डिलीट झालेले फोटो परत कसे घ्यायचे ?

ह्या मॉडर्न तंत्रज्ञानाच्या आणि मोबाईल च्या जगात लोक त्यांचा प्रत्येक क्षण फोटो स्वरूपात जतन करतात. आठवणी जतन करण्याकरिता केवळ फोटो काढून भागत नाही, तर ते फोटो जपूनही ठेवावे लागतात.

डिलिट झालेले फोटो परत कसे घ्यायचे

दैनंदिन जीवनात आपल्या बरोबर काही अशा घटना घडतात ज्यामुळे आपण आपले फोटो गमवून बसतो. अशात ते फोटो परत कसे मिळवावे हा एक प्रश्न आपल्या समोर येतो. अनेक जण तर फोटो परत मिळेल ह्याची अपेक्षाच सोडून द्यात.

ह्या लेखात आपण डिलीट झालेले फोटो परत कसे घ्यायचे ह्यासंबंधी माहिती पाहणार आहोत,

Android फोन मधून डिलीट झालेले फोटो परत कसे घ्यायचे ?

 1. मोबाईल मधील setting पर्याय निवडा.
 2. Application किंवा Apps Managment पर्यायावर क्लिक करा.
 3. आता आपल्या मोबाईल मध्ये जितके application असतील ते समोर येतील, ह्या application च्या यादीतून File Manager Application वर क्लिक करा.
 4. एप्लीकेशन चालू केल्यावर Disable आणि Force असे दोन पर्याय दिसतील यातील Force Stop पर्यायावर क्लिक करा.
 5. आता सर्व टास्क बंद करून Play Store चालू करा.
 6. Search Bar मध्ये “happyappsfree” हे टाइप करा.
 7. निळ्या आयकॉन सहित “Photo Recovery App” नावाचे एक application समोर येईल ते Install करा.
 8. App install झाल्यावर Google Play Store बंद करून मोबाइल मधील photo recovery app चालू करा.
 9. Get Start पर्यायावर क्लिक करा.
 10. एक मेसेज बॉक्स समोर येईल जिथे photo recovery app द्वारे आपल्या Gallery चा Access मागितला जाईल, इथे Allow पर्यायावर क्लिक करा.
 11. ३ ते ४ स्लाईड येथील जेथे एप्लीकेशन कसे वापरावे याचे मार्गदर्शन दिले असेल, या Slide खाली Skip आणि Done हे दोन पर्याय दिसतील यातील skip पर्यायावर क्लिक करा.
 12. आता एक नवीन पेज उघडेल, इथे Scan Image आणि Scan Video हे दोन पर्याय दिसतील. जर तुम्हाला तुमचे डिलीट झालेले फोटो परत मिळवायचे असतील तर Scan Image आणि Video recover करायचे असतील तर Scan Video हया पर्यायावर क्लिक करा.
 13. Scan Image पर्यायावर क्लिक केले की scanning ची प्रक्रिया सुरू होईल. scanning साठी वेळ लागू शकतो, ज्यामुळे प्रक्रिया बंद करू नये.
 14. scanning पूर्ण होताच आपल्यासमोर अनेक जुने फोटो येतील. जो फोटो recover करायचा आहे तो select करा. आपण एकाच वेळी सर्वच फोटो देखील recover करू शकतो.
 15. photo निवडले की Restore आणि Delete पर्याय दिसतील यातील Restore पर्यायावर क्लिक करा. फोटो recover होऊन आपल्या मोबाइल च्या gallery मध्ये save होतील.
 16. अशा प्रकारे आपण आपल्या Android फोन मधून आपले Delete झालेले फोटो recover करू शकतो.

संगणकाचा वापर करून फोन मधील डिलीट झालेले फोटो परत कसे घ्यायचे ?

ह्या पद्धतीत आपण जो सॉफ्टवेअर वापरणार आहोत, तो मोफत नसून त्यासाठी आपल्याला पैसे मोजावे लागतील.

 1. प्रथम मोबाईल च्या Setting मध्ये जा.
 2. About Phone पर्याय निवडा.
 3. Build Number किंवा Software Information हया दोघांपैकी एक पर्याय दिसेल, ह्या पर्यायावर ५ ते ६  वेळा क्लिक कर, असे केल्याने setting मध्ये Developer Mode पर्याय ॲड होईल.
 4. आता बॅक जाऊन Developer Option ह्या पर्यायावर क्लिक करा.
 5. एक नवीन पेज उघडेल, जेथे USB Debugging हा पर्याय दिसेल, तो चालू ( Enable) करा.
 6. आता संगणक किंवा लॅपटॉप चालू करून Dr.Fone हा सॉफ्टवेअर Download आणि install करा.
 7. आता मोबाईल USB च्या सहाय्याने संगणकाला Connect करा.
 8. सॉफ्टवेअर चालू करा. सॉफ्टवेअर open होताच डाव्या बाजूला Recover पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.
 9. नवीन पेज उघडेल. डाव्या बाजूला “Recover Phone Data”,  “Recover from SD Card”, आणि “Recover from Broken Phone” हे तीन पर्याय दिसतील त्यातील पहिल्या क्रमांकाचा पर्याय म्हणजेच “Recover Phone Data” हा पर्याय निवडा.
 10. मोबाईल scanning ची प्रक्रिया सुरू होईल, ह्या दरम्यान कदाचित आपला मोबाईल Restart देखील होऊ शकतो, काहीही झाले तर फोन Desconnect करू नका.
 11. स्कॅनिंग ची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर आपल्याला आपल्या फोन मधील जुना डेटा दिसेल. जो डेटा तुम्हाला Recover करायचा आहे, तो select करून Recover पर्याय निवडा.
 12. फोटो कोणत्या folder मध्ये save करायचे हे विचारले जाईल, फाईल लोकेशन निवडून पुन्हा Recover पर्यायवर क्लिक करा.

अशा प्रकारे आपण Paid सॉफ्टवेअर चा वापर करून मोबाईल मधील फोटो Recover करू शकतो.


iPhone मधून डिलीट झालेले फोटो परत कसे घ्यायचे ?

 1. iMyfone D-Back iphone Data Recovery हा सॉफ्टवेअर तुमच्या संगणकामध्ये install करा. ( संगणक कोणत्याही ऑपरेटिंग सिस्टिमचा असला तरीही चालेल जसे की Windows MAC इत्यादी ).
 2. सॉफ्टवेअर Open करा.
 3. आपला iphone USB च्या सहाय्याने संगणकासोबत connect करा.
 4. सॉफ्टवेअर मधील start पर्यायावर क्लिक करा.
 5. नविन Interface दिसेल, इथे Lost or Deleted Data By Accident पर्यायावर क्लिक करा.
 6. डाव्या बाजूला ४ पर्याय दिसतील, त्यातील Recover From iOS Device पर्यायावर क्लिक करा. पर्याय निवडून start वर क्लिक करा.
 7. जर तुम्ही तुमच्या संगणकात हा software पहिल्यांदा वापरत असाल तर, सॉफ्टवेअर द्वारे संगणाकाकडे विविध permission मागितले जातील, ते allow करा.
 8. आता कोणत्या प्रकारचा डेटा आपल्याला recover करायचा आहे हे विचारले जाईल. इथे photo, video, contacts असे अनेक पर्याय दिसतील, यातील photo हा पर्याय निवडून scan वर क्लिक करा.
 9. Scan पूर्ण झाल्यावर जुने फोटो आपल्याला दिसतील, ह्यातील जे फोटो आपल्याला हवे आहेत, ते निवडून Recover पर्यायावर क्लिक करा.
 10. photo कोठे save करायचे आहेत, त्यासाठी File Location विचारले जाईल, फाईल location set करून पुन्हा Recover पर्यायावर क्लिक करा.

अशा प्रकारे आपण आपल्या iphone मधील डिलीट झालेले फोटो Recover करू शकतो.


Google Photos मधून Delete झालेले फोटो परत कसे घ्यायचे ?

 1. Google Photo Application चालू करा.
 2. मोबाइल स्क्रिन च्या खालच्या बाजूला Photos, Search, Sharing आणि Library हे चार पर्याय दिसतील ह्यातील Library हा पर्याय निवडा
 3. एक नवीन screen उघडेल, इथे Trash पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.
 4. तुमचे google photo मधून Delete झालेले फोटो दिसून येतील. जो फोटो तुम्हाला परत हवा आहे तो निवडा आणि Restore हया पर्यायावर क्लिक करा.

अशा प्रकारे आपण Google Photo मधून Delete झालेले फोटो परत मिळवू शकतो.


संगणकामधील डिलीट झालेले फोटो परत कसे घ्यायचे ?

 1. Window बटण दाबून Search Bar Open करा.
 2. Search Bar मध्ये Recycle Bin टाईप करुन सर्च करा आणि application open करा.
 3. इथे आपल्या PC मधून डिलीट झालेले सर्व फोटो आपल्या समोर येतील. जे फोटो Recover करायचे आहेत ते निवडून Restore पर्यायावर क्लिक करा.

अशा प्रकारे आपण आपल्या संगणकामधील डिलीट झालेले फोटो Recover करू शकतो.


फोटो वर्षानुवर्ष कसे जतन करून ठेवावे ?

आपल्या फोन मध्ये अथवा संगणाका मध्ये save असलेले फोटो कधी न कधी डिलीट होतात, ह्या मागची अनेक कारणे असू शकतात जसे की संगणक currept होणे, मोबाईल हरवणे, मोबाईल खराब होणे, चोरीला जाणे आणि अधिक. अशात वर्षानुवर्ष फोटो कसे जतन करावे हा एक मोठा प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो. इथे आपण दोन मोफत आणि उत्तम असे उपाय पाहणार आहोत, ज्याद्वारे आपण आपले फोटो आजीवन जतन करू शकतो.

उपाय क्रमांक 01

Google Drive किंवा Google Photos हे आपले फोटो जतन करण्याचे दोन उत्तम पर्याय आहेत, फक्त आपल्याला आपले फोटो ह्या दोन्ही पैकी एक application वर upload करायचे असतात.

ह्या ठिकाणी सर्वात महत्वाची भूमिका बजावते ती म्हणजे आपली ईमेल आयडी. ईमेल आयडी विसरल्यास, आपण आपले फोटो कधीच Recover करू शकणार नाही, ह्याउलट ईमेल आयडी आणि त्या आयडी चा पासवर्ड जतन केल्यास आपण आपले फोटो आजीवन सांभाळू शकतो.

उपाय क्रमांक 02

facebook हे एक जगप्रसिद्ध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. आपण आपले फोटो जतन करण्यासाठी फेसबुक ह्या सोशल मीडिया चा वापर करू शकतो.

ह्यासाठी प्रथम आपल्याला आपले एक नवीन फेसबूक अकाऊंट खोलावे लागेल. ह्या अकाऊंट द्वारे कोणालाही Friend Request पाठवू नका ठेवा कोणाचीही Friend Request स्वीकारू नका.

फेसबूक खाते खोलले की, सेटिंग मध्ये जाऊन आपले खाते private करा, म्हणजे आपण अपलोड केलेले फोटो कोणीही पाहू शकणार नाही.

ही सर्व प्रक्रिया झाली की तुमचे फोटो फेसबुक खात्यावर upload करा आणि अशा प्रकारे तुम्ही तुमचे फोटो फेसबुक चा वापर करून वर्षानुवर्ष जतन करू शकता, फक्त तुमचा फेसबूक अकाउंट आयडी आणि पासवर्ड जपून ठेवा.

फोटो कायमस्वरूपी जतन करण्याचे हे दोन सोपे आणि मोफत उपाय आहेत.

2 thoughts on “डिलीट झालेले फोटो परत कसे घ्यायचे ?”

Leave a Comment