भारतातील सर्वात लांब नदी कोणती ?

भारताचे एकूण क्षेत्रफळ हे ३,२८७ दशलक्ष किलो मीटर वर्ग इतके असून, भारत जगातील सर्वाधिक क्षेत्रफळ असणाऱ्या देशांच्या यादीत सातव्या क्रमांकावर येतो. भारताच्या क्षेत्रफळात एकूण ४०० पेक्षा अधिक नद्याचा समावेश आहे, ह्या नद्यांनी भारताच्या एकूण क्षेत्रफळापैकी २०,००० किलोमीटर वर्ग इतके क्षेत्र व्यापले आहे.

या लेखाद्वारे आपण भारतातील सर्वात लांब नदी कोणती ? याबद्दल  माहिती पाहणार आहोत,


भारतातील सर्वात लांब नदी कोणती ?

गंगा नदी ही भारतातील सर्वात लांब नदी आहे. गंगा नदीला इंग्रजीत “Ganges” असे म्हटले जाते.  ह्या नदीची लांबी सुमारे २,५१० किलोमीटर इतकी आहे. गंगेचा उगम भारतातील उत्तराखंड राज्यात वाहणाऱ्या गंगोत्री नावाच्या हिमनदी मधून झाला आहे, कदाचित गंगोत्री वरूनच गंगेचे नाव ठेवले असावे. ही नदी भारत आणि बांगलादेश या दोन देशातून वाहते, तसेच या दोन देशातील मुख्य नद्यांपैकी देखील गंगा नदी एक आहे. गंगा नदी च्या दोन मुख्य नद्या आहेत, ज्यांची नावे अलकनंदा आणि भागीरथी याप्रमाणे आहे.

सर्वात मोठी आश्चर्याची बाब म्हणजे, ज्या ठिकाणी गंगा नदीचा उगम होतो, तो भूभाग जमिनीपासून ४,२६७ मीटर म्हणजे १३००० फूट इतक्‍या उंचीवर स्थित आहे.

गंगा नदीच्या काठावर लोकवस्ती आणि शहरे वसलेली आहेत, ज्यातील काही ऐतिहासिक आहेत ज्यांची नाव नावे काठी, पाटलीपुत्र, कोलकत्ता, काशी, बेहरंपुर, कनोजिया अशी आहेत.

हल्ली गंगा नदीकडे लोकांचे आकर्षण मोठ्या प्रमाणात वाढत आहे, कदाचित हेच मुख्य कारण गंगा नदी मधील वाढणारे प्रदूषणाचे असावे.


उपनद्या व त्यांची नावे

गंगा नदीच्या अनेक उपनद्या आहेत, ज्यातील १३ नद्यांची नावे आणि लांबी आपण खालील तक्त्यात पाहणार आहोत,

क्रमांक नदीचे नाव लांबी (कि.मी. वर्ग)
घाघरा ३२०
यमुना १,३७६
महानंद ८५८
गोमती ४७५
सोन ७८४
रामगंगा ५९६
कर्मनाशा १९२
गंडकी ८१४
दामोदर ५९२
१० ब्रम्हपुत्रा ५९२
११ कोसी ९१६
१२ तमसा २६४
१३ पुनपुण २००


कुंभमेळा

कदाचितच भारतात असा व्यक्ती असेल ज्याला कुंभमेळा ह्याबद्दल बद्दल माहिती नसेल. कुंभमेळा हा सनातन धर्म म्हणजेच आजचा हिंदू धर्म म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धर्मातील खूप महत्त्वाचा प्रसंग मानला जातो.  अगदी हजारो वर्षांपूर्वीपासून आपल्याला अनेक पौराणिक ग्रंथ आणि कथांमध्ये कुंभमेळ्याचा उल्लेख विविध नावानी दिसून येतो, याचे वैशिष्ट्य म्हणजे हा मेळा दर बारा वर्षांनी भरवला जातो, तोही एका विशिष्ट मुहूर्तावर.

कुंभमेळा गंगा नदीच्या तीरावर भरवला जात असून, त्यामुळे गंगा नदीला एक विशेष धार्मिक महत्व प्राप्त झाले आहे. आंतरराष्ट्रीय संस्था युनेस्कोने देखील कुंभमेळ्याला जागतिक सांस्कृतिक वारसा म्हणून घोषित केले आहे.

शास्त्रज्ञांनी लावलेला तर्कानुसार सुर्यमालेत जेव्हा सर्व ग्रह एका रेषेत येतात आणि अशा परिस्थितीत जेव्हा सूर्य किरण पृथ्वीवर ज्या ठिकाणी पडते, ती जागा आणि मुहूर्त म्हणजेच कुंभमेळा होय. शास्त्रज्ञांनी याबद्दल अगदी काही वर्षांपूर्वी सांगितले, पण कुंभमेळा हजार वर्षांपासून अस्तित्वात आहे याचा अर्थ असा होतो कि, आज संपूर्ण जग जितके प्रगत आहे त्यापेक्षाही प्रगत आपला भारत देश हजारो वर्षांपूर्वी होता.


पौराणिक कथा

गंगा नदीला हिंदू धर्मात फार पवित्र मानले जाते. हिंदू धर्मात जर कोणत्याही व्यक्तीहा मृत्यू झाला असेल, तर त्या व्यक्तीला जाळण्याची प्रथा आहे, असे म्हटले जाते की ज्या व्यक्तीचे दहन झाले आहे अशा व्यक्तीची चितेची अस्थी जर गंगा नदीत विसर्जित केली की तर मृत व्यक्तीस मोक्ष लाभतो, यामागे देखील एक पौराणिक कथा आहे.

कथा:- खूप वर्षांपूर्वी एक सगर नावाचा राजा होता. तन्त्र विद्येचा वापर करून सगर राजाने ६०,००० पुत्रांची प्राप्ती केली, हे ६०,००० पुत्र बलाढ्य असल्याचे सांगितले जाते. ह्या ६०००० पुत्रांच्या बळावर राजा सगर ला खूप अभिमान असतो, आपल्याला कोणीच हरवू शकत नाही, अशी त्याची विचारधारा असते, याच ६०,००० पुत्रांच्या बळावर राजा स्वर्गावर हल्ला करून तेथे राज्य करण्याची योजना करतो, यासाठी राजा एक मोठे यज्ञ करतो, हे यज्ञ पार पाडण्यासाठी एका घोड्याची आवश्यकता असते, ज्याला इंद्रदेव घेऊन जातात हे सगळं राजाला समजतात, तेव्हा तो आपल्या सर्व पुत्रांना घोडा शोधून आणण्याची आज्ञा देतो. वडिलांची आज्ञा मिळताच सर्व पुत्र घोड्याच्या शोधात रवाना होतात, अथक प्रयत्नांनंतर घोडा त्यांना पाताळलोकात भेटतो, हा घोडा कपिल मुनी यांच्या बाजूला बांधलेले होता. कपिल मुनी हजारो वर्षांपासून तपश्चर्या करत होते, घोड्याच्या शोधात आलेल्या राजा सगराच्या पुत्रांना वाटले की, घोडा कपिल मुनी ह्यांनीच चोरला आहे, यामुळे राजा चे पुत्र असे काही करता ज्याने कपिल मुनी ह्यांचा तपश्चर्या मध्ये अडथळा येतो आणि त्यांची तपश्चर्या मोडते, या रागात कपिल मुनी सगर राज्याच्या सर्व पुत्रांना आगीत भस्म करून मारून टाकतात.

क्रोधाच्या अग्नीत भस्म झालेल्या राज्याच्या पुत्रांना मोक्ष मिळावा, यासाठी अनेक प्रयत्न झाले पण सर्वच व्यर्थ ठरले, यानंतर भागीरथी ने आपल्या पूर्वजांच्या आत्म्यास शांती लाभो, यासाठी स्वर्गलोकात असलेल्या गंगा देवीला पृथ्वीवर आणण्याचा निश्चय केला, ज्याने आपल्या सर्व पूर्वजांची अस्थी गंगा नदीच्या प्रवाहात विसर्जित करून त्यांच्या आत्म्यास शांती लाभेल, भागीरथी हा राजा सगर चा नातू होता.

राजा भागीरथी ब्रह्मदेवाची आराधना करण्यास सुरुवात करतो, अनेक वर्षांचा कालावधी निघून जातो आणि ब्रह्मदेव भागीरथी वर प्रसन्न होतात, आणि गंगेला पृथ्वीवर आणि नंतर पाताळलोक मध्ये प्रस्थान करण्यास सांगतात, परंतु यात देखील एक समस्या होती, ती म्हणजे जेव्हा गंगा स्वर्गलोकातुन गंगा पृथ्वीवर अवतरेल तेव्हा पृथ्वीला त्याचा भर झेपणार नाही, त्यामुळे भागीरथ राजाने पुन्हा महादेवांकडे मदतीसाठी धाव घेतली आणि भागीरथी ची ती विनवणी स्वीकारत महादेवांनी त्यांच्या डोक्यावरील जटांवर गंगेचा भर सोसला आणि अशाप्रकारे गंगा मातेचे पृथ्वीवर आगमन झाले आणि राजा भागीरथने आपल्या पूर्वजांची अस्थी गंगेत विसर्जित केली आणि त्यांना मोक्ष मिळवून दिला, तेव्हापासून ते आजपर्यंत मृत लोकांची अस्थी गंगा नदीत विसर्जित करण्याची प्रथा प्रचलित आहे.


आपण काय शिकलो ?

  • भारतातील सर्वात लांब नदी गंगा आहे.
  • गंगा नदीची लांबी २,५१० इतकी आहे.
  • जगातील सर्वाधिक लोकांद्वारे भाग घेतला जाणारा कुंभमेळा हा संस्कृती कार्यक्रम गंगा नदीच्या काठावर भरवला जातो.
  • भारतात एकूण ४०० पेक्षा अधिक नद्या आहेत.
  • गंगा नदीचा उगम भारतातील उत्तराखंड ह्या राज्यात झाला आहे.
  • गंगा नदीचे उगम स्थान भूतळापासून 4267 मीटर इतक्या उंचीवर वसले आहे.

Leave a Comment