ई संवाद म्हणजे काय व त्याचे प्रकार कोणते ?

मनुष्य हा एक सामाजिक प्राणी आहे, ज्यामुळे संवाद हा माणसाच्या जीवनात एक महत्वाची भूमिका बजावतो. एखादी व्यक्ती कशी बोलतो, यावरून समाजात त्याची एक प्रतिमा तयार होत असते. या व्यतिरिक्त स्वतःच्या भावना विचार समाजासमोर मांडण्यासाठी संवाद महत्वपूर्ण ठरतो.

कालांतराने जस जसा समाजात बदल होत गेला, तस तसे संवाद साधण्याच्या पद्धती देखील बदलत गेल्या. हल्ली संवाद साधण्यासाठी देखील प्रगत तंत्रज्ञांचा उपयोग केला जाऊ लागला आहे. या लेखात आपण ई संवाद ही संकल्पना नेमकी काय आहे, या संबंधित माहितीचा आढावा घेणार आहोत,


ई संवाद म्हणजे काय ?

मानवी विचारांची आदान-प्रदान करण्याच्या पद्धतीला संवाद साधणे असे म्हटले जाते आणि विचारांची आदान-प्रदान करण्यासाठी म्हणजेच संवाद साधण्यासाठी जेव्हा प्रगत तंत्रज्ञांचा उपयोग केला जातो, तेव्हा त्याला ई संवाद अथवा इलेकट्रोनिक संवाद असे म्हटले जाते.

ई संवाद साधण्यासाठी वायर्ड (Wired) अथवा वायरलेस (Wireless) तंत्रज्ञांचा उपयोग केला जाऊ शकतो. वर्तमान काळात संवाद साधण्यासाठी मोबाईल व्यतिरिक्त इतरही मध्यम विकसित झाले आहेत. हल्ली ई संवाद साधण्यासाठी ज्याही पद्धती अथवा तंत्रज्ञानाचा उपयोग केला जातो, यातील अधिकतर तंत्रज्ञान हे इंटरनेटच्या आधारे कार्य करते.

वर्तमान काळात ई संवाद हा मानवी दैनंदिन जीवनाचा जणू एक भाग बनला आहे. व्यावसायिक क्षेत्रात देखील संवाद साधण्याच्या या पद्धतीचा उपयोग वाढताना दिसत आहे.


ई संवादाचे प्रकार

इलेक्ट्रॉनिक पद्धतीने संवाद साधण्यासाठी साधारणतः कोणकोणत्या पद्धती अथवा माध्यमांचा उपयोग केला जातो, याचा आढावा आपण खालीलप्रमाणे घेणार आहोत,

1. ई-मेल

आधुनिक पद्धतीने अथवा इलेक्ट्रॉनिक पद्धतीने संवाद साधण्यासाठी वापरली जाणारी ई-मेल ही एक लोकप्रिय प्रणाली आहे. ई-मेलचा न केवळ व्यक्तिगत हेतूने तर व्यावसायिक क्षेत्रात देखील मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो. ज्या प्रमाणे पूर्वी पत्र पाठविण्यासाठी टपालाचा उपयोग केला जात होता, अगदी त्याच प्रमाणे वर्तमान काळात पत्र पाठविण्यासाठी ई-मेल प्रणालीचा उपयोग केला जातो.

ई-मेलद्वारे संवाद साधण्यासाठी, ज्या व्यक्तीसोबत आपल्याला संवाद साधायचा आहे, त्या व्यक्तीची ई-मेल आयडी असणे गरजेचे असते. ई-मेल आयडी म्हणजे त्या व्यक्तीचा पत्ता ज्याला आपल्याला पत्र पाठवायचे आहे.

ई-मेल प्रणालीद्वारे न केवळ शब्द स्वरूपी माहितीची तर सोबतच फोटो, विडिओ, इतर फॉरमॅट मधील कागदपत्र जसे की PDF यांसारख्या साहित्यांच्या स्वरूपात  देखील माहितीची देवाण घेवाण देखील करता येते. या व्यतिरिक्त ई-मेल मध्ये व्हॉइस मेलची (Voice Mail) देखील सुविधा उपलब्ध आहे. ईमेलद्वारे संवाद साधण्यासाठी युजरला इंटरनेट कनेक्शनची गरज भासते. Gmail (Google), Yahoo Mail (Yahoo), outlook (Microsoft) हे काही प्रसिद्ध मोफत ई-मेल सेवा प्रोव्हायडर आहेत.

२०१९ च्या एका जागतिक रिपोर्टनुसार दर दिवशी २९३.६ दशलक्ष ई-मेलची देवाण-घेवाण केली जाते.

2. एस.एम.एस (SMS)

“Short Messaging Service” हे SMS चे विस्तारित रूप आहे. SMS मध्ये संक्षिप्त रुपी संदेशाद्वारे संवाद साधला जातो. ३ डिसेंबर १९९२ मध्ये SMS या संकल्पनेचा उदय झाला होता. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे न केवळ ऍडव्हान्स मोबाईलद्वारे तर किपॅड (Keypad) मोबाईलद्वारे देखील या सुविधेचा लाभ घेता येतो. SMS पाठविण्यासाठी युजरला इंटरनेट कनेक्शनची गरज भासत नाही. वर्तमान काळात या प्रणालीचा अधिकतर उपयोग व्यावसायिक क्षेत्रात विपणनाची होताना दिसून येत आहे.

3. वेबसाईट अथवा ब्लॉग

ब्लॉग अथवा वेबसाईटच्या आधारे संवाद साधने ही एक प्रभावी पद्धत मानली जाते. याद्वारे एकाच वेळी लाखो-करोडो लोकांसोबत संवाद साधता येतो.  ब्लॉगिंग करणाऱ्या व्यक्तीला ब्लॉगर असे म्हटले जाते आणि ब्लॉगर ज्या वेबसाईटवर माहिती प्रकाशित करतो, त्या वेबसाईटला ब्लॉग असे म्हटले जाते.

ब्लॉगर ठराविक माहिती त्याच्या ब्लॉग अथवा वेबसाईट वर प्रकाशित करतो. ही माहिती इंटरनेटच्या माध्यमातून एकाच वेळी लाखो लोकांपर्यंत पोहोचते, म्हणजेच ब्लॉगर एकाच वेळी लाखो लोकांसोबत विचारांची देवाण घेवाण करतो. जो ब्लॉग अथवा माहितीचा वाचक असतो, तो कंमेंटद्वारे अथवा ई-मेलद्वारे ब्लॉगर सोबत संवाद साधण्यास सक्षम असतो, तर असा प्रकारे एका वेबसाईटद्वारे देखील संवाद साधला जाऊ शकतो.

4. व्हॉइस कॉलिंग

व्हॉइस कॉलिंग (Voice Calling) करण्यासाठी हल्ली अधिकतर मोबाईल अथवा टेलिफोन या दोन उपकरणांचा उपयोग केला जातो. दूर अंतरावरील व्यक्तीसोबत संवाद साधण्याची ही एक सर्वसाधारण पद्धत आहे. मोबाईलद्वारे व्हॉइस कॉलिंग करण्याव्यतिरिक्त आज इंटरनेटद्वारे देखील व्हॉइस कॉलिंग (Voice Calling) करता येऊ लागली आहे.

सुरुवातीच्या काळात जेव्हा संप्रेषण तंत्रज्ञान उदयास आले होते, तेव्हा एका वेळी दोनच व्यक्ती एकमेकांसोबत संवाद साधण्यास सक्षम होते, परंतु जस जसे तंत्रज्ञान विकसित होत गेले, तस तसे व्हॉईस कॉलिंग (Voice Calling) चे विविध पर्याय उपलब्ध होऊ लागले, यातीलच एक सुप्रसिद्ध व्हॉइस कॉलिंग (Voice Calling) सुविधा म्हणजे “Confrence Voice Calling” होय. या सुविधेसह एकच वेळी एकापेक्षा अधिक लोकांसोबत संपर्क साधने शक्य झाले आहे. Conference Call मध्ये देखील नॉर्मल कॉल आणि इंटरनेट कॉल या दोन्ही सुविधा उपलब्ध आहेत.

5. विडिओ कॉलिंग

विडिओ कॉलिंगच्या (Video Calling) सुविधेमुळे न केवळ संवाद साधता येऊ लागला आहे, तर सोबतच संवाद साधताना संवाद साधणारे व्यक्ती एकमेकांना पाहू शकत आहेत. जून १९७० दरम्यान विडिओ कॉलिंग (Video Calling) ही सुविधा लोकांच्या ओळखीची झाली होती. अगदी सुरु झाल्यापासून ते आतापर्यंत विडिओ कॉलिंग (Video Calling) या सुविधेला लोकांचा भरपूर प्रतिसाद मिळताना दिसत आहे.

विडिओ कॉलिंगद्वारे संवाद साधण्यासाठी लोक हल्ली गुगलच्या “Google Due” नामक अँप्लिकेशनला अधिक प्राधान्य देताना दिसत आहे. उत्कृष्ट विडिओ क्वालिटी हे “Google Due” या अँप्लिकेशनचे वैशिष्टय आहे.  “Conference Voice Call” प्रमाणे “Conference Video Call” ची देखील सुविधा उपलब्ध केली गेली आहे. या द्वारे आपण एकाच वेळी एकापेक्षा अधिक लोकांसोबत संवाद साधता साधता त्यांना पाहू देखील शकतो. या सुविधेचा उपयोग व्यावसायिक क्षेत्रात अधिक होताना दिसत आहे.

6. सोशल मीडिया

आज प्रत्येक व्यक्तीला सोशल मीडियाबद्दल (Social Media) संपूर्ण कल्पना आहे. आज जवळ-जवळ प्रत्येक इंटरनेट युजर हा त्याचा बराचसा वेळ सोशल मीडियावर घालवत आहे.. सोशल मीडिया न केवळ मनोरंजनाचे साधन आहे, तर लोकांसोबत संवाद साधण्यासाठी देखील याचा उपयोग केला जातो. सोशल मीडियाद्वारे आपण टेक्स्ट मेसेज (Text Message), ग्रुप चॅटिंग (Group Chatting), विडिओ कॉलिंग (Video Calling) आणि व्हॉइस कॉलिंग (Voice Calling) अशा विविध पद्धतीने संवाद साधू शकतो.

अनेकदा सोशल मीडियाद्वारे साधला जाणारा संवाद हा रिअलटाइम (Real Time) असू शकतो. वर्तमान काळात फेसबुक (Facebook), ट्विटर (Twitter), व्हाट्सअप (Whats App), इंस्टाग्राम (Instagram) हे सर्वाधिक वापरले जाणारे सोशल मीडिया मंच आहेत.


फायदे

ई संवाद अथवा इलेकट्रोनिक संवादामुळे आपल्याला कोणकोणत्या प्रकारचे फायदे होतात, याचा आढावा आपण खालीलप्रमाणे घेणार आहोत,

1. वेगवान संवाद

ई संवादाचा सर्वात मोठा फायदा म्हणजेच जलद माहितीची देवाणघेवाण होणे. इलेकट्रोनिक मीडियाच्या सहाय्याने एखादी व्यक्ती काही सेकंदातच दूरवर स्थित व्यक्तीसोबत टेक्स्ट, विडिओ, फोटो व इतर स्वरूपात माहितीची देवाण घेवाण करून संवाद संवाद साधू शकते. “Swift Transmission” या प्रणालीमुळे इलेकट्रोनिक माध्यमांच्या सहाय्याने अगदी काही सेकंदातच संभाषण पार पाडणे सुलभ झाले आहे.

2. अमर्यादित माहितीची देवाणघेवाण

इलेकट्रोनिक माध्यमांच्या सहाय्याने केल्या जाणाऱ्या माहितीच्या देवाणघेवाण प्रक्रियेवर कोणत्याही प्रकारची मर्यादा नसते, आपण अमर्यादित माहिती साठ्यासह संवाद साधू शकतो. याचे सर्वोकृष्ट उदाहरण म्हणजे ई-मेल होय. ई-मेलद्वारे शंभर पानांचे लेख अथवा पात्र देखील अगदी सहज हस्तांतरित करता येते. इलेकट्रोनिक माध्यमांमध्ये कालांतराने होणाऱ्या विकासामुळे व्यवसायिकदार अगदी सहज रित्या संपूर्ण जगाचा आढावा घेऊ लागला आहे. जगाचा आढावा घेण्यासाठी इलेकट्रोनिक माध्यमांमधील विडिओ अथवा टेलेकॉन्फेरेंसिन्ग, ई-मेल आणि मोबाईलसारखे घटक सहाय्य करू शकतात.

3. विस्तृत क्षेत्र

इलेकट्रोनिक माध्यमांचे आणखी एक वैशिष्ठ्य म्हणजे विस्तृत क्षेत्र. इलेकट्रोनिक संवादाच्या सहाय्याने आपण जगातील कोणत्याही ठिकाणी स्थित व्यक्तीसोबत संवाद साधू शकतो. हे सर्व उपग्रहांमुळे (Satellite) शक्य झाले आहे. अगदी सोप्या भाषेत सांगायचे झाले तर इलेकट्रोनिक माध्यमांना कोणत्याही प्रकारचे ठराविक क्षेत्र नाही.

4. कमी खर्च

ई संवादामुळे आपल्या केवळ वेळेचीच नाही तर सोबतच पैशांची देखील बचत होते. पारंपरिक पद्धतीच्या तुलनेत नवीन तंत्रज्ञानावर आधारित ई संवाद कमी खर्चिक आहे. इंटरनेट कनेक्शनद्वारे ई-मेल पाठवणे, सोशल मीडियाच्या आधारे व्हॉइस कॉल, विडिओ कॉल करणे मोफत आहे अथवा कमी खर्चिक आहे, या व्यतिरिक्त नॉर्मल कॉल अथवा टेक्स्ट मेसेजद्वारे संवाद साधण्यासाठी देखील अगदी १ रुपयांपेक्षा कमी खर्च उद्भवतो.

5. माहिती संरक्षण

वर्तमान काळात जी काही इलेकट्रोनिक उपकरणे विकसित केली गेली आहे, ती ऍडव्हान्स (Advance) पद्धतीची आहेत. ही इलेकट्रोनिक उपकरणे क्रिया जलद पार पाडण्यासोबतच, पार पडलेल्या क्रिये संबंधित माहिती सुरक्षित ठेवण्याचे देखील काम करतात. कोणताही तृतीय व्यक्ती या माहितीच आढावा घेऊ शकत नाही, यामुळेच विविध स्वरूपातील माहितीची ऑनलाईन देवाणघेवाण वाढली आहे.


तोटे

1. वेळेचा दुरुपयोग

ई संवाद प्रणालीमधील सोशल मीडिया हे एक असे मंच आहे, जे जगभरातील ओळखीच्या अथवा अनोळखी लोकांसोबत संवाद साधण्याची मुभा देते. यामुळे बरेचसे लोक सोशल मीडिया वापरण्यासाठी स्वतःचा अधिक वेळ देतात, ज्यामुळे नक्कीच वेळेचे अपव्यय होतो.

2. निर्मितीचा खर्च

ई संवाद साधण्यासाठी इलेकट्रोनिक प्रणाली जरी स्वस्तात उपलब्ध होत असली तरी त्याच्या निर्मितीचा खर्च अधिक असतो. यंत्रणा तयार करताना अनेक गोष्टींचा आढावा घेणे गरजेचे असते, ज्यामुळे न केवळ यंत्रणा तयार करण्यासाठी खर्च उद्भवतो तर सोबतचे ही एक वेळ घेणारी प्रक्रिया बनते.

3. सायबर हल्ले

या तंत्रज्ञांच्या युगात “Data” ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. युजरचा वैयक्तिक डेटा जसेकी बँक खाते माहिती, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड नंबर यांसारखी माहिती चोरण्यासाठी सायबर गुन्हेगारांकडून सायबर हल्ले केले जातात. यंत्रणा सुरक्षित असल्यामुळे ते थेट सर्वरचा ताबा मिळवू शकत नाही, म्हणून सायबर गुन्हगार युजरला विविध ऑफर्स बोनस संबंधित लालसा देऊन ते युजरचा डेटा चोरतात. कालांतराने वाढत्या इंटरनेट युजर्स सोबतच सायबर हल्ल्यांचे प्रमाण देखील वाढले आहे.


FAQ

1. ई संवाद साधण्यासाठी तयार केलेले पहिले उपकरण कोणते ?

उत्तर : ई संवाद साधण्यासाठी तयार करण्यात आलेले उपकरण हे एक पाच तारांसहित तयार केलेलं टेलिग्राफ होते, ज्याची निर्मिती साल १८३७ मध्ये सॅम्युएल मोर्स यांच्याद्वारे केली गेली होती.

2. मोबाईलचा शोध कोणत्या वर्षी लागला ?

उत्तर : मोबाईल चा शोध साल १९७३ मध्ये लागला.

 3. ई संवाद साधण्यासाठी सर्वाधीक प्रमाणात वापरले जाणारे माध्यम कोणते ?

उत्तर : ई-मेल अथवा इलेकट्रोनिक मेल हे ई संवाद साधण्यासाठी सर्वाधिक प्रमाणात वापरले जाणारे एक लोकप्रिय माध्यम आहे.

4. जगात प्रथम “Conference Call” द्वारे संवाद केव्हा साधला गेला ?

उत्तर : जगातील पहिला “Conference Call” साल १९१५ मध्ये करण्यात आला होता आणि सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे या कॉलसाठी प्रति मिनिट $४८५ अमेरिकी डॉलर इतका खर्च उद्भवला होता.

अधिक लेख –

1. ई-गव्हर्नन्स म्हणजे काय व याचे फायदे कोणते ?

2. ई व्यवसाय म्हणजे काय व याचे फायदे कोणते ?

3. ई कॉमर्स म्हणजे काय व त्याचे फायदे कोणते ?

4. इंटरनेट म्हणजे काय व इंटरनेटचे फायदे कोणते ?

Leave a Comment