Bsc चा फुल फॉर्म काय ? | Bsc Full Form in Marathi

शैक्षणिक जीवनकाळ हा आपल्या संपूर्ण आयुष्याचा पाया मजबूत करण्याचा काळ असतो. शैक्षणिक जीवनांत आपण विविध क्षेत्रातील विविध ज्ञान घेत असतो, त्यातीलच एक क्षेत्र म्हणजे विज्ञान होय. वर्तमान काळात विद्यार्थ्यांद्वारे सर्वाधिक प्राधान्य मिळणारे क्षेत्र म्हणून विज्ञान क्षेत्राची एक वेगळीच ओळख बनली आहे.

विज्ञान क्षेत्रात १२ वी नंतर विद्यार्थ्याला B.Sc course निवडण्याची संधी उपलब्ध होते, ही संधी केवळ विज्ञान शाखेतून १२ वी पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीच उपलब्ध असते.

व्यवस्थित निरीक्षण केल्यास असे निदर्शनास येईल कि B.Sc हे एका इंग्रजी शब्दाचे एक संक्षिप्त रूप आहे. B.Sc चे इंग्रजीतील विस्तारित रूप कोणते व त्या विस्तारित रूपाचा मराठी अर्थ काय, ह्या संदर्भात माहिती आपण ह्या लेखात आपण आहोत, सोबतच B.Sc संबंधित इतरही माहितीचा आढावा घेणार आहोत,


B.Sc म्हणजे काय ?

B.Sc हा विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांसाठी १२ वी नंतर उपलब्ध असलेला एक पदवीधर अभ्यासक्रम आहे. B.Sc ला इंग्रजीत आपण Under Graduation Course असेही म्हटले जाते, ह्याचा अर्थ १५ वी पर्यंत चे शिक्षण पूर्ण करण्याकरिता उपलब्ध असलेला पाठयक्रम आहे. भारतात B.Sc चा शैक्षणिक काळ हा साधारणतः ३ वर्ष इतका आहे, तर विविध देशात आपल्याला ह्या शैक्षणिक काळात काहीसा बदल पाहायला मिळतो, उदा. अर्जेन्टिना इथे B.Sc चा पाठ्यक्रम काळ हा ४ ते ५ वर्ष इतका आहे.

जगभरात तंत्रज्ञान आणि विज्ञान ह्या क्षेत्रामधील प्रगती पाहता, B.Sc ह्या पाठयक्रमाला शैक्षणिक संस्थांमध्ये उच्च पाठयक्रमाचा दर्जा दिला जातो.

इतर पाठ्यक्रमांच्या तुलनेत, B.Sc करणाऱ्या विद्यार्थ्यंना Graduation नंतर करिअरसाठी अधिक पर्याय उपलब्ध होतात, ज्यामुळे B.Sc कडे वळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढताना दिसत आहे.


BSC Full Form In Marathi

B – Bachelor Of

SC – Science

B.Sc ह्या इंग्रजी शब्दाचा फुल फॉर्म “Bachelor Of Science” असून, “Bachelor Of Science” चा मराठी अर्थ “विज्ञान शाखेचा पदवीधर” असा होतो.


B.Sc करण्यासाठी लागणारी पात्रता

B.Sc मध्ये प्रवेश घेण्याकरीत उम्मेदवार इयत्ता १२ वी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.

उम्मेदवाराची १२ वी विज्ञान शाखेतूनच पूर्ण असावी.

अनेकदा विद्यार्थी इयत्ता १० वी पूर्ण केल्यानंतर Diploma किंवा ITI करण्याचा निर्णय घेतो, अशा परिस्थितीही विद्यार्थ्याला B.Sc मध्ये प्रवेश मिळू शकतो.

तसे B.Sc मध्ये प्रवेश घेण्यासाठी गुणांची मर्यादा नसते, परंतु विद्यार्थी नामांकित कॉलेज घेवु इच्चीत असेल, तर अशा परिस्थितीत विद्यार्थी इयत्ता १२ वी किमान ५० % किंवा त्यापेक्षा अधिक टक्क्यांनी उत्तीर्ण झालेला असावा.


B.Sc चे 8 प्रसिद्ध पाठयक्रम

1. B.Sc in Agriculture

B.Sc in Agriculture हा एक शेती विषयक पाठयक्रम आहे, ज्याचा कालावधी हा ४ वर्ष इतका असून हा पाठयक्रम ८ सेमिस्टर मध्ये विभागला गेला आहे.

भारत हा कृषी प्रधान देश असल्यामुळे, B.Sc in Agriculture ह्या पाठयक्रमाला अधिक प्राधान्य मिळताना दिसत आहे.

ह्या पाठयक्रमादरम्यान विद्यार्थ्याला वनस्पती, वनस्पतींचे प्रजनन, त्यांचे जेनेटिकस अशा अधिक ऍडव्हान्स स्वरूपाचा अभ्यासक्रम शिकवला जातो.

आजही भारतात, शेतकरी नैसर्गिक शेती पद्धतींचा वापर करताना दिसून येतो, शेतीत आधुनिक तंत्र आणि तंत्रज्ञान ह्यांचा अधिक वापर व्हावा, व शेती करणे अधिक फायदेशीर व सुलभ व्हावे, हा ह्या पाठयक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

 • अभ्यासक्रम कालावधी :- ४ वर्ष
 • पात्रता :-  Physics, Chemistry आणि Biology विषयांसह १२ वी ५०% व त्यापेक्षा अधिक मार्कांनी उत्तीर्ण असणे गरजेचे.
 • फी :- १ लाख ते ३ लाख
 • नोकरी पद :- व्यवसाय विकास कार्यकारी, कृषी संशोधन शास्त्रज्ञ, कृषी अधिकारी, सहाय्यक वृक्षरोपण व्यवस्थापक आणि अधिक.

2. B.Sc in Computer Science

B.Sc Computer Science चे संक्षिप्त रूप B.Sc CS असे आहे. B.Sc CS हा ३ वर्षांचा एक Under Graduation Course असून, ह्या मध्ये संगणक अनुप्रयोग, संगणक विज्ञान त्यांच्या निर्मिती पासून ते वर्तमान काळापर्यंतचा प्रवास, सॉफ्टवेअर निर्मिती, अशा अनेक विषयांचा अभ्यास शिकवला जातो.

संपूर्ण जगात तंत्रज्ञानाचा वाढता उपयोग आणि तंत्रज्ञानात होणार विकास पाहता, विद्यार्थी B.Sc Computer Science ह्या पाठयक्रमाला अधिक पसंती देत आहेत.

 • अभ्यासक्रम कालावधी : ३ वर्ष
 • पात्रता : १२ वी Science क्षेत्रातून उत्तीर्ण असणे गरजेचे.
 • फी : १ लाख ते ७ लाख
 • नोकरी पद : Software Engineer, Data Analyst, Programmer, Web Developer, Network Engineer आणि अधिक.

3. B.Sc in Information Technology

B.Sc IT हे Bachelor Of  Science in Information Technology चे संक्षिप्त रूप आहे.

कॉम्पुटर नेटवर्किंग (Computer Networking), सॉफ्टवेअर निर्मिती (Software Development), Computer Programming Language असा संगणक तंत्रज्ञानावर आधारित अभ्यासक्रम आपल्याला B.Sc IT मध्ये शिकवला जातो.

जसे की आपण जाणतो, आज संगणकीय तंत्रज्ञानाचा वापर वाढत आहे, तंत्रज्ञान आणखी सुलभ आणि सुरक्षित व्हावे, हा ह्या पाठयक्रमाचा उद्देश आहे. C Programming, Data Structure, Computer Networking, हे काही B.Sc IT मध्ये शकवले जाणारे प्रसिद्ध विषय आहेत.

 • अभ्यासक्रम कालावधी : ३ वर्ष
 • फी :- ६० हजार ते ३ लाख
 • नोकरी पद : Graphic Designer, Software Programmer, Database Administrator, Desktop Engineer आणि अधिक

4. B.Sc in Animation

B.Sc in Animation हा अगदी कमी कालावधीत अधिक लोकप्रिय झालेला पाठयक्रम आहे, ज्यात विध्यार्थी आपली आवड दर्शविताना दिसत आहेत.

३ वर्ष आणि ६ सेमिस्टर मध्ये विभागलेल्या या पाठ्यक्रमादरम्यान विद्यार्थ्याला Computer Animation, Photo & Flash Training, Designing, Software Programming ह्या विषयांसंदर्भात ज्ञान दिले जाते.

 • अभ्यासक्रम कालावधी : ३ वर्ष
 • पात्रता : १२ वी विज्ञान शाखेतून उत्तीर्ण असणे
 • फी : ९ हजार ते २ लाख १५ हजारगरजेचे
 • नोकरी पद : Art Director, Game Designer, Film Editor, Animator, 3D Animator आणि अधिक.

5. B.Sc in Math

ज्या विध्यार्थ्यांना गणिताची आवड आहे, अशा विध्यार्थ्यांसाठी B.Sc in Math हा करिअर च्या दृष्ठीकोनातून एक उत्तम पर्याय आहे.

B.sc in Math हा पाठयक्रम साधारणतः ३ वर्षांचा असतो, जो ६ सेमिस्टर मध्ये विभागला गेला आहे. B.Sc नंतर विद्यार्थ्याला M.Sc करण्याचा देखील,आणखी एक पर्याय उपलब्ध होतो. B.Sc in Math मध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्याला १२ वी Science मध्ये ठराविक टक्केवारीची अट असते.

 • अभ्यासक्रम कालावधी : ३ वर्ष
 • पात्रता : उम्मेदवाराची १२ वी Physics, Chemistry आणि Math ह्या विषयांमधून होणे गरजेचे आहे.
 • फी : ४ हजार ते १ लाख ७० हजार
 • नोकरी पद : Scientist, Professor, Data Analyst, Accountant, Mathematician आणि अधिक

6. B.Sc in Nutrition & Dietetic

तसे पाहायला गेलो तर, B.Sc in Nutrition & Dietetic हे Bio-Science विद्यार्थ्यांद्वारे, अधिक निवडले जाणारे क्षेत्र आहे. ह्या पाठयक्रमात विद्यार्थ्याला दैनंदिन जीवनातील आहार, खाद्यपदार्थ, पोषण, ह्यासंदर्भात अभ्यासक्रम शिकवला जातो, न केवळ अभ्यासक्रम शिकवला जातो, तर एक चांगला आहार कसा तयार करावा, याचेही प्रशिक्षण दिले जाते.

 • अभ्यासक्रम कालावधी : ३ वर्ष
 • पात्रता : इयत्ता १२ वी जीवशास्त्र विषयासहित उत्तीर्ण असणे गरजेचे.
 • फी : ३० हजार ते २ लोख ७५ हजार
 • नोकरी पद : Nutritionist, Food Product Development Scientist, Food & Nutrition Quality Management Officer आणि अधिक.

7. B.Sc in Nautical Science

Nautical Science  ह्या पाठयक्रमात विद्यार्थ्याला समुद्री वाहन जसे कि पाणबुडी, जहाज ह्या संदर्भात ज्ञान दिले जाते,  ज्यामध्ये वाहनांना Operate करणे, Navigate करणे शिकवले जाते, सोबतच विद्यार्थ्यांना Deck Officers आणि Scuba Divers चे प्रशिक्षण देखील दिले जाते, ज्यामुळे उम्मेदवारासाठी करिअरची नवीन दारे उघडली जातात.

B.Sc in Nautical Science ह्या पाठयक्रमाला “The Directorate General Of Shipping” द्वारे मान्यता मिळाली आहे. The Directorate General Of Shipping हे भारत सरकार अंतर्गत कार्य करणारे एक विभाग आहे.

 • अभ्यासक्रम कालावधी : ३ वर्ष
 • पात्रता : १२ वी मध्ये विज्ञान शाखेतून Physics, Chemistry, Math विषयांसह ६० % गुणांनी उत्तीर्ण असणे  गरजेचे.
 • फी : २ ते ३ लाख (वार्षिक)
 • नोकरी पद : Merchant Navy Office, Indian Navy Officer, Deck Cadet, Marine Engineer आणि अधिक.

8. B.Sc in Forensic Science

Forensic Science ही B.Sc मधील एक प्रसिद्ध पदवी आहे, ज्यामध्ये पॅथॉलॉजि, दंतचिकित्सा, मानसशास्त्र ह्यांसारख्या विषयांवर लक्ष केंद्रित केले जाते. Forensic Science चा अधिक तर वापर हा crime laboratory मध्ये केला जातो, ही एक अशी प्रयोगशाळा असते, जेथे गुन्ह्यांची तपासणी ऍडव्हान्स उपकरणांचा वापर करून केली जाते.

असे नाही कि, Forensic Science ची पदवी घेतल्यानंतर केवळ सरकारी क्षेत्रातच करिअर करता येईल, तर Forensic Science चा वापर private Sector मध्ये देखील होत असल्याने आपण त्यात देखील आपले करिअर घडवू शकतो.

 • अभ्यासक्रम कालावधी : ३ वर्ष
 • पात्रता : १२ Science, Biology विषयासहित पूर्ण करण्याबरोबरच उम्मेदवाराला Entrance परीक्षेसाठी देखील पात्र व्हावे लागते.
 • फी : १८ हजार ते २ लाख ५ हजार
 • नोकरी पद : Forensic Expert, Investigation Officer, Crime Scene Investigator, Forensic Medical Examiner आणि अधिक.

B.Sc करण्याचे फायदे

बॅचलर ऑफ सायन्स (बीएससी) पदवीचा पाठपुरावा केल्याने अभ्यासाच्या विविध क्षेत्रांमध्ये असंख्य फायदे मिळतात. येथे काही प्रमुख फायदे आहेत:

1. सखोल ज्ञान

बीएससी प्रोग्राम अनेकदा सखोल ज्ञान आणि अभ्यासाच्या निवडलेल्या क्षेत्रात एक भक्कम पाया प्रदान करतात. करिअरच्या प्रगतीसाठी आणि पुढील शिक्षणासाठी समजून घेण्याची ही खोली मौल्यवान असू शकते.

2. करिअरच्या संधी

बीएससी पदवी विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, गणित, आरोग्यसेवा आणि बरेच काही यासारख्या क्षेत्रात करिअरच्या अनेक संधी उघडते. अनेक व्यवसायांमध्ये किमान शैक्षणिक पात्रता म्हणून बीएससी आवश्यक असते.

3. स्पेशलायझेशन

बीएससी प्रोग्राम्स अनेकदा तुम्हाला तुमच्या निवडलेल्या क्षेत्रातील एखाद्या विशिष्ट क्षेत्रात विशेषज्ञ बनण्याची परवानगी देतात. हे स्पेशलायझेशन तुम्हाला त्या कोनाड्यात शोधलेले तज्ञ बनवू शकते आणि तुमच्या करिअरच्या शक्यता वाढवू शकते.

4. संशोधन आणि नवोपक्रम

बीएससी प्रोग्राम्समध्ये वारंवार संशोधन प्रकल्प आणि प्रयोगशाळेतील कामांचा समावेश असतो, ज्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासात व्यस्त राहता येते आणि वैज्ञानिक नवोपक्रमात योगदान मिळते.

5. समस्या सोडवण्याची कौशल्ये

बीएससी प्रोग्राम दरम्यान विकसित केलेली विश्लेषणात्मक आणि गंभीर विचार कौशल्ये अत्यंत हस्तांतरणीय आहेत आणि विविध वास्तविक-जगातील परिस्थितींमध्ये लागू केली जाऊ शकतात.

6. आंतरविद्याशाखीय ज्ञान

अनेक बीएससी कार्यक्रम आंतरविद्याशाखीय शिक्षणास प्रोत्साहन देतात, ज्यामुळे विद्यार्थ्यांना अनेक क्षेत्रांतून अंतर्दृष्टी मिळू शकते आणि विविध दृष्टीकोनातून समस्यांशी संपर्क साधता येतो.

7. प्रगत पदवीसाठी तयारी

मास्टर्स आणि पीएचडी प्रोग्राम्स सारख्या प्रगत डिग्रीचा पाठपुरावा करण्यासाठी बीएससी पदवी एक पायरी दगड म्हणून काम करू शकते, ज्यामुळे उच्च-स्तरीय करिअर संधी आणि संशोधन पदे मिळू शकतात.

8. अष्टपैलुत्व

बीएससी प्रोग्रामद्वारे मिळवलेली कौशल्ये आणि ज्ञान विविध उद्योग आणि क्षेत्रांमध्ये लागू केले जाऊ शकते, ज्यामुळे तुम्हाला तुमचा करिअरचा मार्ग निवडण्यात लवचिकता मिळते.

9. हाताने अनुभव

बीएससी प्रोग्राम्समध्ये सहसा प्रयोगशाळेचे कार्य, फील्डवर्क आणि प्रकल्प यासारखे व्यावहारिक घटक समाविष्ट असतात, जे प्रत्यक्ष अनुभव देतात आणि सिद्धांत आणि सराव यांच्यातील अंतर कमी करण्यात मदत करतात.

10. नाविन्य आणि सर्जनशीलता

विज्ञान-संबंधित क्षेत्रांमध्ये अनेकदा सर्जनशील समस्या सोडवणे आणि नाविन्यपूर्ण विचारांची आवश्यकता असते. बीएससी शिक्षण या गुणांचे पालनपोषण करू शकते आणि अत्याधुनिक प्रगतीमध्ये योगदान देऊ शकते.

11. जागतिक दृष्टीकोन

अनेक वैज्ञानिक आव्हाने आणि शोध जागतिक स्वरूपाचे आहेत. बीएससी शिक्षण तुम्हाला आंतरराष्ट्रीय संशोधन, ट्रेंड आणि सहयोगांसमोर आणू शकते आणि तुमचा दृष्टीकोन विस्तृत करू शकते.

12. वैयक्तिक वाढ

बीएससी पदवी पूर्ण करण्यासाठी समर्पण, चिकाटी आणि वेळ व्यवस्थापन कौशल्ये आवश्यक आहेत. मार्गातील आव्हाने आणि यश वैयक्तिक वाढ आणि आत्मविश्वास वाढवण्यास हातभार लावतात.

13. नेटवर्किंग संधी

बीएससी कार्यक्रम अनेकदा प्राध्यापक, संशोधक, उद्योग व्यावसायिक आणि सहकारी विद्यार्थ्यांशी संपर्क साधण्याची संधी देतात, भविष्यातील सहयोगासाठी एक मौल्यवान नेटवर्क तयार करतात.

14. पगाराची संभाव्यता

विज्ञान-संबंधित क्षेत्रातील अनेक करिअर स्पर्धात्मक पगार देतात, जे बीएससी पदवीधरांकडे असलेले विशेष ज्ञान आणि कौशल्ये प्रतिबिंबित करतात.

15. समाजासाठी योगदान

हवामान बदल, आरोग्यसेवा आणि तंत्रज्ञानातील प्रगती यासारख्या जागतिक समस्यांवर अनेक वैज्ञानिक विषय हाताळतात. बीएससी पदवी तुम्हाला समाजासाठी अर्थपूर्ण योगदान देण्यास सक्षम करू शकते.

शेवटी, बॅचलर ऑफ सायन्स पदवी घेण्याचे फायदे तुमच्या आवडी, ध्येये आणि तुम्ही निवडलेल्या विशिष्ट क्षेत्रावर अवलंबून असतात. बीएससी प्रोग्रामचा पाठपुरावा करण्याचा निर्णय घेताना आपल्या आवडी आणि करिअरच्या आकांक्षा काळजीपूर्वक विचारात घेणे महत्वाचे आहे.


FAQ

1. B.Sc म्हणजे काय ?

उत्तर : B.Sc एक पदवी शिक्षण आहे. जो विद्यार्थी इयत्ता १२ वी विज्ञान शाखेतून पूर्ण करतो, तोच विद्यार्थी Graduation दरम्यान B.Sc पर्याय निवडू शकतो.

2. B.Sc चे दोन प्रकार कोणते ?

उत्तर : B.Sc Honours आणि B.Sc Plain हे B.Sc चे दोन प्रकार आहेत.

3. B.Sc चा फुल फॉर्म काय ?

उत्तर : Bachelor Of Science हा B.Sc चा इंग्रजी भाषेतील फुल फॉर्म आहे.

अधिक लेख –

1. UDISE चा फुल फॉर्म काय ?

2. CBSE चा फुल फॉर्म काय ?

3. डिप्लोमा म्हणजे काय व डिप्लोमा चे प्रकार कोणते ?

4. MBA चा फुल फॉर्म काय ?

Leave a Comment