डेबिट कार्ड म्हणजे काय ?

दैनंदीन जीवनातील आर्थिक व्यवहारामध्ये वापरला जाणारा डेबिट कार्ड हा एक महत्वाचा घटक आहे. अगदी लहान लहान व्यवहारांपासुन ते मोठ मोठे आर्थिक व्यवहार आपण डेबिट कार्ड द्वारे पार पाडू शकतो.

आर्थिक व्यवहारात इतका महत्त्वाचा घटक असलेले डेबिट कार्ड नेमके आहे तरी काय, कसे कार्य करते. अशाच डेबिट कार्ड संबंधित इतर माहितीचा आढावा आपण ह्या लेखात पाहणार आहोत,

अनुक्रमणिका


डेबिट कार्ड म्हणजे काय ?

डेबिट कार्ड हे मुळात एक पेमेंट कार्ड आहे, ज्याद्वारे एटीएम मशीन मधून पैसे काढणे, ऑनलाइन पेमेंट करणे, यासारखी कामे पार पाडता येतात.

डेबिट कार्ड ला ATM कार्ड किंवा चेक कार्ड या नावाने देखील ओळखले जाते. हे काहीसे क्रेडिट कार्ड प्रमाणे असते, परंतु क्रेडिट कार्डच्या अगदी विपरीत कार्य करते.

जेव्हा डेबिट कार्ड द्वारे आपण कोणत्याही प्रकारचे पेमेंट पार पाडतो, तेव्हा पैसे आपल्या बँकेच्या खात्यातून वजा होतात, आणि वजा झालेले पैसे अथवा रक्कम समोरील खातेदाराच्या बँक अकाऊंट मध्ये ट्रान्सफर केले जातात, ही अगदी सूक्ष्म वेळेत पार पडणारी प्रक्रिया आहे.

डेबिट कार्ड हे डिजिटल फॉर्ममध्ये ही उपलब्ध असते, इथे डेबिट कार्डचा केवळ नंबर Allocate केला जातो, ज्याद्वारे आपण ATM मशीन मधून पैसे काढणे, अशी Phisical कामे करू शकत नाही, ह्याचा वापर आपण केवळ ऑनलाइन व्यवहारासाठी करू शकतो.

डेबिट कार्ड वापरण्यास सोपे आणि सोयीस्कर असल्याकारणाने, अनेक देशांमध्ये डेबिट कार्डचा इतका वापर होत आहे की, डेबिट कार्ड मुळे चेक पेमेंट आणि कॅश पेमेंट पद्धत नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.

साल 2000 च्या दरम्यान डेबिट कार्ड चा वापर आंतरराष्ट्रीय स्तरावर करण्याची अनुमती मिळाली, ज्यामुळे डेबिट कार्डचा वापर वाढू लागला.

डेबिट कार्ड हे युजरला तात्काळ एटीएम मशीन द्वारे स्वतःच्या खात्यातून नगद पैसै काढण्याची सुविधा प्रदान करते.

आपण दैनंदिन जीवनात जे एटीएम कार्ड अथवा डेबिट कार्ड वापरतो ते प्लास्टिकचे असते, परंतु या व्यतिरिक्त काही कंपन्या लाकडी आणि धातूंचे डेबिट कार्ड देखील तयार करतात, जे विशेष विनंती वर तयार केले जाते.


Debit Card चे प्रकार

1. Visa Debit Card

Visa Debit Card हे आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता प्राप्त असलेले डेबिट कार्ड आहे, ज्याद्वारे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्व प्रकारचे व्यवहार पार पाडले जाऊ शकतात.

Visa मुळात आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत असलेली Payment System आहे. Visa Debit Card साधारणतः आपल्याला बँकांद्वारे उपलब्ध करून दिले जाते.

Visa Debit Card द्वारे  कार्ड धारकांना बँकांकडून Overdraft सुविधादेखील पुरवली जाते. Visa Debit Card चे देखील विविध प्रकार अस्तित्वात आहेत, जसे की Classic, Platinum, Gold, Signature इत्यादी. Visa चे हे डेबिट कार्ड आपल्याला विशेष विनंतीवर बँकेद्वारे उपलब्ध करून दिले जातात.

2. Master Debit Card

जगातील सर्वात सुप्रसिद्ध डेबिट कार्ड पैकी Master Debit Card हे एक आहे. ऑनलाइन किंवा ई-पेमेंट च्या जगात मास्टर डेबिट कार्डचा सर्वाधिक वापर आपल्याला दिसून येतो.

मास्टर कार्ड द्वारे आपण आपल्या बँकेच्या खात्याचा Access ऑनलाईन पद्धतीने मिळवू शकतो. World Master Card आणि Standard Master Card हे मास्टर डेबिट कार्ड चे प्रसिद्ध प्रकार आहेत, जे उत्तम सेवा आणि जलद गतीने मिळणाऱ्या कस्टमर सपोर्ट मुळे लोकप्रिय आहेत.

3. Rupay Debit Card

12 मार्च 2012 मध्ये National Payment Corporation of India द्वारे Rupay कार्ड ची स्थापना करण्यात आली होती. भारतीय चलनाच्या नावावर या कार्ड चे नाव ठेवण्यात आले आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावरील Payment कंपनीद्वारे देशांतर्गत होणाऱ्या transaction वरील Transaction Fees पासून ग्राहकाला सुटका मिळावी, या हेतूने Rupay कार्ड ची सुरुवात करण्यात आली होती.

या कार्डचा वापर केवळ देशांतर्गतच केला जाऊ शकतो. आज भारतातील केवळ सरकारी बँकाच नव्हे, तर प्रायव्हेट सेक्टर बँकांमध्ये ही Rupay Debit Card चा वापर केला जात आहे.

Rupay debit कार्डद्वारे ग्राहक त्याच्या खात्याचा एक्सेस इलेक्ट्रॉनिक किंवा ऑनलाइन पद्धतीने मिळवू शकतो. Master कार्ड आणि Visa डेबिट कार्ड जागी देशांतर्गत वापरण्यासाठी Rupay एक उत्तम पर्याय मानला जात आहे.

4. Contactless Debit Card

आपण मॉल अथवा सुपर मार्केटमध्ये खरेदी केल्यावर बिल भरण्यासाठी डेबिट कार्ड Swipe मशिनमध्ये स्वाइप करतो, त्यानंतर पिन टाकून पेमेंट पूर्ण करतो, परंतु contactless debit card मुळे या संपूर्ण प्रक्रियेला आळा बसला आहे. अगदी नावाप्रमाणेच कोणत्याही पेमेंट मशीन सोबत Physically Attach न होता, या डेबिट कार्डद्वारे पेमेंट करता येते, हे डेबिट कार्ड साधारणतः radio frequency या प्रणालीवर कार्य करते.

कॉन्टॅक्ट लेस डेबिट कार्ड मुळे पेमेंट प्रक्रिया जलद आणि आणखी सोयीस्कर बनली आहेत.

कॉन्टॅक्ट लेस डेबिट कार्डला, वायफाय कार्ड म्हणून देखील ओळखली जाते. या कार्डमुळे पेमेंट न केवळ जलद तर अधिक सुरक्षित बनले आहे.

पूर्वीप्रमाणे स्वाईप मशीन वर हात ठेवून न कोणाला समजता पिन टाकायची गरज राहिली नाही, तसेच कोणीही आपल्या डेबिट कार्डचा डेटा चोरू ही शकत नाही, कारण पेमेंट दरम्यान ते आपल्या हातातच असते.

Payment करण्यासाठी आपल्याला आपले कार्ड केवळ पेमेंट मशीन जवळ घेऊन जायचे असते, ज्यांनतर आपला डेटा payment मशीन मध्ये दिसून लागतो आणि payment पूर्ण होते.

भारतात सर्वच नव्हे, तर काही मोजक्‍याच बँक कॉन्टॅक्ट लिस्ट डेबिट कार्ड प्रणालीचा वापर करतात, जसे की HDFC बँक, ICICI बँक आणि State Bank of India. कॉन्टॅक्ट लेस डेबिट कार्ड साठी वापरण्यात येणारे तंत्रज्ञान महागडे असल्याकारणाने लहान बँकांना याचा अवलंब करणे परवडत नाही.

5. Maestro Debit Card

Maestro Debit कार्ड हे काहीसे मास्टर कार्ड प्रमाणे आहे. Maestro कार्डचा वापर आपण संपूर्ण जगात कोणत्याही देशात ATM मशीन द्वारे पैसे withdrawal करण्यासाठी करू शकतो, तसेच ऑनलाइन ट्रांजेक्शन करण्यासाठी देखील करू शकतो.

भारतातील ICICI बँक वगळता अनेक बँका ह्या कार्डचा वापर करताना दिसत आहेत, जसे की बँक ऑफ राजस्थान, स्टेट बँक ऑफ इंडिया इत्यादी.


Debit Card वरील डेटा

आपण पाहिले असेल की, डेबिट कार्ड वर विविध प्रकारची माहिती दिलेली असते, ती माहिती नेमकी कशा संबंधित असते, याचा आढावा आपण खालील प्रमाणे घेणार आहोत,

1. Debit Card Number

डेबिट कार्ड च्या मुखपृष्ठावर चारच्या गटात आणि चार भागात विभागलेल्या 16 अंकी क्रमांक असतो. या नंबरला डेबिट कार्ड नंबर असे म्हणतात. हा सोळा अंकी नंबर म्हणजेच डेबिट कार्ड ची ओळख असते. ह्या डेबिट कार्ड नंबरव्दारे डेबिट कार्ड आणि आपले बँक खाते एकमेकांसोबत जोडले गेलेले असते.

2. Valid From आणि Valid Thru तारीख

डेबिट कार्ड नंबर च्या खाली डाव्या बाजूला Valid From Date आणि Valid Thru Date दिली असते. जे काहीसे MM/YY फॉरमॅटमध्ये असते. M म्हणजे महिना आणि Y म्हणजे वर्ष असते.

या तारखांद्वारे आपले डेबिट कार्ड कधी तयार झाले आहे, आणि कधीपर्यंत ते आपण वापरू शकतो या संबंधित माहिती मिळते.

3. Signature Bar

डेबिट कार्डच्या मागच्या बाजूला सफेद आयताकृती भाग असतो, ज्याला Signature Bar असे म्हटले जाते. डेबिट कार्डच्या ह्या सफेद भागावरून बँक खाते मालकाच्या डिजिटल स्वरूपातील सहीचा आढावा घेतला जातो.

4. CVV Number

Signature Bar ला चिटकून तीन क्रमांक दिसून येतात, ज्याला CVV नंबर म्हणून ओळखले जाते. डेबिट कार्डद्वारे ऑनलाइन ट्रांजेक्शन करताना हे तीन अंकी नंबर आवर्जून मागितले जातात. CVV चा फुल फॉर्म Card Verification Value असा आहे.

5. Microchip

डेबिट कार्ड च्या मुखपृष्ठावर लहान आकाराची पिवळ्या रंगाची एक Chip असते, ज्यामध्ये बँक अकाउंट Holder किंवा डेबिट कार्ड Holder संबंधित माहिती असते.

6. Customer Service No.

डेबिट कार्ड च्या मागच्या बाजूला सर्वात शेवटी काही टेलिफोन क्रमांक दिसून येतात, हे कस्टमर केअर क्रमांक असतात. डेबिट कार्डच्या कोणत्याही शंकेचे निरसन करण्याकरीता आपण या क्रमांकावर कॉल करू शकतो.

7. Card Type

आपण जे कार्ड वापरत आहोत ते कोणत्या प्रकारचे आहे ह्या संबंधित माहिती आपल्याला डेबिट कार्ड च्या मुखपृष्ठावर दिसून येतो.


Debit Card चा इतिहास

डेबिट कार्डची सुरुवात ही 1966 दरम्यान झाली होती. अमेरिकेतील Bank Of Delwar नामक बँकेने डेबिट कार्ड प्रोग्राम लॉन्च केला होता. आज पेक्षा तेव्हाची प्रणाली ही नक्कीच कमी वेगवान आणि असुरक्षित होती, त्याचे मुख्य कारण तंत्रज्ञानाचा अभाव होता. तसेच तेव्हा कोणत्याही प्रकारच्या ATM मशीनही अस्तित्वात नव्हत्या.

1969 दरम्यान Chemical Bank in Rockvill जे न्यूयॉर्क शहरात स्थित आहे, येथे जगातील पहिली ATM मशीन बसविण्यात आली. ATM मशीनमुळे डेबिट कार्डच्या संकल्पनेला लोकप्रियता प्राप्त होऊ लागली, आणि 1970 पासून ATM मशीन मधून पैसे काढण्यासाठी डेबिट कार्डचा वापर होऊ लागला.

1970 च्या आधी ATM मधून पैसे काढण्यासाठी एप्लीकेशन फॉर्म आणि PIN नंबर ची सहाय्यता घ्यावी लागत होती.

1970 नंतर डेबिट कार्ड उत्पादनाचा वेग आणि वापरकर्त्यांची संख्या वाढू लागली आणि अगदी काही वर्षातच बँकेतील पैशांचे अधिक तर व्यवहार डेबिट कार्डद्वारे पार पडू लागले.

डेबिट कार्ड आणि एटीएम मशीन मुळे बँकिंग क्षेत्रातील व्यवहार करण्याची पद्धत पूर्णतः बदलून गेली.


डेबिट कार्ड कसे कार्य करते ?

डेबिट कार्ड चा वापर आपण मुख्यता physical आणि Digital अशा दोन्ही पद्धतीने करत असतो. ह्या दोन्ही पद्धतींमध्ये डेबिट कार्ड कसे कार्य करते ह्याबद्दल माहिती आपण खालील प्रमाणे पाहणार आहोत,

1. Physical पद्धत

फिजिकल पद्धत म्हणजे जेव्हा आपण डेबिट कार्डचा वापर एटीएम मशीनमधून पैसे काढण्यासाठी करतो. प्रथम आपण डेबिट कार्ड वरील मायक्रोचीप असलेल्या बाजूने डेबिट कार्ड एटीएम मशीनमध्ये प्रविष्ट करतो.

मायक्रोचीप मधील सर्व डेटा एटीएम मशीन द्वारे Read केला जातो, वापरकर्त्याच्या मागणीनुसार एटीएम मशीन बँक सर्वर ला Request पाठवते, या रिक्वेस्ट नुसार यूजर एटीएम मधून जितके Cash काढतो, तितकी रक्कम युजरच्या बँक अकाउंट मधून वजा केले जातात.

याचा आढावा युजरला Text Message द्वारे मिळतो, हा मेसेज बँकेद्वारे पाठवला जातो. एटीएम मशीन मधून पैसे काढण्याची प्रक्रिया अधिकृत आणि सुरक्षित करण्यासाठी Debit Card PIN अथवा Password चा सहारा घेतला जातो, जोपर्यंत यूजर योग्य पिन प्रविष्ट करत नाही, तोपर्यंत व्यवहार पूर्णत्वास जात नाही.

2. Digital पद्धत

डिजिटल पद्धती मध्ये आपण ऑनलाइन transaction करतो किंवा वस्तू आणि सेवांची खरेदी ऑनलाइन पद्धतीने करतो. ऑनलाईन व्यवहार करण्यासाठी प्रथम युजरला डेबिट कार्ड वरील माहिती प्रविष्ट करावी लागते, जसे की डेबिट कार्ड नंबर, Debit Card Expiry Date, आणि CVV नंबर.

इत्यादी माहिती भरली की, आपण ज्या वेबसाईटवर अथवा अकाउंट वर पैसे पाठवणार आहोत, तेथून एक Request आपल्या बँकेच्या Server पाठवली जाते, या व्यवहाराची खात्री करण्यासाठी बँक, बँक खात्या सोबत जोडलेल्या मोबाईलवर एक सहा अंकी OTP पाठवते.

हा OTP म्हणजे व्यवहाराचा शेवटचा टप्पा असतो. जसेच आपण OTP Enter करतो, तसेच एक खात्री आपल्या बँक सर्वरला मिळते, ज्यानंतर आपल्या खात्यातून पैसे वजा करून समोरील व्यक्तीच्या बँक अकाउंट मध्ये जमा केले जातात.


Debit Card चे फायदे

डेबिट कार्ड्स तुमच्या निधीमध्ये प्रवेश आणि व्यवस्थापित करण्याचा एक सोयीस्कर आणि सुरक्षित मार्ग देतात. ते विविध फायद्यांसह येतात जे त्यांना वैयक्तिक वित्तासाठी लोकप्रिय पर्याय बनवतात. डेबिट कार्ड वापरण्याचे काही फायदे येथे आहेत:

1. वापरण्यास सुलभता

ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही व्यापाऱ्यांकडे डेबिट कार्ड मोठ्या प्रमाणावर स्वीकारले जातात, ज्यामुळे त्यांना दैनंदिन खरेदीसाठी एक सोयीस्कर पेमेंट पर्याय बनतो.

2. निधीमध्ये त्वरित प्रवेश

जेव्हा तुम्ही डेबिट कार्ड वापरून खरेदी करता तेव्हा तुमच्या लिंक केलेल्या बँक खात्यातून थेट पैसे कापले जातात. हे तुम्हाला तुमच्याकडे जे उपलब्ध आहे तेच खर्च करू देते, जबाबदार आर्थिक वर्तनाला प्रोत्साहन देते.

3. कर्ज जमा नाही

क्रेडिट कार्ड्सच्या विपरीत, जे तुम्हाला पैसे उधार घेण्याची आणि नंतर परतफेड करण्याची परवानगी देतात, डेबिट कार्ड तुम्हाला कर्ज जमा होण्यापासून प्रतिबंधित करतात कारण तुम्ही तुमच्याकडे आधीच असलेले पैसे खर्च करत आहात.

4. अंदाजपत्रक आणि नियंत्रण

डेबिट कार्ड वापरणे बजेटला प्रोत्साहन देते कारण तुम्ही फक्त तुमच्या खात्यात उपलब्ध निधी खर्च करू शकता. हे तुम्हाला तुमचे खर्च व्यवस्थापित करण्यात आणि जास्त खर्च टाळण्यास मदत करते.

5. कोणतेही व्याज शुल्क नाही

डेबिट कार्ड व्यवहारांवर व्याज आकारले जात नाही, कारण तुम्ही क्रेडिट लाइनमधून कर्ज घेण्याऐवजी तुमचे स्वतःचे पैसे खर्च करत आहात.

6. कोणत्याही क्रेडिट चेकची आवश्यकता नाही

डेबिट कार्डे सामान्यत: बँकांकडून क्रेडिट तपासणीची गरज नसताना जारी केली जातात, ज्यामुळे ते मर्यादित किंवा कोणताही क्रेडिट इतिहास नसलेल्या व्यक्तींसह अनेक लोकांसाठी प्रवेशयोग्य बनतात.

7. एटीएम प्रवेश

डेबिट कार्ड अनेकदा एटीएम (ऑटोमेटेड टेलर मशीन) ऍक्सेससह येतात, ज्यामुळे तुम्हाला रोख रक्कम काढता येते, तुमच्या खात्यातील शिल्लक तपासता येते आणि विविध बँकिंग व्यवहार करता येतात.

8. कॅशबॅक आणि बक्षिसे

काही डेबिट कार्ड काही खरेदीसाठी कॅशबॅक रिवॉर्ड देतात, जे कार्डधारकाला व्यवहाराच्या रकमेची एक छोटी टक्केवारी देतात.

9. सुरक्षा

डेबिट कार्डमध्ये अनेकदा सुरक्षा वैशिष्ट्ये समाविष्ट असतात जसे की पिन (वैयक्तिक ओळख क्रमांक) संरक्षण आणि खर्च मर्यादा सेट करण्याचा पर्याय, तुमच्या व्यवहारांची सुरक्षितता वाढवणे.

10. चिप तंत्रज्ञान

अनेक डेबिट कार्डे EMV (Europay Mastercard Visa) चिप तंत्रज्ञानासह येतात, जी फसव्या व्यवहारांविरूद्ध अतिरिक्त सुरक्षा प्रदान करते.

11. ऑनलाइन व्यवहार

ऑनलाइन शॉपिंग आणि पेमेंटसाठी डेबिट कार्ड मोठ्या प्रमाणावर स्वीकारले जातात. ते तुमच्या बँक खात्याचे तपशील उघड न करता व्यवहार करण्याचा सुरक्षित मार्ग देतात.

12. प्रवासाची सोय

डेबिट कार्डे आंतरराष्ट्रीय स्तरावर वापरली जाऊ शकतात, ज्यामुळे प्रवाशांना निधी मिळवण्यासाठी आणि परदेशात खरेदी करण्यासाठी ते सोयीस्कर पर्याय बनतात.

13. आपत्कालीन बदली

तुमचे डेबिट कार्ड हरवले किंवा चोरीला गेल्यास, अनेक बँका तुमच्या निधीमध्ये प्रवेश करण्यामधील व्यत्यय कमी करण्यासाठी त्वरित बदली सेवा देतात.

14. मोबाईल वॉलेटशी लिंक

डेबिट कार्ड अनेकदा Apple Pay, Google Pay आणि Samsung Pay सारख्या मोबाइल पेमेंट सेवांशी लिंक केले जाऊ शकतात, ज्यामुळे तुम्हाला तुमचा स्मार्टफोन वापरून संपर्करहित पेमेंट करता येते.

15. आर्थिक ट्रॅकिंग

डेबिट कार्ड व्यवहार सामान्यतः तुमच्या बँक खात्याच्या स्टेटमेंटमध्ये रेकॉर्ड केले जातात, तुमच्या खर्चाची स्पष्ट नोंद आणि आर्थिक ट्रॅकिंगची सुविधा देते.

16. थेट ठेवी आणि बिल पेमेंट

डेबिट कार्ड पेचेक आणि सरकारी लाभांच्या थेट ठेवी प्राप्त करू शकतात आणि ते स्वयंचलित बिल पेमेंट सेट करण्यासाठी वापरले जाऊ शकतात.

एकूणच, डेबिट कार्ड्स तुमची आर्थिक व्यवस्था व्यवस्थापित करण्यासाठी, जबाबदार खर्चाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि कर्ज किंवा व्याज आकारल्याशिवाय इलेक्ट्रॉनिक पेमेंटच्या सुविधेचा आनंद घेण्यासाठी एक सरळ आणि कार्यक्षम मार्ग देतात.


Debit Card चे तोटे

डेबिट कार्ड अनेक फायदे देत असताना, ते काही तोटे आणि जोखमींसह देखील येतात ज्यांची वापरकर्त्यांनी जाणीव ठेवली पाहिजे. डेबिट कार्ड वापरण्याचे काही तोटे येथे आहेत:

1. मर्यादित फसवणूक संरक्षण

क्रेडिट कार्डच्या तुलनेत डेबिट कार्ड व्यवहार अनेकदा कमी मजबूत फसवणूक संरक्षणाच्या अधीन असतात. तुमची डेबिट कार्ड माहिती चोरीला गेल्यास, अनधिकृत व्यवहारांमुळे तुमच्या बँक खात्यातील निधीचे थेट नुकसान होऊ शकते.

2. ओव्हरड्राफ्ट फीचा धोका

तुम्ही तुमच्या उपलब्ध शिल्लकपेक्षा जास्त खरेदी केल्यास, तुम्हाला तुमच्या बँकेकडून ओव्हरड्राफ्ट शुल्क लागू शकते. यामुळे अनपेक्षित शुल्क आणि आर्थिक ताण येऊ शकतो.

3. क्रेडिट बिल्डिंगचा अभाव

डेबिट कार्ड व्यवहार तुमचा क्रेडिट इतिहास किंवा क्रेडिट स्कोअर तयार करण्यात योगदान देत नाहीत. तुम्ही तुमचे क्रेडिट स्थापित करण्याचा किंवा सुधारण्याचा प्रयत्न करत असल्यास, जबाबदारीने क्रेडिट कार्ड वापरणे हा एक चांगला पर्याय असू शकतो.

4. विवादांचे निराकरण करण्यात अडचण

क्रेडिट कार्डच्या तुलनेत डेबिट कार्डसह व्यवहारावर विवाद करणे अधिक जटिल आणि वेळखाऊ असू शकते. समस्यांचे निराकरण करण्यासाठी आणि तुमचा निधी परत मिळवण्यासाठी यास जास्त वेळ लागू शकतो.

5. कमी उदार पुरस्कार आणि फायदे

डेबिट कार्ड सहसा अनेक क्रेडिट कार्डांच्या तुलनेत कमी बक्षिसे, कॅशबॅक किंवा प्रवास फायदे देतात. क्रेडिट कार्ड अनेकदा खर्च करण्यासाठी अधिक प्रोत्साहन देतात.

6. स्किमिंगसाठी उच्च असुरक्षा

डेबिट कार्ड स्किमिंगसाठी अधिक संवेदनाक्षम असतात, जेथे चोर एटीएम किंवा पॉइंट-ऑफ-सेल टर्मिनल्सवर कार्ड माहिती कॅप्चर करण्यासाठी उपकरणांचा वापर करतात. यामुळे अनधिकृत व्यवहार आणि ओळख चोरी होऊ शकते.

7. मर्यादित प्रवास संरक्षण

डेबिट कार्डे आंतरराष्ट्रीय स्तरावर वापरली जाऊ शकतात, तरीही ते क्रेडिट कार्डांप्रमाणेच प्रवास संरक्षणाचे समान स्तर देऊ शकत नाहीत, जसे की प्रवास विमा किंवा भाड्याने कार कव्हरेज.

8. विलंबित विवाद निराकरण

डेबिट कार्ड व्यवहारांशी संबंधित विवादांचे निराकरण होण्यास जास्त वेळ लागू शकतो, संभाव्यत: तपास प्रक्रियेदरम्यान तुम्हाला निधी उपलब्ध न होता.

9. निधीवर तात्पुरती धारण

काही व्यापारी, विशेषत: हॉटेल्स आणि रेंटल कार कंपन्या, वास्तविक खरेदीपेक्षा मोठ्या रकमेसाठी तुमच्या खात्यावर तात्पुरती होल्ड ठेवू शकतात. होल्ड रिलीझ होईपर्यंत हे तुमचे फंड बांधू शकते.

10. कमी केलेले खरेदी संरक्षण

काही क्रेडिट कार्ड विस्तारित वॉरंटी, किंमत संरक्षण आणि खरेदी हमी देतात. डेबिट कार्डमध्ये अनेकदा या ग्राहक संरक्षणांचा अभाव असतो.

11. एटीएम फी

तुमच्या बँकेशी संलग्न नसलेले एटीएम वापरल्याने पैसे काढण्याचे शुल्क लागू शकते. हे शुल्क वाढू शकते, विशेषत: प्रवास करताना किंवा तुमच्या बँकेच्या नेटवर्कबाहेरील एटीएम वापरताना.

12. कमी फसवणूक निरीक्षण

क्रेडिट कार्ड कंपन्यांकडे विशेषत: प्रगत फसवणूक शोध प्रणाली असते. डेबिट कार्डांवर कमी मजबूत देखरेख असू शकते, ज्यामुळे फसव्या व्यवहारांचा धोका वाढतो.

13. रोख प्रवेश गमावणे

तुमचे डेबिट कार्ड हरवले किंवा चोरीला गेल्यास, बँकेद्वारे समस्येचे निराकरण होईपर्यंत तुम्ही तुमच्या निधीचा प्रवेश तात्पुरता गमावू शकता.

14. कार्ड होल्डची शक्यता

गॅस स्टेशन पेमेंट किंवा हॉटेल आरक्षणे यासारख्या काही व्यवहारांमुळे तुमच्या खात्यावर तात्पुरती होल्ड होऊ शकते, ज्यामुळे तुमची उपलब्ध शिल्लक कमी होऊ शकते.

15. ऑनलाइन फसवणुकीचा उच्च धोका

ऑनलाइन व्यवहारांसाठी वापरल्या जाणार्‍या डेबिट कार्डची माहिती सायबर हल्ले आणि हॅकिंगच्या प्रयत्नांना असुरक्षित असू शकते, ज्यामुळे अनधिकृत शुल्क आकारले जाऊ शकते.

हे तोटे कमी करण्यासाठी, जबाबदार डेबिट कार्ड वापराचा सराव करणे, तुमच्या खात्याच्या स्टेटमेंटचे नियमितपणे निरीक्षण करणे, संशयास्पद क्रियाकलापांसाठी सूचना सेट करणे आणि तुमच्या कार्ड माहितीचे संरक्षण करण्यासाठी पावले उचलणे महत्त्वाचे आहे.

अधिक लेख – 

1. HDFC चा फुल फॉर्म काय ?

2. किसान क्रेडिट कार्ड योजना मराठी माहिती

3. ATM चा फुल फॉर्म काय ?

4. NEFT चा फुल फॉर्म काय ?

1 thought on “डेबिट कार्ड म्हणजे काय ?”

Leave a Comment