ई कचरा म्हणजे काय ?

तंत्रज्ञानाच्या वाढत्या विकासामुळे मानवाला अनेक फायदे तर झाले, परंतु मानवी समस्येत वाढ देखील झाली. तंत्रज्ञानामुळे उद्भवणारी एक मोठी समस्या म्हणजे ई कचरा होय. हा ई कचरा म्हणजे काय व त्याची निर्मिती कशी होते अशा विविध माहितीचा आढावा आपण या लेखाद्वारे घेणार आहोत,


ई कचरा म्हणजे काय ?

ई कचऱ्याला इंग्रजीत “ई वेस्ट” असे म्हटले जाते. इलेक्ट्रॉनिक कचरा हा ई कचऱ्याचा फुल फॉर्म आहे.  ई कचरा हा अशा इलेक्ट्रॉनिक उपकरणांपासून निर्मित होतो, ज्या उपकरणांचा जीवनकाळ संपला आहे, म्हणजेच जे उपकरण Expired झाले आहेत, व्यवस्थित कार्य करत नाही अथवा अनुपयोगी आहेत. जसे की जुने संगणक, टीव्ही, फॅक्स मशीन आणि अधिक.

ई कचरा म्हणजे काय

दर वर्षी जवळजवळ ५० दशलक्ष टन ई कचरा निर्माण होत आहे, जर याचे योग्य ते नियोजन केले नाही तर, ही समस्या भविष्यात एका मोठ्या संकटाचे रूप धारण करू शकते. कारण इलेक्ट्रॉनिक कचरा अधिक काळ वातावरणात राहिला की तो बेरिलिअम, कॅडमियम, मर्क्युरी अशा पदार्थांचे उत्सर्जन करतो, जे वातावरणासाठी हानिकारक ठरू शकतात.

ई कचऱ्याचे नियोजन कसे करावे, त्याची योग्य विल्हेवाट कशी लावावी हे आव्हान आपल्या समोर काही आज पासून नाही, तर १९७० पासून या विषयावर विचार होत आहे. १९७० पासून ते आतापर्यंत हा एक खूप मोठा काळ आहे, या काळात बरेच काही बदलले आहे, खास करून ई कचऱ्याचे प्रमाण.


ई कचरा निर्मितीची कारणे

1. लोकसंख्या

लोकसंख्या वाढीमुळे न केवळ ई कचरा समस्या, तर जगाला इतरही समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे नक्कीच इलेकट्रोनिक सामानांची मागणी वाढली आहे. मागणी पूर्ण करण्यासाठी आणि नफा मिळविण्यासाठी कंपन्यांनी इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे उत्पादन वाढीस लागले आहे.

आज प्रत्येक व्यक्ती कोणत्या न कोणत्या स्वरूपात इलेक्ट्रॉनिक वस्तूचा वापर करत आहे. वर्तमान काळात भारताची एकूण लोकसंख्या १३० कोटीपेक्षा अधिक आहे. जर भारतातील प्रत्येक व्यक्तीकडे किमान एक इलेक्ट्रॉनिक उपकरण असेल, तर अशात आपण ई कचरा निर्मितीचे प्रमाण ओळखू शकतो.

भारत हा एक विकसनशील देश आहे, परंतु जे देश विकसित आहेत, जसे की अमेरिका, हाँग काँग, जर्मनी यांसारख्या देशांमध्ये भारताच्या तुलनेत अधिक इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा उपयोग केला जातो. अशात जर ई कचऱ्याच्या वापरावर जर आळा घातला नाही तर नक्कीच भविष्यात ही एक मोठी समस्या म्हणून आपल्यासमोर उभी राहू शकते.

2. विकास

एका रिपोर्टनुसार वर्तमान काळात संपूर्ण जगात एकूण १०० दशलक्षपेक्षा अधिक संगणक आहेत. संगणकाची संख्या जर आपण विकसनशील आणि विकसित देशांदरम्यान पाहिली, तर ती आपल्याला विकसनशील देशांच्या तुलनेत विकसित देशांमध्ये अधिक दिसून येते. विकसित देशांमध्ये एका वैयक्तिक संगणकाचा कार्यकाळ हा जास्तीत जास्त २ वर्ष इतकाच आहे.

अमेरिका हा जगात एक विकसित देश म्हणून ओळखला जातो. वर्तमान काळात ३० दशलक्ष संगणक हे अनुपयोगी आहेत. ही परिस्थिती केवळ विकसित देशांपुरतीच मर्यादित राहिली नाही, तर विकसनशील देश देखील स्वतःचा विकास वाढीस लावण्यासाठी जास्तीत जास्त इलेक्ट्रॉनिक उपकरणाचा उपयोग करत आहेत, ज्याचा परिणाम असा की येत्या काही वर्षात विकसनशील देशांमुळे सर्वाधिक ई कचऱ्याची निर्मिती होण्याची शक्यता आहे.

एक जागतिक रिपोर्टनुसार विकसनशील देशांमध्ये संगणक आणि इंटरनेटचा उपयोग ४०० %  टक्क्यांनी वाढला आहे, यावरून एक गोष्ट मात्र नक्कीच लक्षात येते, ती म्हणजे इलेक्ट्रॉनिक क्षेत्र स्वतःचा अगदी वेगाने विस्तार करत आहे.

3. मानवी मानसिकता

बँकांद्वारे अथवा इतर वित्तीय संस्थांद्वारे लोकांना खरेदी करीता EMI हा एक पर्याय उपलब्ध करून दिला गेला आहे. तस पाहायला गेलो तर हा एक उपयुक्त पर्याय आहे, ज्याद्वारे व्यक्ती जास्त रकमेची वस्तू खरेदी करून त्याचे पेमेंट EMI द्वारे करू शकतो, परंतु समाजात अनेक अशा मानसिकतेची लोकं वावरतात, ज्यांना एखाद्या गोष्टीची गरज नसतानाही ते वस्तू खरेदी करतात, जसे की आज अधिक तर लोक दर एक ते दोन वर्षात नवीन मोबाईल घेतात. न केवळ मोबाईल तर लॅपटॉप, फ्रिज, AC, टीव्ही खरेदी करतात. गरज नसतानाही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी केल्यास ई कचऱ्यात वाढ होण्याची शक्यता दाट होते, त्यामुळे गरज नसतानाही केवळ दिखावा करण्यासाठी महागड्या वस्तूंची खरेदी करण्याची ही मानसिकता बदलणे फार गरजेचे आहे.

4. तंत्रज्ञान

२१ वे शतक हे तंत्रज्ञानाचे शतक म्हणून ओळखले जाते. तंत्रज्ञान आज आपल्या जीवनाचा एक महत्वपूर्ण भाग बनला आहे. तंत्रज्ञानात अगदी प्रकाशाच्या वेगाने विकास होता असल्याचे दिसून येत आहे. वर्तमान काळात सूक्ष्म तंत्रज्ञान (Nano Technology) हे एक सुप्रसिद्ध तंत्रज्ञान आहे, ज्यावर आधारित दर दिवशी नवनवीन यांत्रिक उपकरणे बाजारात येत आहेत.

बाजारात येणारे नवीन तंत्रज्ञानावर आधारित इलेक्ट्रॉनिक उपकरणे खूप आकर्षक असतात. नवीन तंत्रज्ञानामुळे जुन्या तंत्रज्ञानावर आधारित उपकरणामध्ये लोक रुची दाखवत नाहीत, ज्यामुळे वस्तू अथवा उपकरणे तशीच पडून राहतात आणि परिणामी इलेक्ट्रॉनिक कचऱ्यात वाढ होते.


ई कचऱ्याचे दुष्परिणाम

ई कचरा म्हणजे अनुपयोगी आणि खराब इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा साठा होय, ज्यामध्ये जुने कुकर, ओव्हन, फॅन, संगणक सारख्या यंत्रांचा अथवा यंत्रांच्या भागांचा समावेश असू शकतो. इलेक्ट्रॉनिक कचरा पर्यावरणाची काहीच हानी करू शकत नाही असा बऱ्याच लोकांचा गैरसमज असतो, परंतु जेव्हा याच ई कचऱ्याचे जेव्हा प्रमाण वाढते, तेव्हा ते वातावरणातील हवा, पाणी आणि जमिनीवर कोणते विपरीत परिणाम करू शकते हे आपण खालील प्रमाणे पाहणार आहोत,

1. वायूवरील दुष्परिणाम

इलेक्ट्रॉनिक वस्तूंमध्ये तांबे व इतर महत्वपूर्ण आणि महाग धातूंचा उपयोग केला जातो. हे धातू मिळविण्यासाठी वस्तुंना जाळले जाते, ज्यामुळे विविध विषारी वायू पर्यावरणात मुक्त होतात, जे वायू प्रदूषणाचे मुख्य कारण ठरतात. ई कचऱ्याच्या ज्वलनातून निघणारे विषारी वायू कर्करोगासाठी देखील कारणीभूत ठरू शकतात.

तांबे, अल्युमिनिअम वगळता अनेक वस्तूंमध्ये सोने आणि चांदी सारख्या महागड्या धातूंचा देखील उपयोग केलेला दिसून येतो. हे मौल्यवान धातू इलेकट्रोनिक वस्तूंमधून वेगळे करण्यासाठी ऍसिड आणि ऍसिड सारख्या इतर रसायनांचा उपयोग केला जातो, ज्यामुळे विषारी धूर निर्माण होतो.

2. जमिनीवरील दुष्परिणाम

जेव्हा बेकायदेशीर रित्या ई कचरा जमिनीवर साठवून ठेवला जातो, तेव्हा ई कचऱ्यातील काही धातू आणि ज्वाला रोधक जमिनीत विलीन होतात, ज्यामुळे जमिनीची सुपीकता कमी होते, शिवाय भूजल दूषित होण्याची दाट शक्यता उद्भवते. या व्यतिरिक्त अशा जमिनीवर जर पीक घेण्याचा प्रयत्न केला तर जमिनीतील विचारी तत्व पिकांद्वरे शोषून घेतले जातात, अशी पिके विषबाधा सारख्या आजाराणा आमंत्रण देतात.

जेव्हा इलेक्ट्रॉनिक कचऱ्याचे विघटन कारण्याहेतू उपकरण अथवा यंत्रांना जाळले अथवा तोडले जाते, तेव्हा उपकरणातील मोठेमोठे घातक कण बाहेर पडतात आणि जमिनीत विलीन होऊन जातात, ज्यामुळे जमिनीवरील वनस्पतींचा नाश होतो आणि पर्यावरणात अवलंबून असणाऱ्या वन्य जीवांवर याचा विपरीत परिणाम होतो.

3. पाण्यावरील दुष्परिणाम

जेव्हा इलेक्ट्रॉनिक कचऱ्यातील पारा, बेरियम, लिथियम आणि शिसे यांसारखे पदार्थ मातीत विलीन होतात, तेव्हा ते मातीद्वारे भूजल साठ्यापर्यंत पोहोचतात. भूजल मार्गाने ते नदी, तलाव यांसारख्या मोठ्या पाण्याच्या स्तोत्रांपर्यंत पोहोचतात. हे घटक अधिक काळ पाण्यात राहिल्याने पाण्याचे आम्लीकरण होते, ज्यामुळे पाण्यात विषारी तत्व निर्माण होतात, जे जल जीवनासाठी उचित नाही. जल जीवन धोक्यात येण्याबरोबरच पाणी दूषित झाल्यामुळे पिण्याच्या पाण्याचे स्रोत देखील कमी होतात.


ई कचरा व्यवस्थापन

इलेक्ट्रॉनिक कचरा व्यवस्थापित करणे, ज्याला ई-कचरा देखील म्हणतात, पर्यावरणीय टिकाव आणि मानवी आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. ई-कचऱ्यामध्ये घातक पदार्थ असतात जे योग्य प्रकारे हाताळले नाहीत तर पर्यावरण प्रदूषित करू शकतात. इलेक्ट्रॉनिक कचऱ्याचे जबाबदारीने व्यवस्थापन करण्यासाठी तुम्ही काही पावले उचलू शकता:

1. कमी करा आणि पुन्हा वापरा

जेव्हा शक्य असेल तेव्हा, तुम्हाला खरोखर आवश्यक असलेली खरेदी करून तुमचा इलेक्ट्रॉनिक वापर कमी करण्याचा प्रयत्न करा.
नेहमी नवीन उत्पादने खरेदी करण्याऐवजी सेकंड-हँड किंवा नूतनीकृत इलेक्ट्रॉनिक्स खरेदी करण्याचा विचार करा.
तुमच्या इलेक्ट्रॉनिक्सची योग्य काळजी घेऊन आणि नियमित देखभाल करून त्यांचे आयुष्य वाढवा.

2. पुनर्वापर

तुमच्या स्थानिक समुदायात किंवा शहरात ई-कचरा पुनर्वापर कार्यक्रम आहेत का ते तपासा. इलेक्ट्रॉनिक रिसायकलिंगसाठी अनेक ठिकाणी ड्रॉप-ऑफ पॉइंट्स नियुक्त केले आहेत.
तुमच्या क्षेत्रातील प्रमाणित ई-कचरा पुनर्वापर केंद्रे संशोधन करा आणि ओळखा. ई-कचरा सुरक्षितपणे आणि जबाबदारीने हाताळण्यासाठी ही केंद्रे सज्ज आहेत.

3. देणगी आणि पुनर्विक्री

तुमचे इलेक्ट्रॉनिक्स अजूनही कार्यरत असल्यास, त्यांचा वापर करू शकतील अशा धर्मादाय संस्था, शाळा किंवा समुदाय संस्थांना देणगी देण्याचा विचार करा.
तुम्ही ऑनलाइन प्लॅटफॉर्म किंवा ट्रेड-इन सेवा ऑफर करणार्‍या स्थानिक स्टोअरद्वारे तुमच्या जुन्या इलेक्ट्रॉनिक्सची विक्री किंवा व्यापार देखील करू शकता.

4. सुरक्षित डेटा काढणे

कोणत्याही इलेक्ट्रॉनिक्सची विल्हेवाट लावण्यापूर्वी, तुम्ही डिव्हाइसेसमधून सर्व वैयक्तिक आणि संवेदनशील डेटा सुरक्षितपणे मिटवला असल्याची खात्री करा. असे करण्यासाठी डेटा वाइपिंग टूल्स किंवा सॉफ्टवेअर वापरा.

5. योग्य विल्हेवाट लावणे

जर तुमची इलेक्ट्रॉनिक्स दुरुस्ती किंवा पुनर्वापराच्या पलीकडे असेल आणि पुनर्वापर हा पर्याय नसेल, तर त्यांची योग्य वाहिन्यांद्वारे विल्हेवाट लावा. ते नेहमीच्या कचऱ्याच्या डब्यात टाकू नका.
काही इलेक्ट्रॉनिक्समध्ये घातक सामग्री असू शकते, त्यामुळे विल्हेवाट लावण्यासाठी स्थानिक नियमांचे पालन करणे महत्त्वाचे आहे.

6. जागरूकता आणि शिक्षण

जबाबदार ई-कचरा व्यवस्थापनाच्या महत्त्वाबद्दल मित्र, कुटुंब आणि तुमच्या समुदायामध्ये जागरूकता वाढवा.
अयोग्य ई-कचऱ्याच्या विल्हेवाटींशी संबंधित संभाव्य पर्यावरणीय आणि आरोग्य जोखमींबद्दल इतरांना शिक्षित करा.

7. कायदे आणि नियम

ई-कचरा व्यवस्थापनाबाबत स्थानिक आणि राष्ट्रीय कायदे आणि नियमांबद्दल माहिती ठेवा. ई-कचरा हाताळण्यासाठी वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये विशिष्ट मार्गदर्शक तत्त्वे असू शकतात.
उत्पादकांनी त्यांच्या उत्पादनांच्या आयुष्याच्या शेवटच्या विल्हेवाटीची जबाबदारी घेतली आहे याची खात्री करण्यासाठी कठोर ई-कचरा नियमांना समर्थन आणि समर्थन द्या.

8. उत्पादक टेक-बॅक प्रोग्राम

काही इलेक्ट्रॉनिक्स उत्पादक टेक-बॅक प्रोग्राम ऑफर करतात, जेथे ते पुनर्वापरासाठी किंवा योग्य विल्हेवाट लावण्यासाठी जुनी उत्पादने स्वीकारतात. तुम्ही वापरत असलेल्या ब्रँडमध्ये असे प्रोग्राम आहेत का ते शोधा.

लक्षात ठेवा की ई-कचरा व्यवस्थापन ही एक सामूहिक जबाबदारी आहे आणि प्रत्येक व्यक्तीचे प्रयत्न आरोग्यदायी वातावरणात योगदान देतात. 


तथ्य (Facts)

  • चीन हा देश जगात सर्वाधिक ई कचऱ्याची निर्मिती करतो.
  • २०१४ ते २०१९ या कालावधीत ई कचऱ्याच्या निर्मितीत २१ % टक्क्यांनी वाढ झाली आहे.
  • संयुक्त राष्ट्र अमेरिकेच्या एका रिपोर्टनुसार साल २०१९ मध्ये निर्मित एकूण ई कचऱ्यापैकी केवळ १७.४% टक्के ई कचरा recycle करण्यात आला होता.
  • युरोप हा देश जगात ई कचरा Recycle करण्यात अग्रेसर आहे. साल २०१९ मध्ये युरोप देशातील एकूण ई कचऱ्यापैकी ४२.५ % टक्के कचरा recycle केला होता.
  • २०१९ मध्ये अमेरिकेत निर्माण झालेल्या ई कचऱ्याची एकूण किंमत ७४९ करोड इतकी होती.
  • ई कचऱ्यात आढळणाऱ्या मोबाईल आणि इतर इलेकट्रोनि उपकरणांमधून दरवर्षी अनेक किलो सोने आणि चांदी सारखे धातू रिकव्हर केले जातात.
  • ई कचऱ्यातील संगणक आणि मोबाईलमधून आपल्या वैयक्तिक डेटा चोरला जाऊ शकतो.
  • जितकी ऊर्जा नवीन इलेकट्रीक उपकरणे तयार करण्यासाठी लागते, त्यापेक्षा ही खूप पटीने कमी ऊर्जा इलेक्ट्रॉनिक उपकरणं Recycle करण्यासाठी लागते.

FAQ

1. भारत ई कचरा निर्मितीत जगात कितव्या क्रमांकावर आहे ?

उत्तर : भारत ई कचरा निर्मितीत जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे.

2. जगात सर्वाधिक ई कचरा कोणत्या देशात निर्माण होतो ?

उत्तर : जगात सर्वाधिक ई कचरा चीन देशात निर्माण होतो.

3. दर वर्षी जगात किती प्रमाणात ई कचऱ्याची निर्मिती होते ?

उत्तर : दर वर्षी जगात निर्माण होणाऱ्या ई कचऱ्याची आकडेवारी ५३.६ दशलक्ष टन इतकी आहे, तसेच गेल्या ५ ते ६ वर्षात ई कचरा निर्मितीची आकडेवारी २५ ते ३२% टक्क्यांनी वाढली आहे.

4. जगात सर्वाधिक ई कचरा निर्मित करणारे देश कोणते ?

उत्तर : चीन (७.२ दशलक्ष मेट्रिक टन), अमेरिक (६.३ दशलक्ष मेट्रिक टन), जपान (२.१ दशलक्ष मेट्रिक टन), भारत (२ दशलक्ष मेट्रिक टन), जर्मनी (१.९ दशलक्ष मेट्रिक टन) हे पाच जगात सर्वाधिक कचरा निर्माण करणारे देश आहेत.

5. ई कचऱ्यात आढळणारी सर्वसाधारण उपकरणे कोणती ?

उत्तर : जुने LCD TV, संगणक, घड्याळ, रेडिओ, calculator, कॅमेरा, प्रिंटर, कीबोर्ड, माउस, सर्किट बोर्ड, कॅबेल्स, मोबाईल फोन, फ्रिज, फॅन ही काही उपकरणे आहेत, ज्याचे प्रमाण ई कचऱ्यात सर्वाधिक आढळून येते.

अधिक लेख –

1. इलेक्ट्रॉनिक्स म्हणजे काय ?

2. जैवतंत्रज्ञान म्हणजे काय व याचे प्रकार कोणते ?

3. अवकाश तंत्रज्ञान म्हणजे काय ?

4. क्षेपणास्त्र तंत्रज्ञान म्हणजे काय ?

Leave a Comment