CBI चा फुल फॉर्म काय ? | CBI Full Form In Marathi

भारत सरकारद्वारे, देशातील विविध कामे पार पाडण्यासाठी ठराविक प्रशासकीय विभागांची निर्मिती करण्यात आली आहे. असेच एक प्रशासकीय विभाग म्हणेज CBI होय, ज्याबद्दल विविध माहितीचा आढाव आपण खालील प्रमाणे घेणार आहोत,


CBI म्हणजे काय ?

CBI हे भारत सरकारद्वारे स्थापित प्रमुख विभागांपैकी एक चौकशी विभाग अथवा अन्वेषण विभाग आहे, जे कार्मिक मंत्रालय, लोक तक्रार आणि भारत सरकारच्या अधिकार क्षेत्रात आपले कार्य पार पडते. CBI ला अधिक तर लाचखोरी आणि सरकारी भ्रष्टचार संबंधित चौकशी व गुन्हे हाताळणे याकरिता विशेष ओळखले जाते.

या व्यतिरिक्त १९६५ मध्ये भारत सरकारद्वारे लागू करण्यात आलेल्या केंद्रीय कायद्यांचे उल्लंघन, राज्य संघटित गुन्हेगारी, भारता संबंधित राष्ट्रीय आणि आंतराष्ट्रीय स्तरावरील तपासणी असे अनेक कार्य CBI द्वारे पार पाडले जातात. माहिती अधिकार कायद्यानुसार CBI ला आर्थिक गुन्हे, भ्रष्टचार प्रकरणे, विशेष गुन्हे अथवा प्रकरणे हाताळण्याची विशेष सूट देण्यात आली आहे.


CBI Full Form In Marathi

C  – Central
B  – Bureau Of
 – Investigation

CBI चे  विस्तारित रूप “Central Bureau Of Investigation” असे असून, याचा मराठी अर्थ “केंद्रीय अन्वेषण विभाग” अथवा “केंद्रीय चौकशी विभाग” असा होतो.


CBI चा इतिहास

 CBI हा एक प्रकारचा विशेष पोलीस विभाग आहे. भारत सरकारद्वारे १९४१ मध्ये म्हणजे भारत स्वातंत्र्यपूर्वी युद्ध आणि पुरवठा विभागातील भ्रष्टचारा संबंधित चौकशीसाठी या विभागाची स्थापना करण्यात आली होती. सुरुवातीच्या काळात या विभागाचे मुख्य कार्यालय हे आजच्या पाकिस्तान देशातील लाहोर मध्ये होते.

सुरुवातीला विशेष पोलीस दलाचे संचालक हे कुर्बान अली खान होते, ज्यांनी फाळणी दरम्यान पाकिस्तान देशाची निवड केली.

१९४६ मध्ये विशेष पोलीस दल हा विभाग अधिनियमानुसार भारतीय गृह खात्याकडे हस्तांतरित करण्यात आला. भारतातील इतर विभागांना व्यापण्यासाठी DSPE म्हणजेच विशेष पोलीस दलाचा विस्तार करण्यात आला, त्याची व्याप्ती राज्यांपासून ते केंद्रशासित प्रदेशांपर्यंत करण्यात आली

१ एप्रिल १९६३ मध्ये भारतीय गृह खात्याच्या ठरावानुसार विशेष पोलीस दलाचे नाव बदलून Central Bureau Of Investigation (CBI) ठेवण्यात आले आणि अशा प्रकारे CBI ची स्थापना झाली.

१९८७ मध्ये विविध प्रकारचे गुन्हे हाताळण्यासाठी CBI चे भ्रष्टचार विरोधी विभाग, विशेष गुन्हे विभाग, आर्थिक गुन्हे विभाग, आंतराष्ट्रीय सहयोग विभाग, प्रशासन विभाग, फॉरेन्सिक विभाग, आणि अभियोग विभाग असे विविध भागात विभाजन करण्यात आले.

धरमनाथ प्रसाद कोहली हे CBI चे पहिले संचालक होते, ज्यांचा कार्य कालावधी १ एप्रिल १९६३ ते ३१ मे १९६८ पर्यंत होता.


संरचना

CBI विभागाचे जे संचालक असतात, ते साधारणतः जिल्हाधिकारी अथवा पोलीस महासंचालक पदावर काम करणारे अधिकारी असतात. CBI मध्ये अधिकारी भरतीची वेगळी अशी प्रक्रिया पार पाडली जात नाही, तर पोलीस दलातीलच अधिकाऱ्यांची निवड ही CBI अधिकारी म्हणून केली जाते. CBI द्वारे विविध कार्य पाडण्यासाठी CBI चे विविध भाग तयार करण्यात आले आहे, ज्याबद्दल माहिती आपण खालील प्रमाणे पाहणार आहोत,

1. अँटी-करप्शन विभाग

CBI च्या या विभागाद्वारे लाचखोरी, भ्रष्टचार संबंधित प्रकरणांचा आढावा घेतला जातो, म्हणजेच प्रकरणांची माहिती गोळा करणे व भ्रष्टचार प्रतिबंध पैलूं संबंधित कार्य पार पाडणे इत्यादी.

राज्य सरकार अथवा केंद्र सरकार करिता काम करणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांसंबंधित लोक विरोध असलेल्या प्रकरणांना CBI च्या अँटी करप्शन विभागद्वारे हाताळणे जाते.

2. विशेष गुन्हे विभाग

समाजात अशांतता निर्माण करणारे गुन्हे जसे कि खून, अपहरण, अमली पदार्थांची तस्करी यांसारख्या प्रकरणांचा आढावा CBI च्या स्पेशल क्राईम विभागाद्वारे घेतला जातो. या विभागाचा मुख्य हेतू हा खऱ्या गुन्हेगाराचा छडा लावणे व समाजात शांततेचे वातावरण टिकून ठेवणे आहे.

3. आर्थिक गुन्हे विभाग

CBI च्या आर्थिक गुन्हे विभागाची स्थापना २९ एप्रिल १९६३ रोजी केली गेली होती. या विभागाच्या स्थापनेचा संबंध विशेष पोलीस दल कायद्यातील कलाम ३ सोबत आहे. सरकारी अथवा पब्लिक बँकेतील घोटाळे, शेअर मार्केट मधील घोटाळे, अशा मोठमोठया आर्थिक घोटाळ्यांचा आढावा CBI च्या आर्थिक गुन्हे विभागाद्वारे घेतला जातो.

4. खटला विभाग

CBI च्या इतर विभागाद्वारे दोषी ठरवलेल्या गुन्हेगारांवर कायदेशीर कारवाया करणे, न्यायालयांमध्ये अपील करणे अशी कामे या विभागाद्वारे पार पाडली जातात.

5. केंद्रीय फॉरेन्सिक विभाग

CBI ला चौकशी दरम्यान विविध टप्प्यांमध्ये मदत करणे, हे फॉरेन्सिक विभागाचे कार्य असते.


CBI चे संचालक

CBI च्या संचालक पदी निवड झालेल्या अधिकाऱ्यांचा कार्यकाळ हा साधारणतः २ ते ५ वर्षांपर्यंतचा असतो. दर २ ते ५ वर्षानंतर नवीन संचालकाची निवड केली जाते. इथे आपण CBI च्या स्थापनेपासून ते आता पर्यंत कार्यरत संचालकांची नावे खालील तक्त्यात पाहणार आहोत,

क्रं संचालक कालावधी
धरमनाथ प्रसाद कोहली १९६३ ते १९६८
फ्रेड्रिक वेक्टर अरुल १९६८ ते १९७१
डी. सेन १९७१ ते १९७७
एस. एन. माथूर २९ मार्च १९७७ ते २५ मे १९७७
चक्रवर्थी विजयराघवा नरसिम्हन २ मे १९७७ ते २५ नोव्हेंबर १९७७
जॉन लोबो १९७७ ते १९७९
रिपुदमन सिंग औलख १९१९ ते १९८०
जे. एस. बजवा १९८० ते १९८५
९. एम. जी. कात्रे १९८५ ते १९८९
१०. अरुण प्रसाद मुखर्जी १९८९ ते १९९०
११ राजेंद्र शेखर ११ जानेवारी १९९० ते १४ फेब्रुवारी १९९०
१२ विजय करण १४ फेब्रुवारी १९९० ते १४ फेब्रुवारी १९९०
१३ सुमित कुमार दत्त १९९० ते १९९३
१४ विजय रामाराव १९९३ ते १९९६
१५ जोगिंदर सिंग १९९६ ते १९९७
१६ आर. सी. शर्मा १९९७ ते १९९८
१७ देवरायापुरम रामासामी कार्तिकेयन ३१ जानेवारी १९९८ ते ३१ मार्च १९९८
१८ त्रिनाथ मिश्रा १९९८ ते १९९९
१९ डॉ. राघव कृष्णस्वामी राघवन १९९९ ते २००१
२० पी. सी. शर्मा २००१ ते २००३
२१ उमा शंकर मिश्रा २००३ ते २००५
२२ विजय शंकर तिवारी २००५ ते २००८
२३ अश्वनी कुमार २००८ ते २०१०
२४ अमर प्रताप सिंग २०१० ते २०१२
२५ रंजित सिन्हा २०१२ ते २०१४
२६ अनिल सिन्हा २०१४ ते २०१६
२७ राकेश अस्थाना २०१६ (कार्यरत)
२८ अलोक वर्मा २०१७ ते २०१९
२९ नागेश्वर राव २०१८ ते २०१९
३० ऋषी कुमार शुक्ला २०१९ ते २०२१
३१ प्रवीण सिन्हा २ फेब्रुवारी २०२१ ते २५ मे २०२१
३२ सुभोध कुमार जैस्वाल २५ मे २०२१ (कार्यरत)

कार्य

  • CBI ही भारत सरकारची एक प्रमुख तपास यंत्रणा आहे. दिल्ली पोलीस एस्टॅब्लिशमेंट अधिनियम १९४६ नुसार या संस्थेला  अनेक अधिकार प्राप्त झाले आहेत, ज्याचा उपयोग करून CBI विविध कार्य पार पाडत असते.
  • भारत सरकार आणि न्यायालयाच्या आदेशानुसार ठराविक प्रकाराने हाताळणे.
  • आर्थिक कायद्यांचे उल्लंघन करणाऱ्या प्रकरणांमध्ये, जसे कि आयकर नियम उल्लंघन, परकीय चलन नियम उल्लंघन, केंद्रीय उत्पादन शुल्क नियम उल्लंघन आणि अधिक, CBI कारवाई करते अथवा संबंधित प्रशासकीय विभागासोबत सल्ला मसलत करते.
  • भ्रष्टचाराला आळा घालणे आणि सत्य निष्ठा राखून ठेवणे ही CBI ची मुख्य भूमिका आहे. भ्रष्टाचार निवारण अधिनियम १९८८ नुसार, भ्रष्टचार संबंधित कामकाज CBI द्वारे केंद्रीय सतर्कता आयोगाच्या देखरेखी खाली हाताळले जाते.
  • भारतातील विविध प्रशासकीय विभाग जसे कि पोलीस दल, भ्रष्टचार विरोधी विभाग यांच्या सोबत समन्वय साधते.
  • भारतासंबंधित राष्ट्रीय अथवा आंतराष्ट्रीय व्यावसायिक घोटाळे अथवा गंभीर गुन्हयाची चौकशी करून त्याचे निवारण करते.

FAQ

1. CBI ची स्थापन केव्हा झाली ?

उत्तर : १ एप्रिल १९६३ मध्ये CBI ची स्थापन झाली.

2. CBI चे पहिले संचालक कोण ?

उत्तर : धरमनाथ प्रसाद कोहली हे CBI चे पहिले संचालक होते, ज्यांचा कार्यकाळ १९६३ ते १९६८ पर्यंतचा होता.

3. CBI चे मुख्य कार्यालय कोठे आहे ?

उत्तर : भारताची राजधानी असलेल्या दिल्लीमध्ये CBI चे मुख्य कार्यालय आहे.

4. CBI चे वर्तमान संचालक कोण ?

उत्तर : सुभोध कुमार जैस्वाल हे CBI चे वर्तमानकालीन संचालक आहेत.

5. CBI चे मुख्य सांकेतिक स्थळ काय आहे ?

उत्तर : cbi.gov.in हे CBI चे मुख्य सांकेतिक स्थळ आहे.

अधिक लेख –

1. RTE चा फुल फॉर्म काय ?

2. NVSP चा फुल फॉर्म काय ?

3. APBS चा फुल फॉर्म काय ?

4. ई-गव्हर्नन्स म्हणजे काय व याचे फायदे कोणते ?

Leave a Comment