फेसबुकचा शोध कोणी लावला ?

आज जवळजवळ प्रत्येक इंटरनेट युजर हा सोशल मीडिया साईटवर दैनंदिन जीवनातील बराचसा वेळ घालवत असतो. या व्यतिरिक्त नवनवीन लोकांशी चॅटिंग करणे, स्वतःचे फोटो शेअर करणे, अशी विविध कामे सोशल मीडिया साईटवर पार पाडली जातात.

सोशल मीडिया ही एकप्रकारे लोकांना जोडण्याचे कार्य करत असते, ज्यामुळे लोकांमधील अंतर कमी होऊ लागले आहे. वर्तमान काळात अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत, ज्यातील फेसबुक हे सर्वाधिक लोकप्रिय आहे.

या लेखात आपण फेसबुक संबंधित विविध माहितीच आढावा घेणार आहोत,


फेसबुक म्हणजे काय ?

फेसबुकचा शोध कोणी लावला

फेसबुक हे एक जगप्रसिद्ध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. फेसबुक वापरण्यास मोफत आणि सुलभ देखील आहे. फेसबुकचा उपयोग करण्यासाठी आपल्याला प्रथम, स्वतःचे एक फेसबुक खाते खोलावे लागते. खाते खोलले की, आपण फेसबुक चे “Registered User” म्हणून घोषित होतो. फेसबुक खात्याचा ऍक्सेस मिळविण्यासाठी आपल्याला, आपल्या खात्याकरीता आयडी आणि पासवर्ड तयार करावा लागतो. 

फेसबुक खात्याचा ऍक्सेस आपण फेसबुक अँप अथवा वेबसाईटच्या आधारे देखील मिळवू शकतो. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे, जी भाषा आपल्याला अवगत आहेत, त्या भाषेत आपण फेसबुक खात्याचा आढावा घेऊ शकतो. 

फेसबुक खात्याचा उपयोग करून आपण स्वतःची प्रोफाइल तयार करणे, फोटो, विडिओ अथवा लेख अपलोड करणे, मेसेज पाठविणे, नवनवीन लोकांना Friend Request पाठविणे, स्वतःचे ग्रुपस तयार करणे अशी विविध कामे पार पाडू शकतो.  


फेसबुक पेज म्हणजे काय ?

फेसबुक पेज म्हणजे फेसबुक वरील एक असे स्थान जेथे, एखादा कलाकार, व्यावसायिक, एखादी कंपनी, NGO त्यांच्या ग्राहक आणि चाहत्यांसोबत जुळले जातात. जेव्हा फेसबुक युजर एखाद्या फेसबुक पेजला फॉलो करतो अथवा पेज वरील विडिओ, फोटो, टेक्स्ट स्वरूपी साहित्याला लाईक करतो, तेव्हा युजर त्या ठराविक पेज सोबत जोडला जातो व युजरला त्या पेज संबंधित नवनवीन उपडेट भेटू लागतात. 

फेसबुक पेज तयार करण्यासाठी युजरकडे स्वतःचे फेसबुक अकाउंट असणे गरजेचे असते, कारण फेसबुक पेज तयार करण्याची मुभा ही केवळ फेसबुकच्या Registered User साठीच उपलब्ध आहे. 


फेसबुक मेसेंजर म्हणजे काय ?

फेसबुक मेसेंजर (Facebook Messenger) हे फेसबुक निर्मित एक तात्काळ मेसेजिंग फिचर (Instant Messaging Feature) आहे, ज्याची सुरुवात फेसबुकद्वारे २०११ मध्ये करण्यात आली होती. फेसबुक युजरचा Messaging अनुभव उत्तम व्हावा, म्हणून फेसबुक ने मेसेंजरची (Messanger) निर्मिती केली आहे.

फेसबुक मेसेंजर सुरु झाल्याच्या तीन वर्षांनंतर म्हणजेच २०१४ मध्ये फेसबुकद्वारे मेसेंजरची स्वतंत्र वेबसाईट आणि अप्लिकेशन (Application) तयार केले गेले. मेसेंजरसाठी युजरला वेगळे खाते खोलावे लागत नाही तर, युजर फेसबुक खाते मेसेंजर सोबत Connect करून मेसेंजर वापरू शकतो.


फेसबुक चा इतिहास 

फेसबु ची संकल्पना ही “Facemash” नामक वेबसाईटमुळे उदयास आली. २००३ मध्ये म्हणजे जेव्हा मार्क झुकरबर्ग हे हार्वर्ड विद्यापीठातून त्यांचे शिक्षण घेत होते, तेव्हा मार्कयांनी, त्यांच्या काही मित्राना सोबत घेऊन एक फेसमॅश नामक वेबसाईट तयार केली. ही एक तुलनात्मक वेबसाईट होती. जेथे दोन व्यक्तींचे फोटो सिलेक्ट केले की कोणती व्यक्ती सुंदर दिसते हे सांगितले जायचे. 

बघता बघता फेसमॅश वेबसाईट विद्यापीठातील प्रत्येक विद्यार्थ्यांच्या परिचयाची झाली, परंतु व्यक्तिगत गोपिनीयतेचे, कारण सांगून विद्यापीठाद्वारे ही वेबसाईट बॅन केली. यांनतर फेसमॅश संकल्पनेचा उपयोग करून मार्क यांच्याद्वारे एक सोशल मीडिया वेबसाईटचा प्रोजेक्ट तयार करण्यात आला. 

यांनतर मार्क यांनी त्यांचे मित्र Eduardo Saverin यांच्याकडून १००० डॉलर ची गुंतवणूक मिळवून ४ फेब्रुवारी २००४ मध्ये “TheFacebook” ची सुरुवात केली. 

२००५ मध्ये “TheFacebook” चे नाव बदलून Facebook असे ठेवण्यात आले, सोबतच Facebook.com नामक डोमेन रेजिस्टर केला गेला. फेसबुकची सुरुवात झाल्यापासून म्हणजेच फेब्रुवारी २००४ पासून ते २००५ पर्यंत फेसबुक युजर्सची संख्या ही १ करोड पर्यंत पोहोचली होती. 

१ ऑक्टोबर २००५ मध्ये फेसबुक अमेरिकेसहित, युनाइटेड किंग्डम मधील २१ विद्यापीठासाठी उपल्बध केले गेले. डिसेंबर २००५ येता-येता फेसबुक ऑस्ट्रेलिया, निवझीलँड अशा विविध देशांमधील एकूण २००० पेक्षा अधिक विद्यापीठांमध्ये उपलब्ध केले गेले. २६ संप्टेंबर २००६ मध्ये फेसबुक सार्वजनिक रित्या खुले करण्यात आले, तत्पूर्वी ते केवळ विद्यापीठांमध्येच वापरले जात होते. २००८ मध्ये फेसबुक चे आंतराष्ट्रीय मुख्यालय आयलंड मधील डब्लिन येथे स्थापित केले गेले. 

अशा प्रकारे फेसबुक चा विस्तार होत गेला आणि आज फेसबुक ही जगातील सर्वात मोठी सोशल मीडिया साईट आहे. 


फेसबुकचा शोध कोणी लावला ?

फेसबुकचा शोध २००४ मध्ये मार्क झुकरबर्ग यांनी त्यांच्या हार्वर्ड विद्यापीठातील काही मित्रांना सोबत घेऊन लावला, ज्यांची नावे Eduardo Saverin, Andrew McCollum, Dustin Moskovitz, Chris Hughes ही आहेत. 

सुरुवातीच्या काळात फेसबुकचे नाव “TheFacebook” होते, जे नंतर बदलून केवळ “Facebook” असे ठेवण्यात आले. सुरुवातीच्या काळात फेसबुक हे केवळ हार्वर्ड विद्यापीठातील विद्यार्थ्यांसाठीच उपलब्ध होते, परंतु नंतर  ते अमेरिकेतील इतर विद्यार्थ्यांसाठी देखील उपलब्ध करण्यात आले. 

सप्टेंबर २००६ पासून काही अटी आणि नियम तयार करून फेसबुक सार्वजनिक रित्या उपलब्ध केले गेले. अटींमधील सर्वात महत्वाची अट म्हणजे, ज्यांचे वय १३ वर्षांपेक्षा जास्त आहे, तेच फेसबुकवर स्वतःचे खाते तयार करू शकतील. फेसबुकचा वाढता विस्तार पाहता मार्क यांनी स्वतःच्या शिक्षणाला स्थगिती दिली आणि फेसबुकवर संपूर्ण लक्ष केंद्रित केले.  


फेसबुक डाउनलोड 

फेसबुक App चा उपयोग आपण Android आणि IOS या दोन्ही Operating System प्रणालीवर करू शकतो. या व्यतिरिक्त App डाउनलोड न करता फेसबुक खात्याचा ऍक्सेस, आपण फेसबुक वेबसाईट वरून देखील मिळवू शकतो. 


फेसबुक खाते डिलीट कसे करावे ?

 • तुमचे फेसबुक खाते Login करा. 
 • Setting” पर्याय निवडा. 
 • Facebook Information” विभागातील “Account Ownership & Control” पर्यायावर क्लिक करा.
 • Deactivation & Deletion” पर्यायावर क्लिक करा. 
 • Delete Account” वर क्लिक करा.

अकाउंट डिलीट करण्याच्या प्रक्रियेत खातेदाराची पुष्टी करण्यासाठी पासवर्ड विचारला जातो. डिलीट अकाउंटची प्रक्रिया पूर्ण झाली की, युजरला १४ दिवसांचा कालावधी देण्यात येतो, म्हणजे जर युजर ने अकाउंट डिलीट केल्याच्या पुढील १४ दिवसात फेसबुक खाते लॉगिन केले नाही, तर १५ व्या दिवशी फेसबुक खाते कायमचे डिलीट “Permanent Delete” केले जाते. अकाउंट सोबत युजर ने अपलोड केलेले विडिओ, फोटो आणि इतर डेटा देखील डिलीट होतो.


तथ्य (Facts)

 • गुगल आणि युट्युबनंतर फेसबुक ही जगातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात प्रसिद्ध वेबसाईट आहे. 
 • वर्तमान काळात अमेरिकेतील ७१% पेक्षा अधिक लोकसंख्या फेसबुकचा वापर करते.
 • फेसबुक या वेबसाईटची उत्पत्ती “Facemash” या वेबसाईट वरून झाली आहे. 
 • फेसबुक चे जितकेही युजर आहेत, त्यामध्ये अधिकतर महिलांचा समावेश आहे. 
 • फेसबुकवर युजर्सद्वारे दर दिवशी जवळ-जवळ ३५ करोडपेक्षा अधिक फोटो अपलोड केले जातात. 
 • वर्तमान काळात भारतात, जगातील इतर देशांच्या तुलनेत अधिक फेसबुक युजर्स आहेत. 
 • प्रत्येक फेसबुक युजर दर दिवशी स्वतःचा जवळ-जवळ एक तास फेसबुक वर घालतो. 
 • जगातील लोकसंख्येपैकी एकूण ३५० करोडपेक्षा अधिक लोकसंख्या ही फेसबुकचा उपयोग करते.  
 • ३ जुलै २०१९ मध्ये फेसबुक २४ तासांसाठी क्रॅश झाले होते. 
 • सध्या फेसबुकवर ३०० करोड पेक्षा अधिक फेक अकाउंट आहेत. 
 • इंस्टाग्राम आणि व्हाट्सअँप हे दोन फेसबुकचेच प्लॅटफॉर्म्स आहेत.
 • फेसबुक ने त्याचे नाव बदलून मेटा (Meta) असे ठेवले आहे. 
 • फेसबुक कंपनीची अधिकतर कमाई ही जाहिराती प्रदर्शनद्वारे होते. 
 • चीन, सीरिया, नॉर्थ कोरिया आणि इराण या देशांमध्ये फेसबुक बॅन आहे. 
 • फेसबुक चे संस्थापक मार्क झरकरबर्ग हे लाल आणि हिरवा रंग पाहण्यास असक्षम असल्यामुळे त्यांनी फेसबुकचा रंग निळा ठेवला आहे.  
 • एकूण इंटरनेट युजरच्या ३०% पेक्षा अधिक युजर हे फेसबुक वापरतात 
 • मार्क झुकरबर्ग यांचे फेसबुकवर खाते आहे, ज्याला आपण ब्लॉक करू शकत नाही. 
 • वर्तमान काळात एकूण फेसबुक युजर्सपैकी ८.७ % पेक्षा अधिक युजर हे फेक आहेत. 

FAQ

1. फेसबुकची सुरुवात कोणत्या वर्षी झाली ?

उत्तर : फेब्रुवारी २००४ मध्ये फेसबुकची सुरुवात झाली होती. 

2. फेसबुक चे मुख्यालय कोठे आहे ?

उत्तर : अमेरिकेतील मेनलो पार्क, कैलिफोर्निया येथे फेसबुक चे मुख्यालय आहे. 

3. २०२१ मध्ये फेसबुकचे वार्षिक उत्पन्न किती होते ?

उत्तर : २०२१ मध्ये फेसबुक चे एकूण उत्पन्न ११,७०० करोड रुपये इतके होते. 

4. फेसबुक चे वर्तमानकालीन नाव कोणते ?

उत्तर : मेटा “Meta” हे फेसबुक चे वर्तमान नाव आहे. 

5. फेसबुक खाते खोलण्यासाठी कोणत्या गोष्टींची गरज भासते ?

उत्तर : फेसबुक खाते खोलण्यासाठी इमेल आयडी अथवा मोबाईल क्रमांक या दोघांपैकी एका गोष्टीची गरज भासते.

6. फेसबुक चे मुख्य कार्यकारी अधिकारी कोण ?

उत्तर : मार्क झुकरबर्ग हे फेसबुक चे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. 

7. फेसबुक मधील 1K म्हणजे काय ?

उत्तर : फेसबुकमध्ये वापरल्या जाणाऱ्या 1K चा अर्थ एक हजार असा होतो. 

अधिक लेख –

1. इंस्टाग्राम म्हणजे काय व ते कसे वापरावे ?

2. व्हाट्सअप माहिती मराठी

3. युट्युब चा शोध कोणी लावला ?

4. Social Media म्हणजे काय ?

Leave a Comment