संगणक मराठी निबंध | Essay on Computer in Marathi

संगणक हे प्रत्येक व्यक्तीच्या परिचयाचे आहे आणि जवळचे देखील, कारण आज संगणक म्हणजे प्रकत्येकच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनले आहे. प्रत्येक क्षेत्र संगणकाने व्यापून टाकले आहे. आज असे कोणतेही क्षेत्र अस्तित्वात नाही, ज्यात संगणकाचा  वापर केला जात नाही. 

संगणकामुळे ऑपरेटिंग सिस्टम असते ह्यावरून अनेकदा संगणकाचे कार्य काय असू शकते ह्याचा आपल्याला अंदाज येतो. ऑपरेटिंग सिस्टम म्हणजे अशी कार्य प्रणाली ज्याच्या आधारे संपूर्ण संगणक कार्य करते. Linux, Window आणि Mac हे काही प्रसिद्ध ऑपरेटिंग सिस्टम आहेत.

Windows ची निर्मिती ही मायक्रोसॉफ्ट ह्या कंपनीद्वारे केली जाते, वापरण्यास अगदी सुलभ असल्यामुळे जगातील सर्वात जास्त वापरली जाणारी OS म्हणून ह्याची ओळख आहे. ह्याचे आपल्याला विविध व्हर्जन पाहण्यास मिळतात जासेकी Microsoft windows 7, 8, 8.1, 10 इत्यादी. विंडोज चा अधिकतर वापर हा शैक्षणिक क्षेत्रात दिसून येतो.

Linux ही Open-source OS असल्यामुळे लिनक्स चे संगणक हे स्वस्त दरात उपलब्ध असतात. जे लोक software developer, programmer आणि हॅकर असतात त्यांच्या द्वारे ह्याचा मोठ्याप्रमाावर वापर केला जातो. लिनक्स चे देखील काही प्रसिद्ध वर्जन आहेत जसे की Ubuntu, Kali Linux, parrot इत्यादी.

मॅक बुक हे apple company द्वारे तयार केले जाणारे प्रॉडक्ट असून जगातील सर्वात सुरक्षित ऑपरेटिंग सिस्टम चा दर्जा मॅक ला प्राप्त झाला आहे. ह्याच्या सुरक्षितते मुळे मोठमोठ्या कंपनी मध्ये ह्याचा अधिक वापर दिसून येतो.

संगणक हे मुळात एक यंत्र आहे जे वापरकर्त्या च्या सोयीनुसार आणि त्याच्या आदेशानुसार काम करते. संगणक ह्या मराठी शब्दाचा अर्थ अंकांची आकडेमोड करणे असा होतो. प्रथम जेव्हा संगणकाची निर्मिती झाली तेव्हा ह्याचा वापर केवळ गणिती आकडेमोड करण्यासाठी केला जात होता, कालांतराने विकास होत गेला आणि संगणकाची काम करण्याची पद्धत बदलली, म्हणून आज संगणक विविध क्षेत्रात अग्रेसर आहे.

आज बाजारात विविध प्रकारचे संगणक आहेत. असेही संगणक आहेत जे अगदी आपल्या तळ हातात मावतील ज्याला आपण मोबाईल म्हणून ओळखतो. लॅपटॉप, डेस्कटॉप आणि मोबाईल हे संगणकाचे तीन प्रमुख प्रकार आढळतात.

लॅपटॉप हा आकाराने लहान असतो तसेच ह्यामध्ये इनपुट आणि आऊटपुट यंत्र इनबिल्ट असल्यामुळे ह्याचे वजन हलके असून आपण प्रवासात ह्याचा वापर करू शकतो.

डेस्कटॉप हे लॅपटॉप पेक्षा जास्त जागा घेणारे, जड असते परंतु हे laptop पेक्षा कमी किमतीत उपलब्ध असते. डेस्कटॉप ला आपण हवे तसे customize करू शकतो म्हणजेच विविध उपकरणांची फेरबदल करू शकतो जी मुभा आपल्याला लॅपटॉप मध्ये नसते.

मोबाईल हा जगातील सर्वात लहान संगणक म्हणून ओळखला जातो. हे laptop आणि डेस्कटॉप पेक्षा खूप पटीने स्वस्त असतात. ह्याची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे ह्याला माऊस कीबोर्ड सारख्या आऊटपुट device ची गरज नसते तसेच हे वापरण्यास सोप्पे असते. हे वजनाने खूपच हलके असते

किमान दहा ते पंधरा वर्षा पूर्वी कोणी असा विचार देखील केला नसेल, कि आपले काम एक मशीन करू शकेल तेही अगदी अचूक आणि जलद. कारण तेव्हा संगणक एवढे विकसित नव्हते आणि त्याचा वापर करणे देखील सोप्पे नव्हते कारण तेव्हा संगणक इतके लोकांच्या परिचयाचे नव्हते तसेच आकाराने मोठे असल्याने आणि खूप महाग असल्याने ते प्रत्येकाच्या आवाक्यात नव्हते.

संगणक माणसाच्या आयुष्यात आल्यापासून एक मोठा बदल दिसून आला आहे तो म्हणजे गेल्या १०० वर्षात माणसाचा जितका विकास झाला नाही त्यापेक्षा देखील अधिक विकास आहे गेल्या १० वर्षात म्हणजेच संगणक मानवी जीवनात आल्यावर झाला आहे आणि हे दहा वर्ष असे होते ज्या दरम्यान संपूर्ण मानवी जीवांची कायापालट झाली .

संगणकाचा शोध तर खूप आधीच लागला होता, परंतु चार्ल्स बॅबेज ह्या ब्रिटिश तज्ज्ञाने १८३३ ते १८७० ह्या दरम्यान लोकांसमोर प्रोग्रॅमनिग संगणकाची संकल्पना मांडली आणि ती सत्यात देखील उतरवली, त्यामुळे चार्ल्स ला संगणकाचा जनक म्हणून अशी ओळख प्राप्त झाली.

आज आपण जे संगणक घरी, ऑफिसमध्ये आणि शाळेमध्ये वापरतो ते सर्व संगणक प्रोग्रामिंग base वर काम करणारे आहेत. प्रोग्रामिंग भाषा म्हणजे अशी भाषा ( कोडींग ) जी संगणकाच्या परिचयाची आहे आणि त्यानुसार संगणक कार्य पार पडत असते. java , c programming, python , PHP  हे काही प्रोग्रामिंग language ची उदाहरणे आहेत.

मुळात संगणक हे असे यंत्र आहे जे इनपुट आणि आउटपुट ह्या पद्धतीने काम करते. म्हणजे जोपर्यंत user  संगणकाला आज्ञा देत नाही तोपर्यंत हे काहीही काम करत नाही.

संगणक मध्ये विविध यंत्रांचा समावेश असतो जसे की माऊस, कीबोर्ड, मॉनिटर, cpu, प्रिंटर, स्पीकर, हेड फोन्स इत्यादी. हे यंत्र इनपुट आणि आऊटपुट ह्या दोन प्रकारांमध्ये विभागले गेले आहे. ज्या यंत्रांचा वापर संगणकाला आज्ञा देण्यासाठी केला जातो त्याला इनपुट असे म्हणतात आणि ज्या यंत्राद्वारे आपल्याला उत्तर प्राप्त होते अशा यंत्राला आऊटपुट असे म्हणतात. माऊस, कीबोर्ड हे इनपुट device आहेत तर मॉनिटर, स्पीकर, प्रिंटर हे आऊटपुट device आहेत.

संगणकाचा वापर विविध क्षेत्रात विविध पद्धतीने होतो ज्यामुळे प्रत्येक ठिकाणी संगणकाला एक वेगळेच महत्व प्राप्त होते.

संगणक हे आपण विचारलेल्या भाषेत प्रश्न समजू शकत नाही म्हणून संगणक साठी एक वेगळी भाषा तयार करण्यात आली आहे ज्याला बायनरी भाषा म्हणून ओळखले जाते. ही भाषा 0 आणि 1 केवळ ह्या दोन अंका पासून तयार करण्यात आली आहे.

जेव्हा एखादा युजर संगणकाला प्रश्न विचारतो तेव्हा त्याचे पहिल्यांदा रूपांतर हे बायनरी भाषेत केले जाते नंतर त्या प्रश्नाचे उत्तर शोधले जाते आणि पुन्हा त्याचे रूपांतर user ने विचारलेल्या भाषेत करून ते युजर पर्यंत पोहचवले जाते.

संगणक हे खूपच फायदेशीर असे यंत्र आहे कारण संगणकामुळे आज विद्यार्थी जगाच्या पाठीवर कोठेही असला तरी आपल्या वेळेनुसार आणि इच्छेनुसार शिक्षण घेऊ शकतो ह्या मुळे शैक्षणिक क्षेत्रात खूप मोठा बदल झाला, संगणकाच्या काम करण्याच्या वेगामुळे कामे जलद होऊ लागली ह्यामुळे जगातील सर्वात अमूल्य गोष्टीची म्हणजेच वेळेची बचत होऊ लागली आणि मोठमोठ्या यंत्रांचा समावेश कारखान्यात होऊ लागला ज्याला संगणक द्वारे ऑपरेट केले जाऊ लागले ज्यामुळे मानव बल कमी खर्ची पाडू लागले म्हणून पैशाची बचत झाली.

संगणक आपल्याला जितके फायदेशीर वाटते तितकेच ते घातक ठरू शकते. कारण ऑनलाईन लोकांची माहिती चोरी होऊ लागली, पैशांची देखील ऑनलाईन चोरी वाढल्यामुळे आरोपीला पकडण्यासाठी मशागत होऊ लागली कारण अनेकदा आरोपी हे विविध देशात असायचे, मॉनिटर पासून निघणाऱ्या लाईट मुळे डोळ्यांची कार्य क्षमता कमी होऊ लागली आणि अधिक.

अशा प्रकारे संगणक संपूर्ण जगाचा ताबा घेतला आहे आणि संपूर्ण जग देखील हळू हळू पूर्णतः संगणकावर अवलंबून राहू लागली आहे.

Leave a Comment