बल्बचा शोध कोणी लावला ?

बल्बचा शोध लागण्यापूर्वी लोक अंधारात प्रकाशाचा स्त्रोत म्हणून दिव्यांचा उपयोग करायचे. अशा प्रकाश स्त्रोतांमुळे अनेकदा आग लागण्यासारख्या घटना घडायच्या.

कालांतराने मानवी विकास वाढीस लागला, ज्यामुळे नवनवीन शोध उदयास आले, ज्यातील एक महत्त्वपूर्ण शोध म्हणजे बल्ब. बल्ब हा एक प्रकाशाचा कृत्रिम स्त्रोत आहे. आज बल्ब चा उपयोग न केवळ घरात तर गाड्यांच्या हेड लाईटमध्ये, रस्त्यांवरील विद्युत दिव्यांमध्ये अशा विविध ठिकाणी केला जातो.

बल्बचा शोध कोणी लावला

या लेखात आपण बल्बचा शोध व त्या संबंधित विविध माहितीचा आढावा घेणार आहोत,


बल्ब म्हणजे नेमके काय ?

बल्ब हे मुळात एक उपकरण आहे, जे प्रकाश निर्मितीचे कार्य करते. बल्बला त्याचे कार्य पार पाडण्यासाठी विद्युत ऊर्जेची गरज असते. जेव्हा बल्बला विद्युत ऊर्जेचा प्रवाह पुरवला जातो, तेव्हा बल्बमधील tungsten नामक धातूने तयार केलेली तार तापते, ज्यामुळे प्रकाशाची निर्मिती होते. बल्ब हे आकाराने लहान असल्यामुळे ते सहज वागवता येतात, तसेच अगदी सहज कोठेही फिट होतात.


बल्ब चे प्रकार

जस-जसा तंत्रज्ञानात विकास होत गेला, तसे-तसे बल्ब चे विविध प्रकार अस्तित्वात आहे, हे प्रकार नेमके कोणते याचा आढावा आपण खालीलप्रमाणे घेणार आहोत,

  • इनकॅन्डेससेन्ट बल्ब (Incandescent Bulb)
  • हॅलोजन इनकॅन्डेससेन्ट बल्ब (Halogen Incandescent Bulb)
  • फ्लूरोसेन्ट बल्ब (Fluorescent Bulb)
  • कॉम्पॅक्ट फ्लूरोसेन्ट बल्ब (Compact Fluorescent Bulb)
  • एलईडी बल्ब (LED Bulb)

1. इनकॅन्डेससेन्ट बल्ब

इनकॅन्डेससेन्ट बल्ब हा एक पारंपरिक पद्धतीचा बल्ब आहे, ज्याच्या निर्मितीसाठी कमीत-कमी साहित्यांचा उपयोग केला गेला जातो. इनकॅन्डेससेन्ट बल्बमध्ये दोन संपर्क बिंदू असतात, जे विद्युत प्रवाहाच्या संपर्कात आल्याने बल्बला विद्युत ऊर्जा प्रदान करतात. या दोन संपर्क बिंदू दरम्यान एक धातूची बारीक तार असते, जी टंगस्टनपासून तयार केली जाते. जेव्हा विद्युत प्रवाह संपर्क बिंदू दरम्यान असलेल्या तारेतून प्रवास करतो, तेव्हा तार अति गरम होते आणि प्रकाशाची निर्मिती होते.

2. हॅलोजन बल्ब

इनकॅन्डेससेन्ट बल्ब हा जगातील नक्कीच एक क्रांतिकारी शोध होता, परंतु त्यात अनेक त्रुटी होत्या. इनकॅन्डेससेन्ट बल्ब हे ठराविक क्षमतेनेच प्रकाश निर्मिती करायचे, अशात इनकॅन्डेससेन्ट बल्ब ऐवजी हॅलोजन बल्ब नक्कीच एक उत्तम विकल्प ठरू शकतो. हॅलोजन बल्ब अधिक क्षमतेने प्रकाश निर्मिती करतो. हॅलोजन बल्बचा उपयोग अनेक आधुनिक उपकरणांसोबत केला जातो.

3. फ्लूरोसेन्ट बल्ब

फ्लूरोसेन्ट बल्ब पारंपरिक बल्बपेक्षा वेगळे एखाद्या चंचू पात्राप्रमाणे असतात. यांना “ट्यूब लाईट” असे देखील म्हटले जाते. फ्लूरोसेन्ट बल्बच्या ट्यूबमध्ये आर्गन गॅस आणि अगदी थोड्या प्रमाणात पारा उपस्थित असतो. तसेच काचेची संपूर्ण ट्यूब आतील बाजूने फॉस्फर पावडर ने लेपित केलेली असते, या व्यतिरिक्त ट्यूबमध्ये इलेकट्रोड्स चे अस्तित्व असते.

ट्यूब लाईट च्या दोन्ही बाजूला सर्किट असतात, जेथून बल्ब ला विद्युत ऊर्जा मिळते.

4. कॉम्पॅक्ट फ्लूरोसेन्ट बल्ब

कोणत्याही बल्ब संबंधित एक महत्वाचा विषय म्हणजे त्या ठराविक बल्बद्वारे किती प्रमाणात विद्युत ऊर्जेचा उपयोग केला जातो, कारण मोठमोठ्या कार्यालयांमध्ये विद्युत बल्बचा सर्वाधिक उपयोग होतो, या व्यतिरिक्त संगणकांचा देखील उपयोग होतो, त्यामुळे मोठा प्रमाणात विद्युत ऊर्जा खर्चिक पडते. अशात विद्युत ऊर्जेची बचत करण्यासाठी कॉम्पॅक्ट फ्लूरोसेन्ट बल्बचा उपयोग केला जातो.

हे बल्ब पारंपरिक बल्बच्या तुलनेत फार कमी प्रमाणात ऊर्जेचा उपयोग करून अधिक प्रकाश देण्यास सक्षम असतात. हे काहीसे ट्यूब लाईट सारखे असतात, परंतु ट्यूब लाईटच्या तुलनेत आकाराने खूप लहान असतात.

5. एलईडी बल्ब

Light Emitting Diodes हा LED चा फुल फॉर्म आहे, ज्याचा मराठी अर्थ प्रकाश उत्सर्जक डायोड असा होतो. LED बल्ब हे मुळात एक लहान असे अर्धसंचालक उपकरण आहे असे म्हणू शकतो. LED बल्ब हे प्लास्टिक पदार्थपासून तयार केले जातात, ज्यामुळे हे किमतींमध्ये किफायती आणि परवडणारे असतात. LED बल्बमध्ये डायोडद्वारे इलेकट्रोन्सला उत्तेजित केले जाते, ज्याने प्रकाश निर्मिती होते.

पारंपरिक बल्बप्रमाणे यामध्ये धातूच्या तारेचा उपयोग केला जात नाही, तर यामध्ये एक लहान असे विद्युत सर्किट बोर्ड वापरले जाते, जे बल्बला निरंतर विद्युत प्रवाह पोहोचविण्याचे कार्य पार पाडते.


इतिहास

साल १८०२ च्या दरम्यान Humphrey Davy नामक वैज्ञानिकाद्वारे जगात प्रथम बल्ब बनविण्यासाठी प्रयत्न केले गेले होते. प्रयोगादरम्यान Davy यांनी एका बॅटरीची निर्मिती केली. ही बॅटरी त्यांनी एका विशिष्ट प्रकारच्या धातूच्या तारेला जोडली, तारे बरोबरच त्यांनी कार्बनचा देखील उपयोग केला. बॅटरीद्वारे जेव्हा तारेमध्ये विद्युत प्रवाह सोडण्यात आला, तेव्हा तार अति गरम होऊन कृत्रिम प्रकाशाची निर्मिती झाली आणि अशा प्रकारे जगात प्रथम एका विद्युत लॅम्पचा शोध लागला. Davy यांनी जगातील पहिला लॅम्प तर तयार केला, परंतु यात एक त्रुटी होती, ती म्हणजे हा लॅम्प अथवा दिवा अधिक काळ प्रकाश देण्यास असक्षम होता.

साल १८४० मध्ये पुन्हा ब्रिटिश वैज्ञानिक वार्नर रियू यांनी विद्युत बल्बवर एक प्रयोग केला. यात त्यांनी एका गुंडाळलेल्या प्लॅटिनम फिलामेंटला व्हॅक्युम ट्यूबमध्ये ठेऊन, त्यामध्ये काही गॅस देखील सोडले. या प्रयोगामागचा मुख्य उद्देश म्हणजे जेव्हा व्हॅक्युमला विद्युत पुरवठा केला जाईल, तेव्हा प्लॅटिनमचा गुणधर्म त्यामधील तापमान नियंत्रित करेल आणि व्हॅक्युममध्ये उपस्थित गॅस प्लॅटिनम सोबत प्रतिक्रिया करून अधिक काळ प्रकाश पुरवेल. हा प्रयोग काही प्रमाणात यशस्वी तर झाला, परंतु प्लॅटिनम खूप महाग होते.

साल १८५० मध्ये जोसेफ स्वान नामक वैज्ञानिकाने कार्बन पेपर फिलॅमेंटचा उपयोग करून एक काचेचा बल्ब तयार केला, परंतु मर्यादित विद्युत ऊर्जा आणि व्हॅक्युममुळे हा ही बल्ब जास्त काळ प्रकाश देण्यास असक्षम ठरला.

१९७० येता येता बाजारात उत्तम दर्जाचे व्हॅक्युम उपलब्ध झाले, ज्याचा उपयोग करून जोसेफ स्वान यांनी १८ डिसेंबर १८७८ मध्ये एक लॅम तयार केला आणि Newcastle Chemical Society च्या एक सभेत तो प्रदर्शित केला. अधिक काळ विद्युत ऊर्जेचा वापर केल्यामुळे हा लॅम्प तुटला. १७ जानेवारी १८७९ मध्ये जोसेफ यांनी लॅम्पमध्ये सुधारणा करून पुन्हा सभेत प्रदर्शित केला.

जोसेफद्वारे पुनर्निर्मित लॅम्प अधिक काळ प्रकाश देण्यास सक्षम होता, परंतु यामध्ये वापरण्यात आलेल्या कार्बन रॉडमुळे, लॅम्पला विद्युत ऊर्जा पुरविण्याकरिता मोठ्या आकाराच्या कंडक्टरची गरज भासत होती, त्यामुळे हे बाजारात प्रत्येकासाठी उपलब्ध करणे शक्य नव्हते.

साल १८७८ मध्ये थॉमस एडिसन यांनी एक यशस्वी रित्या कार्य करणारा विद्युत बल्ब तयार केला, जो कमी विद्युत उर्जेसहित अधिक काळ प्रकाश निर्मिती करण्यास सक्षम होता. १४ ऑक्टोबर १८७८ मध्ये एडिसन यांनी तयार केलेल्या बल्बचे पेटंट स्वतःच्या नावे केले आणि अशा प्रकारे विविध वैज्ञानिकांच्या अथक प्रयत्नाने विद्युत बल्ब घडला.


बल्बचा शोध कोणी लावला ?

बल्बचा शोध थॉमस एल्वा एडिसन यांनी साल १८७९ मध्ये लावला. थॉमस एडिसन हे अमेरिकी संशोधक आणि एक कुशल व्यावसायिक होते. बल्ब सोबतच त्यांनी इलेक्ट्रिक पॉवर जनरेशन, मास कॉम्म्युनिकेशन, साऊंड रेकॉर्डिंग, मोशन पिच्चर अशा अनेक उपकरणांचा शोध लावला आहे.

थॉमस यांच्या कामगिरीमुळे त्यांना  Matteucci Medal, John Scott Medal, Edward Longstreth Medal, John Fritz Medal, Navy Distinguished Service Medal, Congressional Gold Medal अशा अनेक पुरस्कारांनी पुरस्कृत करण्यात आले आहे.


FAQ

 
1. बल्बचा शोध कोणत्या वर्षी लागला ?

उत्तर : बल्बचा शोध साल १८७९ मध्ये लागला.

2. पारंपरिक बल्बमध्ये कोणत्या गॅसचा उपयोग केला जातो ?  

उत्तर : पारंपरिक बल्बमध्ये आर्गन गॅसचा उपयोग केला जातो.

3. जगात सर्वाधिक चालणार बल्ब कोणता ?

उत्तर : कॅलिफोर्निया मधील फायर स्टेशनमध्ये साल १९०१ मध्ये एक बल्ब बसविण्यात आला होता, जो अद्यापही प्रकाश देत आहे. हा बल्ब जगात सर्वाधिक काळ चालणार बल्ब आहे, ज्याचे वय साधारणतः १२० वर्षांपेक्षा देखील अधिक आहे, जो आजही चालूच आहे.

4.  LED बल्बचा शोध कोणी लावला ?

उत्तर : साल १९६२ मध्ये Nick Holonyak Jr. यांनी LED बल्बचा शोध लावला.

5. बल्बला कार्य करण्यासाठी साधारणतः किती विद्युत ऊर्जेची गरज असते ?

उत्तर : बल्बला कार्य करण्यासाठी साधारणतः १. ५ ते १०० वॅट इतक्या विद्युत ऊर्जेची गरज भासते.

अधिक लेख –

1. पेन चा शोध कोणी लावला ?

2. एक्स-रे चा शोध कोणी लावला ?

3. गणक यंत्राचा शोध कोणी लावला ?

4. दुर्बिणीचा शोध कोणी लावला ?

Leave a Comment