३ वर्ष कालावधीसाठी FD खात्यात डिपॉसिट केली. तर ग्राहकाला दर वर्षी १,००,००० रुपयांवर १०% च्या हिशोबाने १०,००० न मिळता ३ वर्षांनंतर १,३२,४५८ इतकी रक्कम मिळेल.

वैशिष्टय :-

 • संचयी मुदत ठेवीवर मासिक, वार्षिक, त्रैमासिक आधारावर चक्रवाढ होते.
 • ग्राहकाने गुंतविलेल्या मूळ रकमेत वाढ होते, व त्या रकमेवर ग्राहकाला व्याजदर मिळतो.

5. असंचयी मुदत ठेवी

असंचयी मुदत ठेवींवर (Non-Cumulative Fixed Deposit) ग्राहकाला नियमित कालावधीत व्याजदर मिळत असतो. ग्राहकाला मासिक, त्रैमासिक अथवा सहा महिन्यांनी देखील व्याजदर मिळू शकतो. असंचयी मुदत ठेवी खात्यांवर बँकेद्वारे व्याज न रोखल्यामुळे ते तंतोतंत ग्राहक अथवा गुंतवणूकदारांपर्यंत पोहोचते.

6. जेष्ठ नागरिक मुदत ठेवी

ज्या व्यक्तींचे वय ६० वर्ष किंवा ६० पेक्षा अधिक आहे, अशा समाजातील जेष्ठ नागरिकांसाठी ही योजना तयार करण्यात आली आहे. जेष्ठ नागरिक मुदत ठेवींवर (Senior Citizen’s Fixed Deposit) इतर मुदत ठेवींपेक्षा काही टक्के अधिक व्याजदर मिळतो, हा व्याजदर ५ ते १० % दरम्यान असू शकतो. जेष्ठ नागरिक मुदत ठेवीवर ग्राहकाला मासिक अथवा त्रैमासिक आधारावर व्याजदर दिला जातो.

वैशिष्टय :-

ज्या व्यक्तींचे वय ६० वर्ष किंवा ६० पेक्षा अधिक आहे, असेच व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

या मुदत ठेवी खात्यांवर अधिक व्याजदर दिला जातो.

ज्येष्ठ नागरिक मुदत ठेवीवर कर सवलती देखील दिल्या जातात .

7. अस्थिर मुदत ठेवी

अस्थिर मुदत ठेवीं (Flexi Fixed Deposit) खाते ग्राहकाला व्यवहारात लवचिकता प्रदान करते. अस्थिर मुदत ठेवी खाते हे बचत खाते आणि मुदत ठेवी खात्याचे संयोजन आहे, असे आपण म्हणू शकतो. यामध्ये ग्राहकांना मुदत ठेवी खात्याप्रमाणे उच्च व्याजदर तर बचत खात्याप्रमाणे खात्यात तरलतेचा लाभ मिळतो.

वैशिष्ट्य :-

 • ग्राहक मर्यादित ठेवीवर नुसारही FD खात्याचा प्रारंभ करू शकतो व नंतर ते खाते त्याच्या बचत खात्यासोबत जोडू शकतो.
 • ग्राहक मर्यादेपेक्षा जास्त रक्कम बचत खात्यातून मुदत ठेवी खात्यात हस्तांतरित करू शकतो.

FD योजना कशी कार्य करते ?

भारतातील बँकांद्वारे त्यांच्या ग्राहकांना बचत खाते, चालू खाते असे विविध खाते सेवा पुरवली जाते. परंतु या खात्यांमधून ग्राहक त्याची ठेवी कोणत्याही वेळी काढू शकतात. या व्यतिरिक्त चालू खात्यांमध्ये शून्य ठेवी ठेवता येते. बँकांना विविध कामे पार पाडण्यासाठी जसे कि कर्ज देण्यासाठी निधीची सतत गरज भासत असते. बँक त्यांच्या इतर ग्राहकांना कर्ज देण्यासाठी खातेदाराच्या चालू अथवा बचत खात्यातील निधी हस्तांतरित करू शकता नाही, अशात बँकेसाठी निधी उभारण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे मुदत ठेवी (FD) खाते होय.

FD मध्ये ठेवीदार खात्यात ठराविक रक्कम ही ठराविक कालावधीसाठी जमा करतो. ठेवींचा कालावधी ७ दिवस ते १० वर इतका असू शकतो. ठेवीचा कालावधी निवडण्याची संपूर्ण सूट ग्राहकाला दिली जाते. ग्राहक किती निधी किती कालावधीसाठी FD करत आहे, यावर ग्राहकाला मिळणारे व्याजदर निश्चित होते. निश्चित केलेल्या मुदतीपूर्वी ठेवीदार खात्यातून पैसे काढू शकत नाही, काही बँका पैसे काढण्याची मुभा ग्राहकाला अथवा ठेवीदाराला देतात, परंतु यामुळे ठेवीदाराला ठरलेल्या व्याजदरापेक्षा कमी व्याजदर मिळते.

FD खात्याचे विविध प्रकार आहेत, त्यामुळे खात्याची सुरुवात करतांना कोणते खाते आपल्यासाठी लाभदायक ठरेल याचा विचार ठेवीदाराने करणे गरजेचे आहे. तसेच वर्तमान काळात अनेक ऑनलाईन FD Calculator उपलब्ध आहेत, ज्याच्या आधारे ठेवीदार व्याजदराची गणना करू शकतो व FD खात्यासंबधित ठोस निर्णय घेऊ शकतो.

बँका मुदत ठेवी खात्यातून हस्तांतरित केलेल्या निधीचा अधिकतर उपयोग हा बँकेतील इतर खातेदारांना कर्ज देण्यासाठी करतात. बँका कर्ज देऊन त्यातून व्याज स्वरूपी नफा मिळवतात, ज्यातील काही टक्के हिस्सा हा मुदत ठेवी खातेदाराला दिला जातो. अशा प्रकारे बँका मध्यस्थी करून पैशांचे व्यवस्थापन करतात.


फायदेशीर FD योजनेची निवड कशी करावी ?

शेअर मार्केट अथवा सोने वगळता FD हा गुंतवणुकीचा एक सोपा आणि सुलभ पर्याय मानला जातो. अशात अनेक व्यक्तींना FD मध्ये गुंतवणूक करताना अनेक प्रश्न उद्भवतात, जसेकी कोणती बँक FD साठी उत्तम ठरेल, कोणत्या प्रकारच्या FD मध्ये गुंतवणूक करावी आणि अधिक.

इथे आपण काही अशा मुद्द्यांचा आढावा घेणार आहोत, जे गुंतवणूकदारांना FD मध्ये गुंतवणूक करण्यास लाभकारी ठरतील.

1. मुदत / कालावधी :- FD  खात्यावर मिळणार व्याजदर हा काहीसा मुदत ठेवी कालावधीवर अवलंबून असतो, म्हणजेच ठेवीदार जितक्या जास्त कालावधीसाठी रक्कम खात्यात ठेवेल, तितके जास्त हस्तांतरण त्या ठेवीचे बँकांद्वारे केले जाते, ज्याने बँकांना अधिक नफा मिळतो, आणि बँकांना अधिक नफा मिळाला कि, बँक ग्राहकाला अधिक नफा मिळवून देते. ठेवीदार जास्तीत जास्त १० वर्षांसाठी खात्यात रक्कम ठेवू शकतो. त्यामुळे ठेवीदाराने ठेवी ठेवण्यापूर्वी आपण किती कालावधी पर्यंत ती FD खात्यात ठेऊ शकतो, याचा विचार करणे गरजेचे आहे.

2. मुदतपूर्व पैसे काढणे :- केव्हाही प्रथम FD खाते खोलण्यापूर्वी बँकेच्या मुदत पूर्व पैसे काढण्याच्या काय अटी आणि शर्ती आहेत, याचा आढावा घेणे फार गरजेचे आहे. कारण अनेकदा बँक मुदतपूर्व FD खात्यातून पैसे काढल्याने विविध चार्ज ठेवीदाराकडून आकाराने, व्याजदर न देणे अथवा कमी देणे अशी पाऊले उचलू शकतात. बँकांच्या FD संबंधित सर्व कलमे आणि अटी या आपण त्यांच्या Official वेबसाईट वर वाचू शकतो.

3. व्याजदर :- व्याजदर हा FD खात्यासंबंधित एक महत्वपूर्ण घटक आहे, ज्यासाठी ठेवीदार बँकेत ठेवी ठेवतो. व्याजदर संबंधित सर्व माहिती ग्राहकाला असणे गरजेचे आहे. कोणती बँक कोणत्या FD खात्यावर किती व्याजदर देत आहे, किती कालावधीसाठी ठेवी ठेवल्यावर आपल्याला जास्त व्याजदर मिळेल आणि जास्त व्याजदर मिळविण्यासाठी किती रक्कम FD खात्यात जमा करावी लागेल, यासंबंधित माहिती ठेवीदारांला असणे फार गरजेचे आहे. हा सर्व डेटा ऑनलाईन पद्धतीने अगदी सहज उपलब्ध होतो, तसेच ठेवीदार बँक शाखेत प्रत्यक्षात जाऊन देखील या संबंधित विचारपूस करू शकतो.

4. इतर घटक :- भारतातील बऱ्याच बँका ग्राहकांना FD खात्यावर कर्ज उपलब्ध करून देतात, या व्यतिरिक्त Over Draft सुविधा देखील मिळवून देतात, त्यामुळे ज्या बँकेद्वारे अधिक फायदे मिळत असतील अशाच बँकेत अथवा FD योजनेत गुंतवणूक करणे लाभ दायक ठरेल.


FD चे फायदे

मुदत ठेवी (FDs), ज्यांना मुदत ठेवी किंवा टाइम डिपॉझिट देखील म्हणतात, बँका आणि वित्तीय संस्थांद्वारे ऑफर केलेली आर्थिक साधने आहेत. ते गुंतवणूकदारांना अनेक फायदे देतात:

1. सुरक्षितता

एफडी हा सर्वात सुरक्षित गुंतवणूक पर्यायांपैकी एक मानला जातो कारण त्यांचा विशिष्ट मर्यादेपर्यंत सरकारी ठेव विमा योजनांद्वारे विमा काढला जातो. याचा अर्थ असा की जरी बँक किंवा संस्थेला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला तरीही, तुमची मूळ रक्कम सहसा हमी असते.

2. स्थिरता

FD पूर्वनिर्धारित कालावधीसाठी निश्चित व्याज दर देतात, परताव्यात स्थिरता आणि अंदाजेपणा प्रदान करतात. हे विशेषतः जोखीम-प्रतिरोधक गुंतवणूकदारांसाठी फायदेशीर ठरू शकते जे बाजारातील अस्थिरतेशिवाय स्थिर उत्पन्नाला प्राधान्य देतात.

3. निश्चित परतावा

इतर अनेक गुंतवणुकीच्या पर्यायांप्रमाणे, FDs खात्रीपूर्वक परतावा देतात. व्याजदर ठेवीच्या वेळी पूर्वनिर्धारित केला जातो आणि व्याज उत्पन्नाची ज्ञात रक्कम सुनिश्चित करून संपूर्ण कार्यकाळात स्थिर राहते.

4. तरलता पर्याय

इतर काही गुंतवणुकीच्या पर्यायांपेक्षा एफडी कमी तरल मानल्या जातात, परंतु ते अनेकदा मुदतपूर्व पैसे काढण्याच्या तरतुदींसह येतात. तथापि, हे काही विशिष्ट दंड किंवा कमी व्याजदरांच्या अधीन असू शकतात.

5. लवचिक कार्यकाल

एफडी काही महिन्यांपासून अनेक वर्षांपर्यंत अनेक कालावधीची ऑफर देतात, ज्यामुळे गुंतवणूकदारांना त्यांच्या आर्थिक उद्दिष्टांशी जुळणारा कालावधी निवडता येतो. ही लवचिकता अल्पकालीन आणि दीर्घकालीन आर्थिक नियोजनासाठी उपयुक्त ठरू शकते.

6. कमी धोका

इक्विटी किंवा कमोडिटीजसारख्या इतर गुंतवणूक पर्यायांच्या तुलनेत एफडीशी संबंधित जोखीम साधारणपणे कमी असते. हे त्यांचे भांडवल जतन करू पाहणाऱ्या पुराणमतवादी गुंतवणूकदारांसाठी त्यांना योग्य पर्याय बनवते.

7. कर बचत पर्याय

काही देशांमध्ये, विशिष्ट प्रकारच्या मुदत ठेवी आयकर कायद्याच्या विशिष्ट कलमांनुसार कर कपातीसाठी पात्र असू शकतात. या कर-बचत एफडी तुमचे करपात्र उत्पन्न कमी करताना व्याज मिळवण्याची संधी देतात.

8. नियमित उत्पन्न

सेवानिवृत्त किंवा नियमित उत्पन्न मिळवू इच्छिणाऱ्यांसाठी, FDs मासिक, त्रैमासिक किंवा वार्षिक व्याज देय देऊ शकतात, जे एखाद्याच्या नियमित उत्पन्नाला पूरक ठरू शकतात.

9. बाजारातील चढ-उतार नाहीत

शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीप्रमाणे एफडीवर बाजारातील चढउतारांचा प्रभाव पडत नाही. हे बाजारातील अस्थिरतेबद्दल चिंतित असलेल्या गुंतवणूकदारांना मनःशांती प्रदान करू शकते.

10. विविधीकरण

वैविध्यपूर्ण गुंतवणूक पोर्टफोलिओचा एक भाग म्हणून एफडीचा वापर केला जाऊ शकतो. ते धोकादायक गुंतवणुकीप्रमाणे उच्च परताव्याची समान क्षमता देऊ शकत नसले तरी, ते एकंदर गुंतवणूक धोरणाला स्थिरता आणि समतोल प्रदान करू शकतात.

11. गुंतवणुकीची सुलभता

एफडी उघडणे ही सामान्यतः एक सरळ प्रक्रिया असते, ज्यासाठी किमान कागदपत्रे आवश्यक असतात. हे गुंतवणुकीसाठी नवीन असू शकतील अशा लोकांसह, विविध व्यक्तींसाठी ते प्रवेशयोग्य बनवते.

तथापि, हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की FD मध्ये काही कमतरता आहेत, जसे की इतर गुंतवणूक पर्यायांच्या तुलनेत तुलनेने कमी परतावा, महागाईमुळे संभाव्य क्रयशक्ती कमी होणे आणि मर्यादित तरलता. गुंतवणूक करण्यापूर्वी, व्यक्तींनी त्यांची आर्थिक उद्दिष्टे, जोखीम सहनशीलतेचा विचार केला पाहिजे आणि ते एक माहितीपूर्ण निर्णय घेतील याची खात्री करण्यासाठी इतर गुंतवणूक पर्यायांचा शोध घ्यावा.


FD चे तोटे

फिक्स्ड डिपॉझिट (FDs) काही फायदे देतात, पण ते काही तोटे देखील देतात ज्यांचा गुंतवणूकदारांनी विचार केला पाहिजे:

1. कमी परतावा

एफडीद्वारे दिले जाणारे व्याजदर इक्विटी, म्युच्युअल फंड किंवा रिअल इस्टेट सारख्या इतर गुंतवणूक पर्यायांमधून मिळणाऱ्या संभाव्य परताव्यापेक्षा अनेकदा कमी असतात. याचा अर्थ गुंतवणूकदार उच्च वाढीच्या संधी गमावू शकतात.

2. महागाईचा धोका

FD कदाचित महागाईपेक्षा जास्त परतावा देऊ शकत नाही. कालांतराने, कमावलेल्या व्याजाची क्रयशक्ती कमी होऊ शकते, ज्यामुळे वास्तविक मूल्याचे नुकसान होण्याची शक्यता असते.

3. तरलता मर्यादा

इतर काही गुंतवणुकींच्या विपरीत, FD चा कालावधी निश्चित असतो आणि मुदतपूर्व पैसे काढणे दंड किंवा कमी व्याजदरांसह येऊ शकते. आणीबाणीच्या परिस्थितीत तुम्हाला तुमच्या निधीत प्रवेश करण्याची आवश्यकता असल्यास तरलतेचा अभाव हा गैरसोय होऊ शकतो.

4. व्याजदर जोखीम

एकदा तुम्ही विशिष्ट व्याजदराने तुमची FD लॉक केल्यानंतर, तुम्हाला व्याजदराच्या जोखमीचा सामना करावा लागतो. तुम्ही गुंतवणूक केल्यानंतर व्याजदर वाढल्यास, तुम्हाला कमी दरामध्ये लॉक केले जाईल, संभाव्यत: जास्त परतावा मिळणार नाही.

5. संधी खर्च

FD मध्ये गुंतवलेले पैसे बांधले जातात आणि इतर संभाव्य फायदेशीर संधींसाठी वापरले जाऊ शकत नाहीत. याला संधी खर्च म्हणून ओळखले जाते, कारण तुम्ही गुंतवणुकीचे चांगले पर्याय गमावू शकता.

6. कर आकारणी

अनेक देशांमध्ये, FD मधून मिळणारे व्याज कर आकारणीच्या अधीन आहे. तुमच्या टॅक्स ब्रॅकेटवर अवलंबून, हे तुमचे एकूण रिटर्न लक्षणीयरीत्या कमी करू शकते. स्थानिक कर कायद्यांवर आधारित कर परिणाम बदलू शकतात.

7. भांडवल प्रशंसा नाही

FD निश्चित व्याज उत्पन्न देतात, परंतु ते कोणतेही भांडवल वाढ देत नाहीत. याचा अर्थ तुमची गुंतवणूक केलेली मुद्दल निश्चित व्याजदराच्या पलीकडे वाढत नाही.

8. किमान ठेव आवश्यकता

काही बँका किंवा वित्तीय संस्थांमध्ये FD उघडण्यासाठी किमान ठेव आवश्यकता असू शकतात. गुंतवणूक करण्यासाठी मर्यादित निधी असलेल्या व्यक्तींसाठी हे एक गैरसोय असू शकते.

9. लवकर पैसे काढणे दंड

तुम्हाला मुदतपूर्तीच्या तारखेपूर्वी तुमचे पैसे काढायचे असल्यास, तुम्हाला दंडाला सामोरे जावे लागू शकते ज्यामुळे तुमची व्याज कमाई किंवा अगदी मूळ रक्कमही खाऊ शकते.

10. बाजारातील बदल

एफडी तुलनेने स्थिर असताना, त्या पूर्णपणे जोखीममुक्त नसतात. FD ऑफर करणार्‍या वित्तीय संस्थेला आर्थिक अडचणी येत असल्यास, तुमच्या गुंतवणुकीला संभाव्य धोका आहे, जरी अनेक देशांमध्ये ठराविक ठेवींचे संरक्षण करण्यासाठी ठेव विमा योजना आहेत.

11. महागाई-समायोजित नाही

एफडी महागाईशी जुळवून घेत नाहीत. कालांतराने, वाढत्या किमतींमुळे तुमच्या निश्चित व्याजाचे मूल्य कमी होऊ शकते.

12. मर्यादित गुंतवणूक होरायझन

FD मध्ये सामान्यत: निश्चित कार्यकाळ असतात, जे सर्व आर्थिक उद्दिष्टांशी जुळत नाहीत. तुम्हाला दीर्घकालीन उद्दिष्टासाठी निधीची आवश्यकता असल्यास, FD परिपक्व होईपर्यंत तुम्हाला गुंतवलेल्या पैशात प्रवेश नसेल.

FD मध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी, FDs तुमच्या आर्थिक उद्दिष्टे, जोखीम सहनशीलता आणि एकूण गुंतवणूक धोरणाशी जुळतात की नाही हे निर्धारित करण्यासाठी फायद्यांसह या तोट्यांचे काळजीपूर्वक मूल्यांकन करणे आवश्यक आहे.


FAQ

1. ठेवीदार किमान किती ठेवी सह FD खाते सुरु करु शकतो ?

उत्तर : ठेवीदार किमान १,००० रुपयांच्या ठेवी सह स्वतःचे FD खाते सुरु करू शकतो.

2. FD खात्यात जास्तीत जास्त किती कालावधीसाठी ठेवी ठेवता येते ?

उत्तर : FD खात्यात जास्तीत जास्त १० वर्षांसाठी ठेवीदार ठेवी ठेवू शकतो.

3. FD खात्यात जास्तीत जास्त किती रकमेची ठेवी ठेवू शकतो ?

उत्तर : FD खात्यात ठेवीदार जास्तीत जास्त १ कोटी रुपयांची ठेवी ठेवू शकतो.

4. FD खात्यात किती व्याजदर मिळतो ?

उत्तर : FD खात्यावर मिळणार व्याजदर हा विविध बँकेचा विविध % असतो, हा व्याजदर साधारणतः ५ ते ९ % दरम्यान असू शकतो.

5. FD खात्यातील ठेवीचा उपयोग बँक कसा करते ?

उत्तर : FD खात्यातील ठेवींचा उपयोग बँक, बँकेतील इतर खातेदारांना जास्त व्याजदराने कर्ज देण्यासाठी वापरते.

6. भारतात FD योजनेची सुरुवात कधी झाली ?

उत्तर : भारतात FD योजनेची सुरुवात एप्रिल १९९२ मध्ये झाली.

अधिक लेख –

1. म्युच्युअल फंड म्हणजे काय ?

2. शेअर बाजार संपूर्ण माहिती

3. व्यवस्थापन म्हणजे काय व याचे फायदे कोणते ?

Leave a Comment