BMW चा फुल फॉर्म काय ? | BMW Full Form in Marathi

वाहन एक असे साधन आहे, जे आपण आपल्या दैनंदिन जीवनात प्रवासासाठी सतत वापरत असतो, मग प्रवास लांबचा असो की जवळचा. वाहनांमध्ये देखील विविध प्रकार अस्तित्वात आहेत, जसे की Scooter, Bike, Card इत्यादी.

अनेक लोकांसाठी वाहन हे न केवळ प्रवासाचे एक साधन आहे, तर त्यांच्यासाठी ते एक उच्च दर्जाचे चिन्ह देखील आहे. वाहनांची वाढती मागणी पाहता, आज संपूर्ण जगात अनेक वाहन निर्मिती कंपन्या अस्तित्वात आहेत. काही वाहन निर्मिती कंपन्या अशा देखील आहेत, ज्यांची प्रचिती संपूर्ण जगात आहे

यातीलच एक वाहन निर्मिती कंपनी म्हणजे BMW होय. BMW हे नाव इतके प्रसिद्ध आहे की जवळ जवळ सर्वांच्याच ओळखीचे आहे. BMW चे नाव तर ओळखीची आहे, परंतु BMW चा फुल फॉर्म काय हे कदाचित अधिक तर लोकांना माहीत नसे

या लेखात आपण BMW संबंधित विविध माहितीचा आढावा घेणार आहोत, जसे की BMW full form in Marathi, BMW चा इतिहास आणि अधिक.


BMW Full Form in Marathi

B : Bayerische ( बेयरिस्चे )

M : Motoren ( मोटरन )

W : Werke ( वेर्के )


BMW कंपनीचा इतिहास

BMW कंपनीची स्थापना १९१६ दरम्यान करण्यात आली होती. सुरुवातीच्या काळात कंपनीचे नाव Baerische Flugzeugwerke AG असे होते, जे बदलून १९२२ मध्ये Bayerische Motoren Werker (BMW) असे ठेवण्यात आले.

पहिल्या विश्व युद्धानंतर BMW ही कंपनी मोटारसायकल इंजिन तयार करणे, शेती, घर आणि रेल्वे संबंधित सामग्री तयार करण्याच्या क्षेत्रात आली.

BMW कंपनीने १९२३ दरम्यान “BMW R32” नामक मोटरसायकलचे इंजिन तयार केले. 1928 मध्ये कंपनी Automobile क्षेत्रातील उत्पादक बनली.

१९३० दरम्यान BMW कंपनीने मोठ्या आलिशान आणि स्पोर्ट गाड्यांचे उत्पादन घेण्यास सुरुवात केली. १९३९ ते १९४५ दरम्यान म्हणजेच दुसऱ्या विश्वयुद्धादरम्यान BMW द्वारे मोटर सायकल इंजिन, एअरक्राफ्ट इंजिन आणि ऑटोमोबाईल क्षेत्रातील इतर गोष्टींचे उत्पादन घेतले जात होते. दुसऱ्या विश्व युद्धादरम्यान कंपनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे कंपनी बंद पडली.

१९४८ मध्ये कंपनी मोटर सायकल इंजिनच्या उत्पादनासह पुन्हा सुरू झाली. १९५२ दरम्यान कंपनीने बवेरिया मध्ये कार उत्पादनाला पुन्हा सुरुवात केली. १९५५ येता-येता कंपनीने स्वस्त दरातील मायक्रो कारचे उत्पादन घेण्यास देखील सुरुवात केली.

Luxury गाड्यांची होणारी कमी विक्री व मायक्रो कार मधून मिळणारा कमी नफा, यामुळे BMW कंपनी चांगलीच आर्थिक संकटात सापडली.

१९५९ मध्ये BMW च्या प्रतिस्पर्धा कंपनीने म्हणजेच Daimler benz ने BMW मध्ये मोठी रक्कम गुंतवून BMW ला overtake केले. या कठीण परिस्थितीत herbert quandt नामक व्यक्तीने BMW कंपनी ध्ये मोठी गुंतवणूक केली, ज्यामुळे BMW कंपनीचे स्वतःचे असे वैयक्तिक अस्तित्व टिकून राहिले, यानंतर BMW ने BMW 700 नामक कार लॉंच केली.

BMW चा हा कार मॉडेल अगदी कमी वेळात लोकांमध्ये अधिक प्रसिद्ध झाला, ज्यामुळे कंपनीला पुन्हा उभा राहण्यास आधार मिळाला. १९६२ मध्ये कंपनीने BMW New Class गाडी लॉन्च केली, ज्यामुळे BMW कंपनीला स्पोर्ट गाडी उत्पादनाच्या क्षेत्रातही प्रसिद्धी मिळण्यास सुरुवात झाली.

१९६० च्या दशकात कंपनीने coup आणि sedan Series 5 चे मॉडेल लॉन्च केले आणि स्वतःचा विस्तार केला. १९७२ मध्ये कंपनीने मध्यम आकाराच्या Sedan गाड्या Introduce केल्या, आणि अशाप्रकारे १९७५ मध्ये BMW 3 Series Compat Sedan, १९७६ मध्ये BMW 6 Series Luxury Coupes आणि १९७८ मध्ये Series 7 च्या Luxury मॉडेलच्या गाड्या Introduce केल्या.

1994 मध्ये BMW ने Rover Group नामक कंपनी विकत घेतली. या कंपनीमुळे BMW ला मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान सोसावे लागले आणि शेवटी साल 2000 मध्ये BMW ने Rover Group चा अधिक तर भाग विकला.

२००६ मध्ये कंपनीने turbocharge पेट्रोल इंजिन चे उत्पादन घेतले. २०१३ मध्ये कंपनीने BMW i3 City Car नामक पहिली इलेक्ट्रिक कार तयार केली

२०१९ ते २०२१ च्या दरम्यान Covid-१९ मुळे BMW गाड्यांच्या विक्रीत ८ टक्क्यांनी घट झाली, असे एका रिपोर्टनुसार समोर आले आहे.


BMW चे मालक कोण ?

Francis Joseph Popp यांनी १९१३ मध्ये BMW ची स्थापना केली होती. Popp ह्यांच्या व्यतिरिक्त Karl Rapp, Gustav Otto आणि Camillo Casti यांना देखील BMW चे संस्थापक एक मानले जाते.

Popp हे १९२२ ते १९४५ या कालावधीत BMW चे महासंचालक (Managing Director) होते. असे म्हटले जाते की Popp ह्यांना १९४२ दरम्यान महासंचालक पदाचा राजीनामा देण्यास भाग पाडले होते.

BMW कंपनीच्या स्थापनेनंतर कंपनी सोबत अनेक घटना घडल्या, कंपनी बंद देखील पडली होती, परंतु १९४८ मध्ये पुन्हा सुरू झाली, कालांतराने कंपनीचे मालकही बदलले आहे.

वर्तमान काळात BMW चे मालक म्हणून Stefan quandt आणि susanne klatten ही दोन नावे समोर आली आहेत. २०१६ नुसार steafan quandt हे BMW कंपनीच्या २९% तर, susanne klatten हे २१% शेअरस चे मालक आहेत, उर्वरित ५०% टक्के शेअर लोकांकडे आहे.


BMW संबंधित तथ्य (Fact)

  • सुरुवातीच्या काळात BMW द्वारे गाड्यांचे नव्हे, तर एयरक्राफ्ट च्या इंजिनचे उत्पादन घेतले जात होते
  • BMW कंपनीद्वारे इलेक्ट्रिक गाडीची निर्मिती १९७२ मध्येच केली केली होती, परंतु हवा तसा परफॉर्मन्स न मिळाल्याने, गाडीचे मार्केटिंग आणि उत्पादन केले गेले नाही. या पहिल्या इलेक्ट्रिक गाडीचा मॉडेल BMW 1602E असा होता.
  • BMW द्वारे तयार केलेल्या पहिल्या कार चे नाव Dixi होते
  • १९३७ दरम्यान BMW ने २७९ किलोमीटर प्रतितास वेगाने चालणारी जगातील सर्वात वेगवान मोटरसायकल तयार केली होती.
  • Rolls Royce ही जगप्रसिद्ध कार निर्मिती कंपनी देखील BMW च्याच मालकीचे आहे.
  • BMW कंपनीच्या headquarter building चा आकार हा गॅस सिलेंडर प्रमाणे आहे.
  • दुसऱ्या विश्व युद्धात झालेल्या नुकसानामुळे कंपनी बंद करण्यात आली होती
  • १९७८ मध्ये कंपनीने BMW M नामक पहिली स्पोर्ट कार तयार केली होती.
  • १९२३ मध्ये BMW कंपनीने BMW R32 नामक पहिली बाइक तयार केली होती

भारतात BMW चे Showroom कोठे आहे ?

संपूर्ण भारतातील ३७ शहरांमध्ये BMW चे ४९ Showroom आहेत. कालांतराने शोरूम ची संख्या वाढताना दिसत आहे. ज्या शहरांमध्ये BMW चे शोरूम आहेत, ती शहरे भारताची मुख्य शहरे म्हणून ओळखली जाता

भारतातील नवी दिल्ली (०३), मुंबई (०४), बेंगलोर (०३), चेन्नई (०३), कोलकत्ता (०२), पुणे (०२), नॉईडा (०१), लखनऊ (०२), जयपुर (०१), हैदराबाद (०१), गुरगाव (०२), कोची (०१), चंदिगड (०१), अहमदाबाद (०१), भुवनेश्वर (०१), फरीदाबाद (०१), लुधियाना (०१), कानपूर (०१), इंदोर (०१), गोवा (०१), मंगलागिरी (०१), मंगळूर (०१), नागपूर (०१), नवी मुंबई (०१), रायपूर (०१), राजकोट (०१), सुरत (०१), तिरुअनंतपुरम (०१), उदयपूर (०१), वडोदरा (०१), कोईमतूर (०१) या शहरांमध्ये BMW चे Showroom आपल्याला पाहायला मिळतात.


BMW ची सर्वात महाग गाडी कोणती ?

जसे की आपण जाणतोच, BMW द्वारे स्पोर्ट्स बाईक आणि स्पोर्ट्स कार अशा दोन्ही वाहनांची निर्मिती केली जाते. इथे आपण BMW ची सर्वात महाग बाईक आणि सर्वात महाग कार कोणती या संबंधित माहिती पाहणार आहो

1. Bike : BMW M 1000

M 1000 RR ही एक स्पोर्ट्स बाईक जी BMW च्या सर्वात महागड्या गड्यांपैकी पैकी एक आहे. ही वजनाला हलकी आणि अतिवेगवान अशी गाडी आहे, जी ३०६ किलोमीटर प्रतितास इतक्या वेगाने धावू शकते. M १००० RR ची किंमत ५० लाख रुपये इतकी आहे. ह्या बाइकची पेट्रोल ची टाकी स्वतःमध्ये १६.५ लिटर पेट्रोल सामावू शकते

१७० किलो वजन असलेल्या ह्या गाडीची लांबी ३.९ फूट तर रुंदी ६.५ फूट इतकी आहे. या गाडीचे इंजिन ९९९ CC इतक्या क्षमतेचे आ

M १००० RR जरी BMW ने तयार केलेली BMW च्या इतर मॉडेल पेक्षा सर्वात महाग बाईक असली, तरी Neiman Marcus ही जगातील सर्वात महाग बाईक आहे, जीची किंमत ८२,५७,८६,५०० रूपये इतकी आ

2. Car : BMW X7

BMW ची BMW X7 ही BMW च्या इतर कार्स पैकी सर्वात महागडी कार आहे, ज्याची किंमत एक करोड पेक्षा अधिक आहे. ही एक Sport कार आहे

BMW X7 ही गाडी BMW कंपनीने २०१८ मधील लॉन्च केली होती. ह्या गाडीची लांबी १६ फूट, रुंदी ६.५ फूट, आणि उंची 5.9 फूट इतकी आहे. या गाडीच्या इंधन टाकीची क्षमता ८३ लिटर इतकी असून ही गाडी डिझेल आणि पेट्रोल अशा दोन्ही इंधनांवर चालविण्यास सक्षम आहे.

सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे BMW X7 ही गाडी २१० किमी प्रति तास वेगाने धावू शकते आणि १०० किलोमीटर प्रतितास इतका वेग या गाडी द्वारे केवळ ४ ते ५ सेकंदात धारण केला जाऊ शकतो.

BMW X7 ही BMW च्या इतर गाड्यांच्या तुलनेत सर्वात महाग असून Bugatti La Voitle Noire ही जगातील सर्वात महाग गाडी आहे. या गाडीची किंमत १,४०,३८,९३,१५० रुपये इतकी आहे.

अधिक लेख –

1. KTM चा फुल फॉर्म काय ?

2. USA चा फुल फॉर्म काय ?

3. HDFC चा फुल फॉर्म काय ?

4. RTO चा फुल्ल फॉर्म काय ?

Leave a Comment