EMI चा फुल फॉर्म काय ? | EMI Full Form in Marathi

जेव्हा ग्राहक एखाद्या बँक अथवा वित्तीय ससंस्थेकडून कर्ज घेतो, तेव्हा कर्जाची परतफेड करण्यासाठी तो EMI हा पर्याय निवडतो, कारण एकत्र रित्या कर्जाची रक्कम फेडणे एक पगारदार व्यक्तीला शक्य नसते. 

EMI म्हणजे नेमके काय आणि भारतात EMI पद्धतीची सुरुवात कधी झाली अशा विविध माहितीचा आढावा आपण या लेखात घेणार आहोत,


EMI म्हणजे काय ?

EMI म्हणजे दर माह ठराविक रकमेसहित केलेली कर्जाची परत फेड होय किंवा एकूण कर्जातील ठराविक हिस्सा होय.

EMI FULL FORM IN MARATHI

सोप्या भाषेत सांगायचे झाले तर, EMI ही एक प्रकारची सुविधा आहे, असे आपण म्हणू शकतो, जी वित्तीय संस्था अथवा बँकांद्वारे त्यांच्या ग्राहकांना कर्जाची परत फेड करणे सुलभ व्हावे म्हणून उपलब्ध करून दिली जाते. बँक अथवा वित्तीय संस्थेने निश्चित केलेला EMI हा ग्राहकाला ठराविक तारखेला भरावा लागतो.

EMI किती रकमेचा असेल, किती कालावधीसाठी मर्यादित असेल, त्यावर किती व्याजदर लादले जाईल हे पूर्णतः कर्जाच्या रकमेवर आणि कोणत्या प्रकारचे कर्ज आहे, त्यावर अवलंबून असते.

EMI चे भुगतान करण्यासाठी ग्राहक ऑनलाईन, ऑफलाईन अथवा ऑटो डेबिट या पर्यायाचा उपयोग करू शकतात. EMI भरला नाही अथवा EMI भरण्यास विलंब केल्यास ग्राहकाकडून ठराविक रक्कम ही शुल्क (Bounce Charges, Late Fees) म्हणून आकारली जाते.


EMI Full Form in Marathi

E – Equated
M – Monthly
I – Installment

EMI चा फुल फॉर्म “Equated Monthly Installment” हा असून, याचा मराठी अर्थ “समान मासिक हप्ता” असा होतो.


EMI वर परिणाम करणारे घटक

EMI वर साधारणतः कोणकोणत्या घटकांमुळे परिणाम होऊ शकतो, हे आपण खालील प्रमाण पाहणार आहोत,

1. कर्जाची रक्कम :- ग्राहकाला अथवा कर्ज धारकाला दर महिना किती रक्कम EMI स्वरूपात भरावी लागेल, हे पूर्णतः कर्जधारक बँक अथवा वित्तीय संस्थेकडून किती रक्कम कर्ज म्हणून घेत आहे, यावर अवलंबून असते. म्हणजेच कर्जाची रक्कम जर जास्त असेल, तर कर्ज धारकाला EMI स्वरूपात जास्त रकमेची परत फेड करावी लागेल.

2. व्याजदर :-  बँक अथवा इतर वित्तीय संस्थांकडून विविध कर्जासाठी विविध % व्याज आकारले जाते, म्हणजे सुरक्षित कर्जासाठी कमी तर असुरक्षित कर्जासाठी जास्त व्याजदर आकारले जाते. शैक्षणिक कर्ज, वैयक्तिक कर्ज हे असुरक्षित तर, वाहन कर्ज, गृह कर्ज हे सुरक्षित कर्ज आहेत. ग्राहक जेव्हा कर्जाची EMI स्वरूपात परत फेड करतो, तेव्हा तो EMI मधील काही टक्के भाग व्याज देत असतो, त्यामुळे व्याजदर हा EMI साठी एक परिणामकारक घटक ठरतो.

3. कर्ज कालावधी :-  प्रत्येक प्रकारच्या कर्जाच्या परतफेडीचा एक ठराविक कालावधी बँक अथवा वित्तीय संस्थांद्वारे RBI च्या नियमावलीनुसार ठरवला जातो. ग्राहक या ठराविक कालावधीत त्याचे संपूर्ण EMI भरेल अशी ग्वाही वित्तीय संस्थांद्वारे ग्राहकांकडून घेतली जाते. जेव्हा कर्जाचा कालावधी ठरतो, तेव्हाच EMI ची एकूण संख्या ठरवली जाते. कर्ज फेडीचा जितका जास्त अवधी असतो, तितके जास्त EMI ग्राहकाला कर्ज फेडण्यासाठी मिळतात.


EMI ची गणना

EMI ची गणना करण्यासाठी साधारणतः स्थिर दर पद्धत आणि शिल्लक कमी करण्याची पद्धत अशा दोन विविध पद्धतींचा उपयोग केला जातो. या दोन्ही पद्धतींचा आढावा आपण खालीलप्रमाणे घेणार आहोत,

1. स्थिर दर पद्धत

स्थिर दर पद्धतीचा उपयोग करून EMI ची गणना करण्यासाठी प्रथम एकूण कर्जाची रक्कम आणि व्याज यांची बेरीज केली जाते, नंतर एकूण कालावधी निशी त्या बेरजेला भागले जाते व शेवटी वर्षातील महिन्यांच्या संख्येने (१२) गुणाकार केला जातो.

समजा,
कर्जाची रक्कम – १,००,००० रुपये,
एकूण व्याजदर – ८%,
कालावधी – १० वर्ष,

(१,००,०००)+(१०,००,०००*१०*०.०८))/(१०*१२)

EMI ची रक्कम = १५,००० रुपये.

2. शिल्लक कमी करण्याची पद्धत

(A*B)*((1+C)n)/(E*((1+r)D)-1) या सूत्राचा उपयोग करून आपण शिल्लक कमी करण्याच्या पद्धतीने EMI ची गणना करू शकतो.

इथे,
A – एकूण कर्जाची रक्कम
B – वार्षिक व्याजदर
C – मासिक व्याजदर
D – EMI ची संख्या
E  – वर्षातील महिन्यांची संख्या (१२)

समजा,
कर्जाची रक्कम – १,००,००० रुपये,
एकूण व्याजदर – ८ %,
कालावधी – १० वर्ष,

((१०,००,००००*(०.०८))*(१+(०.०८/१२))१२०)/(१२*(१+(०.०८/१२))१२०-१)

EMI ची रक्कम = १२,१३३ रुपये

तर अशा प्रकारे आपण दोन पद्धतींचा उपयोग करून EMI ची गणना करू शकतो. या व्यतिरिक्त EMI ची गणना करण्यासाठी आपण EMI Calculator नामक software चा देखील उपयोग करू शकतो.


EMI चे फायदे

1. खरेदी चे स्वातंत्र्य

EMI मुळे आपल्याला अशा गोष्टी खरेदी करण्याचे स्वातंत्र्य मिळते, ज्या आपल्या बजेटमध्ये बसत नाहीत किंवा खूप महाग असतात. कारण EMI मध्ये आपल्याला वस्तूची सर्व किंमत एकत्र द्यावी लागत नाही, ती आपण थोडी थोडी रक्कम भरून फेडू शकतो. याचे सर्वोकृष्ट उदाहरण म्हणजे घर घेण्यासाठी घेतले जाणारे कर्ज. घर हे आपल्या मूलभूत गरजांपैकी एक आहे. पगारदार अथवा नोकरदार व्यक्तीला मोठी रक्कम एकत्र भरता येत नाही त्यामुळे असे व्यक्ती बँकेकडून कर्ज व कर्जावर EMI पर्याय निवडतात.

2. कमी खर्चिक

जेव्हा आपण एखादी वस्तू अथवा कर्ज EMI पर्याया सह प्राप्त करतो, तेव्हा कर्जाच्या रकमेनुसार EMI चे विभाजन केले जाते व सोबतच EMI भरण्याची एक मासिक तारीख देखील ठरवली जाते. कर्ज अनेक लहान लहान भागांमध्ये विभागले असल्यामुळे आपण ते मासिक उत्पन्नातून अगदी सहज फेडू शकतो.

3. कर्जाचे नियोजन

वर्तमान काळात इंटरनेटवर अनेक EMI calculator उपलब्ध आहेत, ज्याच्या आधारे आपण दर महिना EMI मधून किती मूळ रक्कम, व्याज भरत आहोत, याची माहिती मिळते, ज्यामुळे ग्राहक त्यांच्या एकूण उत्पन्नाचे उत्तम नियोजन करू शकतो.

4. EMI ची लवचिकता

अनेक वित्तीय संस्था आणि बँका त्यांच्या ग्राहकांना EMI लवचिकतेचा पर्याय उपलब्ध करू देतात. इथे ग्राहक त्याच्या आर्थिक परिस्थिती आणि मासिक उत्पन्नानुसार EMI ची मूळ रक्कम आणि EMI भरण्याचा कालावधी निवडू शकतो.

5. तृतीय पक्षाचा सहभाग नाही

ग्राहक EMI ची रक्कम सरळ बँक किंवा वित्तीय संस्थांना ऑनलाईन पद्धतीने फेडू शकतो, इथे कोणत्याही प्रकारच्या तृतीय पक्षाचा समावेश असतो, त्यामुळे बँक अथवा वित्तीय संस्था आणि ग्राहक यांची गैरसोय होण्याची शक्यता फार कमी असते.


EMI चे तोटे

1. दीर्घकाळ कर्ज

EMI द्वारे ग्राहक एक मोठी रक्कम अनेक तुकड्यांमध्ये विभागून घेतो, ज्यामुळे पैसे एकत्र भरावे लागत नाहीत, परंतु कर्जाचे ओझे अनेक महिने ग्राहकावर राहते.

2. जास्त रकमेची परतफेड

जेव्हा ग्राहक EMI मार्गाने कर्जाची परतफेड करतो, तेव्हा तो मूळ कर्ज रकमेपेक्षा अधिक रकमेची परत फेड करतो. उदा. जर ग्राहकाने १५,००० रुपयांचा एक स्मार्टफोट EMI पर्याया सहित खरेदी केला, तर जेव्हा ग्राहक एकूण EMI फेडेल, तेव्हा ग्राहकाने १५,००० पेक्षा देखील अधिक रक्कम EMI स्वरूपात भरलेली असेल.

3. पूर्व पेमेंट नाही

अनेकदा ग्राहक EMI तारखेच्या आधीच EMI ची रक्कम भरण्याचा विचार करतो, परंतु ते ग्राहकांसाठी सोयीस्कर नसते, कारण अनेकदा ग्राहकांना पूर्व पेमेंटवर मूळ कर्ज रकमेच्या २ ते ३ % रक्कम दंड भरावा लागू शकतो.

4. शुल्क अथवा ताबा

बँक अथवा वित्तीय संस्था ग्राहकाकडून EMI उशिरा भरल्यास अथवा न भरल्यास ठराविक रक्कम दंड आकारते. जर ग्राहकाने एखादी मालमत्ता गहाण ठेवून कर्ज घेतले असेल, तर अशा परिस्थिती ज्या व्यक्ती अथवा संस्थेकडे मालमता गहाण ठेवली आहे, तो व्यक्ती अथवा संस्था ती मालमत्ता संपूर्ण अधिकारानिशी ताब्यात घेऊ शकते.

5. क्रेडिटस्कोर वर परिणाम

ग्राहकाने EMI उशिरा भरल्यास अथवा न भरल्यास ग्राहकाच्या क्रेडिट स्कोर वर परिणाम होतो, ज्यामुळे ग्राहकाला बँक अथवा अन्य वित्तीय संस्थांकडून भविष्यात कर्ज मिळवणे कठीण जाते.

6. अतिरिक खर्च

जेव्हा ग्राहक कर्जावर EMI पर्याय निवडतो तेव्हा ग्राहकाकडून व्याजासहित प्रक्रिया शुल्क (Processing Fees) देखील आकारले जाते, ज्यामुळे ग्राहकाला अतिरिक्त खर्च उद्भवतो.


FAQ

1. ग्राहक ऍडव्हान्स मध्ये EMI भरू शकतो का ?

उत्तर : अनेक वित्तीय संस्था अथवा बँक या पूर्व EMI पेमेंट वर ग्राहकाला काही प्रमाणात चार्ज लावतात.

2. EMI वर परिणाम करणारे घटक कोणते ?

उत्तर : व्याजदर, कर्ज कालावधी आणि कर्जाची मूळ रक्कम हे EMI वर परिणाम करणारे तीन घटक आहेत.

3. भारतात EMI पद्धत कोणी आचरणात आणली ?

उत्तर : भारतात के.वी. कामथ यांनी ICICI बँकेच्या सहाय्याने भारतात EMI पद्धत आचरणात आणली.

अधिक लेख –

1. NPA चा फुल फॉर्म काय ?

2. जागतिक बँकेची स्थापना कधी झाली ?

3. भारतीय रिझर्व्ह बँकेचे कार्य कोणते ?

4. KYC चा फुल फॉर्म काय ?

Leave a Comment