डिप्लोमा म्हणजे काय व डिप्लोमा चे प्रकार कोणते ?

वर्तमान काळात विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत, ज्यांची निवड करून विद्यार्थी त्यांचे  करिअर घडवू शकतात. असाच एक शैक्षणिक पर्याय म्हणजे डिप्लोमा कोर्स होय.

बऱ्याच विद्यार्थाना डिप्लोमा कोर्स बद्दल काहीच कल्पना नाही, ज्यामुळे ते त्यांच्या शैक्षणिक जीवनात डिप्लोमाकडे एक संधी म्हणून पाहत नाहीत.

या लेखात आपण डिप्लोमा संबंधितच विविध माहितीचा आढावा घेणार आहोत,


डिप्लोमा म्हणजे काय ?

डिप्लोमा म्हणजे कमी शैक्षणिक कालावधी असलेले कोर्स होय, जो उम्मेदवाराला ठराविक क्षेत्रासंबंधित प्रशिक्षण देऊन प्रमाणपत्र बहाल करतो. डिप्लोमामध्ये उम्मेदवाराला अथवा विद्यार्थ्याला त्याच्या आवडीनुसार निवडलेल्या क्षेत्रात, कमी कालावधीत पूर्ण प्रशिक्षण बहाल केले जाते.

डिप्लोमाद्वारे उम्मेदवाराला क्षेत्रासंबंधित अधिकाधिक प्रात्यक्षिक ज्ञान देण्याचा प्रयत्न केला जातो, ज्यामुळे उम्मेदवार त्या क्षेत्रात पारंगत होतो. प्रात्यक्षिक ज्ञानासहित डिप्लोमा कोर्समध्ये व्यावहारिक ज्ञानावर देखील लक्ष केंद्रित केले जाते, तसेच उम्मेद्वाराला नोकरी मुलाखतीकरिता सज्ज केले जाते.

डिप्लोमामध्ये अनेक विविध प्रकारच्या कोर्सचा समावेश होतो, ज्यामुळे प्रत्येक कोर्सचा कालावधी देखील वेगळा असतो, जसे कि काही कोर्स साठी ६ महिने, तर काही कोर्स साठी दीड ते दोन वर्षांचा शैक्षणिक कालावधी असतो, हा कालावधी रेगुलर कोर्सच्या तुलनेत फार कमी असतो.


डिप्लोमा चे प्रकार

डिप्लोमा कोर्स हे साधारणतः चार प्रकारांमध्ये विभागले गेले आहेत, माहिती आपण खालील प्रमाणे पाहणार आहोत,

प्री ग्रॅज्युएशन डिप्लोमा कोर्स – १० वी अथवा १२ वी पर्यंतच शिक्षण पूर्ण करून, केल्या जाणाऱ्या डिप्लोमा कोर्सला प्री ग्रॅज्युएशन डिप्लोमा कोर्स असे म्हटले जाते

पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा कोर्स – पदवी शिक्षण पूर्ण करून केल्या जाणारी डिप्लोमा कोर्सला पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा कोर्स असे म्हटले जाते.

फुल टाइम डिप्लोमा कोर्स – नियमित पद्धतीने केल्या जाणारी डिप्लोमा कोर्सला फुल टाइम डिप्लोमा कोर्स असे म्हणतात.

पार्ट टाइम डिप्लोमा कोर्स – पार्ट टाइम डिप्लोमा कोर्समध्ये उम्मेदवाराचे प्रशिक्षण पूर्ण केले जाते, तसेच उम्मेदवाराला अधिक तर अभ्यासक्रम स्वतः पूर्ण करावा लागतो. जे विद्यार्थी काम करून शिक्षण घेत असतात, अशा विद्यार्थ्यांसाठी हा विकल्प उपलब्ध करून दिला जातो.


पदवी आणि डिप्लोमा यातील फरक

पदवी शिक्षण म्हणेज १५  वी पर्यंतचे शिक्षण. पदवी शिक्षणात उम्मेदवाराला साधारणतः १२ वी नंतर ठराविक क्षेत्रासंबंधीत कोर्स निवडण्याची मुभा मिळते, परंतु डिप्लोमामध्ये उम्मेद्वार १० वी नंतर देखील ठराविक कोर्ससाठी आवेदन करू शकतो.

पदवी शिक्षणात संपूर्ण शिक्षणाचा आढावा हा ठराविक युनिव्हर्सिटीद्वारे घेतला जातो, परंतु डिप्लोमामध्ये युनिव्हर्सिटी ठराविक नसते. हे आपण प्रायव्हेट शिक्षण संस्थेद्वारे देखील पूर्ण करू शकतो.

पदवी शिक्षणात ठराविक कोर्समध्ये न केवळ कोर्स संबंधित, तर कोर्स व्यतिरिक्त विषय देखील शिकवले जातात, परंतु डिप्लोमामध्ये उम्मेवाराला ठराविक क्षेत्रासंबंधितच पारंगत करण्याचा प्रयत्न केला जातो.


पात्रता

जसे कि आपण जाणतोच, डिप्लोमामध्ये विविध कोर्स शिकवले जातात आणि प्रत्येक डिप्लोमा कोर्समध्ये प्रवेश मिळविण्यासाठी विविध प्रकारची पात्रता लागते.

शैक्षणिक पात्रता पाहता, काही डिप्लोमा कोर्स मध्ये प्रवेश आपण केवळ ८ वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण करून मिळवू शकतो, तर काही कोर्स मध्ये प्रवेश मिळविण्यासाठी आपल्याला १० वी किंवा १२ वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण करणे अनिवार्य असते. असेही काही डिप्लोमा कोर्स आहेत, ज्यामध्ये आपण पदवी शिक्षण पूर्ण केल्यानंतरच प्रवेश मिळवू शकतो.

शिक्षणाव्यतिरिक्त आपल्याला काही डिप्लोमा कोर्ससाठी वयोमर्यादेचे देखील ध्यान ठेवावे लागते. वयोमर्यादा ही डिप्लोमाच्या अगदी मोजक्याच कोर्ससाठी सक्तीची असते, ते कोर्स वगळता इतर कोणत्याही कोर्ससाठी वयोमर्यादेची अट नसते.


प्रसिद्ध डिप्लोमा कोर्स

1. डिप्लोमा इन ग्राफिक डिजाईन

ग्राफिक डिजाईन हा एक वर्ष कालावधी असलेला डिप्लोमा कोर्स आहे, ज्यामध्ये उम्मेदवाराला ऍनिमेशन, मल्टि मीडिया, कॉम्पुटर गेमिंग यांसारख्या विषयांसंबंधित शिक्षण दिले जाते. हा डिप्लोमा आपण साधारणतः १२ वी नंतर करू शकतो.

भारतासहित युनाइटेड किंग्डम, अमेरिका यांसारख्या देशांमध्ये देखील याकोर्स ची खूप प्रचिती आहे. हा कोर्स पूर्ण केल्यानंतर उम्मेदवार Web Developer, Graphic Designer, Creative Director यांसारख्या पदावर कार्य करण्यासाठी सज्ज होतो.

ग्राफिक डिजाईन डिप्लोमा कोर्सची फी ही साधारणतः ३० हजार ते १ लाख रुपये या दरम्यान असू शकते.

2. डिप्लोमा इन डिजिटल मार्केटिंग

डिजिटल मार्केटिंग म्हणजे ऑनलाईन पद्धतीने डिजिटल स्वरूपात ब्रॅंडिंग करणे होय. ई-मेल, सोशल मीडिया, युट्युब, यांसारख्या ऑनलाईन मंचाचा उपयोग डिजिटल मार्केटरद्वारे ब्रॅंडिंगसाठी केला जातो.

एनआयआयटी (NIIT), डीआयडीम (DIDM), आयआयडीइ (IIDE) या भारतातील काही प्रसिद्ध डिजिटल मार्केटिंग प्रशिक्षण संस्था आहेत, जेथून उम्मेदवार आपला डिजिटल मार्केटिंग डिप्लोमा पूर्ण करू शकतो. या डिप्लोमा कोर्सचा अवधी साधारणतः १२ महिन्यांपर्यंतचा असू शकतो, व याची फी २ हजार ते ५० हजार इतकी असू शकते.

डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर उम्मेदवार SEO Expert, Web Designer, Content Marketer यांसारख्या पदांवर काम करण्यासाठी सज्ज होतो.

वर्तमान काळात अनेक असे मंच आहेत, जे डिजिटल मार्केटिंग अगदी मोफत शिकवत आहेत, ज्यामुळे उम्मेदवार कोणतीही संस्था न जॉईन करता घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने डिजिटल मार्केटिंग कोर्स पूर्ण करू शकतो.

3. डिप्लोमा इन फूड अँड बेव्हरेज सर्विस मॅनेजमेंट

डिप्लोमा इन फूड अँड बेव्हरेज सर्विस मॅनॅजमेण्ट हा कोर्स ६ महिने ते १ वर्ष इतक्या कालावधीचा असतो. ज्या विद्यार्थ्यांना हॉटेल क्षेत्रात स्वतःचे करिअर घडवायचे आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी हा एक उत्तम कोर्स मानला जातो.

१२ वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर आपण या कोर्ससाठी आवेदन करू शकतो, अनेक विद्यार्थी पदवी शिक्षण पूर्ण केल्यानंतर देखील हा कोर्स करतात.

या कोर्स ची फी ५० हजार ते १ लाख रुपये इतकी असू शकते, तसेच हा कोर्स पूर्ण केल्यानंतर उम्मेदवार २ लाख ते ७ लाख रुपयांपर्यंतचे वार्षिक पॅकेज मिळवू शकतो.

4. डिप्लोमा इन इंटिरियर डिजाईन

डिप्लोमा इन इंटेरिअर डिजाईन हा १ ते २ वर्ष कालावधी असलेला डिप्लोमा कोर्स आहे, ज्यात १२ वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर उम्मेदवारे प्रवेश मिळवू शकतो.

साधारणतः ४० हजार ते डिड लाख रुपये इतकी या डिप्लोमा कोर्सची फी असू शकते. हा कोर्स पूर्ण केल्यानंतर उम्मेदवार असिस्टंट डिझाइनर, इंटिरियर डिझाइनर, visual merchandiser अशा विविध पदांवर काम करण्यासाठी सज्ज होतो.

5. डिप्लोमा इन हॉटेल मॅनेजमेंट

भारतात वर्तमान काळात हॉटेल क्षेत्र अगदी वेगाने विस्तारत आहे, ज्यामुळे हॉटेल मॅनेजमेंट कोर्सची प्रसिद्धी देखील अगदी वेगाने वाढताना दिसत आहे. उम्मेदवार १२ वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण करून अथवा पदवी शिक्षण पूर्ण करून या कोर्ससाठी आवेदन करू शकतो.

या कोर्समध्ये उम्मेदवाराला अन्न उत्पादन, हॉटेल क्षेत्रासंबंधीत सॉफ्टवेअर चालवणे, हॉटेल कायदे, विक्री व्यवस्थापन, हॉटेल स्वच्छता यासारख्या विषयसंबंधित अभ्यासक्रम शिकवला जातो.

या डिप्लोमा कोर्सची फी ही १ लाख ते २ लाख रुपये इतकी असू शकते, सरकारी संस्थानमध्ये यापेक्षा देखील कमी फी आकारली जाते.

हॉटेल मॅनेजमेंट कोर्स पूर्ण झाल्यावर उम्मेदवार हॉटेल मॅनेजर, असिस्टंट मॅनेजर, रेस्टॉरंट मॅनेजर, अशा पदांवर रुजू होण्यासाठी सक्षम होतो.

तर हे काही डिप्लोमा कोर्स आहेत, ज्याची निवड भारतातील विद्यार्थ्यांद्वारे अधिक प्रमाणात केली जाते.


फायदे

  • कोणत्याही डिप्लोमा कोर्समध्ये व्यावहारिक आणि प्रात्यक्षिक शिक्षणावर अधिक लक्ष केंद्रित केले जाते. प्रात्यक्षिक शिक्षण हे पुस्तकी शिक्षणापेक्षा अधिक प्रभावी मानले जाते, ज्यामुळे विद्यार्थ्याच्या मनात कामासंबंधी आत्मविश्वास निर्माण होतो.
  • डिप्लोमा कोर्स ची फी, पदवी शिक्षणाच्या फी च्या तुलनेत फार कमी असते, ज्यामुळे न केवळ वेळेची तर सोबतच आपल्या पैशांची देखील बचत होते.
  • सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे डिप्लोमा कोर्स हे पार्ट टाइम आणि फुल टाइम अशा दोन्ही पद्धतीने करता येतात. ज्या विद्यार्थ्यांच्या घरची आर्थिक स्थिती ठीक नाही, असे विद्यार्थी याचा लाभ घेऊ शकतात.
  • डिप्लोमाद्वारे विद्यार्थी कमी वयात शिक्षण मिळवत असल्यामुळे, डिप्लोमा कोर्स नंतर विद्यार्थ्याला इतरही शिक्षण घेण्यासाठी खूप अवधी मिळतो.

तोटे

  • डिप्लोमा उम्मेदवारापेक्षा पदवीधर उम्मेदवाराला अधिक वेतनाची संधी असते.
  • वर्तमान काळात भारतात कोणत्याही क्षेत्रात डिप्लोमा कोर्सच्या तुलनेत पदवी शिक्षणाला अधिक महत्व दिले जाते.

अधिक लेख –

1. शिक्षण म्हणजे काय व शिक्षणाचे प्रकार कोणते ?

2. UDISE चा फुल फॉर्म काय ?

3. डिजिटल साक्षरता म्हणजे काय ?

4. डेटा सायन्स म्हणजे काय ?

Leave a Comment