ब्लॉग म्हणजे काय व ब्लॉग चे प्रकार कोणते ?

आजचे युग हे संगणक आणि इंटरनेट चे युग आहे. संपूर्ण जग हे संगणकाने विविध पद्धतीने व्यापले आहे.   ह्यात संगणक बरोबर इंटरनेट देखील खूप मोठी भूमिका बजावते. इंटरनेट हे लाखो करोडो संगणाकांना वायरलेस पद्धतीने जोडण्याचे कार्य करते. इंटरनेट ला मराठी मध्ये “आंतरजाळ” म्हणून ओळखले जाते.

जसे की आपल्याला माहीत आहे की, प्रत्येक  क्षेत्रात संगणक वापरला जातो ज्यामुळे अनेक फायदे आणि तोटे देखील झाले. अवजड कामे पूर्वी मानवी बळावर केली जात होती परंतु जेव्हा पासून संगणकाचा वापर होऊ लागला तेव्हा पासून वेळ आणि पैसा दोघांची बचत होऊ लागली ज्यामुळे अनेक लोकांच्या नोकऱ्या गेल्या, ह्या उलट इंटरनेट आणि सोशल मीडिया मुळे घरबसल्या ऑनलाईन पैसे कमविण्याची संधी वाढल्या. ह्यासाठी गरज आहे ती केवळ संगणक आणि त्याच्या जगाशी स्वतःचा परिचय करण्याची.

अनेक संधिंपैकी एक म्हणजे ब्लॉगिंग. ब्लॉगिंग साठी तुम्हाला केवळ इंटरनेट आणि एक मोबाईल ची आवश्यकता भासते. तसेच ह्यामध्ये आपण आपल्या वेळेनुसार कोणाच्याही हाताखाली काम न करता पैसे कमवू शकतो. आता तुमच्या मनात अनेक प्रश्न येत असतील जसे की, ब्लॉगिंग किंवा ब्लॉग म्हणजे काय, ब्लॉग कसा तयार करायचा, ह्यापासून पैसे कसे कमवायचे आणि अधिक. तुमच्या ह्याच सर्व प्रश्नांची उत्तरे आपण ह्या लेखात अगदी सोप्या भाषेत पाहणार आहोत.


ब्लॉग म्हणजे काय ?

ब्लॉग म्हणजे एक प्रकारची website असते, ज्याच्या द्वारे लोक त्यांचा अनुभव आणि knowledge इतर लोकांपर्यंत पोचवतात, ह्यामुळे onilne शिकणे आणि शिकवणे खूप सोप्पे झाले. लोकांनी ब्लॉग द्वारे प्रसारित केलेले ज्ञान हे आजीवन इंटरनेट वर उपलब्ध असते, ज्यामुळे विद्यार्थी आपल्या सोयीनुसार ठिकाण आणि वेळ निवडू शकतात.


ब्लॉग किती प्रकारचे असतात ?

ब्लॉग हा केवळ शिक्षणासाठी तयार केला जात नसून त्याचे विषय आणि प्रकार हे विविध असू शकतात. जसे की मनोरंजक ब्लॉग, शैक्षणिक ब्लॉग, बिझनेस ब्लॉग, न्यूज ब्लॉग, personal blog आणि अधिक.

1. मनोरंजक ब्लॉग

असे ब्लॉग हे लोकांपर्यंत मनोरंजक गोष्टींचे प्रसारण करण्यासाठी तयार केले जातात. जसे की गाणे, गेम्स, व्हिडिओ, joke, शायरी, कविता इत्यादी. अशा ब्लॉग ला सर्व वयोगटातील लोक पसंती देत असतात, ज्यामुळे मनोरंजक ब्लॉग ची संख्या अधिक   वाढली आहे.

2. शैक्षणिक ब्लॉग

हे जास्त करून एखाद्या शिक्षण संस्था किंवा शिक्षकांद्वरे तयार केले जातात, ज्याने विद्यार्थ्याला शिक्षण आत्मसात करणे सोप्पे जाते . ह्यामध्ये कोणत्याही प्रकारचे knowledge शेअर केले जाऊ शकते, जसे की फिटनेस, व्यवसाय इत्यादी.

3. बातमी ब्लॉग

जसे की नावावरूनच आपल्याला समजते की, हे बातमी प्रसरणाचे ठिकाण किंवा ब्लॉग असेल. आज इंटरनेट वर विविध मराठी न्यूज ब्लॉग उपलब्ध आहेत. Maharashtra times, zee news, lokmat, सामना हे काही प्रसिद्ध न्यूज ब्लॉग आहे. अगदी जलद लोकांपर्यंत चालू घडामोडी पोहोचवणे हेच न्यूज ब्लॉग चे उद्दीष्ट असते.

4. वैयक्तिक ब्लॉग

Personal ब्लॉग हा एका डायरी प्रमाणे असते. अनेक लोकांना दैनंदिन जीवनातील घडामोडी लिहून ठेवण्याची सवय असते, ज्याला आपण daily डायरी असे म्हणतो. डायरी जळणे, हरवणे अशा गोष्टी टाळण्यासाठी लोक personal ब्लॉग बनवतात.  कारण इथे प्रसारित केलेली माहिती आपण आपल्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत जपून ठेवता येते.


डोमेन नेम म्हणजे काय ?

डोमेन म्हणजे तुम्ही तयार केलेल्या एका particular ब्लॉग ला दिलेले नाव असते. जसेकी www.Google.com. हे आहे. जेव्हा तुम्ही नवीन ब्लॉग बनवता तेव्हा तुम्हाला डोमेन name free दिला जातो परंतु ते खूप मोठे आणि युजर friendly नसतो.

समजा, जर तुम्ही blogger.com वर website तयार केली तर तुम्हाला तुमच्या ब्लॉग चे डोमेन निवडण्याची मुभा असते, परंतु तुमच्या डोमेन मध्ये blogspot हे add होते. उदा. www.example.blogspot.com हे नाव user-friendly नसते, त्यामुळे एक चांगले डोमेन नेम विकत घेणे सोईस्कर ठरते. येथे देखील डोमेन नेम registration करणाऱ्या विविध कंपनी आहेत त्यांची नावे खालील प्रमाणे.

1. Google Domain

2. Name Cheap


Hosting म्हणजे काय?

ज्याप्रमाणे आपण स्वतःला घर घेतो म्हणजेच आपण आपल्यासाठी काही space घेत असतो, अगदी त्याच प्रमाणे website ला इंटरनेट वर कार्यरत ठेवण्यासाठी काही स्पेस ची गरज असते, ज्याला आपण website host करणे असे म्हणतो. ब्लॉग किंवा website ला host करण्यासाठी आपल्याला एका चांगल्या कंपनी ची गरज असते ज्याने वेबसाईट ला लोड होण्यास अडथळा येणार नाही.

जेव्हा एखादी व्यक्ती ब्लॉग किंवा website बनवते तेव्हा त्याचा hosting चा खर्च ठरलेलाच असतो, जर तुम्हाला तुमचा हा खर्च वाचवायचा असेल तर तुम्ही blogger.com पासून सुरुवात करू शकता, कारण blogger.com ही कंपनी आपल्या युजर ची website host करण्यासाठी unlimited space मोफत देते आणि तेही लाईफ टाईम.


Blog द्वारे पैसे कसे कमवावे?

आपण एक चांगला quality blog बनवून आणि त्यावर traffic आणून म्हणजेच visiters ची संख्या वाढवून खूप चांगली income करू शकतो. ब्लॉग ला monetize करण्याच्या विविध पद्धती आपण खालील प्रमाणे पाहणार आहोत.

1. गूगल Adsense

Google Adsense हा गूगल चाच product असून एक popular ad program देखील आहे. १८ जून २००३ ला गूगल adsense ची सुरुवात झाली तेव्हा हे केवळ इंग्लिश ब्लॉग monetize करत होते, परंतु आता adsense मराठी, हिंदी, तेलुगू ब्लॉग ला देखील monitize करतो.

सामान्यतः adsense आपल्या ब्लॉग वर जाहिराती दाखवते ज्याच्या मोबदला आपल्याला पैसे मिळतात. adsense हे अनेक अटी आणि नियम नुसार कार्य करते.

2. Affiliate Marketing

affiliate marketing म्हणजे दलाली असे आपण सोप्या भाषेत समजू शकतो. हा व्यवसाय काहीसा real-estate सारखा भासतो. ह्यामध्ये आपल्याला एका व्यक्तीच्या प्रॉडक्ट ला ग्राहक शोधून आणायचे असते, त्या मोबदला आपल्याला कमीशन मिळते. आपण विविध कंपनी सोबत tie-up करून त्यांच्या प्रॉडक्ट ला customer शोधून त्यामोबदला पैसे कमवू शकतो. हे आपण ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने करू शकतो. amazon, Alibaba, flipkart हे काही भारतातील प्रसिद्ध affiliate program चालवणाऱ्या कंपनी आहेत.

3. Guest Posting

आज ऑनलाईन अनेक ब्लॉग आहेत जे content स्वतः लिहीत नसून लोकांकडून लिहून घेतात आणि त्यांना मोबदला पैसे देतात, ह्यालाच guest posting असे म्हणतात. अगदी ह्याच प्रमाणे तुम्ही देखील दुसऱ्यांच्या ब्लॉग साठी guest Posting करून पैसे कमवू शकता.

4. बॅनर अड्स

हे काहीसे adsense प्रमाणे कार्य करते. जर तुम्ही तयार केलेल्या वेबसाईट अथवा ब्लॉग वर हजारो लोक visit करत असतील तर अनेक कंपनी तुम्हाला त्यांच्या जाहिराती तुमच्या ब्लॉग वर लावण्यासाठी पैसे देतात. इथे तुम्हाला हवे तितके पैसे तुम्ही चार्ज करू शकता.

5. ब्लॉग Selling

तुम्ही तयार केले ब्लॉग तुम्ही इतर लोकांना विकून देखील हजारो कमवू शकता. इथे देखील तुम्ही तुमच्या ब्लॉग ची किंमत तुमच्या हिशोबाने ठरवू शकता.

Leave a Comment