CBSE चा फुल फॉर्म काय ? | CBSE Full Form in Marathi

भारतात विद्यार्थ्याला शिक्षण प्रसाधनासाठी साधारणतः स्टेट बोर्ड आणि CBSE बोर्ड असे दोन पर्याय उपलब्ध आहेत. इथे विविध राज्याचे विविध स्टेट बोर्ड असतात, तर CBSE हे बोर्ड केंद्र शासना अंतर्गत कार्य करते.

या लेखात आपण CBSE संबंधित विविध माहितीचा आढावा घेणार आहोत,


CBSE म्हणजे काय ?

CBSE हे एक केंद्रीय स्तरावरील खासगी आणि सरकारी शाळांसाठीचे शिक्षण मंडळ आहे, ज्यावर केंद्र सरकारचे नियंत्रण आणि निर्णायक अधिकार आहेत. साल १९२९ मध्ये भारत सरकारच्या ठरावानुसार या शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना करण्यात आली होती. देशातील शिक्षण क्षेत्राचे एकीकरण करणे हे CBSE चे मुख्य उद्देश  मानले जाते. वर्तमान काळात भारतातील २४,००० पेक्षा अधिक शाळांमध्ये CBSE वर आधारित अभ्यासक्रम शिकवला जातो.


CBSE Full Form in Marathi

C – Central
B – Board Of
S – Secondary
E – Education
 
CBSE चा इंग्रजी फुल फॉर्म “Central Board Of Secondary Education” असून याचा मराठी अर्थ “केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ” असा होतो.

इतिहास

१९१७ मध्ये स्थापित कोलकत्ता विश्वविद्यालय समिती, ज्याला “सॅडलर समिती” म्हणून देखील ओळखले जायचे, या समितीमुळे भारतातील विविध भागात माध्यमिक शिक्षण मंडळांचा उगम होऊ लागला. “युपी बोर्ड ऑफ हायस्कुल अँड इंटरमेडिएट एज्युकेशन” भारतातील पहिले बोर्ड होते, जे सुरुवातीच्या काळात राजपुताना, ग्वाल्हेर आणि मध्य भारत या क्षेत्रात कार्यरत होते.

एक वेळ अशी आली कि, “युपी बोर्ड ऑफ हायस्कुल अँड इंटरमेडिएट एज्युकेशनस्वतःचे कार्य सुरळीत चालविण्यास अकार्यक्षम ठरले, ज्याचे मुख्य कारण होते, कामाचा वाढता भार. या नंतर राज्य सरकारने “युपी बोर्ड ऑफ हायस्कुल अँड इंटरमेडिएट एज्युकेशन संबंधित कार्य सुरळीत चालू रहावीत आणि कामावर संपूर्ण नियंत्रण रहावे, याकरिता युपी बोर्डची जबाबदारी केंद्र सरकारवर सोपवली.

युपी बोर्ड चे प्रतिनिधित्व केंद्र सरकारकडे सोपविल्या नंतर, केंद्र सरकार ने एक महत्वाची भूमिका बजावली आणि प्रत्येक राज्याचे स्वतंत्र संयुक्त शिक्षण बोर्ड असावे आणि प्रत्येक बोर्डसाठी संयुक्त मंडळ असावे, अशी कल्पना सुचवली.

केंद्र सरकारच्या ठरावानुसार सर्व राज्यांसाठी संयुक्त मंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला, यानंतर साल १९२९ मध्ये उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ आणि मध्यवर्ती शिक्षण मंडळ हे अजमेर, मध्यभारत आणि ग्वाल्हेर येथे स्थापन करण्यात आले. सुरुवातीला याचे मुख्यालय हे अजमेर येथे होते, ज्यामध्ये राजपूतानामधील गव्हर्नर, मुख्य आयुक्त, लेप्टीनेन्ट कर्नल आणि GD हे नियंत्रक अधिकारी होते, यांच्या व्यतिरिक्त अजून ३८ सदस्यांचा समावेश त्या शिक्षण मंडळात होता.

१९५२ मध्ये म्हणजे भारत स्वातंत्र्यानंतर या शिक्षण बोर्डाचे नाव बदलून वर्तमान कालीन नाव म्हणजेच “Centra Board Of Secondary Education” असे ठेवण्यात आले.

१ जुलै १९६२ मध्ये CBSE ची पुनर्रचना करण्यात आली, ज्यामुळे देशात प्रत्येक राज्यामधील विद्यार्थ्याला CBSE संबंधित सेवा उपलब्ध झाल्या.


परीक्षा आयोजन

वर्तमान काळात CBSE द्वारे कोणकोणत्या परीक्षांचे आयोजन केले जाते, हे आपण खालीलप्रमाणे पाहणार आहोत,

 • १० वी आणि १२ वी परीक्षा
 • JEE (Joint Entrance Exam)
 • NEET (National Eligibility Cum Entrance Test)
 • CTET (Central Teachers Eligibility Test)
 • NET (National Eligibility Test)

CBSE बोर्ड आणि State बोर्ड यातील फरक

स्टेट बोर्ड हे ठराविक राज्यापुरतीच मर्यादित असते, जसे की महाराष्ट्रात महाराष्ट्र बोर्ड आणि UP मध्ये उत्तर प्रदेश बोर्ड. CBSE ठराविक राज्यापुरती मर्यादित नसून ते संपूर्ण देशातील विद्यार्थ्यांना सेवा पुरवतात.

विविध राज्याचे विविध स्टेट बोर्ड असल्यामुळे, प्रत्येक राज्यातील ठराविक इयत्तेच्या अभ्यासक्रमात विविधता आढळून येते, या उलट संपूर्ण भारतात जेथे-जेथे CBSE केंद्र आहे, तेथे  समान अभ्यासक्रम असतो.

CBSE आणि स्टेट बोर्ड हे विविध निती नियमांनी स्वतःची कार्य पार पाडत असतात.

CBSE बोर्ड संपूर्ण देशात कार्यरत असले तरी, CBSE ला स्टेट बोर्ड आणि स्टेट बोर्डला CBSE मध्ये हस्तक्षेप करता येत नाही. स्टेट बोर्ड चा अभ्यासक्रम हा CBSE च्या अभ्यासक्रमाच्या तुलनेत अगदी कमी प्रमाणात बदलला जातो.


उद्देश

 • विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा त्याग न करता तणावमुक्त आणि व्यापक असे शैक्षणिक वातावरण निर्माण करणे.
 • राष्ट्रीय लक्ष्य साधण्यासाठी, शालेय शिक्षणाला चालना देणे आणि विविध उपाय योजना सुचवणे
 • शिक्षकांमधील कौशल्यांचा विकास व्हावा, यासाठी विविध उपक्रम राबवणे
 • परीक्षेचे स्वरूप ठरवणे आणि १० वी आणि १२ वी वर्गाच्या परीक्षांचे आयोजन करणे.
 • परीक्षेसंबंधित मार्गदर्शक सूचनांची निर्मिती करणे.
 • देशात जास्तीत-जास्त शैक्षणिक संस्था संलग्न करणे.

क्षेत्रीय कार्यालये

वर्तमान काळात CBSE चे कार्यालयीन क्षेत्र कोणते व त्या क्षेत्राचे संचालक अधिकारी कोण हे आपण खालील तक्त्यात पाहणार आहोत,

क्षेत्र  अधिकारी
पुणे डॉ. एम. डी. धर्माधिकारी
गुवाहाटी के. के. चौधरी
दिल्ली (पूर्व ) जे. के. यादव
नोएडा पियूष कुमार शर्मा
अजमेर सतपाल कौर
बेंगळुरू रणबीर सिंग
भुवनेश्वर के. श्रीनिवास
भोपाळ मिनू जोशी
चंदीगड श्याम कपूर
चेन्नई दिनेश राम
दिल्ली (पश्चिम) विकास अरोरा
डेहराडून जयप्रकाश चतुर्वेदी
पंचकुळा विजय सिंग
प्रयागराज श्वेता अरोरा
पटना जगदीश बर्मन
तिरुअनंतपुरम सचिन ठाकूर

तथ्य (Facts)

 • वर्तमान काळात CBSE २१ पेक्षा अधिक देश आणि १४० पेक्षा अधिक आंतरराष्ट्रीय शाळांमध्ये सक्रिय आहे.
 • CBSE भारत सरकारच्या नियंत्रणाखाली असले तरी, CBSE चा संपूर्ण खर्च शिक्षण मंडळ स्वतः भागवते.
 • CBSE ही जगातील सर्वात मोठी परीक्षा आयोजित करणारी संस्था अथवा शिक्षण मंडळ आहे.
 • २०२० मध्ये १२ वी च्या परीक्षेसाठी १२ लाख तर १० च्या परीक्षेसाठी १८ लाखपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी आवेदन केले होते.

वैशिष्ट्ये

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) हे भारतातील एक व्यापक मान्यताप्राप्त शैक्षणिक मंडळ आहे जे देशभरातील मोठ्या संख्येने सार्वजनिक आणि खाजगी शाळांचे संचालन आणि व्यवस्थापन करते. CBSE हे इतर शैक्षणिक मंडळांपेक्षा वेगळे ठेवणाऱ्या त्याच्या वैशिष्ट्यांसाठी ओळखले जाते. सीबीएसई बोर्डाची काही प्रमुख वैशिष्ट्ये येथे आहेत:

1. राष्ट्रीय अभ्यासक्रम

CBSE राष्ट्रीय अभ्यासक्रम फ्रेमवर्कचे अनुसरण करते जे देशभरात एकसमान अभ्यासक्रम प्रदान करते. हे शैक्षणिक मानकांमध्ये सातत्य राखण्यात मदत करते आणि विद्यार्थ्यांना त्यांचे स्थान काहीही असो त्यांना समान शिक्षण अनुभव मिळतील याची खात्री करते.

2. विज्ञान आणि गणितावर लक्ष केंद्रित करा

सीबीएसई विज्ञान आणि गणित यासारख्या विषयांवर जोरदार भर देते. या विषयांमधील गंभीर विचार, समस्या सोडवणे आणि विश्लेषणात्मक कौशल्यांना प्रोत्साहन देण्यासाठी अभ्यासक्रमाची रचना केली आहे.

3. सतत आणि व्यापक मूल्यमापन (CCE)

CBSE ने CCE प्रणाली सादर केली, जी फॉर्मेटिव्ह आणि समेटिव्ह असेसमेंटच्या संयोजनाद्वारे विद्यार्थ्यांच्या कामगिरीचे मूल्यांकन करते. केवळ परीक्षेतील गुणांच्या पलीकडे विद्यार्थ्याच्या क्षमतेचे अधिक समग्र मूल्यमापन करणे हा या दृष्टिकोनाचा उद्देश आहे.

4. लवचिक अभ्यासक्रम

CBSE अभ्यासक्रम लवचिक बनवण्यासाठी डिझाइन केला आहे, ज्यामुळे शाळांना स्थानिक गरजा आणि संसाधनांवर आधारित अतिरिक्त विषय आणि उपक्रम समाविष्ट करता येतात. हे अध्यापन पद्धतींमध्ये सर्जनशीलता आणि नाविन्यपूर्णतेला प्रोत्साहन देते.

5. आधुनिक अध्यापनशास्त्रांचा समावेश

CBSE आधुनिक शिक्षण पद्धतींचा वापर करण्यास प्रोत्साहन देते, ज्यामध्ये परस्परसंवादी आणि तंत्रज्ञान-आधारित शिक्षण समाविष्ट आहे. हे प्रकल्प-आधारित शिक्षण, अनुभवात्मक शिक्षण आणि ज्ञानाच्या वास्तविक-जागतिक अनुप्रयोगांना प्रोत्साहन देते.

6. सह-अभ्यासक्रम उपक्रमांवर भर

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सह-अभ्यासक्रमाचे महत्त्व CBSE ओळखते. CBSE बोर्डाच्या अंतर्गत येणाऱ्या शाळांना क्रीडा, कला, संगीत आणि सांस्कृतिक कार्यक्रम यासारख्या विविध उपक्रमांसाठी प्रोत्साहन दिले जाते.

7. भाषांवर लक्ष केंद्रित करा

सीबीएसई भाषा शिक्षण आणि संभाषण कौशल्यांना महत्त्व देते. अभ्यासक्रमामध्ये मातृभाषा, दुसरी भाषा आणि इंग्रजी यासह अनेक भाषा पर्यायांचा समावेश आहे.

8. नियमित अद्यतने आणि पुनरावृत्ती

बदलत्या शैक्षणिक गरजांशी संबंधित आणि संरेखित ठेवण्यासाठी CBSE वेळोवेळी त्याच्या अभ्यासक्रमाचे पुनरावलोकन करते आणि अद्यतनित करते. हे सुनिश्चित करते की विद्यार्थ्यांना वर्तमान ज्ञान आणि घडामोडींची माहिती मिळते.

9. परीक्षा

CBSE 10 वी साठी अखिल भारतीय माध्यमिक शाळा परीक्षा (AISSE) आणि इयत्ता 12 साठी ऑल इंडिया सीनियर स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन (AISSCE) यासह प्रमाणित परीक्षा आयोजित करते. या परीक्षा विविध स्पर्धात्मक प्रवेश परीक्षांसाठी मोठ्या प्रमाणावर ओळखल्या जातात.

10. अभ्यास साहित्याची उपलब्धता

CBSE शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी विविध अभ्यास साहित्य, नमुना पेपर आणि संसाधने प्रदान करते. ही सपोर्ट सिस्टीम शाळा आणि विद्यार्थ्यांना परीक्षेची प्रभावी तयारी करण्यास मदत करते.

11. केंद्रीकृत मंडळ

CBSE हे भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत केंद्रीकृत बोर्ड आहे. हा केंद्रीकृत दृष्टिकोन विविध राज्ये आणि प्रदेशांमधील अभ्यासक्रम आणि परीक्षा मानकांमध्ये एकसमानता सुनिश्चित करतो.

12. ओळख आणि स्वीकृती

CBSE हे भारतातील आणि परदेशातील विद्यापीठे आणि महाविद्यालयांद्वारे मोठ्या प्रमाणावर ओळखले जाते आणि स्वीकारले जाते. CBSE शाळांमधील विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावर उच्च शिक्षण संस्थांमध्ये जाणे अधिक सोपे वाटते.

हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की CBSE मध्ये ही वैशिष्ट्ये असली तरी प्रत्येक शैक्षणिक मंडळाची स्वतःची ताकद आणि दृष्टिकोन आहेत. विद्यार्थी आणि पालकांनी त्यांच्या शैक्षणिक उद्दिष्टांशी आणि प्राधान्यांशी जुळणारे शैक्षणिक मंडळ निवडताना या घटकांचा विचार केला पाहिजे.


FAQ

1. CBSE ची स्थापन केव्हा झाली ?

उत्तर : साल १९२९ मध्ये CBSE बोर्डाची स्थापना भारत सरकारद्वारे करण्यात आली.

2. २०२१ मध्ये CBSE परीक्षा किती विद्यार्थ्यांनी दिली होती ?

उत्तर : इयत्ता १० वी करिता २०,९७,१२८ तर १२ वी करिता १३,०४,५६१ इतक्या विद्यार्थ्यांनी CBSE ची परीक्षा दिली होती.

3. भारतातील किती शाळा CBSE बोर्डावर आधारित आहेत ?

उत्तर : भारतात २४,००० पेक्षा अधिक शाळांमध्ये CBSE बोर्डावर आधारित अभ्यासक्रम शिकवला जातो.

4. भारत वगळता CBSE किती देशांमध्ये कार्यरत आहे ?

उत्तर : वर्तमान काळात CBSE आंतराष्ट्रीय स्तरावर एकूण २६ पेक्षा अधिक देशामध्ये सक्रिय आहे.

5. CBSE संबंधित पहिली सभा कधी व कोठे झाली ?

उत्तर : १२ ऑगस्ट १९२९ मध्ये अजमेर येथे CBSE संबंधित प्रथम सभा आयोजित केली गेली.

6. CBSE ची पुनर्रचना केव्हा झाली ?

उत्तर : १ जुलै १९६२ मध्ये CBSE ची पुनर्रचना केली गेली.

7. CBSE द्वारे क्रीडा कार्यक्रम केव्हा सुरु करण्यात आला ?

उत्तर : साल १९९८ मध्ये CBSE ने प्रथम क्रीडा कार्यक्रम सुरु केले गेले.

8. CBSE बोर्डातून उत्तीर्ण होण्यासाठी किती टक्क्यांची आवश्यकता असते ?

उत्तर : CBSE बोर्डातून १० वी आणि १२ वी उत्तीर्ण होण्यासाठी विद्यार्थ्याला किमान ३३% गुण मिळवणे आवश्यक असते.

अधिक लेख –

1. MBA चा फुल फॉर्म काय ?

2. Bsc चा फुल फॉर्म काय ?

3. डिप्लोमा म्हणजे काय व डिप्लोमा चे प्रकार कोणते ?

4. RTE चा फुल फॉर्म काय ?

Leave a Comment