भारतात किती राज्य आहेत ?

भारत हा विविध संस्कृती आणि धर्मानी नटलेला देश आहे, जेथे विविध जाती धर्माचे लोक एकसाथ राहतात.

संपूर्ण भारतामध्ये एकूण २१ पेक्षा अधिक भाषांचा वापर केला जातो, त्यामधील हिंदी हि भारताची राष्ट्रीय भाषा आहे.

एकतेचे प्रतीक असणाऱ्या भारतात किती राज्य आहेत, ह्याचा आढावा आपण ह्या लेखात घेणार आहोत,


भारतात किती राज्य आहेत ?

आपला भारत हा क्षेत्रफळाच्या दृष्टीकोनातून सर्वात मोठ्या देशांच्या यादीत ७ व्या क्रमांकावर येत असून, भारताचे क्षेत्रफळ हे ३२,८७,२६३ किमी वर्ग इतके आहे. भारताच्या ह्या क्षेत्रफळात २८ राज्य आणि ८ केंद्रशासित प्रदेशांचा समावेश होतो, ज्यांची इंग्रजी आणि मराठी नावे खालील प्रमाणे:
 
क्रमांक राज्याचे नाव इंग्रजीत राज्याचे नाव मराठीत
Maharashtra महाराष्ट्र
Gujarat गुजरात
Jharkhand झारखंड
Haryana हरियाणा
Mainpur मणिपूर
Goa गोवा
Punjab पंजाब
Meghalaya मेघालय
Andhra Pradesh आंध्र प्रदेश
१० Bihar बिहार
११ Uttar Pradesh उत्तर प्रदेश
१२ Sikkim सिक्कीम
१३ Tamil Nadu तामिळनाडू
१४  Uttara Khand उत्तराखंड
१५ NagaLand नागालँड
१६ Rajasthan राजस्थान
१७ West Bengal पश्चिम बंगाल
१८  Himachal Pradesh हिमाचल प्रदेश
१९ Kerala केरळ
२० Odisha ओडिसा
२१ Mizoram मिझोरम
२२ Krnataka कर्नाटक
२३ Telangana तेलंगणा
२४ Chhattisgarh छत्तीसगड
२५ Arunachal Pradesh अरुणाचल प्रदेश
२६ Assam आसाम
२७ Tripura त्रिपुरा
२८ Madhya Pradesh मध्य प्रदेश
 
केंद्रशासित प्रदेश:-
 
क्र इंग्रजी नाव मराठी नाव
Delhi  दिल्ली 
Andman And Nicobar Islands  अंदमान आणि निकोबार बेट 
Ladakh  लद्दाख 
Lakshadweep  लक्षद्वीप 
PuduCherry  पड्डीचेरी 
Chandigarh  चंदीगड 
Jammu And kashmir  जम्मू आणि काश्मीर 
Dadara & Nagar Haveli & Daman & Deep दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीप 

राज्यांची थोडक्यात माहिती

1. महाराष्ट्र

महाराष्ट्र हे भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर वसलेले एक राज्य आहे, जे ३,०७,७१३ चौ. किमी इतक्या क्षेत्रफळात पसरले आहे. महाराष्ट्राला एकूण ७२० किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे.

महाराष्ट्राची राजधानी  मुंबई आणि उपराजधानी नागपूर आहे. मुंबई ला स्वप्ननागरी म्हणून देखील ओळखले जाते.

मुंबई मध्ये एक समुद्र किनारा आहे, ज्याला भारताचे प्रवेश द्वार ( Gate Of  India ) म्हणून ओळखले जात ह्याची निर्मिती इंग्रजांच्या काळात झाली होती.

१९६० पूर्वी गुजरात आणि महाराष्ट्र हे दोन्ही मिळून एकच राज्य होते, परंतु काही राजकीय घडामोडी आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीमुळे १ मी १९६० मध्ये महाराष्ट्र हे एक स्वतंत्र राज्य म्हणून घोषित करण्यात आले.

महाराष्ट्राला संतांची भूमी म्हणून देखील ओळखले जाते. महाराष्ट्र राज्याचे राज्य फळ आंबा, राज्य प्राणी शेकरू आणि राज्य भाषा मराठी आहे.

2. गुजरात

गुजरात हे महाराष्ट्राच्या उत्तरेस वसलेले राज्य असून गुजरात हे १,९६,०२४ चौ. किमी इतक्या क्षेत्रफळात पसरले आहे. गुजरात ची स्थापन देखील १ मे १९६० मध्ये झाली, ज्या दिवशी गुजरात आणि महाराष्ट्र हे दोन्ही स्वतंत्र राज्य घोषित करण्यात आले.

लोकसंख्या हि ६,०३,८३,६२८ इतकी असून गांधीनगर गुजरात ची राजधानी आहे, तसेच अहमदाबाद आणि सुरत हे गुजरात ची काही प्रमुख शहरे आहे.

येथील प्रमुख भाषा ही गुजराती असून व्यापाऱ्यांचे राज्य म्हणून गुजरात ची ओळख आहे. गुजरातचा राज्य पक्षी महा रोहित, वनस्पती वड आणि नृत्य दांडिया आहे.

3. राजस्थान

राज्यस्थान हे उत्तर भारतामधील वाळवंटी प्रदेशात स्थित राज्य आहे. राज्यस्थान हे भारतामधील सर्वात जास्त क्षेत्रफळ असणारे राज्य असून याचे क्षेत्रफळ ३,४२,३९ चौ कि.मी. इतके आहे.

राजस्थानचे पौराणिक नाव राजपुताना असे होते, तसेच याला महाराणा प्रतापांची भूमी म्हणून देखील ओळखले जाते, राजस्थानची राजधानी जयपूर असून राजस्थान मधील जयपूर हे सर्वात मोठेेेेे शहर देखील आहे.

राजस्थान येथील किल्ले आणि काळी घाटी चे युद्ध यामुळे राजस्थान जगप्रसिद्ध आहे.

4. बिहार

पटना राजधानी असलेले बिहार हे राज्य पौराणिक मंदिरांसाठी संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे. बिहार हे मुख्यता भारताच्या उत्तर भागात स्थित असून याच्या दक्षिणेला झारखण्ड हे राज्य आहे.

बिहार हे भारतातील सर्वाधिक लोकसंख्या असणाऱ्या राज्यांच्या यादीत येते, याचे क्षेत्रफळ ९४, १६३ चौ किमी एवढे असून, येथील लोक संख्या ७७,०४,२३६ इतकी आहे तसेच येथील बोलीभाषा हिंदी आणि भोजपुरी आहे, बिहार मधील अधिक तर लोक शेती व्यवसाय करत असून ते तांदूळ, मका आणि गहू यांचे उत्पादन अधिक प्रमाणात घेतात.

5. मध्य प्रदेश

जसे की नावावरूनच आपल्याला समजते कि, हे राज्य मध्य भारतात स्थित असून याचा भूभाग ३,०८,१४४ चौ किमी इतका क्षेत्रफळात पसरला आहे, मध्य प्रदेश ची राजधानी भोपाळ असून इंदूर येथील सर्वात मोठे शहर आहे.

येथे अधिक तर लोकांद्वारे हिंदी ही भाषा बोलली जाते मध्य प्रदेशची लोकसंख्या ७,२५,९७,१०० इतकी असून भारतातील सहाव्या क्रमांकाचे सर्वाधिक लोकसंख्या असलेले हे राज्य आहे

6. कर्नाटक

भारताच्या दक्षिण भागात केवळ चार राज्य असून कर्नाटक हे त्यातीलच एक राज्य आहे, कन्नड हे कर्नाटक ची मुख्य बोलीभाषा आहे.

कर्नाटक ची स्थापना ही 1 नोव्हेंबर 1956 मध्ये झाली असून, याचे पौराणिक नाव मैसुरु असे होते, येथील मुख्य शहर आणि राजधानी होण्याचा मान बंगळूर या शहराला मिळाला आहे.

बंगळूर शहराला आयटी सेक्टर चे सर्वात मोठे शहर मानले जाते. कर्नाटकात चे एकूण क्षेत्रफळ १,९१,७९१ चौ किमी इतके असून यामध्ये एकूण 29 जिल्ह्यांचा समावेश आहे तसेच येथील मुख्य खाद्य इडली आहे.

7. केरळ

केरळ हे राज्य देखील भारताच्या दक्षिण भागात वसले आहे, येथील नैसर्गिक सौंदर्य हेच केरळ चे वैशिष्ट्य आहे.  केरळला दोन समुद्राचा किनारी भाग लाभला असून त्यातील पहिले अरबी समुद्र, तर दुसरे हिंदी महासागर आहे.

केरळ राज्याची स्थापना 1 नोव्हेंबर 1956 मध्ये झाली असून तिरुअनंतपुरम हे केरळची राजधानी आहे, केरळचे क्षेत्रफळ ३८,८६३ चौ किमी इतके आहे, तसेच केरळमध्ये एकूण १४ जिल्ह्यांचा समावेश होतो.

8. हरियाणा

हरियाणा हे राज्य भारताच्या उत्तर भागात स्थित असून, हे एक प्रगत राज्य अशी हरियाणा ची ओळख आहे.  हरियाणा हा भारतातील साक्षर राज्यांपैकी एक असून, त्याचे क्षेत्रफळ ४४,२१२ इतके आहे.

हिंदी हरियाणाची अधिक तर बोलली जाणारी भाषा आहे चंदीगड ही हरियाणाची राजधानी असून फरीदाबाद हे येथील सर्वात मोठे शहर आहे.

9. पंजाब

पंजाबी हे भारताच्या वायव्य दिशेला स्थित असून हे राज्य पाकिस्तानच्या सीमेलगत वसले आहे. पंजाब आणि हरियाणा हे एकच राज्य होते, परंतु 1 नोव्हेंबर 1956 मध्ये दोन्ही स्वतंत्र राज्य म्हणून घोषित करण्यात आले.

लुधियाना हे पंजाब मधील मोठे शहर असून चंदिगड पंजाब ची राजधानी आहे. पंजाब चे एकूण क्षेत्रफळ ५०,३६५ चौ कीमी इतके असून, या क्षेत्रफळात 20 जिल्ह्यांचा समावेश होतो पंजाबी ही पंजाब ची राज्यभाषा आहे.

10. तामिळनाडू

चेन्नई राजधानी असलेले तमिळनाडू हे राज्य 32 जिल्ह्यांसह १,३०,०५८ चौ किमी इतक्या क्षेत्रफळात पसरले आहे. तमिळ हि तामिळनाडू ची राज्यभाषा असून चेन्नई आणि मदुराई हे तमिळनाडू मधील मोठी शहरे आहेत.

11. हिमाचल प्रदेश

हिमाचल प्रदेश हे भारताच्या उत्तरेकडील एक राज्य असून, त्याचे एकूण क्षेत्रफळ ५५,६३७ चौ कीमी इतकी आहे.

हिमाचल प्रदेश हे तेथील उंच आणि बर्फाने झाकलेल्या पर्वत रांगासाठी जगप्रसिद्ध आहे. हिमाचल प्रदेश ची राजधानी शिमला असून दरवर्षी हजारो लोक या शहराला पर्यटक म्हणून भेट देतात.

इथे एकूण 12 जिल्हे आहेत. येथे मुख्यता हिंदीत भाषा अधिक तर बोलली जाते, येथील अधिक तर लोकांचा रोजगार पर्यटन व्यवसायांवर आधारित आहे.

12. गोवा

गोवा हे भारतातील सर्वात लहान राज्य म्हणून प्रचलित आहे. गोव्याचे एकूण क्षेत्रफळ केवळ ३,७०२ चौरस किलोमीटर इतके असून, येथे केवळ दोनच जिल्हे आहेत ज्यामध्ये १४,५७,७२३ इतकी लोकसंख्या आहे.

गोव्याची राजधानी होण्याचा मान पणजि ला मिळाला असून वास्को-द-गामा हे गोव्यातील प्रमुख शहर आहे, गोव्याला ३० मे १९८७ मध्ये स्वतंत्र राज्य म्हणून घोषित करण्यात आले. येथे अधिक तर मराठी भाषेचा वापर करतात.

गोवा हा तेथील समुद्रकिनारपट्टीसाठी प्रसिद्ध असून दरवर्षी देश-विदेशातील लाखो लोक गोव्याला पर्यटक म्हणून भेट देतात, यामुळे गोव्याचे मूळ उत्पादनाचे साधन पर्यटन व्यवसाय आहे.

13. आसाम

बांगलादेश लगत वसलेले आसाम हे राज्य भारताच्या वयवयास आहे. आसाम ची स्थापना १५ ऑगस्ट १९४७ मध्ये म्हणजेच भारत स्वातंत्र्य झाल्याच्या काळातच झाली, आसामचे एकूण क्षेत्रफळ ७८,४३८ चौ किमी इतके आहे.

आसामची राजधानी म्हणून दिसपुर ला ओळखले जाते आणि गुवाहाटी हे येथील सर्वात मोठे शहर आहे. आसाम मध्ये मुख्यता आसमिया भाषेचा वापर केला जातो, तसेच बिहू हे येथील लोकप्रिय नृत्य आहे.

14. झारखंड

साल २००० च्या आधी भारतामध्ये एकूण २७ घटक राज्य होते, परंतु बिहार या राज्याच्या दक्षिणेकडील भाग वेगळा करुन त्या भूभागाला स्वतंत्र राज्य म्हणून घोषित केले गेले आणि अशा प्रकारे झारखंड ची स्थापना दोन हजार साली झाली आणि भारताच्या घटक राज्यांच्या यादीत आणखी एक नाव सामील झाले.

झारखंड हे राज्य ७९,७१४ इतक्या क्षेत्रफळात पसरले आहे, याची राजधानी रांची आणि मोठे शहर जमशेदपूर आहे. झारखंड मध्ये एकूण 24 जिल्हे असून येथील एकूण लोकसंख्या ३,२९,६६,२३८ इतकी आहे.

15. सिक्कीम

सिक्कीम हे हिमालय पर्वत रागांमध्ये वसलेले एक राज्य आहे जे गोवा ह्या राज्यानंतर दुसरे सर्वात लहान राज्य आहे, ज्याचे क्षेत्रफळ ७०९६ चौ किमी इतके असून, येथे केवळ ४ जिल्हे अस्तित्वात आहेत, ज्यातील गंगटोक हे सिक्कीमचे सर्वात मोठे शहर आणि राजधानी देखील आहे. सिक्कीमची लोकसंख्याह ६,१०,००० इतकी आहे.

16. मेघालय

मेघालय हे आसाम राज्याच्या दक्षीणेत स्थित असून, शिलॉंग ही मेघालयची राजधानी आणि तेथील सर्वात मोठे शहर देखील आहे. 1972 च्या दरम्यान मेघालय आणि आसाम हे राज्य दोन वेगळे राज्य म्हणून घोषित करण्यात आले, सध्या आसामची लोकसंख्या ही 30 लाख पेक्षा अधिक आहे. आसाम चे एकूण क्षेत्रफळ हे २२,४२९ चौ किमी आहे.

17. छतीसगड

छत्तीसगड हे भारताच्या मध्यभागातील एक राज्य आहे, जे १,३५,१९४  चौ. किमी इतक्या क्षेत्रफळात पसरले आहे.

छत्तीसगडच्या एकूण क्षेत्रफळात १८ जिल्ह्यांचा समावेश होतो, ज्यामधील रायपूर हि छत्तीसगड ची राजधानी आणि मुख्य मोठे शहर आहे.

छत्तीसगड ची लोकसंख्या २,०७,९५,१२५ इतकी असून येथील बोलीभाषा छत्तीसगडी आणि हिंदी ही आहे. काही इतिहासकारांच्या माहितीनुसार छत्तीसगडचे पौराणिक नाव दंडकारण्य दक्षिण-कोशल असे होते.

18. मिझोरम

म्यानमार च्या उत्तरेस असलेले हे राज्य २१,००० चौरस किलोमीटर इतके क्षेत्रफळात पसरले आहे. येथील राज्यभाषा मिझो ही आहे.

मिझोरम मधील एझोल ही राजधानी आणि सर्वात मोठे शहर देखील आहे, तसेच मिझोरमच्या एकूण क्षेत्रफळात ८ जिल्ह्यांचा समावेश आहे, येथील लोकसंख्या १०,९१,२५६ इतकी आहे. मिझोरम या राज्याची स्थापना २० फेब्रुवारी १९८७ मध्ये झाली होती.

19. त्रिपुरा

आगरताळा राजधानी असलेले त्रिपुरा हे राज्य भारताच्या ईशान्य दिशेला वसलेले असून, येथील एकूण लोकसंख्या 36 लाख 71 हजार 32 एवढी असून त्रिपुराला १०,४९२ चौरस किलोमीटर इतके क्षेत्रफळ लाभले आहे.  डाळ, कापूस हे येथील प्रमुख उत्पादन आहे. येथे मुख्यतः बंगाली या भाषेचा वापर केला जातो.

20. अरुणाचल प्रदेश

अरुणाचल प्रदेश भारतातील काही मुख्य राज्यांपैकी एक आहे, जे भारताच्या ईशान्य भागात म्हणजेच चीनच्या सीमेलगत वसले आहे. अनेकदा चीनने या राज्यावर आपले वर्चस्व स्थापन करण्याचा प्रयत्न केला, परंतू ते प्रयत्न असफल ठरले.

भारतामधील उगवत्या सूर्याचे राज्य म्हणून अरुणाचल प्रदेश ची ख्याती आहे. अरुणाचल प्रदेश या राज्यात अनेक डोंगररांगा आहेत, त्यामुळे चीन पासून भारताचा बचाव होण्यास मदत मिळते, अशा या अरुणाचल प्रदेश ची राजधानी इटानगर ही आहे.

अरुणाचल प्रदेश चे एकूण क्षेत्रफळ ८३,७४३ चौरस किलोमीटर इतके असून येथील लोकसंख्या 13 लाखापेक्षा अधिक आहे तसेच, जिथे हिंदी आणि इंग्रजी या बोलीभाषा बोलल्या जातात.

21. नागालँड

भारतातील अनेक नैसर्गिक सौंदर्य लाभलेल्या राज्यांपैकी नागालँड एक आहे, जे 16 हजार 580 चौरस किलोमीटर इतके क्षेत्रफळात पसरले आहे. कोहिमा हे शहर नागालँड ची राजधानी आहे. नागालँडमध्ये विविध भागात विविध लोकसंस्कृती आढळून येते.

या व्यतिरिक्त भारतातील साक्षर राज्यांच्या यादीत देखील नागालँड चा समावेश होतो. नागालँड मध्ये एकूण ८ जिल्हे आहेत आणि 19 लाख पेक्षा अधिक लोकसंख्या असलेला हा प्रदेश आहे, जेथे अधिक तर इंग्रजी ही भाषा बोलली जाते.

22. पश्चिम बंगाल

भारताच्या पूर्व दिशेस असलेले पश्चिम बंगाल हे राज्य मिठाई साठी खूप प्रसिद्ध आ,हे येथे मिळणारे रसगुल्ले हे जग प्रसिद्ध आहेत, तसेच भारतातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या राज्यांपैकी देखील एक आहे.

अगदी काही वर्षांपूर्वी कोलकत्ता हे संपूर्ण भारतातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले शहर होते, परंतु कालांतराने मुंबई हे लोकसंख्या जास्त असलेले भारतातील शहर बनले. पश्चिम बंगाल चे एकूण क्षेत्रफळ 88 हजार 752 चौरस किलोमीटर इतके असून ह्या क्षेत्रफळात एकूण 19 जिल्हे विभागले गेले आहेत.

पश्चिम बंगालची मुख्य ओळख ही कोलकत्ता पासून होते, म्हणूनच कोलकता ही पश्चिम बंगालची राजधानी आणि मुख्य शहर देखील आहे.

23. आंध्र प्रदेश

तिरुपती बालाजी हे जगप्रसिद्ध असलेले धार्मिक स्थळ आंध्रप्रदेश मध्येच आहे. आज नकेवळ भारतातून तर संपूर्ण जगातील तिरुपती बालाजी मंदिराला लोक भेट देतात.

जगातील सर्वात श्रीमंत मंदिर म्हणून देखील तिरुपती बालाजी ची ओळख आहे. आंध्र प्रदेशला ९३७ किलोमीटर चा समुद्र किनारा लाभला आहे, तसेच या राज्याचे एकूण क्षेत्रफळ २,७५,०६८ वर्ग किलोमीटर इतके आहे.

या राज्याची स्थापना १ नोव्हेंबर १९५६ च्या दरम्यान झाली होती, ज्यामध्ये एकूण 13 जिल्हे आहेत आणि विशाखापटनम ही आंध्रप्रदेश ची राजधानी म्हणून ओळखली जाते. येथे मुख्यता तेलगू या भाषेचा वापर अधिक पहायला मिळतो.

24. मनिपुर

२२,३२८ चौरस किलोमीटर इतके क्षेत्रफळ असलेले मनिपुर हे राज्य भारताच्या ईशान्य भागात आहे, ज्या ची लोकसंख्या सत्तावीस लाखापेक्षा अधिक आहे.

मणिपूरची राज्यभाषा मनिपुरी ही असून याची स्थापना २१ जानेवारी १९७२ मध्ये झाली. इंफाळ हि मणिपूरची राजधानी असून मणिपूर मध्ये एकूण 9 जिल्हे आणि दोन मतदार संघ आहेत.

25. ओडिसा

छत्तीसगडच्या लगत असलेले ओडिसा हे राज्य लोकसंख्येच्या बाबतीत अकराव्या क्रमांकावर येते. ओडिसा चे एक वैशिष्ट्य म्हणजे भारत स्वतंत्र होण्या आधीच ओडिषा स्वतंत्र झाले होते, म्हणजेच ओडीसा ची स्थापना किंवा मुक्तता ही १ एप्रिल १९३६ साली झाली.

भुवनेश्वर ही ओडीसा ची राजधानी असून ओडिशामध्ये 29 जिल्ह्यांचा समावेश होतो. ओडिसा चे शेत्रफळ एक लाख चौरस किलोमीटरपेक्षा अधिक आहे. ओडिया ही उडीसा ची राज्यभाषा आहे.

26. उत्तराखंड

अगदी नावाप्रमाणेच भारताच्या उत्तर भागात स्थित असलेले उत्तराखंड हे राज्य देवांची भूमी या नावाने देखील ओळखले जाते.

भारतातील पवित्र नद्या म्हणजे गंगा, यमुना आणि रामगंगा या तीनही उत्तराखंड मधून वाहतात, ज्यामुळे उत्तराखंडाला एक वेगळेच पावित्र्य लाभले आहे. नद्यांबरोबरच केदारनाथ-बद्रिनाथ ही  हिंदु धर्मातील पवित्र स्थळे उत्तराखंडामध्य स्थित आहेत.

उत्तराखंडाचे एकूण क्षेत्रफळ 53 हजार 483 चौरस किलोमीटर एवढे असून, येथील लोकसंख्या एक कोटी पेक्षा अधिक आहे. देहरादून हे प्रसिद्ध शहर उत्तराखंड ची राजधानी आहे.

27. उत्तर प्रदेश

भारताच्या उत्तरेस स्थित असणारे उत्तर प्रदेश हे राज्य संपूर्ण भारतात सर्वाधिक लोकसंख्या असणारे राज्य आहे, ज्याची लोकसंख्या २०११ च्या जनगणनेनुसार 19 करोड 95 लाख 81 हजार इतकी आहे.

येथे साक्षरतेचे प्रमाण अधिक नसल्यामुळे जास्त लोक इथे शेती व्यवसाय करतात व तांदूळ, गहू आणि डाळ येथील मुख्य पीक म्हणून ओळखले जाते.

लखनऊ ही उत्तर प्रदेशची राजधानी असून, उत्तर प्रदेश चे एकूण क्षेत्रफळ 240000 चौरस किलोमीटर इतके आहे. उत्तर प्रदेश ची स्थापना २६ जानेवारी १९५० रोजी झाली होती, ज्यामध्ये एकूण ७५ जिल्हे आणि 80 मतदार संघ आहेत.

28. तेलंगणा

तेलंगणा हे भारतातील तरूण राज्य आहे, ज्याची स्थापना २०१४ जून महिन्यात झाली, यापूर्वी तेलंगणा हा आंध्रप्रदेशचाच एक भाग होता, याचे प्राचीन नाव त्रिल्लींग असे होते.

तेलंगणाची राजधानी हैदराबाद असून याचे एकूण क्षेत्रफळ एक लाख 14 हजार चौरस किलोमीटर इतके आहे, ज्यामध्ये दहा जिल्ह्यांचा समावेश आहे.

तसेच येथील लोकसंख्या तीन कोटी पेक्षा अधिक आहे, येथे मुस्लिम समाज अधिक राहत असल्याने तेलंगणा मध्ये तेलगू आणि उर्दू भाषेचा अधिक वापर केला जातो.


FAQ

1. भारतातील सर्वात लहान राज्य कोणते ?

उत्तर : गोवा हे भारतातील सर्वात लहान राज्य आहे, ज्याचे एकूण क्षेत्रफळ हे ३,७०२ किमी वर्ग इतके आहे.

2. भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते ?

उत्तर : राज्यस्थान हे क्षेत्रफळाच्या दृष्टीकोनातून भारतातील सर्वात मोठे राज्य आहे, ज्याचे एकूण क्षेत्रफळ ३,२४,२३९ किमी वर्ग इतके आहे.

3. भारतात एकूण किती जिल्हे आहेत ?

उत्तर : संपूर्ण भारतात एकूण ७५५ इतके जिल्हे आहेत.

4. भारतातील सर्वात मोठा जिल्हा कोणता ?

उत्तर : गुजरात मधील कच्च हा भारतातील सर्वात मोठा जिल्हा आहे.

5. भारतातील सर्वात श्रीमंत राज्य कोणते ?

उत्तर : महाराष्ट्र हे भारतातील सर्वात श्रीमंत राज्य आहे.

अधिक लेख :

1. महाराष्ट्रात किती जिल्हे आहेत ?

2. महाराष्ट्रात किती तालुके आहेत ?

3. भारतातील सर्वात लांब नदी कोणती ?

4. भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते ?

Leave a Comment