कलेक्टर म्हणजे काय व कलेक्टरची कामे कोणती ?

भारतीय संविधानानुसार भारतातील प्रत्येक क्षेत्रात भारतीय सरकारद्वारे पुरविल्या जाणाऱ्या सेवांचा लाभ व्हावा, याकरिता विविध प्रशासकीय पदांची निर्मिती केली गेली आहे, आणि प्रत्येक पदासाठी पात्र व्यक्तीची निवड केली जाते. जसे की पोलीस अधिकारी, कलेक्टर, तलाठी, ग्रामसेवक आणि अधिक.

या लेखात आपण भारतातील सर्वात महत्वपूर्ण पदांपैकी म्हणजेच कलेक्टर या पद विषयी माहिती पाहणार आहोत,


कलेक्टर म्हणजे काय ?

कलेक्टर हे एक सरकारी उच्च स्तरीय अधिकारी पद आहे. कलेक्टरला मराठीत जिल्हाधिकारी तर इंग्रजीत आय.ए.एस (IAS) अधिकारी असे म्हटले जाते. भारतातील सरकारद्वारे पुरविल्या जाणाऱ्या सेवांपैकी ही एक प्रमुख नागरी सेवा आहे.

विविध उपक्रमांच्या आधारे सरकारद्वारे, जिल्हाधिकारी म्हणून पात्र व्यक्तीची निवड केली जाते, व त्या व्यक्तीला ठराविक जिल्ह्यातील प्रशासकीय विभागांचे प्रमुख बनवेल जाते. कलेक्टरला अथवा जिल्हाअधिकारी ला जिल्ह्यातील जनसेवेकरीता विविध अधिकार प्रदान केले जातात, ज्यांचा उपयोग करून जिल्हाधिकारी जिल्ह्यात विविध उपक्रम राबवतो, अनुशासन ठेवतो, व जिल्ह्यातील अनधिकृत प्रक्रियांवर योग्य ती कारवाई करतो.

अगदी थोडक्यात सांगायचे झाले तर, कलेक्टर हा ठराविक जिल्ह्याचा मुख्य प्रशासकीय अधिकारी असतो.


कलेक्टर ची कामे

जसे कि आपण जाणतोच, जिल्हाधिकारी हा संपूर्ण जिल्ह्याचा प्रमुख सरकारी अधिकारी असतो, ज्यामुळे त्याला जिल्ह्यासंबंधित विविध कामे पार पाडावी लागतात. जिल्हाधिकाऱ्याद्वारे पार पाडली जाणारी कामगिरी खालील प्रमाणे,

 • जिल्ह्यातील महसूल गोळा करणे व गोळा केलेल्या महसुलाच्या बाबतीत, न्यायालयाप्रमाणे भूमिका बजावणे.
 • जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था राखणे, व त्यासाठी विविध उपक्रम राबवणे.
 • न्यायाधीशाप्रमाणे जिल्ह्यातील अनधिकृत कार्यांवर योग्य ती कारवाई करणे.
 • जिल्हाआयुक्त प्रमाणे जिल्ह्यातील समस्या जसे कि पाणी, रस्ते दूर करण्यासाठी विविध उपाय योजना अमलात आणणे.
 • जिल्ह्यात सुरु असलेल्या राज्य सरकारद्वारे अथवा केंद्र सरकारद्वारे मान्यता मिळालेल्या धोरणांची देखरेख आणि अंमलबजावणी करणे व या करीत विविध तालुके अथवा गावांना भेट देणे.
 • सार्वजनिक निधी खर्चाचे निरीक्षण करणे, व अनुपयोगी खर्च टाळण्यास योगदान देणे.
 • राज्य सरकारद्वारे अथवा केंद्र सरकारद्वारे आखलेल्या धोरणांना अंतिम स्वरूप प्राप्त करून देणे, व त्याची अंमलबजावणी करणे.
 • मंत्रालयातील मंत्र्यांसोबत सल्ला-मसलत करणे, व विविध धोरणे तयार करणे.
 • सरकारचे दैनंदिन व्यवहार हाताळणे.

कलेक्टरला मिळणाऱ्या सरकारी सुविधा

भारतात एका जिल्हा अधिकाऱ्याला ५६,००० ते ५७,००० इतके वेतन दिले जात असून, या व्यतिरिक्त इतरही भत्ते दिले जातात, जे मिळून एक जिल्हा अधिकारी दरमाह २ ते २.५ लाख रुपये इतके वेतन प्राप्त करतो. वेतनाव्यतिरिक्त इतरही सुविधा कलेक्टरला दिल्या जातात, त्या सुविधा नेमक्या कोणत्या हे आपण खालील प्रमाणे पाहणार आहोत,

कर्तव्य बजावत असताना अनेकदा समाजात शत्रू निर्माण होतात, ज्यामुळे कलेक्टर व कलेक्टरच्या कुटुंबीयांच्या संरक्षणासाठी सरकारद्वारे कॉलेक्टला पोलीस सुरक्षा दिली जाते.

कार्यालयात जाण्या-येण्यासाठी अथवा इतर कारणास्तव वाहने व वाहनासाठी सरकारी चालक देखील उपलब्ध करून दिले जातात.
कलेक्टर सेवा निवृत्त झाल्यावर पेन्शन सुविधा मिळते.

कलेक्टरला वीज, पाणी, LPG गॅस सुविधा आणि लँडलाईन कनेक्शन अगदी मोफत उपलब्ध करून दिले जाते.

कलेक्टरला सरकारद्वारे अगदी कमी भाड्यानिशी मोठ्या घरात राहण्याची सोया करून दिली जाते, सोबतच घरात काम करण्यासाठी नोकर, माळी, सुरक्षा रक्षक, जेवण बनविण्यासाठी स्वयंपाकी देखील उपलब्ध करून दिले जातात, तेही अगदी मोफत.

कलेक्टर सरकार सोबत करार करून विदेशात विविध अभ्यासक्रम करण्यासाठी २ वर्षांपर्यंत ची सुट्टी घेऊ शकतो, तसेच कलेक्टरद्वारे शिकल्या जाणाऱ्या अभ्यासक्रमाचा खर्च सरकारद्वारे उचलला जातो.

कलेक्टर अधिकृत सुट्टी घेऊन सहलीवर असताना, सरकारद्वारे त्यांना मोफत गेस्ट होऊस सुविधा पुरवली जाते, तसेच दिल्ली दौऱ्यावर असताना राज्य भवनात राहण्याची सोय केली जाते.

कलेक्टर अथवा जिल्हाधिकारी पद हे जवाबदारीचे पद असल्यामुळे, कोणत्याही जिल्हा अधिकाऱ्याला सहज निलंबित करता येत नाही, ज्यामुळे सुरक्षित नोकरी ची हामी मिळते.


भरती प्रक्रिया

कलेक्टर अथवा जिल्हाधिकारी परीक्षा ही राज्य स्तरीय लोकसेवा आयोग आणि केंद्र स्तरीय लोकसेवा आयोग अशा विविध आयोगांद्वारे घेतली जाते. महाराष्ट्रातील लोकसेवा आयोगाला MPSC, तर केंद्रीय लोकसेवा आयोगाला UPSC असे म्हटले जाते. विविध राज्यांचे विविध लोकसेवा आयोग असतात, जसे कि महाराष्ट्राचे MPSC, गुजरात चे GPSC, कर्नाटक चे KPSC आणि अधिक.

जसे कि आपण जाणतो, MPSC आणि UPSC या दोन्ही आयोगाद्वारे कलेक्टर बनण्यासाठी परीक्षा घेतल्या जातात, परंतु दोन्ही आयोगांच्या परीक्षे प्रक्रियेत काहीसा फरक आढळून येतो, त्यामुळे इथे आपण MPSC आणि UPSC या दोन्ही आयोगाद्वारे घेतल्या जाणाऱ्या परीक्षा प्रक्रियेचा आढावा घेणार आहोत,

1. MPSC

MPSC द्वारे साधारणतः तीन टप्प्यांमध्ये परीक्षा प्रक्रिये पूर्ण केली जाते

प्रारंभिक परीक्षा

प्रथम उम्मेदवाराची प्रारंभिक परीक्षा घेतली जाते, ज्याला इंग्रजीत Entrance exam असे म्हटले जाते. प्रारंभीक परीक्षा पेपर-१ आणि पेपर-२ अशा दोन भागांमध्ये विभागली जाते. प्रारंभिक परीक्षेचा टप्पा यशस्वी रित्या पूर्ण करायचा असेल तर, उम्मेदवाराला दोन्ही पेपरमध्ये उत्तीर्ण होणे गरजेचे आहे. पेपर-१ आणि पेपर-२ हे किती गुणांचे असतील, व त्यात किती प्रश्न असतात, हे आपण खालील प्रमाणे पाहणार आहोत,

पेपर क्रं प्रश्न गुण वेळ
पेपर – १ १०० २०० १२० मिनिटे (२ तास)
पेपर – २ ८० २०० १२० मिनिटे (२ तास)

मुख्य परीक्षा

उम्मेदवार प्रारंभिक परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर, त्याला मुख्य परीक्षेसाठी तयारी करावी लागते. मुख्य परीक्षेत साधारणतः ६ पेपर घेतले जातात. या पेपर चे विषय कोणते, व पेपरला किती गुण असतात, हे आपण खालील प्रमाणे पाहणार आहोत,
 
पेपर क्र. विषय गुण वेळ परीक्षा प्रकार
पेपर – १ मराठी आणि इंग्रजी (निबंध/अनुवाद/सारांश) १०० १८० मिनिटे (३ तास ) वर्णनात्मक (प्रश्नोत्तर)
पेपर – २ मराठी आणि इंग्रजी (व्याकरण) १०० ६० मिनिटे (१ तास) बहू पर्यायी प्रश्न (MCQ)
पेपर – ३ सामान्य अध्ययन – १ १५० १२० मिनिटे (२ तास) बहू पर्यायी प्रश्न (MCQ)
पेपर – ४ सामान्य अध्ययन – २ १५० १२० मिनिटे (२ तास) बहू पर्यायी प्रश्न (MCQ)
पेपर – ५ सामान्य अध्ययन- ३ १५० १२० मिनिटे (२ तास) बहू पर्यायी प्रश्न (MCQ)
पेपर – ६ सामान्य अध्ययन- ४ १५० १२० मिनिटे (२ तास) बहू पर्यायी प्रश्न (MCQ)

मुलाखत

प्रारंभीक आणि मुख्य परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर, उम्मेदवाराची मुलाखत घेतली जाते, ही मुलाखत एकूण १०० गुणांची असते. मुलाखतीद्वारे उम्मेदवाराची पात्रता तपासली जाते, व निवड केली जाते.

2. UPSC

प्रारंभिक परीक्षा

पेपर क्रमांक प्रश्न संख्या एकूण गुण वेळ परीक्षा भाषा
पेपर – १ १०० २०० १२० मिनिटे (२ तास) हिंदी आणि इंग्रजी
पेपर – २ ८० २०० १२० मिनिटे (२ तास) हिंदी आणि इंग्रजी

मुख्य परीक्षा

पेपर क्र. विषय गुण वेळ परीक्षा प्रकार
पेपर – १ अनिवार्य भारतीय भाषा ३०० १८० मिनिटे (३ तास ) वर्णनात्मक (प्रश्नोत्तर)
पेपर – २ इंग्रजी ३०० १८० मिनिटे (३ तास ) वर्णनात्मक (प्रश्नोत्तर)
पेपर – ९ निबंध २५० १८० मिनिटे (३ तास ) वर्णनात्मक (प्रश्नोत्तर)
पेपर – ३ सामान्य अध्ययन – १ (भारतीय सांस्कृतिक वारसा, जागतिक आणि सामाजिक इतिहास, भूगोल) २५० १८० मिनिटे (३ तास ) वर्णनात्मक (प्रश्नोत्तर)
पेपर – ४ सामान्य अध्ययन – २ (राज्यघटना, सामाजिक न्याय, भारताचे आंतराष्ट्रीय संबंध, कल्याणकारी उपक्रम ) २५० १८० मिनिटे (३ तास ) वर्णनात्मक (प्रश्नोत्तर)
पेपर – ५ सामान्य अध्ययन- ३ (आपत्तीचे व्यवस्थापन, जैवविविधता, आर्थिक विकास, तंत्रज्ञान) २५० १८० मिनिटे (३ तास ) वर्णनात्मक (प्रश्नोत्तर)
पेपर – ६ सामान्य अध्ययन- ४ (अखंडता, योग्यता, आणि नैतिकता) २५० १८० मिनिटे (३ तास ) वर्णनात्मक (प्रश्नोत्तर)
पेपर – ७ पर्यायी विषय – १ २५० १८० मिनिटे (३ तास) वर्णनात्मक (प्रश्नोत्तर)
पेपर – ८ पर्यायी विषय – २ २५० १८० मिनिटे (३ तास) वर्णनात्मक (प्रश्नोत्तर)

UPSC आयोगाद्वारे घेतल्या जाणारी मुख्य परीक्षेत एकूण ९ पेपरांचा समावेश असतो. या नऊ पेपर मधील २ पेपर हे पर्यायी विषयावर म्हणजेच उम्मेदवार, अर्ज करताना जो विषय निवडतो, त्या विषयानुसार घेतले जातात. तसेच यातील एकही पेपर हा बहू पर्यायी पद्धतीचा नसतो, म्हणजेच येथे उम्मेदवाराला वर्णनात्मक उत्तरे लिहायची असतात.

मुलाखत

UPSC द्वारे घेतली जाणारी मुलाखत ही २७५ गुणांची असते.


कलेक्टर होण्यासाठी पात्रता

 • उम्मेदवारचे पदवी शिक्षण म्हणजेच १५ वी पर्यंतच शिक्षण पूर्ण असणे गरजेचे आहे.
 • पदवी कोणत्याही क्षेत्रातून असली तरी चालते.
 • मुक्त विद्यापीठातून पूर्ण केलेले पदवी शिक्षण देखील ग्राह्य धरले जाते.
 • उम्मेदवारासाठी पदवी शिक्षणात टक्केवारीची अट नसते, ज्यामुळे केवळ पदवीधर असणे गरजेचे आहे.
 • उम्मेदवार भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे.

FAQ

1. कलेक्टर अथवा जिल्हाधिकारीला इंग्रजीत काय म्हटले जाते ?

उत्तर : कलेक्टर अथवा जिल्हाअधिकारीला इंग्रजीत IAS (Indian Administrative Service) असे म्हटले जाते.

2. पहिली भारतीय महिला कलेक्टर कोण ?

उत्तर : Anna Rajam Malhotra या भारतीय इतिहासातील सर्वात पहिल्या महिला IAS अधिकारी होत्या.

3. कलेक्टर या पदाची निर्मिती कोणी केली ?

उत्तर : Warren Hastings या इंग्रज अधिकारी ने १७७२ साली कलेक्टर या पदाची निर्मिती केली.

4. भारतातील सर्वात तरुण जिल्हाधिकारी कोण ?

उत्तर : जालना जिल्ह्यातील अन्सार शेख हे भारतातील सर्वात तरुण जिल्हा अधिकारी आहेत, जे वयाच्या २१ व्या वर्षी जिल्हाधिकारी बनले होते.

5. कलेक्टर ला किती वेतन असते ?

उत्तर: कलेक्टरला साधारणतः ५६,१०० इतके वेतन असते, परंतु इतर भत्ता मिळवून जिल्हाधिकारीला दर माह २ ते २.५ लाख रुपये वेतन म्हणून मिळतात.

अधिक लेख –

1. समान नागरी कायदा म्हणजे काय ?

2. MLC चा फुल फॉर्म काय ?

3. कॅबिनेट मंत्री म्हणजे काय ?

4. HR चा फुल्ल फॉर्म काय ?

1 thought on “कलेक्टर म्हणजे काय व कलेक्टरची कामे कोणती ?”

Leave a Comment