सायकलचा शोध कोणी लावला ?

आजचे युग हे खूप विकसित बनले आहे ह्या मागचे मुख्य कारण म्हणजे नवनवीन शोध. असाच एक शोध आज पासून २०० ते २५० वर्षांपूर्वी लागला तो म्हणजे सायकल चा शोध.

सायकल चा शोध कोणी लावला

सायकल च्या शोधामुळे प्रवास हा कमी खर्चिक, आणि सोप्पं बनला. सायकल हि पहिल्यांदा युरोप मध्ये तयार करण्यात आली होती आणि तेथूनच ह्याची प्रचिती संपूर्ण जगात पसरली.

या लेखात आपण सायकल संबंधित विविध माहितीचा आढावा घेणार आहोत,

अनुक्रमणिका


सायकल म्हणजे काय ?

सायकल हे एक प्रवासाचे साधन आहे, ज्याला कंट्रोल करण्यासाठी एक हॅन्डल, एका धातूच्या पट्टीच्या साहाय्याने दोन चाके एकमेकांना जोडलेली असतात आणि सायकल पुढे ढकलण्यासाठी  पायाच्या दिशेने दोन padel असतात. सायकल ला प्रवासाचे एक उत्तम साधन म्हणून पूर्वी ओळखले जात होते.

आज पासून सुमारे २०० ते २५० वर्षांपूर्वी लोक प्रवासासाठी घोड्यांचा वापर करत होते, परंतु घोड्यांचा वापर हा प्रत्येकाला परवडणारा नव्हता, ज्यामुळे गरीब लोक अनेक मैलांचा प्रवास पायी पार पाडत होते. घोड्यांचा वापर देखील खूप खर्चिक होता, जसे कि घोड्याला वेळोवेळी पाणी पिण्यास  देणे, चारा देणे आणि प्रवासात जर हे उपलब्ध झाले नाही कि परिणामी प्रवास खंडित होत होता अथवा हळू होत होता.

सायकल मुळे प्रवासाची आणि उद्योगांची परिभाषा बदलली, कारण सायकल मध्ये अगदी मोजक्याच सामानाचा उपयोग होतो ज्यामुळे सायकल ही कमी खर्चिक आणि प्रत्येकाला परवडणारी आहे.


सायकल चा इतिहास

कार्ल ड्रिस ला सायकल चा निर्माता म्हणून ओळखले जाते, परंतु कार्ल ने तयार केलेली सायकल हि परिपूर्ण नव्हती, कारण त्याने तयार केलेल्या सायकलला पेडेलच नव्हते, ज्यामुळे प्रवासाला पर्यायी मार्ग भेटला, तरी तो इतका सोईस्कर नव्हता, सायकल पुढे ढकलण्यासाठी आपल्या दोन्ही पायांना जमिनीवर ठेवून सायकल पुढच्या दिशेला ढकलावी लागत होती, जे थोडे अवघड काम होते.

सायकल ची ख्याती संपूर्ण जगात पसरली, त्यामुळे विविध लोकांनी सायकल ला आणखी सोयीस्कर बनवण्याचा प्रयत्न केला. १८२० ते १८५० च्या दरम्यान Willard Sawyer ह्यांनी सायकल मध्ये बदल करून तीन आणि चार चाकी सायकल तयार केली ज्यात पेडेल चा देखील समावेश केला. हि सायकल वजनाने खूप जड होती आणि विविध design देखील ह्यामध्ये उपलब्ध होते. १८५० च्या दरम्यान सायकल संपूर्ण जगात export केली गेली आणि लोकांची सायकल ला खूप पसंती देखील मिळाली. 

1869 च्या दरम्यान Mac Millan ने पहिली दुचाकी सायकल तयार केली ही जगातील पहिली दुचाकी पेडेल असलेली सायकल होती, ह्याची रचना ही काहीशी Willard Sawyer ने तयार केलेल्या सायकल प्रमाणे होती. Willard ने जी सायकल तयार केली होती त्याचे दोन चाके मोठ्या आकाराची व उर्वरित हे खूप लहान आकाराचे होते. McCall ने दुचाकी तर तयार केली, परंतु त्याचे एक चाक मोठे आणि एक चाक लहान होते ज्यामुळे त्याचा वापर करणे थोडे अवघड होत होते. 

१८८४ मध्ये पुन्हा सायकल मध्ये बदल करण्यात आले आणि पहिली चैन असलेली सायकल तयार करण्यात आली आणि अशाच प्रकारे सायकल मध्ये कालांतराने बदल होत गेले आणि सायकल विकसित होत गेली. आज विविध कामासाठी विविध प्रकारच्या सायकल तयार केल्या जात आहेत जसे कि मालवाहू सायकल, डोंगराळ प्रदेशात फिरण्यासाठी माउंटन सायकल, व्यायाम करण्यासाठी जिमची सायकल आणि अधिक.   


सायकल चे प्रकार 

तसे पाहायला गेलो, तर सायकल चे अनके प्रकार उपलब्ध आहेत, परंतु इथे आपण अशा ५ सायकलींचे प्रकार पाहणार आहोत, ज्यांनी अगदी कमी वेळात जास्त लोकप्रियता प्राप्त केली तसेच ह्यांचा वापर देखील अधिक होताना दिसतो. सायकलींची नावे आणि थोडक्यात माहितीत खालील प्रमाणे,

1. स्टंट सायकल

स्टंट सायकल हे मुळात मनोरंजनाचे एक उत्तम साधन आहेत. स्टंट म्हणजे सायकल च्या सहाय्याने विविध प्रकारच्या कलाकृती पार पाडणे, जसे कि एका चाकावर सायकल चालवणे, एका पायाच्या साहाय्याने जागेवर सायकल गोल गोल फिरवणे आणि अधिक.

स्टंट सायकल ह्या आकाराने साधारण सायकल पेक्षा थोड्या लहान असतात आणि अनेकदा ह्या मध्ये ब्रेक चा वापर काही वापरकर्ते करत नाहीत, कारण ब्रेक लावले कि सोबत ब्रेक ची वायर देखील लावावी लागते, ज्यामुळे स्टंट करणे थोडे अवघड जाते असे अनेकांचे म्हणणे आहे, तसेच हि सायकल वजनाने थोडी हलकी असते, ज्यामुळे स्टंट मन ह्यावर आपले पूर्ण नियंत्रण मिळवू शकतो.

2. माउंटन सायकल

माउंटन सायकल हि सायकल साधारण सायकल प्रमाणे दिसते, परंतु ह्याची रचना हि काही अशा प्रकारे असते, ज्याने हि डोंगरांवर सहज चालवली जाऊ शकेल. ज्या लोकांना डोंगरांवर फिरायला आवडते, अशा लोकांसाठी हे एक उत्तम साधन आहे. ह्या सायकल ची विशेषतः अशी कि, ह्याची चाके हि इतर सायकल पेक्षा मोठी आणि जाड असतात, तसेच ह्यामध्ये ट्यूब चा वापर केला जात नाही, ह्याचे कारण म्हणजे डोंगरांवर मोठमोठी खडके आणि वळणदार खडबडीत रस्ते असतात.

3. गियर सायकल

वाहने हि मुळात दळणवळण आणि प्रवासाची मुख्य साधने आहेत. कमी वेळात जास्त अंतर पार करणे हा वाहनांचा मुख्य हेतू असतो, ज्यामुळे वेगावर नियंत्रण मिळविण्यासाठी त्यांच्यात गियर चा वापर केला जातो, हीच संकल्पना लक्षात ठेऊन एका व्हेलॉसिओ नावाच्या सायकल प्रवाशाने १९०५ च्या दरम्यान पहिली गियरवाली सायकल तयार केली, ह्या सायकल ला प्रथम दोनच गियर जोडण्यात आले होते, कालांतराने ह्याची संख्या वाढवण्यात आली आणि आज आपण ६ ते ७ गियर वाली सायकल वापरत आहोत. सायकल ची धावण्याची क्षमता वाढावी हा सायकल ला गियर जोडण्याचा हेतू मानला गेला आहे.

4. इलेक्ट्रिक सायकल

इलेक्ट्रिक सायकल हि आजच्या तंत्रज्ञानाच्या विकासाचा एक उत्तम नमुना आहे. परंतु तुम्हाला माहित आहे का कि, १८९७ मध्ये होसी लिब्बेय ह्या अमेरिकन व्यक्तीने जगातील पहिली विजेवर चालणारी सायकल तयार केली होती, जी तयार करण्यासाठी नॉर्मल सायकल मध्ये एक मोटर बसविण्यात आली होती, परंतु तंत्रज्ञानाच्या अभावामुळे त्यावेळी ह्या सायकल ला इतका चांगला प्रतिसाद मिळाला नाही. परंतु आज ह्या सायकल ला खूपच चांगला प्रतिसाद मिळत आहे, ह्या मागचे कारण देखील तितकेच महत्वाचे आहे ते म्हणजे, ही सायकल अगदी एखाद्या वाहना प्रमाणे कार्य करते आणि वायू प्रदूषण देखील करत नाही, ज्यामुळे वातावरण शुद्ध राहण्यास मदत मिळते. इलेक्टिर्स सायकल ची किंमत जास्त असल्यामुळे अद्याप सर्वीकडे हीच वापर केला जात नाही, परंतु दिवसेंदिवस ह्याचे वापरकर्ते मात्र वाढत आहेत.

5. फोल्डिंग सायकल

जगातील पहिली फोल्डिंग सायकल हि १८८७ मध्ये एम्मीत लत्ता ह्या अमेरिकन नागरिकाने तयार केली. एम्मीत ने ह्या सायकल चा पेटंट हा एका कंपनी ला विकला होता, परंतु हि सायकल बाजरात विकली जाणार नाही ह्या विचारधारेने कंपनी ने अनेक दिवस ह्याचे उत्पादन केले नाही आणि शेवटी एक वर्षांनंतर हि सायकल बाजारात आली, परंतु ह्याचा अपेक्षेपेक्षा खूप कमी प्रतिसाद मिळाला आणि आज एकविसाव्या शतकात ह्या सायकल ला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

फोल्डिंग सायकल हि दिसायला एखाद्या नॉर्मल सायकल प्रमाणेच आहे, परंतु जर ह्याला फोल्ड केले तर हि सायकल एखाद्या बॅगेत देखील मावेल आणि हिच ह्या सायकल ची विशेषतः आहे, ह्याचा फायदा असा कि आपण जगात कोणत्याही देशात गेलो तरी आपण सोबत आपली सायकल सहज घेऊन जाऊ शकतो.


सायकलचा शोध कोणी लावला ?

सायकल चा शोध कार्ल वोन ड्रिस ह्या युरोपिअन इन्व्हेन्टवर ने लावला. त्याने तयार केलेल्या सायकलला ‘SwiftWalker’ असे नाव देण्यात आले होते  तसेच ह्याला human powerd vehicle ह्या नावाने देखील ओळखले जात होते. इ.स. १२ जून १८१७ मध्ये कार्ल ने यूरोप मध्ये सायकल पहिल्यांदा introduce केली आणि युरोपच्या रस्त्यांवर सुमारे ७ किमी इतक्या अंतरावर चालवली, हे अंतर पार करण्यासाठी कार्ल वोन ड्रिस ला एक तासापेक्षा जास्त वेळ लागला.

लोकांनी पहिल्यांदा घोड्याशिवाय माणसाचा प्रवास पाहिला, कारण तेव्हा प्रामुख्याने घोड्यांचा वापर प्रवासासाठी होत होता. कार्ल च्या सायकलीला पेडेल नव्हते. त्याने तयार केलेल्या सायकलींमध्ये केवळ हॅन्डल आणि दोन चाके जी एका धातूच्या पट्टीने एकमेकांना जोडलेली होती.


फायदे

सायकल चालवल्याने व्यक्ती आणि संपूर्ण समाज दोन्हीसाठी असंख्य फायदे मिळतात. सायकलचे काही प्रमुख फायदे :

1. शारीरिक आरोग्य

सायकल चालवल्याने हृदयाचे आरोग्य, फुफ्फुसाची क्षमता आणि एकूणच स्वास्थ्य सुधारण्यास मदत मिळते. नियमित सायकल चालवल्याने स्नायू बळकट होतात, लवचिकता वाढते आणि संयुक्त गतिशीलता सुधारते.

2. वजन नियंत्रण

सायकल चालवणे हा कॅलरी बर्न करण्याचा एक प्रभावी मार्ग आहे, ज्यामुळे वजन व्यवस्थापन आणि वजन कमी करण्याच्या उद्दिष्टांसाठी ते उपयुक्त ठरते. हा व्यायामाच्या इतर प्रकारांसाठी एक आनंददायक आणि टिकाऊ पर्याय असू शकतो.

3. कमी-प्रभावी व्यायाम

धावण्यासारख्या उच्च-प्रभावी क्रियाकलापांच्या विपरीत, सायकलिंग हा कमी प्रभावाचा व्यायाम आहे, ज्यामुळे सांध्यांवर कमी ताण येतो. सायकल  चालवणे वेगवेगळ्या फिटनेस स्तर आणि वयोगटातील लोकांसाठी योग्य बनते, ज्यामध्ये सांधे समस्या किंवा दुखापतींचा समावेश आहे.

4. मानसिक आरोग्य

सायकल चालवल्याने मानसिक आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो, तणाव, चिंता आणि नैराश्य कमी होते. व्यायामादरम्यान एंडोर्फिनचे प्रकाशन संपूर्ण समाधान आणि आनंदाच्या भावनांमध्ये भर पडतो.

5. पर्यावरणीय फायदे

सायकल हा वाहतुकीचा एक हिरवा मार्ग आहे, जो शून्य उत्सर्जन निर्माण करतो, वायू प्रदूषण कमी करण्यास आणि हवामान बदलाचा सामना करण्यास मदत करतो. लहान सहलींसाठी कारऐवजी सायकली वापरल्याने व्यक्तीचा कार्बन डायऑक्साइड चे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी होऊ शकते.

6. किंमत-प्रभावी

सायकल हा वाहतुकीचे एक स्वस्त आणि प्रभावी साधन आहे. कार अथवा इतर वाहनांच्या तुलनेत सायकल संबंधित देखभाल, इंधन आणि विमा खर्च असा अतिरिक्त खर्च नाही.

7. सुधारित प्रवास

गर्दीच्या आणि रहदारी असलेल्या शहरी भागात सायकल हा प्रवासाचा एक कार्यक्षम मार्ग आहे. सायकल आपल्याला ट्रॅफिक जाम पासून बचाव करण्याची अनुमती देते, तसेच लहान ते मध्यम अंतराचा प्रवास जलद करू शकते.

8. सामाजिक परस्परसंवाद

सायकल चालवणे, ही एक सामाजिक क्रियाकलाप असू शकते, जी समूह राइड आणि समुदायाच्या सहभागाला प्रोत्साहन देते. सायकल क्लबमध्ये सामील होणे किंवा कार्यक्रमांमध्ये सहभागी होणे यामुळे नवीन मैत्री आणि आपलेपणाची भावना निर्माण होऊ शकते.

9. उत्तम झोप

सायकल चालवणे हे क्रिया नियमित शारीरिक हालचाली जसे की, झोपेच्या पद्धती सुधारण्यास हातभार लावू शकते, ज्यामुळे दिवसभरात चांगली विश्रांती आणि शरीरात एकूण ऊर्जा पातळी वाढते.

10. वर्धित संज्ञानात्मक कार्य

व्यायाम, सायकल चालवणे, सुधारित संज्ञानात्मक कार्याशी जोडले गेले आहे, ज्यामध्ये चांगली स्मरणशक्ती, लक्ष आणि समस्या सोडवण्याची कौशल्ये यांचा समावेश आहे.

11. दीर्घकालीन आजारांचा धोका कमी

नियमित सायकल चालाविल्यामुळे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग, टाईप 2 मधुमेह आणि विशिष्ट प्रकारचे कर्करोग यांसारख्या विविध तीव्र परिस्थितींचा धोका कमी होतो.

12. दैनंदिन दिनचर्यामध्ये सुलभ एकीकरण

सायकल चालवणे हे दैनंदिन दिनचर्येमध्ये सहजपणे समाकलित केले जाऊ शकते, मग ते प्रवासासाठी असो, कामासाठी असो किंवा मनोरंजनासाठी असो. सायकल महत्त्वपूर्ण वेळेच्या वचनबद्धतेशिवाय सक्रिय राहण्याची संधी प्रदान करते.


तोटे

सायकलमुळे अनेक फायदे मिळत असले तरी, या क्रियाकलापाशी संबंधित काही तोटे आणि संभाव्य आव्हाने देखील आहेत :

1. अपघात आणि दुखापती

रस्त्यावर किंवा जड रहदारी असलेल्या भागात सायकल चालवल्याने अपघात होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. सायकलस्वारांना अपघातात दुखापत होण्याची अधिक शक्यता असते, ज्यामुळे हेल्मेटसारखे संरक्षणात्मक वस्तू घालणे आणि सुरक्षित सायकल चालवण्याच्या सवयींचा सराव करणे आवश्यक आहे.

2. हवामान अवलंबित्व

सायकल चालवण्यावर हवामानाच्या परिस्थितीचा परिणाम होऊ शकतो. पाऊस, बर्फ, जोरदार वारा किंवा अति उष्णतेमुळे सायकल चालवणे असुविधाजनक किंवा धोकादायक असू शकते. प्रतिकूल हवामानात, सायकलस्वारांना पर्यायी वाहतूक पद्धती शोधाव्या लागतात.

3. मर्यादित वाहून नेण्याची क्षमता

मोटार वाहनांच्या तुलनेत सायकलींची वाहून नेण्याची क्षमता मर्यादित आहे. मोठ्या किंवा जड वस्तूंची वाहतूक करणे कदाचित आव्हानात्मक असू शकते आणि सायकलस्वारांना खरेदीसाठी किंवा अवजड वस्तूंची वाहतूक करण्यासाठी त्यानुसार नियोजन करावे लागते.

4. पायाभूत सुविधांचा अभाव

काही भागात, सायकल चालविण्यासाठी पायाभूत सुविधा अपुरी किंवा सुविधा अस्तित्वात नसू शकतात, यामुळे सायकल चालवणे कमी सुरक्षित आणि कमी आकर्षक होऊ शकते, विशेषत: नवशिक्यांसाठी किंवा ज्यांना मोटार वाहनांसह रस्ता शेअर करण्यात आत्मविश्वास वाटत नाही त्यांच्यासाठी.

5. शारीरिक ताण

डोंगराळ प्रदेशात लांब पल्ल्याच्या प्रवास सायकलवर  केल्याने थकवा किंवा जास्त परिश्रम होऊ शकते. खास करून ज्या व्यक्तीला सायाव नाही अशा व्यक्तींसाठी असे साहस आव्हानात्मक ठरू शकते.

6. चोरी आणि सुरक्षिततेची चिंता

सायकली चोरीला जाण्यास संवेदनाक्षम आहेत, आणि त्यांना योग्यरित्या सुरक्षित करणे ही चिंतेची बाब असू शकते, विशेषत: उच्च गुन्हेगारी दर असलेल्या शहरी भागात. चोरीचा धोका कमी करण्यासाठी चांगल्या दर्जाच्या लॉक आणि सुरक्षित बाइक स्टोरेजमध्ये गुंतवणूक करणे आवश्यक आणि अधिक खर्चिक ठरू शकते.

7. मर्यादित गती

सायकल चालवणे हा फिरण्याचा उत्तम मार्ग असला तरी, तो लांब अंतरासाठी मोटार चालविण्याइतका वेगवान असू शकत नाही. वेळ-संवेदनशील प्रवासासाठी किंवा लांब प्रवासासाठी, सायकलस्वारांना इतर वाहतुकीच्या पर्यायांचा विचार करावा लागेल.

8. हंगामी मर्यादा

थंड हवामानात किंवा हिवाळ्यात, बर्फाळ रस्ते, बर्फ जमा होणे किंवा अतिशीत तापमानामुळे सायकल चालवणे कमी व्यावहारिक किंवा आनंददायक होऊ शकते.

9. प्रदूषणाच्या प्रदर्शनाचा धोका

सायकल चालवणे हा वाहतुकीचा एक इको-फ्रेंडली मार्ग असला तरी, सायकलस्वारांना वायू प्रदूषणाचा सामना करावा लागू शकतो, विशेषत: जास्त रहदारी असलेल्या व गजबजलेल्या शहरी भागात.

10. मर्यादित दृश्यमानता

सायकलस्वारांना कधीकधी दृश्यमानतेच्या आव्हानांचा सामना करावा लागतो, विशेषत: रात्रीच्या वेळी किंवा खराब प्रकाश असलेल्या भागात. बाईकला लाईट, रिफ्लेक्टरने योग्यरित्या सुसज्ज करणे आणि रिफ्लेक्टिव्ह कपडे घालणे हे दृश्यमानता आणि सुरक्षितता वाढवण्यासाठी महत्वाचे आहे.

हे तोटे असूनही, यांपैकी अनेकांना योग्य नियोजन, सुरक्षितता खबरदारी आणि शहरी भागात सायकल चालविण्यासाठी अनुकूल पायाभूत सुविधांच्या विकासाद्वारे कमी करता येऊ शकते. बर्‍याच लोकांसाठी, सायकल चालविण्याचे फायदे अनेकदा तोट्यांपेक्षा जास्त असतात, ज्यामुळे ते वाहतूक आणि मनोरंजनाचे लोकप्रिय आणि आनंददायक साधन बनते.


FAQ

1. सायकलचा शोध कोणत्या देशात लागला ?

उत्तर : सायकलचा शोध प्रथम युरोप या देशात लागला.

2. सायकलचे परीक्षण प्रथम कधी करण्यात आले ?

उत्तर : १२ जून १८१७ मध्ये सायकल चे प्रथम परीक्षण करण्यात आले होते.

3. पहिल्या सायकलला काय नाव देण्यात आले होते ?

उत्तर : पहिल्या सायकलला “SwiftWalker” असे नाव देण्यात आले होते.

4. गिअर सायकल चा शोध कधी लागला ?

उत्तर : साल १९०५ मध्ये प्रथम गिअरच्या सायकलचा शोध लावला गेला.

अधिक लेख :

1. शून्य 0 चा शोध कोणी लावला ?

2. विमानाचा शोध कोणी लावला ?

3. मोबाईल चा शोध कोणी लावला ?

4. युट्युब चा शोध कोणी लावला ?

Leave a Comment