भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते ?

भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते ?

संपूर्ण भारतात एकूण २९ राज्य आणि ७ केंद्रशासित प्रदेश आहेत. ह्या २९ राज्यांपैकी राजस्थान हे क्षेत्रफळाच्या दृष्टीकोनातून भारतातील सर्वात मोठे राज्य आहे, ज्याचे एकूण क्षेत्रफळ हे ३,४२,२३९ किमी वर्ग इतके आहे.


राजस्थान मधील जिल्हे

३,४२,२३९ किमी वर्ग इतक्या क्षेत्रफळात पसरलेल्या राज्यस्थानमध्ये एकूण ३३ जिल्हे आहेत, ह्या जिल्ह्यांची नावे आणि थोडक्यात माहिती आपण खालील प्रमाणे पाहणार आहोत,

1. अजमेर

अजमेर जिल्हा हा एकूण ८,४८१ किलोमीटर वर्ग इतक्या क्षेत्रफळात पसरला असून २०११ नुसार येथील लोकसंख्या २,५८३,०५२ इतकी होती. अजमेर जिल्हा राज्यस्थान राज्याच्या मध्यभागी स्तिथ आहे. अजमेर शहर हे अजमेर जिल्ह्याचे मुख्यलाय आहे. ह्या जिल्ह्यात मुख्यतः तीन धर्मातील लोकांचा अधिक वावर दिसून येतो, जे हिंदू, जैन आणि मुस्लिम ह्या प्रमाणे आहे.

2. जयपूर

जयपूर जिल्हा राजस्थान मधील क्षेत्रफळाच्या दृष्टीकोनातून सर्वात मोठा जिल्हा आहे. जयपूर चे एकूण क्षेत्रफळ ११,१५२ किलोमीटर वर्ग इतके आहे. २०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ६,६२६,१७८ इतकी आहे. जयपूरला राजस्थान ची राजधानी होण्याचा देखील मान मिळाला आहे. राजपूत शासक जयसिंग दुसरे ह्यांच्या शासन काळात म्हणजेच १७२७ दरम्यान जयपूर ची स्थापना केली गेली होती. भारतातील प्राचीन शहरांपैकी जयपूर हे एक आहे.

3. कोटा

जेव्हा भारतावर मोघल शासन होते, त्याकाळी कोटा मधील शासकांद्वारे मोघलांना बरोबरीची टक्कर दिली होती तेव्हा पासून कोटाला शौर्य आणि संस्कृतीचे प्रतीक मानले जाते. कोटा जिल्हा ५,२१७ किमी वर्ग इतक्या क्षेत्रफळात विस्तारला असून येथिक एकूण लोकसंख्या २०११ च्या जनगणने नुसार १,९५१,०१४ इतकी आहे.

4. उदयपूर

उदयपूर जिल्ह्याला ऐतिहासिक स्थान म्हणून ओळख आहे. हा जिल्हा मेवाड चा एक भाग देखील आहे.  भारत स्वातंत्र्य होण्यामध्ये उदयपूर ची एक महत्वाची भूमिका आहे, कारण इंग्रजांच्या राज्यात उदयपूर मधूनच अनेक चळवळी उदयास आल्या होत्या . हा जिल्हा एकूण ११,७४२ किमी वर्ग इतक्या क्षेत्रफळात विस्तारलेला असून ह्यामध्ये एकूण १५ तहसील कार्यालयाचा समावेश आहे. २०११ नुसार येथील लोकसंख्या ३,०६८,४२० इतकी होती .

5. चित्तोरगड

चित्तोरगड हे शहर जिल्ह्याचे मुख्य प्रशासकीय कार्यालय आहे. राजस्थान मधील मेवाड, टोंक, झालावर आणि प्रतापगड अशा काही राज्याचे भाग एकत्र करून १ ऑगस्ट १९४८ दरम्यान चित्तोरगड ची स्थापन करण्यात आली होती. चित्तोरगड देखील एक इतिहास स्थान असून, चित्तोरगड नावाच्या किल्ल्यासाठी हा जिल्हा प्रसिद्ध आहे. हा जिल्हा एकूण ७,८२२ किलोमीटर वर्ग इतक्या क्षेत्रफळात विस्तारलेला आहे.

6. बिकानेर

३०,२४७ किमी वर्ग इतक्या क्षेत्रफळात विस्तारलेला बिकानेर जिल्हा पाकिस्तान च्या सीमेलगत आहे. हा जिल्हा मुळात वाळवंटी प्रदेशात वसलेला असून, बिकानेरला जलसिंचनाद्वारे पाणीपुरवठा केला जातो. राज्यस्थान कालवा किंवा इंदिरा गांधी कालवा हा ह्याच जिल्ह्यात आहे. आंतराष्ट्रीय स्तरावरील संशोधकांना असे काही अवशेष मिळाले आहेत, ज्यावरून असे सिद्ध होते कि जवळ जवळ १,७२,००० वर्षांपूर्वी ह्या जिल्ह्यात नदी प्रवाह होता, परंतु कालांतराने नदी लुप्त झाली.

7. भरतपूर

इ.स १०० दरम्यान इथे आदिवासी समुदायाचे आदिपत्य होते, इ.स १५०० पासून पुढील काही वर्षात हे एक जाट राज्य म्हणून विकसित झाले. कालांतराने ह्यावर मराठ्यांचे वर्चस्व स्थापित झाले. महाराज सुरज मल ह्याच्या मार्गदर्शना खाली भरतपूर ह्या शहराची स्थापना करण्यात आली होती. ह्या शहराचे नाव हे प्रभू श्री रामचंद्र ह्याचे बंधू भरत ह्यांच्या नावावर ठेवण्यात आले होते. भरतपूर हा जिल्हा एकूण ५,०६६ किमी वर्ग इतक्या क्षेत्रफळात पसरला आहे आणि २०११ नुसार ह्या जिल्ह्याची लोकसंख्या हि २,५४८,४६२ इतकी होती.

8. ढोलपूर

३,०८४ किमी वर्ग इतके क्षेत्रफळ असलेल्या ढोलपूर जिल्ह्याच्या अधिकतर भागात शेती केली जाते. राजस्थान, मध्यप्रदेश आणि उत्तर प्रदेश ह्या तिन्ही राज्याच्या मध्यभागी वसलेला हा जिल्हा आहे. जिल्ह्याच्या दक्षिण दिशेला चंबळ नदी वाहते, जी राज्यस्थान आणि मध्यप्रदेश ह्या दोन राज्यां दरम्यान एखाद्या सीमे प्रमाणे कार्य करते. ढोलपूर च्या पश्चिम भागात लहान लहान पर्वत रांगा पसरल्या आहेत. २०११ नुसार येतील एकूण लोकसंख्या हि १,२०६,५१२ इतकी आहे.

9. जोधपूर

ऐतिहासिक स्थळ म्हणून जोधपूरची प्रचिती आहे. २०११ नुसार जोधपूर जिल्हा राज्यस्थान मधील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक लोकसंख्या असलेला जिल्हा होता, तेव्हा ह्या जिल्याची लोकसंख्या ३,६८७,१६५ इतकी होती. हा जिल्हा एकूण २२,८५० किलोमीटर वर्ग इतक्या क्षेत्रफळात पसरलेला आहे. जोधपूरची स्थापन १५ व्या शतकाच्या दरम्यान राव जोधा ह्यांनी केली होती.

10. पाली

आजचा पाली जिल्हा एकेकाळी राजपुतांची राजधानी म्हणून ओळखला जात होता. भारताचे वीर शासक पृथिराज चोहान ह्यांचे नाते आजच्या पाली जिच्यासोबत असल्याचे सांगितलं जाते. हा जिल्हा १२,३८७ किमी वर्ग इतक्या क्षेत्रफळात विस्तारला आहे. इथे मारवाडी आणि हिंदी ह्या दोन भाषांचे प्रमुख वास्तव्य दिसून येते.

11. जैसलमेर

जैसलमेर हा राज्यस्थानमधील पहीला तर भारतातील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा जिल्हा आहे. ह्या जिल्ह्याचा अधिकांश भाग हा वाळवंटी प्रदेशात आहे. जैसलमेरच्या उत्तरेस पाकिस्तानच्या सीमा आहेत. ह्या जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ हे ३०,४०१ किमी वर्ग इतके आहे. इथे एकच नदी वाहते, जिचे नाव काकनी असे आहे.

12. प्रतापगड

प्रतापगड हा राज्यस्थान मधील सर्वात तरुण जिल्हा आहे, असे आपण म्हणू शकतो, कारण ह्या जिल्ह्याची स्थापना २६ जानेवारी २००८ मध्ये करण्यात आली होती. २००६ मध्येच राजस्थान सरकारद्वारे प्रतापगड वेगळा जिल्हा बनविण्याची घोषणा करण्यात आली होती. हा जिल्हा उदयपूरचा एक भाग मानला जातो. ह्या जिल्ह्याची स्थापन जरी २००८ मध्ये झाली असली तरी, प्रतापगड चा इतिहास हा फार जुना आहे. प्रतापगड चे एकूण क्षेत्रफळ ४,११७ किमी वर्ग इतके आहे.

13. बरान

भारत स्वतंत्र होण्यापूर्वी बरान जिल्हा, कोटा जिल्ह्याचा एक भाग होता. १९९१ सालच्या एप्रिल महिन्याच्या १० तारखेला बरान आणि कोटा हे दोन स्वतंत्र जिल्हे करण्यात आले. बरान जिल्ह्यचे नाव विद्यमान बरांन वरून पडले आहे. ह्या जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ ६,९९२ किमी वर्ग इतके असून, इथे अधिक तर लोकांद्वारे हिंदी भाषेचा वापर केला जातो.

14. श्री गंगानगर

पूर्वी गंगानगर हा बिकानेर जिल्ह्याचाच एक भाग होता आणि बिकानेर चे शासक महाराज गंगा सिंग हे होते, त्यावरूनच ह्या जिल्याचे नाव श्री गंगानगर असे ठेवण्यात आले होते. श्री गंगानगर चे एकूण क्षेत्रफळ हे १,११५,४६६ हेक्टर म्हणजेच ११,१५४ किमी वर्ग इतके आहे. ह्या जिल्ह्याच्या उत्तरेस पंजाब तर पश्चिमेस पाकिस्तानच्या सीमा आहेत. श्री नगरगंगानगर मध्ये एकूण १० तहसील आहेत.

15. बुंदी

बुंदी हा जिल्हा ५,५५० किलोमीटर वर्ग इतक्या क्षेत्रफळात विस्तारला असून, हा जिल्हा एकूण ५ तहसील मध्ये विभागला गेल आहे. बुंदी मध्ये झालेल्या उत्खननतात संशोधकांना ५००० वर्षांपूर्वीचे म्हणजेच अशमयुगातील अवशेष सापडले आहेत. येथील एकूण लोकसंख्या १,११०,९०६ इतकी असून हा आकडा २०११ च्या जनगणने नुसार दर्शविण्यात आला आहे.

16. बारमेर

राजस्थानमधील वाळवंटी प्रदेशात स्तिथ असलेला हा जिल्हा एकूण २८,३८७ किमी वर्ग इतक्यात क्षेत्रफळात विस्तारला आहे. हा राजस्थानमधील क्षेत्रफळाच्या दृष्टीकोनातून तिसरा सर्वात मोठा जिल्हा आहे. बारमेर च्या पश्चिमेस पाकिस्तान सीमा आहेत. लूमणी नदी हि बारमेर जिल्ह्यात वाहणारी सर्वात मोठी नदी आहे. ह्या जिल्ह्याच्या अवतीभवती वाळवंट असल्यामुळे येथे कमाल तापमान ५१ अंश सेल्सिअस दरम्यान असते. ह्या जिल्ह्यात एकूण १७ तहसील कार्यालये आहेत.

17. दौसा

दौस मधील अधिकीतर लोकांचा उदरनिर्वाह हा शेतीवर चालतो. येथे बाजरी, मोहरी, शेंगदाणे, गहू असे काही पीक घेतले जातात. ह्या जिल्ह्याची स्थापन १९९१ दरम्यान झाली होती, तसेच ह्याचे एकूण क्षेत्रफळ हे ३,४३२ किमी वर्ग इतके आहे.

18. चुरु

राव चुहरू ह्यांनी १६२० मध्ये चुरु ची स्थापन केली गेली होती. हा जिल्हा एकूण १६,८३० किलोमीटर वर्ग इतक्या क्षेत्रफळात विस्तारला आहे. येथील लोकसंख्या २०११ च्या जगनगणनेनुसार २,०३९,५४७ इतकी आहे. बागड आणि हिंदी ह्या चुरु मध्ये वापरल्या जाणाऱ्या दोन मुख्य भाषा आहेत. चुरु शहर हे चरू जिल्ह्याचे मुख्यालय म्हणून ओळखले जाते.

19. हनुमानगड

हनुमानगड हा पंजाब आणि हरियाणा लगत वसलेले राज्यस्थानचा एक जिल्हा आहे, जो १२,६४५ किलोमीटर इतक्या क्षेत्रफळात पसरला आहे. ह्या जिल्ह्यातिल अधिकतर भागात शेती व्यवसाय केला जातो, इथे घेतल्या जाणाऱ्या पिकांमध्ये तांदूळ, बाजरी, कापूस, गहू हि काही प्रमुख पिके आहे. २०११ नुसार ह्या जिल्ह्याची एकूण लोकसंख्या हि १,७७४,६९२ इतकी होती. येथे मोठमोठे धान्यकोठार देखील उभारण्यात आले आहेत.

20. सवाई मधोपूर

सवाई मधोपुर ४,४९८ किमोमीटर वर्ग इतक्या क्षेत्रफळात विस्तारला आहे. येथील एकूण लोकसंख्या २०११ नुसार  १,३३५,५५१ इतकी आहे. येथे हिंदी, राजस्थानी आणि उर्दू ह्या भाषांचा अधिक वापर आपल्याला दिसून येतो.

21. दूंगारपूर

१२ व्या शतका दरम्यान म्हणजेच ११९७ मध्ये सामंत सिंह ह्यांनी दूंगारपूर ची स्थापन केली होती. सामंत सिंह हे मेवाड चे राजपुत्र होते. ह्यानंतर जेव्हा भारतावर इंग्रजांचे राज्य होते, त्या वेळेस दुंगारपुर हे लष्कर आणि पोलीस ह्यांचे मुख्य केंद्र बनले होते. हा जिल्हा साधारणतः ३,७७० किलोमीटर वर्ग इतक्या क्षेत्रफळात पसरला असून, ह्या मध्ये एकूण ८ तहसील कार्यालयांचा समावेश आहे. २०११ मध्ये दूंगारपूरची एकूण लोकसंख्या हि १,३८८,५५२ इतकी होती.

22. टोंक

२०११ मध्ये टोंक ची लोकसंख्या हि १,४२१,३२६ इतकी म्हणजेच स्वित्झर्लंड इतकी होती. टोंक मध्ये हुंडी समाजासोबतच, मुस्लिम समाजाचा देखील वावर दिसून येतो. एका रिपोर्टनुसार टोंक मध्ये १० % पेक्षा अधिक मुस्लिम समाज स्थित आहे. ७,१९४ किमी वर्ग क्षेत्रफळात पसरलेल्या ह्या जिल्ह्यात एकूण ७ तहसील आहेत.

23. सिरोही

सिरोहीचा इतिहास हा फार प्राचीन असून, इथे अनेक प्राचीन मंदिरे आणि देवस्थान आहेत, ह्यामुळेच सिरोहीला देव नगरी ह्या नावाने देखील ओळखले जाते. प्राचीन स्थळांसोबतच दुहेरी तलवारी निर्मिती मध्ये देखील सिरोही अग्रेसर आहे. ५,१३६ किमी वर्ग क्षेत्रफळ आणि १,०३६,३४६ इतकी लोकसंख्या असलेल्या ह्या जिल्याच्या दक्षिणेस गुजरात हे राज्य आहे.

24. जालोर

जालोरचे प्राचीन नाव जबलीपूर असे होते, हे नाव संत जबली ह्यांच्या नावावरून ठेवले गेले होते. पूर्वी जालोर एक दाट वसाहत असलेले ठिकाण होते. जालोर मध्ये १२ मोठे हिंदू मठ आणि १३ मशीद आहेत. इथे स्वदेशी घोड्यांची जमत मोठ्या प्रमाणात आढळते, त्यामुळे ह्या जिल्ह्याला मारवाडी घोड्याचा पाळणा ह्या नावाने देखील ओळखले जाते. हा जिल्हा एकूण १०,६४० किलोमीटर वर्ग इतक्या क्षेत्रफळात पसरला आहे.

25. झुंझुनू

झुंझुनू जिल्ह्यातील झुंझुनू शहर हे ह्या जिल्ह्याचे मुख्य शहर आहे. इथे राजस्थानी, हिंदी, मारवाडी, उर्दू, आणि हरयाणवी अशा काही भाषा बोलल्या जातात. एकूण ८ तहसील कार्यालय असलेला हा जिल्हा एकूण ५,९२८ किमी वर्ग इतक्या क्षेत्रफळात पसरला आहे. हा जिल्हा शेखावती प्रदेशात स्तिथ असून ह्या जिल्याच्या पूर्वेला हरियाणा हे राज्य आहे.

26. राजसमंद

राजसमंद हा जिल्हा पूर्वी उदयपूर जिल्ह्याचाच एक भाग होता, परंतु १० एप्रिल १९९१ मध्ये उदयपूर पासून हा जिल्हा वेगळा करण्यात आला आणि अशा प्रकारे राजसमंद जिल्ह्याची स्थापन झाली. जिल्ह्यातील राजनगर हे राजसमंद जिल्ह्याचे मुख्य शहर आहे. ह्या जिल्ह्यात एकूण ७ तहसील असून ह्या जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ हे ४, ५५० किमी वर्ग इतके आहे. इथे मेवाडी भाषेचं वर्चस्व असून सोबतच हिंदी भाषा देखील बोलली जाते.

27. नागौर

नागौर हा जिल्हा बिकानेर, चुरु, सिकर, जयपूर, अजमेर, पाली आणि जोधपूर ह्या जिल्ह्यांच्या केंद्रस्थानी स्थित आहे. ह्या जिल्ह्यातील काही भाग हा वाळवंटी प्रदेशात आहे, तर काही भाग वन्य प्रदेशात आहे. ह्या जिल्ह्याचे क्षेत्रफळ १७,७१८ किमी वर्ग इतके आहे. २०११ नुसार ह्या प्रदेशाची लोकसंख्या हि ३,३०७,७४३ इतकी होती. नागौर मध्ये हिंदी, मुस्लिम आणि जैन ह्या धर्मातील लोकांचा वावर अधिक दिसून येतो.

28. सीकर

७,७४२ किमी वर्ग क्षेत्रफळात पसरलेल्या ह्या जिल्ह्यातील फतेहपूर, लक्ष्मणगड आणि मधोपूर हे काही मोठ्या आकाराची शहरे आहेत. २०११ मध्ये ह्या जिल्ह्याची एकूण लोकसंख्या २,६७७,३३३ इतकी होती. सीकर मध्ये एकूण १,१८३ इतक्या गावांचा समवेश आहे.

29. करोली

करोली जिल्हा हा पूर्णतः डोंगर – दऱ्यांनी व्यापलेला आहे.  हा जिल्हा लाल रंगाच्या रत्नांच्या उत्पादनासाठी भारतभर प्रसिद्ध आहे. लाल रत्नांसोबतच ह्या जिल्ह्यातील अनेक क्षेत्रात लोह खनिजांचे देखील काही प्रमाणात उत्पादन घेतले जाते. ह्या जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ ५,०४३ किमी वर्ग इतके आहे, तसेच २०११ मध्ये ह्या जिल्ह्याची लोकसंख्या १,४५८,२४८ इतकी होती.

30. झालावर

६,९२८ किमी वर्ग इतक्या क्षेत्रफळात पसरलेल्या ह्या जिल्ह्याच्या पूर्वेस मध्यप्रदेश राज्य आहे. झालावर ला ऐतिहासिक शहर म्हणून देखील ओळखणे जाते. झालावर जिल्ह्याच्या मध्य क्षेत्रातून काली सिंध नदी वाहते. ह्या नदीची दिशा हि दक्षिणेकडून उत्तरेकडे अशा प्रकारे आहे. झालावर जिल्ह्यामध्ये एकूण १२ तहसील कार्यालयांचा समावेश आहे.

31. अलवार

जोधपूर आणि जयपूर नंतर अलवार हा तिसऱ्या क्रमांकाचा जिल्हा आहे, जो राजस्थानमधील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या जिल्ह्याच्या यादीत येतो. ह्या जिल्याचे क्षेत्रफळ हे ८,३८० किमी वर्ग इतके आहे. अलवार जिल्ह्याच्या सीमा ह्या हरियाणा राज्यासोबत जोड्ल्या गेल्या आहेत. २०११ मध्ये ह्या जिल्ह्याची एकूण लोकसंख्या हि ३,६७४,१७९ इतकी होती.

32. बंसर

बंसर जिल्ह्याने संपूर्ण राज्यस्थान राज्याच्या एकूण क्षेत्रफळापैकी १.४७% भाग म्हणजेच ५,०३७ किलोमीटर वर्ग इतका जमिनीचा भाग व्यापला आहे. ह्या जिल्ह्याच्या सीमा गुजरात आणि मध्यप्रदेश अशा दोन राज्यांसोबत जोड्ल्या गेल्या आहेत.

33. बिलावर

बिलावर मध्ये एका उत्खननांत संशोधकांना ५ ते २०० हजार वर्षांपूर्वीचे काही अवशेष सापडले आहेत, ज्यामुळे ह्या जिल्ह्याला एक ऐतिहासिक ओळख धारण झाली आहे. ह्या जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ १०,४५५ किमी वर्ग इतके असून, ह्या क्षेत्रफळात २,४०८,५२३ पेक्षा अधिक लोकसंख्या आहे.


राज्यस्थान चे सांस्कृतिक जीवन

नृत्य :- जगप्रसिद्ध घुमर नृत्य हे राज्यस्थानचे सांस्कृतिक नृत्य आहे जे केवळ स्त्रियांद्वारेच सादर केले जाते. ह्या व्यतिरिक्त गीर आणि पाणीहरी हे दोन नृत्य देखील आहेत. गीर मध्ये स्रिया आणि पुरुष दोघेही नृत्य करतात, तर पाणीहरी मध्ये पुरुष घोड्यांप्रमाणे दिसणाऱ्या पुतळ्यांसोबत नृत्य करत असतात. हे नृत्य साधारणतः सण उत्सवां दरम्यान केले जातात, तेही पारंपरिक पोशाख घालून.

वास्तू :- राज्यस्थानचे नृत्यासोबतच आणखी एक वैशिष्ठ्य आहे, ते म्हणजे खडकांवरचे शिलालेख. राज्यस्थान मध्ये अनेक पौराणिक काळातील शिलालेख आणि लेण्या आजही अस्तित्वात आहेत. बिकानेर जिल्ह्यात १५ व्या शतकाच्या दरम्यान तयार झालेले नक्षी कामांनी नटलेले नेत्रदीप नामक जैन मंदिर आहे. ह्या याव्यतिरिक्त भव्य राजवाडे, चित्र काम असलेल्या मोठंमोठ्या भिंती, महाल अशा काही वास्तू संपूर्ण राज्यस्थानात स्तिथ आहेत. डोंगरी भागात राजा महाराजांचे मोठमोठे किल्ले आजही दिमाखात उभे आहेत. २०१३ च्या दरम्यान युनेस्को ने राज्यस्थान मधील काही भागांना तेथे आढळणाऱ्या वास्तूंमुळे वर्ल्ड हेरिटेज स्थान म्हणून नामांकित केले आहे.

सण :- अनेकदा सण उत्सवांवरून देखील आपण संस्कृती विषयी खुप काही जाणू शकतो. राज्यस्थानच्या सांस्कृतिक जीवनात अनेक सण उत्सवांचा समावेश होतो.  राज्यस्थान मधील एक लोकप्रिय उत्सव म्हणजेच गंगौर होय. ज्याप्रमाणे महाराष्ट्रात गणेशोत्सव साजरा केला जातो, असाच काहीसा हा सण आहे. ह्यामध्ये माता पार्वती आणि महादेव ह्यांच्या मातीच्या प्रतिमा तयार केल्या जातात आणि ह्या प्रतिमांचे १५ दिवस पूजन करून, नंतर त्या प्रतिमांचे विसर्जन केले जाते.


राजस्थानमधील हवामान

राज्यस्थानचा अधिकतर भाग वाटवंटी प्रदेशात असल्यामुळे इथे वातावरण साधारणतः उष्ण आणि दमट स्वरूपाचे असते. वाळवंटा बरोबरच राज्यस्थान मध्ये काही प्रदेशात डोंगररांगा देखील आहेत. उन्हाळ्यात ह्या डोंगर रांगा वगळता इतर क्षेत्रामध्ये उष्णता सुमारे ३० अंश सेल्सिअस ते ४० अंश सेल्सिअस इतके असते. अनेकदा येथिल लोकांना धुळी वादळांना देखील तोंड द्यावे लागते, खास करून वाळवंटी प्रदेशात.

हिवाळ्याच्या दरम्यान येथील तापमान ३ अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचते. येथे पावसाचे प्रमाण कमी आहे, त्यामुळे पाणी संवर्धनासाठी रेन हार्वेस्टिंग हि पद्धत वापरली जाते. येथे पावसाचे प्रमाण ५०० मिमी पर्यंत असते. राज्यस्थानचा दक्षिण – पूर्व भाग अरबी समुद्राच्या जवळ असल्यामुळे त्याभागात भरपूर प्रमाणात पाऊस पडतो.


राज्यस्थानची अर्थव्यवस्था

राज्यस्थानच्या अर्थव्यवस्थेत शेती, संसाधने आणि उत्पादन ह्या घटकांचे विशेष महत्व आहेत. ज्याबद्दल थोडक्यात माहिती आपण खालील प्रमाणे पाहणार आहोत,

शेती :- राज्यस्थान मध्ये अधिक तर क्षेत्रात शेती व्यवसाय केला जातो, ज्यामुळे राज्यस्थानच्या अर्थव्यवस्तेत शेती हा सर्वात महत्वाचा टप्पा मानला जातो. राज्याच्या एकूण उत्पन्नापैकी एक चतुर्थांश उत्पन्न हे एकट्या शेती क्षेत्रातून राज्याला मिळते, सोबतच ह्यामुळे दोन चतुर्थांश लोकसंख्येला रोजगार मिळतो. ह्या राज्यात पावसाचे प्रमाण इतर राज्यांपेक्षा कमी असतानाही राज्यस्थान मध्ये जवळ जवळ सर्व प्रकारच्या पिकांचे उत्पादन घेतले जाते. कापूस आणि तंबाखू हि राज्यस्थान मध्ये घेतले जाणारे महत्वाची नगदी पिके आहेत.

पासून कमी असल्यामुळे इथे जलसिंचन पद्धतीने पिकांचे उत्पादन घेतले जाते. राज्याला पंजाब, हरियाणा, उत्तरप्रदेश, आग्रा, गुजरात, मध्यप्रदेश ह्या राज्यांमधून पाणी पुरवठा केला जातो. सोबतच येथे इंदिरा गांधी कालवा देखील तयार केला गेला आहेत, ज्याच्या आधारे देखील काही क्षेत्रात शेती करण्यात येते.

संसाधने :- राज्यस्थान हा शिसे आणि झिंक चा देशातील महत्वाचा उत्पादक आहे. देशातील चांदी आणि जिप्सम चा सर्वात मोठा भाग राज्यस्थान मध्ये तयार होतो. सोबतच काही प्रमाणत येथे वीज निर्मिती प्रकल्प देखील कार्यरत आहेत.

उत्पादन :- रसायने, सिमेंट, लोकर, कापड, वनस्पतींचे तेल हे काही राज्यस्थान मध्ये घेतल्या जाणाऱ्या प्रमुख उत्पादनांपैकी एक आहे. ह्या शिवाय लेदरच्या वस्तू, दागिने, नक्षीदार वस्तू, संगमरवरी, ह्याचे देखील काही प्रमाणात उत्पादन घेतले जाते.

अधिक लेख –

1. भारतात किती राज्य आहेत ?

2. महाराष्ट्रात किती तालुके आहेत ?

3. जगात किती देश आहेत आणि कोणते ?

4. भारतातील सर्वात लांब नदी कोणती ?

Leave a Comment