दुर्बिणीचा शोध कोणी लावला ?

आकाशगंगा हा फार पूर्वीपासून माणसाचा आकर्षणाचा एक विषय आहे, पण पृथ्वीवर राहून आकाशगंगेला अन्वेषण (explore) करणे शक्य नव्हते, याचे मुख्य कारण होते ते म्हणजे आपल्या डोळ्यांची पाहण्याची मर्यादा.

सोळाव्या शतकाच्या दरम्यान एक यंत्र उदयास आले, ज्याने आपल्या डोळ्यांची दूर अंतरावरील वस्तू पाहण्याची मर्यादा नष्ट केली, ज्यामुळे आपण आज पृथ्वीवरून आकाशगंगेचा अभ्यास करण्यास सक्षम झालो, या यंत्राचे नाव होते दुर्बिण.

आता याबाबत अनेकांच्या मनात काही प्रश्‍न नक्कीच उमलत असतील, जसे की दुर्बीण म्हणजे नेमके काय, दुर्बिन चा इतिहास काय, दुर्बिणीच्या शोध कोणी लावला आणि अधिक. ह्या लेखाद्वारे आपण या प्रश्नांचे निराकरण करणार आहोत.


दुर्बीण म्हणजे काय ?

दुर्बीण हे एक यंत्र असून आधुनिक जगातील तंत्रज्ञानाचे एक उत्तम उदाहरण आहे. लहान लहान भिंगांचा वापर करून हे यंत्र तयार केले जाते. दूरवरची वस्तूची आपण डोळ्यांनी पाहू अगदी स्पष्ट पाहू शकत नाही, त्या वस्तूला पाहण्यासाठी आणि त्याचे निरीक्षण करण्यासाठी दुर्बिन चा वापर केला जातो. या यंत्रात मुख्यतः बहिर्वक्र भिंगाचा वापर होताना आपल्याला दिसून येतो.

दुर्बिणीचा शोध कोणी लावला

पूर्वी युद्ध होत असल्याने दुर्बिण चा वापर शत्रूवर नजर ठेवण्यासाठी केला जात होता, परंतु कालांतराने जसजसा काळ बदलत गेला या यंत्राचा वापर देखील बदलू लागला. आज दुर्बिणीचा वापर न केवळ शत्रूवर नजर ठेवण्यासाठी, तर सूक्ष्मजीवांचे निरीक्षण करणे, आकाशगंगेत असलेल्या ग्रहांचे निरीक्षण करणे, अशा अनेक कामांसाठी होऊ लागला आहे.


प्रकार

दुर्बिणीचा वापर हा काळानुसार बदलत असून ह्यामुळेच दुर्बिणीचे विविध प्रकार देखील पाडण्यात आले आहेत. दुर्बिणीच्या वापरा नुसार त्यात काही विशिष्ठ बदल देखील आपल्याला पाहायला मिळतात. खालील प्रकारे आपण ५ विविध प्रकारच्या दुर्बिणी चे नाव आपण पाहणार आहोत, माहिती
  • Marine Binocular
  • Night Vision Binocular
  • Porro Prism Binocular
  • Astronomy Binocular
  • Opera Glass Binocular

इतिहास

संपूर्ण आकाश आणि रात्रीच्या वेळी आकाशात चमकणारे ग्रह अथवा लुकलुकणारे तारे हे नेहमीच माणसाचे आकर्षण होते आणि आजही आहेत, परंतु आतासारखे पूर्वी आकाश आणि आकाशातील ग्रहांचे निरीक्षण करण्यासाठी उपकरणे उपलब्ध नव्हती कारण तेव्हा दुर्बिन नावाचा प्रकार अस्तित्वात नव्हता.

दुर्बिन चा इतिहास हा आपल्याला सोळाव्या शतकात कडे घेऊन जातो, कारण हा असा काळ होता, ज्या दरम्यान काच आणि भिंग यांचा वापर लोकांच्या दैनंदिन जीवनात आढळून येतो. या काळात भिंगाचा वापर अधिक तर वयस्कर लोक करत होते, ज्यांना दूरच्या गोष्टी दिसत नव्हत्या. बारीक अक्षरे वाचण्यासाठी भिंग डोळ्यासमोर धरावे लागत होते, काम झाले की ते ठेवून द्यायचे. या काळात अगदीच कमी लोक चष्म्याचा वापर करत होते.

हॉलंड जे आजच्या न्यूझीलंड मध्ये स्थित आहे, या ठिकाणी एक लीपरशे नावाचा व्यक्ती होता. लिपरशे भिंग बनवून लोकांना विकत असे, एके दिवशी लीपराशे च्या दुकानासमोर दोन मुले भिंगासोबत खेळत होते, लिपरशे द्वारे निरीक्षण केल्याने त्यांच्या असे लक्षात आले की, ती मुले दोन भिंगाना विशिष्ट अंतरावर ठेवून दूरवरील पक्षाला पाहण्याचा प्रयत्न करत होते आणि अशा प्रकारे एका यंत्राची कल्पना लिपरशे ह्यांच्या मनात उद्भवली.

लिपराशे ह्यांनी दोन भिंगांचा प्रयोग करण्यास सुरुवात केली आणि त्यांच्या असे लक्षात आले की, दोन बहिर्वक्र भिंगांना एका पुढे एक असे ठराविक अंतरावर धरले की, आपण अधिक दूरवरची वस्तू अगदी सहज पाहू शकतो, परंतु यात एक अडचण होती, ती म्हणजे दोन भींगांना दोन्ही हातात पकडून नंतर त्यादरम्यान ठराविक अंतर शोधावे लागायचे, जे सोयीचे नव्हते हे सोपे बनवण्यासाठी लिपरशे ह्यांनी दोन नळकांड्या आणि दोन लहान मोठ्या आकाराच्या भिंगाचा वापर करून एक यंत्र तयार केले आणि अशाप्रकारे जगातील पहिल्या दुर्बिणीचा जन्म झाला. कालांतराने लिपरशे ने तयार केलेल्या यंत्रात अधिक बदल घडवून आणले आणि त्या यंत्राला अधिक सुलभ करण्याचा प्रयत्न देखील केला.

लिपरशे ह्यांनी तयार केलेल्या यंत्रांची हळूहळू चर्चा वाढली, ही खबर गॅलिलिओ नामक व्यक्ती पर्यंत पोहोचली. गॅलिलिओला आकाश आणि आकाशातील ग्रहांचा विशेष आकर्षण होते. आकाशाचे निरीक्षण करण्यासाठी आपल्याकडे देखील असे एक यंत्र असावे, अशी जिज्ञासा गॅलिलिओच्या मनात तयार झाली आणि लिपरशे ह्यांनी तयार केलेल्या यंत्रापासून प्रेरणा घेऊन गॅलिलिओ ह्यांनी देखील स्वतःचे यंत्र तयार केले आणि या यंत्राची दूर वरील वस्तू पाहण्याची क्षमता इतकी होती, की या यंत्राद्वारे ग्रहांचे देखील निरीक्षण करता येत होते आणि अशा प्रकारे गॅलिलिओच्या या शोधामुळे खगोलशास्त्राला एक वेगळेच वळण प्राप्त झाले.

यानंतर १८५० मध्ये एकनाथ जिओ पूर्व तर 893 मध्ये देवी यांनी दुर्बिन मध्ये बदल घडून दुर्बिन ला आणखी सुलभ बनवण्याचा प्रयत्न केला या बदलानंतर दुर्बीण मध्ये तंत्रज्ञानाचा वापर होत गेल्यामुळे आज आपण इतके ॲडव्हान्स दुर्मिल वापरू शकत आहोत.


वैशिष्ट्ये

दुर्बिणी हे ऑप्टिकल उपकरणे आहे, जे प्रकाश गोळा करण्यासाठी आणि फोकस करण्यासाठी भिंगांच्या जोडीचा वापर करून दूरच्या वस्तूंचे निरीक्षण करण्यासाठी संरचीत केलेले आहे. दुर्बिणी सामान्यतः बर्डवॉचिंग, स्टारगेझिंग, स्पोर्ट्स इव्हेंट्स आणि बाह्य अन्वेषण यासारख्या विविध क्रियाकलापांसाठी वापरले जातात. दुर्बिणीची प्रमुख वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे :

1. भव्यता

दुर्बिणी दोन संख्यांद्वारे ओळखली जाते, जसे की 8×42 किंवा 10×50, जिथे पहिली संख्या आवर्धन शक्ती दर्शवते. उदाहरणार्थ, 8x दुर्बिणीमुळे वस्तू उघड्या डोळ्यांपेक्षा आठ पट जवळ दिसतात.

2. वस्तुनिष्ठ भिंगाचा व्यास

दुर्बिणीच्या तपशीलातील दुसरी संख्या (उदा., 8×42) मिलिमीटरमध्ये मोजलेल्या वस्तुनिष्ठ लेन्सच्या व्यासाचा संदर्भ देते. मोठ्या वस्तुनिष्ठ लेन्समुळे अधिक प्रकाश दुर्बिणीत प्रवेश करू शकतो, परिणामी प्रतिमा उजळ होतात.

3. दृश्य क्षेत्र

दृश्य क्षेत्र म्हणजे क्षेत्राची रुंदी जी विशिष्ट अंतरावर दुर्बिणीद्वारे पाहिली जाऊ शकते. हे सहसा पाय किंवा अंशांमध्ये मोजले जाते. एक विस्तीर्ण दृश्य क्षेत्र आपल्याला दुर्बीण न हलवता विस्तृत क्षेत्राचे निरीक्षण करू देते.

4. एक्झिट प्युपिल

जेव्हा दुर्बीण हाताच्या लांबीवर धरली जाते, तेव्हा एक्झिट प्युपिल हा प्रकाशाचा लहान, वर्तुळाकार किरण असतो. हे वस्तुनिष्ठ लेन्स व्यासाला भिंगाने विभाजित करून मोजले जाते (उदा. 42/8 = 5.25 मिमी). एक मोठा बाहेर पडणारा विद्यार्थी म्हणजे उजळ प्रतिमा, विशेषत: कमी प्रकाशाच्या परिस्थितीत.

5. प्रिझम प्रकार

दुर्बीण प्रतिमा उलट करण्यासाठी प्रिझम वापरतात. दुर्बिणीमध्ये दोन मुख्य प्रकारचे प्रिझम वापरले जातात, जसे कि पोरो प्रिझम आणि रूफ प्रिझम इत्यादी. पोरो प्रिझम अधिक मोठ्या प्रमाणात असतात परंतु अधिक चांगल्या खोलीचे आकलन देतात, तर छतावरील प्रिझम अधिक सुव्यवस्थित आणि संक्षिप्त डिझाइनमध्ये परिणाम करतात.

6. थर

आधुनिक दुर्बिणीमध्ये प्रकाशाचा प्रसार वाढविण्यासाठी, चकाकी कमी करण्यासाठी आणि प्रतिमेची स्पष्टता सुधारण्यासाठी लेन्स चे थर वैशिष्ट्यीकृत आहेत. सामान्य कोटिंग्समध्ये छतावरील प्रिझम दुर्बिणीसाठी अँटी-रिफ्लेक्टीव्ह कोटिंग्स (मल्टी-कोटेड किंवा पूर्णपणे मल्टी-कोटेड) आणि फेज करेक्शन कोटिंग्सचा समावेश होतो.

7. केंद्रित प्रकार

दुर्बिणीमध्ये प्रत्येक आयपीससाठी एकतर केंद्र फोकस किंवा वैयक्तिक फोकस असू शकतो. सेंटर फोकस दुर्बिणीमध्ये एकच फोकस व्हील असते, तर वैयक्तिक फोकस दुर्बिणींना प्रत्येक आयपीस स्वतंत्रपणे समायोजित करणे आवश्यक असते.

8. जलरोधक

उच्च-गुणवत्तेच्या दुर्बिणीमध्ये अनेकदा वॉटरप्रूफिंग आणि फॉगप्रूफिंग यांसारखी वैशिष्ट्ये असतात, ज्यामुळे ते विविध हवामान परिस्थितीत बाहेरच्या वापरासाठी योग्य बनतात.

9. वजन आणि आकार

दुर्बिणीचा आकार आणि वजन हे पोर्टेबिलिटी आणि वापर सुलभतेसाठी आवश्यक बाबी आहेत. कॉम्पॅक्ट दुर्बिणी अधिक प्रवासासाठी अनुकूल असतात, तर मोठ्या दुर्बीण अधिक चांगली कामगिरी देऊ शकतात परंतु आसपास वाहून नेण्यासाठी जड असू शकतात.

एकंदरीतच, विविध क्रियाकलाप आणि प्राधान्ये तुमच्यासाठी सर्वोत्तम दुर्बिणी ठरवतील. खरेदी करण्यापूर्वी, शक्य असल्यास ते वापरून पहा आणि आपल्या इच्छित वापराच्या विशिष्ट गरजा विचारात घेणे नेहमीच चांगली कल्पना आहे.


दुर्बिणीचा शोध कोणी लावला ?

अनेक लोक दुर्बिण बनवण्याचे श्रेय हे गॅलिलिओ यांना देतात, परंतु जगातील पहिली दुर्बिन हेन्स लिपरशेय नामक व्यक्तीने १६०७ च्या दरम्यान तयार केली होती.

हेन्स लिपरशेय हे कोणतेही शास्त्रज्ञ किंवा अभ्यासक नसून एक सामान्य व्यक्ती होते, जे पैसे कमवण्यासाठी लोकांना काचेपासून भिंग तयार करून विकत होते.

हेन्स यांचा जन्म १५७० च्या दरम्यान होली साम्राज्यात झाला होता. दोन बहिर्वक्र भिंग यांना एकासमोर एक अशा प्रकारे ठराविक अंतरावर ठेवून, त्यांनी जगातील पहिली दुर्बीण तयार केली होती. दुर्बिनचा पेटंट त्यांच्या नावी व्हावा, यासाठी त्यांनी अर्ज देखील केला होता, परंतु हा एक सामान्य आविष्कार आहे जो कोणीही तयार करू शकतो, असे म्हणून त्यांनी केलेल्या अर्जाला ना स्वीकार करण्यात आले होते.


आपण काय शिकलो ?

  • जगातील पहिली दुर्बिण ही लिपरशे नामक व्यक्तीने बनवली होती.
  • पृथ्वीवरून ग्रहांचे निरीक्षण करण्याइतकी सक्षम दुर्बीण पहिल्यांदा गॅलिलीओ यांनी तयार केली होती.
  • गॅलिलिओ हे एक प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ होते.
  • सोळाव्या शतकाच्या सुमारास जगातील पहिली दुर्बीण तयार करण्यात आली होती.
  • Marine binocular, astronomia Binocular, Opera glass binocular, night vision binocular, Poro prism binocular हे दुर्बिन चे पाच प्रकार आहेत.

अधिक लेख :

1. पेन चा शोध कोणी लावला ?

2. कागदाचा शोध कोणी लावला ?

3. कार्बन पेपर चा शोध कधी लागला ?

4. छपाई यंत्राचा शोध कोणी लावला ?

Leave a Comment