ई कॉमर्स म्हणजे काय व त्याचे फायदे कोणते ?

ह्या तंत्रज्ञान आणि इंटरनेटच्या जगात, दर दिवशी एक नवीन संकल्पना आपल्या कानी पडत असते, ती संकल्पना आश्चर्यचकित करणारी तर असतेच, सोबतच लाभदायक देखील असते. ह्या नवीन संकल्पना उदयास तर येतात, पंरतु आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनण्यासाठी बराचसा वेळ घेतात. अशीच एक संकल्पना म्हणजे ई कॉमर्स. ही संकल्पना अनेकांच्या ओळखीची असेल तर ह्या उलट ई कॉमर्स म्हणजे काय असा प्रश्न अनेकांच्या मनात उद्भवत असेल.

ह्या लेखात आपण ई कॉमर्स संबंधित विविध माहितीचा आढावा घेणार आहोत,

अनुक्रमणिका


ई कॉमर्स म्हणजे काय ?

ई कॉमर्स म्हणजेच ऑनलाईन पद्धतीने एका वेबसाईटच्या आधारे वस्तू आणि सेवांची खरेदी विक्री करणे होय. वस्तू आणि सेवांची खरेदी विक्री ही खरेदीदार आणि विक्रेता ह्यांचा गैरहजेरीत होत असते. सेवा आणि वस्तूंची खरेदी आणि विक्री ही व्यावसायिक ते व्यावसायिक, व्यवसायिक ते ग्राहक, ग्राहक ते ग्राहक, आणि ग्राहक ते व्यावसायिक अशा प्रकारे होऊ शकते.

ई कॉमर्सला आपण ई-बिसिनेस असे देखील म्हणू शकतो. ई कॉमर्स ची संपूर्ण प्रणाली हि सप्लाय चेन, मोबाईल कॉमर्स, इलेक्ट्रॉनिक किंवा इ फंड ट्रान्सफर, ऑटोमेटेड डेटा सिस्टिम, इंटरनेट मार्केटिंग, अशा काही टेकनॉलॉजि च्या आधारावर कार्य करत असते. ऑनलाईन पद्धतीने वस्तू आणि सेवांच्या खरेदी विक्री मध्ये ई कॉमर्स हे जगातील सर्वात मोठे सेक्टर आहे.

ई कॉमर्स मध्ये आपण नगद आणि ऑनलाईन अशा दोन्ही प्रकारे पैशांचा व्यवहार करू शकतो.


ई कॉमर्स चा इतिहास

ई कॉमर्स ह्या शब्दाची उत्पत्ती डॉक्टर रॉबर्ट जाकोबसन ह्यांच्या द्वारे १९८४ दरम्यान झाली होती. डॉक्टर रॉबर्ट जाकोबसन हे त्या काळी California State Assembly’s utilities & Commerce Committee चे प्रमुख म्हणून कार्यरत होते.

ह्या शब्दाची उत्पत्ती जरी १९८४ मध्ये झाली असली, तरी ई कॉमर्स ची संकल्पना १९८४ च्या देखील आधी उदयास आली होती. १९७१ आणि ७२ दरम्यान APARTNET चा वापर Sandford Artificial Intelligence Laboratory & Massachusetts Institute Of Technology ह्या शिक्षण संस्थेत विद्यार्थ्यांना भांग विकण्यासाठी केला जात होता, ते ही ऑनलाईन पद्धतीने. ह्या संपूर्ण प्रक्रियेची तुलना जॉन मार्कोफ्फ ह्यांनी त्यांच्या एका पुस्तकात ई कॉमर्स सोबत केली आहे.

१९७६ मध्ये बंकर रेमो कॉर्पोरेशन आणि अटाला टेकनॉवेशन ह्या दोन कंपनीद्वारे एका नवीन प्रणाली तयार करण्यात आली होती, ज्याद्वारे ऑनलाईन पैशांचा व्यवहार केला जाऊ शकत होता.

मायकल अल्ड्रीच नामक व्यक्तीने १९७९ दरम्यान ऑनलाईन शॉपिंगची संकल्पना जगासमोर मांडली. १९८१ मध्ये युनाइटेड किंगडम मधील थॉमसन नामक व्यक्तीने व्यावसायिक ते व्यावसायिक ऑनलाईन शॉपिंग प्रणाली अस्तित्वात आणली.

१९८२ मध्ये टेली कॉलिंग प्रणालीला ऑनलाईन शॉपिंग चा एक भाग बनविण्यात आले. इथे टेली कॉलिंग प्रणालीला ऑनलाईन ऑर्डर घेण्यासाठी वापरले जात होते, आणि हे प्रथम फ्रान्स मध्ये एका कंपनी द्वारे केले गेले होते.

१९८३ मध्ये Kendal आणि Karen ह्या दोन व्यक्तींनी पियानो खरेदीदार आणि विक्रेते यांच्यासाठी ई कॉमर्स सेवा सुरु केली. इथे साधारणतः खरेदीदार आणि विक्रेता ह्यांना आपापसात जोडण्यासाठी एक डाटाबेस चा वापर केला गेला होता. ह्या संपूर्ण प्रणालीला एका वयक्तिक संगणकावरून ऑपेरेट केले गेले होते.

१९९२ दरम्यान एक संकेतस्थळ उदयास आले, ज्याचे नाव www.Book.com असे होते. हि एक ई कॉमर्स वेबसाईट होती, ज्याद्वारे केवळ पुस्तकांची विक्री होत होती.

१९९४ मध्ये ई कॉमर्स सेवेमध्ये आर्थिक व्यवहार अधिक सुरक्षित बनविण्यासाठी Mozilla नावाचा एक ब्रउसर तयार करण्यात आला, ह्याद्वारे transaction संबंधित माहिती encrypt केली जात होती.

१९९५ मध्ये जेफ बेझोस, Pierre Omidyar ह्यांनी ऍमेझॉन आणि eBay ची सुरुवात केली, ह्याच वर्षी ई कॉमर्स मध्ये सर्वात मोठा बदल घडून आला तो म्हणजे, ह्या आधी केवळ ठराविक वेळेसाठीच ई कॉमर्स सेवा पुरवली जात होती, परंतु १९९५ मध्ये ई कॉमर्स सेवा २४ तास पुरवली जाऊ लागली.

१९९९ मध्ये Alibaba ची स्थापन चीन मध्ये झाली आणि ह्याच वर्षी ई कॉमर्स चे मार्केट हे १५० बिलियन अमेरिकी डॉलर इतके झाले होते. कालांतराने ई कॉमर्स प्रणाली लोकांमध्ये प्रसिद्ध होऊ लागली आणि त्याचा मार्केट विस्तार देखील होत गेला. आज संपूर्ण जगात ई कॉमर्स सेवा कार्यरत आहे.


ई कॉमर्स  चे प्रकार

ई कॉमर्सद्वारे होणाऱ्या विविध प्रकारच्या व्यवहारानुसार ई कॉमर्स चे विविध प्रकार उदयास आले आहेत, ज्याबद्दल माहिती आपण खालील प्रमाणे घेणार आहोत,

1. व्यावसायिक ते ग्राहक

व्यावसायिक ते ग्राहक ह्या पद्धतीच्या व्यापाराला B2C (Business To Consumer) मॉडेल म्हटले जाते. हा ई कॉमर्स चा एक साधारण प्रकार आहे. जेव्हा ग्राहक वस्तू किंवा सेवांची खरेदी करतो, तेव्हा वस्तूंचा प्रवाह हा साधारणतः व्यावसायिक किंवा उत्पादक ते ग्राहक असा असतो. ऍमेझॉन, फ्लिपकार्ट हे व्यावसायिक ते ग्राहक ई कॉमर्स प्रकारचे उत्तम असे उदाहरण आहे.

2. व्यावसायिक ते व्यावसायिक

ह्या प्रकाराला B2B (Business To Business) मॉडेल म्हणून देखील ओळखले जाते. व्यावसायिक ते व्यावसायिक हा व्यवहार दोन किंवा दोन पेक्षा अधिक कंपन्यांमध्ये होत असतो. ह्यामध्ये उत्पादक किंवा घाऊक विक्रेता (Wholesaler) ह्यांचा व्यवहार Retailer सोबत होत असतो.

कोणतीही वस्तू किंवा सेवा ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी त्या वस्तूला तीन टप्प्यातून जावे लागते. प्रथम वस्तू आणि सेवांचे उत्पादन होते, त्यानंतर ते होलसेलर कडे जाते आणि होलसेलर कडून रिटेलर व शेवटी रिटेलर ते ग्राहक.

3. ग्राहक ते व्यावसायिक

ग्राहक ते व्यावसायिक हा प्रकार व्यावसायिक ते ग्राहक च्या अगदी  उलट आहे. ह्यामध्ये एखादी कंपनी ग्राहकाचे प्रोडक्ट कंपनीला विकण्यासाठी प्रोत्साहित करत असते. ह्यामध्ये लोगो डिसाईन, फोटोग्राफ सेलिंग, ह्यासारख्या अनेक सेवा आणि वस्तूंचा समावेश असू शकतो.

4. ग्राहक ते ग्राहक

एखाद्या डिजिटल माध्यमाचा उपयोग करून ग्राहक त्याच्या वस्तू किंवा सेवा इतर ग्राहकाला विकू शकतो. ह्याचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे upwork.com हि एक freelancing website आहे, ज्याद्वारे एक ग्राहक दुसऱ्या ग्राहकाला सेवा विकत असतो. amazon वर देखील केवळ स्वतःचे अकाउंट उघडून आपण आपल्या वस्तू आणि सेवा इतर ग्राहकांना विकू शकतो. इथे ईकॉमर्स कंपन्या एक प्रकारची मध्यस्थी करत असतात.


ई कॉमर्स प्रणाली कशी कार्य करते ?

ई कॉमर्स साधारणतः कसे कार्य करते, हे आपण काही स्टेप्सद्वारे जाणून घेणार आहोत,

१. प्रथम ग्राहक ई कॉमर्स सुविधा पुरविणाऱ्या कंपनीच्या सांकेतिक स्थळाला (Website) भेट देतात. तेथे स्वतःचे खाते खोलता. ग्राहक तेथून गरजेची किंवा आवडीच्या सेवा व वस्तूंची खरेदी करतो.

२. खरेदी केली, कि कंपनी ग्राहकाला payment साठी दोन पर्याय देते.  पहिला पर्याय म्हणजे ऑनलाईन पैसे भरणे जे ग्राहक नेट बँकिंग किंवा इतर पद्धतीने पार पडतो. आणि दुसरा पर्याय म्हणजे COD ( Cash On Delivery ), ह्यामध्ये ग्राहकाला वस्तू पोच झाल्यावर डिलिव्हरी मॅन कडे नगद पैसे द्यायचे असतात.

३. हि प्रक्रिया पूर्ण झाली कि, कंपनी तुमच्या जवळच्या कुरियर कंपनी कडे तुमचे पार्सल पाठवते व त्या कुरियर कंपनी द्वारे तुम्हाला पार्सल फोहोचवले जाते.

४. ह्यात तुम्ही तुमच्या मोबाईलद्वारे तुमच्या पार्सल चे लोकेशन सतत चेक करू शकता.

५. जर तुम्ही विकत घेतलेल्या सामाना ऐवजी इतर पार्सल तुमच्या कडे चुकून आल्यास तुम्ही कंपनीला कॉल करून किंवा मेसेजद्वारे कळवू शकता. अशा परिस्थितीत कंपनी तुमच्यकडून जुने पार्सल घेऊन नवीन आणि योग्य ते पार्सल देते.

६. अनेक कंपनी Refund पर्याय देखील ग्राहकाला उपलब्ध करून देतात. ज्यामध्ये ग्राहक वस्तू कंपनीला परत देऊन त्याचे पैसे परत घेऊ शकतो.

ह्या पूर्ण प्रक्रियेला ई कॉमर्स असे म्हटले जाते.


ई कॉमर्स चे फायदे

1. जलद प्रक्रिया

ई कॉमर्सद्वारे ऑनलाईन खरेदी ही एक वेगवान अशी प्रक्रिया झाली आहे. अगदी कमी वेळात ग्राहक वस्तू आणि सेवा खरेदी करू शकतो, तसेच ग्राहक एकाच वेळेस अनेक वस्तू किंवा सेवांची खरेदी करू शकतो. ज्या वस्तू आपल्या अवती भवती परिसरातील दुकानांमध्ये उपलब्ध नसतात, त्या वस्तू ऑनलाईन स्टोर मध्ये अगदी सहज उपलब्ध होतात, ह्यामुळे आपल्याला दुकानांमध्ये भटकावं लागत नाही.

ऑनलाईन खरेदी दरम्यान वस्तू निवडणे, शॉपिंग लिस्ट मध्ये ऍड होणे, ऑनलाईन payment होणे ह्या प्रक्रिया अगदी जलद पार पडतात, ह्यामुळे ग्राहकाचा बराचसा वेळ वाचतो.

2. सुरक्षित बिल भरणे

वस्तू किंवा सेवांची खरेदी केल्यानंतर सर्वात शेवटचा आणि महत्वाचं टप्पा येतो, तो म्हणजे बिल भरणे. इथे विक्रेत्या कडून ग्राहकाला तीन पर्याय दिले जातात, पहिले म्हणजे नेट बँकिंग, दुसरे UPI आणि तिसरे म्हणजे कॅश ऑन डिलिव्हरी. नेट बँकिंग आणि UPI मध्ये आपण ऑनलाईन बिल भरू शकतो, ज्याचा पुरावा म्हणून आपल्याला पावती अथवा बिल PDF स्वरूपात दिले जाते. ऑनलाईन व्यवहार सुरक्षित करण्यासाठी कंपनीद्वारे सुरक्षित तंत्रज्ञानाचा वापर केला जातो, ज्यामुळे ग्राहक अगदी कोणतीही शंका मनात न ठेवता ऑनलाईन पैसे भरू शकतो.

तिसरी आणि सर्वात प्रसिद्ध बिल भरणी प्रक्रिया हि कॅश ऑन डिलिव्हरी आहे, ह्यामध्ये ग्राहकाला त्याच्या हातात जेव्हा सामान मिळेल, तेव्हा बिल चे पैसे सामान घेऊन आलेल्या व्यक्तीकडे द्यायचे असतात. अधिक तर ग्राहक ऑनलाईन payment चा पर्याय न  निवडता कॅश ऑन डिलिव्हरीला प्राधान्य देत असतात.

3. वस्तू आणि सेवांची यादी

जेव्हा आपण मॉल किंवा D-Mart सारख्या स्टोर मध्ये खरेदीसाठी जातो, त्या वेळेस आपल्याला एक-एक वस्तू शोधण्यासाठी संपूर्ण स्टोर फिरावे लागते, अनेकदा वस्तू मिळतात तर अनेकदा मिळत नाहीत. मोठ्या स्टोर मध्ये एखादी लहान वस्तू शोधणे, हे खरंच एक किचकट काम असते. परंतु ई कॉमर्स सेवेत कंपनीद्वारे किंवा ऑनलाईन विक्रेत्याद्वारे वस्तू आणि सेवांची यादी तयार केली जाते, ज्यामुळे वस्तू लगेच भेटतात.

ज्याप्रमाणे फिसिकल स्टोर मध्ये सामान ठेवण्यासाठी आपल्याला एक बास्केट किंवा ट्रॉली दिली जाते, हीच सेवा आपल्याला ऑनलाईन मध्ये देखील उपलब्ध असते, ज्या वस्तू आपल्याला हव्या आहेत, त्या आपण आपल्या शॉपिंग कार्ट मध्ये जमा करून ठेऊ शकतो, व शॉपिंग पूर्ण झाली कि, पुन्हा आपले कार्ट तपासून अगदी सहज त्यामधून वस्तू किंवा सेवा वजा देखील करू शकतो.

ग्राहकांसोबतच हे विक्रेत्याला देखील सोपे जाते, कारण एकदाच विक्रेता सामानाची यादी तयार करून, सामानाविषयी सर्व माहिती description मध्ये लिहितो, ज्यामुळे विक्रेत्याला त्याच्या वस्तूंबाबत प्रत्येक ग्राहकाला सांगावे लागत नाही. माहिती सोबतच विक्रेता त्याच्या सामानाचे फोटो देखील ग्राहकांना उपलब्ध करून देतो, त्यामुळे आपल्याला हवी असलेली वस्तू नेमकी हीच आहे का ह्याच निश्चय ग्राहक करू शकतो.

ह्याच जागी जर आपण एखाद्या दुकानात सामान घ्यायला जातो, तेव्हा प्रत्येक वस्तू बाबत आपल्याला दुकानदाराला विचारावे लागते आणि सतत संक्षिप्त माहिती सांगणे हे दुकानदाराला शक्य होत नाही.

4. ग्राहकाला मिळणारी लवचिकता

ई कॉमर्स सिस्टिम मधील सर्वात मोठा फायदा म्हणजे, विक्रेता ग्राहकाला लवचिकता प्रदान करतो. ग्राहक संपूर्ण २४ तासांपैकी कोणत्याही वेळी खरेदी करू शकतो. ग्राहकाला स्वतः स्टोर मध्ये जावे लागत नाही, त्यामुळे ग्राहकाचा बराचसा खर्च वाचतो. आपल्याला आपण खरेदी केलेले सामान केव्हा हवे आहे, हे आपण विक्रेत्याला सांगू शकतो आणि आपण ठरविलेल्या वेळीच आपल्याला सामान मिळते.

फिसिकल स्टोर मध्ये जाऊन, सामना घेतले की बिल बनविण्यासाठी रांगेत उभे राहा, बिल भरले कि, ते अवजड सामान उचलून घरी जा, ऑनलाईन स्टोरमुळे इतके सर्व करण्याची गरज राहिली नाही, ह्यामुळे ग्राहक समाधानी झाला.

5. वस्तूंच्या कमी किंमत

वस्तू आणि सेवांच्या कमी किमती हि गोष्ट प्रत्येक ग्राहकाला हवी असते, जी ऑनलाईन शॉपिंग द्वारे पूर्ण होते. अनेकदा असे निदर्शनास येते कि, फिसिकल स्टोर पेक्षा डिजिटल स्टोर मध्ये वस्तू आणि सेवांच्या किमती फार कमी असतात, ह्याचे मुख्य कारण म्हणजे ऑनलाईन स्टोर मध्ये विक्रेतेदाराला मेन्टेनन्स कॉस्ट नसते.

फिसिकल स्टोर मध्ये विक्रेत्याला भाडे, कामगारांचा पगार, मालाची देखभाल असा काही खर्च येत असतो, जो निभावण्यासाठी विक्रेता ग्राहकाला महागात वस्तू विकतो, परंतु ई कॉमर्स मध्ये असा कोणताही खर्च उद्भवत नाही, ज्यामुळे ग्राहकाला अगदी स्वस्त दरात वस्तू आणि सेवा उपलब्ध होतात.


तोटे

 

ई-कॉमर्स, किंवा इलेक्ट्रॉनिक कॉमर्स, अनेक फायदे देते, परंतु ते त्याच्या तोट्यांसह देखील येते. यापैकी काही तोटे समाविष्ट आहेत:

1. वैयक्तिक परस्परसंवादाचा अभाव

ई-कॉमर्स व्यवहारांमध्ये सामान्यतः वैयक्तिक स्पर्शाचा अभाव असतो जो वैयक्तिक खरेदीसह येतो. यामुळे ग्राहकांचा असंतोष होऊ शकतो, विशेषत: जेव्हा ग्राहकांना प्रश्न किंवा समस्या असतात ज्यांना ऑनलाइन संप्रेषणाद्वारे सहजपणे संबोधित केले जाऊ शकत नाही.

2. सुरक्षा चिंता

ऑनलाइन व्यवहारांसाठी संवेदनशील वैयक्तिक आणि आर्थिक माहिती सामायिक करणे आवश्यक आहे, जे ग्राहकांना ओळख चोरी, फसवणूक आणि हॅकिंगसाठी असुरक्षित बनवू शकते. सुरक्षा उपाय असूनही, डेटा भंग होण्याचा धोका नेहमीच असतो.

3. गुणवत्तेची चिंता

ग्राहक अनेकदा खरेदी करण्यापूर्वी उत्पादनांची प्रत्यक्ष तपासणी करू शकत नाहीत, ज्यामुळे वास्तविक उत्पादन गुणवत्ता, आकार, रंग किंवा इतर गुणधर्मांच्या बाबतीत त्यांच्या अपेक्षा पूर्ण करत नसल्यास निराशा होऊ शकते.

4. शिपिंग आणि डिलिव्हरी समस्या

विलंब किंवा चुकीच्या डिलिव्हरी, तसेच शिपिंग दरम्यान खराब झालेल्या उत्पादनांमुळे ग्राहक निराश होऊ शकतात. शिपिंग खर्च देखील खरेदीच्या एकूण खर्चात जोडू शकतो.

5. परतावे आणि परतावा

वस्तू परत करणे आणि परतावा मिळवणे ही प्रक्रिया ई-कॉमर्समध्ये किचकट आणि वेळखाऊ असू शकते, फक्त भौतिक स्टोअरमध्ये वस्तू परत करण्याच्या तुलनेत.

6. तंत्रज्ञानावर अवलंबित्व

ई-कॉमर्स वेबसाइट्स, पेमेंट गेटवे आणि इंटरनेट कनेक्टिव्हिटीसह तंत्रज्ञानाच्या पायाभूत सुविधांवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे. तांत्रिक अडचणी, डाउनटाइम किंवा वेबसाइट क्रॅश ग्राहकांच्या अनुभवात व्यत्यय आणू शकतात आणि संभाव्यतः विक्री गमावू शकतात.

7. डिजिटल डिव्हाइड

सर्व ग्राहकांना इंटरनेट किंवा तंत्रज्ञान उपकरणांमध्ये समान प्रवेश नाही, जे लोकसंख्येच्या काही भागांना ई-कॉमर्समध्ये भाग घेण्यापासून वगळू शकतात.

8. तत्काळ समाधानाचा अभाव

ऑनलाइन खरेदीसाठी उत्पादन पाठवण्याची वाट पाहणे आवश्यक आहे, जे खरेदी केल्यानंतर लगेच वस्तू मिळविण्यास प्राधान्य देणाऱ्या ग्राहकांसाठी गैरसोय होऊ शकते.

9. मर्यादित संवेदी अनुभव

ग्राहक खरेदी करण्यापूर्वी उत्पादनांना शारीरिकरित्या स्पर्श करू शकत नाहीत, अनुभवू शकत नाहीत, वास घेऊ शकत नाहीत किंवा वापरून पाहू शकत नाहीत, जे विशेषतः कपडे, परफ्यूम आणि सौंदर्यप्रसाधने यासारख्या उत्पादनांसाठी महत्त्वाचे आहे.

10. स्पर्धा आणि किमतीची तुलना

ई-कॉमर्स अनेकदा किमतीची स्पर्धा अधिक तीव्र करते, ज्यामुळे व्यवसायांना निरोगी नफा राखणे कठीण होते. विविध प्लॅटफॉर्मवर किमती आणि पुनरावलोकनांची सहज तुलना करण्याची क्षमता देखील ग्राहकांकडे असते, ज्यामुळे व्यवसायांसाठी स्वतःला वेगळे करणे आव्हानात्मक बनू शकते.

11. सांस्कृतिक आणि भाषा अडथळे

ई-कॉमर्स बर्‍याचदा जागतिक स्तरावर चालते, ज्यामुळे विविध भाषा, सांस्कृतिक प्राधान्ये आणि स्थानिक नियम समजून घेण्याशी संबंधित आव्हाने उद्भवू शकतात.

12. स्थानिक व्यवसायांचे नुकसान

ई-कॉमर्सची जागतिक पोहोच स्थानिक व्यवसायांवर नकारात्मक परिणाम करू शकते, कारण ग्राहक स्थानिक वीट-आणि-मोर्टार स्टोअरला समर्थन देण्याऐवजी ऑनलाइन खरेदीची सोय निवडू शकतात.

हे तोटे असूनही, ई-कॉमर्स सतत वाढत आहे आणि विकसित होत आहे आणि अनेक व्यवसाय या समस्या कमी करण्याचे मार्ग शोधतात आणि ग्राहकांना सकारात्मक ऑनलाइन खरेदी अनुभव देतात.


८ प्रसिद्ध ई-कॉमर्स कंपनी

क्रमांक ई-कॉमर्स कंपनी वेबसाईट
ऍमेझॉन Amazon.com
रिलायन्स मार्ट Relienceretail.com
वॉलमार्ट Walmart.com
होम डेपोट Homedepot.com
फ्लिपकार्ट Flipkart.com
अलीबाबा Alibaba.com
मिन्त्रा Myntra.com
शॉपक्लुस Shopclues.com

 

 

 

 

 

 


FAQ

1. ई कॉमर्स ची सुरुवात सर्वप्रथम कोणत्या देशात झाली ?

उत्तर : ई कॉमर्स ची सुरुवात सर्वप्रथम युनाइटेड किंग्डम (United Kingdom) ह्या देशात झाली.

2. ई कॉमर्स ची सुरुवात कोणी केली ?

उत्तर : ई कॉमर्स संकल्पनेला विस्तारित करण्याचे संपूर्ण श्रेय हे Michael Aldrich ह्यांना दिले जाते.

3. ई कॉमर्स ची सुरुवात कोणत्या साली झाली ?

उत्तर : १९८२ साली ई कॉमर्स ची सुरुवात झाली.

4. वर्तमान काळात जगातील सर्वात मोठी ई कॉमर्स कंपनी कोणती ?

उत्तर : वर्तमान काळात ऍमेझॉन ही जगातील सर्वात मोठी ई कॉमर्स कंपनी आहे.

5. भारतातील पहिली ई कॉमर्स वेबसाइट कोणती ?

उत्तर : Febmart.com ही भारतातील पहिली ई कॉमर्स वेबसाईट होती, ज्याची सुरुवात साल १९९९ मध्ये करण्यात आली होती.

अधिक लेख –

1. वेबसाईट म्हणजे काय व वेबसाईट चे प्रकार कोणते ?

2. सॉफ्टवेअर म्हणजे काय ?

3. ब्लॉग म्हणजे काय ?

4. Web Hosting म्हणजे काय ?

Leave a Comment