भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता ?

खेळांची आपल्या जीवनात खूप महत्वाची भूमिका आहे. चांगल्या स्वास्थ्यासाठी खेळ खेळणे उत्तम पर्याय मानला जातो. सोबतच खेळ म्हणजे मनोरंजनाचे एक उत्तम साधनही मानले जाते.

भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता

सध्याच्या काळात खेळ केवळ मनोरंजनासाठी खेळले जात नसून, खेळ खेळण्याला एक स्पर्धात्मक रूप धारण झाले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर कोणता देश खेळात सर्वाधिक gold medal मिळवतो, ह्यासाठी स्पर्धा चालू आहेत.

प्रत्येक देशाने अनेक स्वतःचे राष्ट्रीय खेळ देखील निवडले आहेत. जसे की ऑस्ट्रेलिया चा राष्ट्रीय खेळ cricket ,चीन चा टेबल टेनिस, Canada चा ice hockey आहे.

ह्या लेखात आपण भारताचा राष्ट्रिय खेळ कोणता आणि त्या खेळासंबंधीत विविध घटकांची माहिती पाहणार आहोत.


भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता ?

हॉकी भारताचा राष्ट्रीय खेळ आहे. जगातील कोणत्याही देशाचा राष्ट्रीय खेळ हा दोन घटकांवरून ठरवला जातो, त्यातील पहिला घटक म्हणजे देशात एखाद्या खेळाची प्रसिद्धी किंवा लोकप्रियता किती आहे आणि दुसरा घटक म्हणजे खेळाचे देशासोबत असलेले ऐतिहासिक संबंध.

1920 ते 1950 या काळात भारतीय संघाची हॉकी खेळातील आंतरराष्ट्रीय स्तरावरील कामगिरी पाहता, त्यामुळेच कदाचित हॉकीला भारताचा राष्ट्रीय खेळ म्हणून घोषित करण्यात आले असावे. ह्या काळात भारतीय हॉकी संघाने 7 वेळा ओलंपिक मध्ये गोल्ड मेडल 🏅 मिळवले होते.


हॉकी खेळाचा इतिहास

हॉकी या खेळाचा इतिहास हा फार जुना आहे. हा खेळ अनेक वर्षांपासून अस्तित्वात आहे, पण कदाचित पूर्वी या खेळाचे नाव आणि नियम हे वेगळे असावेत असा अंदाज दर्शविण्यात आला आहे.

अनेक ऐतिहासिक नोंदी नुसार हॉकी सारखाच एक खेळ इजिप्तमध्ये 4000 वर्षांपूर्वी, इथिओपिया मध्ये 1000 BC ( Before Crist ( येशू ख्रिस्ताच्या जन्मा आधी चा काळ )) पूर्वी आणि इराणमध्ये 2000 BC पूर्वी खेळला जात होता, यावरूनच हॉकी खेळ किती जुना आहे, याचा अंदाज आपल्याला आला असेल.

अनेक संग्रहालयातील पौराणिक वास्तुंवरून वरून असे देखील समोर आले आहे की, रोमन, ग्रीक आणि अझ्टेक येथील लोक देखील एक खेळायचे जो अगदी हॉकी प्रमाणे होता.

आज आपण ज्या पद्धतीने व ज्या काही नियमां सहीत हॉकी खेळत आहोत, ज्याला आपण आधुनिक जगातील हॉकी असे म्हणतो, त्याचा जन्म 18 व्या शतकात इंग्लंडमध्ये झाला होता.

1876 मध्ये UK ( United Kingdom ) या देशात जगातील पहिल्या हॉकी असोसिएशनची स्थापना झाली होती.  ही हॉकी असोसिएशन फक्त सहा वर्षे म्हणजेच 1882 पर्यंतच कार्यरत होती, यानंतर 1886 मध्ये पुन्हा 9 सदस्यांनी मिळून हॉकी Association ची स्थापना केली गेली. अशा प्रकारे कालांतराने हॉकी ह्या खेळाला प्रसिद्धी मिळत गेली.


हॉकी खेळाची माहिती

1. मैदान

हॉकीचे मैदान हे आयताकृती असून, मैदानाची लांबी 91.40 मीटर आणि रुंदी 55 मीटर इतकी असते. लांबीच्या कडांना site line तर रुंदीच्या कडांना back line असे म्हटले जाते. Site Line व बॅक लाईनच्या दरम्यान असलेल्या भागाला Goal Line असे म्हणतात.

Site line वर 2 मीटर आणि Back Line वर 3 मीटर Run Off असते. मैदान विभाजनसाठी जिथे जिथे सफेद रंगाची line वापरली जाते त्या line ची रुंदी 75 mm इतकी असते. मैदान विभाजनासाठी सफेद रंग वगळता इतर कोणताही रंग वापरला जात नाही.

हॉकीच्या मैदानाच्या प्रत्येक कोपऱ्यात 300 मीमी जागेवर लहान-लहान झेंडे लावले जातात, ज्यांची उंची 1.20 ते 1.50 मीटर इतकी असते. मैदानाच्या दोन्ही बाजूंना Goal Post असतात. Goal Post म्हणजे ज्या ठिकाणी goal केले जातात. हे Goal Post चौकोनी आकाराचे असतात. Goal Post साठी, ज्या लोखंडी खांबांचा वापर होतो, त्या लोखंडी खांबांची रूंदी 50 मिली मीटर इतकी असते. मैदानावर दोन संघ साठी दोन goal Post असतात. दोन्ही बाजूच्या Goal Post च्या अवतीभवती अर्धवर्तुळ असते.

2. नियम

हॉकी मध्ये दोन संघ एकमेकांच्या विरुद्ध खेळत असतात आणि प्रत्येक संघात 11-11 खेळाडू असतात.

हॉकी ची मॅच 70 मिनिटांची असून त्याला 35 35 मिनिटांमध्ये विभागले जाते.

खेळाडू हॉकी स्टिक व्यतिरिक्त, हातांनी हॉकी बॉलला स्पर्श करू शकत नाहीत, असे केल्यास फाऊल होतो.

जे खेळाडू जर सतत नियमांचे उल्लंघन करत असतील तर अशा खेळाडूंना हिरवा, लाल आणि पिवळा अशा रंगाचे कार्ड दिले जातात.

मैदानावर ज्याही ठिकाणी फाऊल होतो, त्या ठिकाणावरुन विरोधक संघ फ्री-हीट करू शकतो.

3. साहित्य

Hockey Sticke:- हॉकी स्टिक ही साधारणता ‘J’ ह्या आकाराची असून, या स्टिक ची उंची किती असले हे पूर्णता खेळाडूवर अवलंबून असते, म्हणजे जितके खेळाडूची उंची असेल त्या मानाने खेळाडू हॉकी स्टिक वापरतो.

Hockey Ball:- होकी बॉल चे वजन हे 156 ग्राम ते 163 ग्राम या दरम्यान असू शकते. या चेंडूचा व्यास 71.3 ते 74.8 मिली मीटर, तर परिघ 22.4 सेमी ते 23.5 सेमी इतका असतो.

Shin Guard:- Shin guard हे पायाच्या संरक्षणाचे काम करते. Shin म्हणजे तळपाय आणि गुडघ्या यादरम्यान चा भाग. खेळताना इतर खेळाडूचे हॉकी स्टिक किंवा पडल्यावर पायांना इजा होऊ नये म्हणून Shin guard वापरले जाते.

Mouth Guard:- Mouth Guard हे लहान आकाराचे असते, जे खेळादरम्यान तोंडामध्ये ठेवायचे असते, ज्याने आपल्या दातांना इजा होत नाहीत.

Helmet:- हॉकी ह्या खेळात वापरले जाणारे हेल्मेट हे एक विशिष्ट प्रकारचे हेल्मेट असते, जे गोलकीपरसाठी विशेष असते. हेल्मेटच्या पुढच्या बाजूला जाळीचे आवरण असते, ज्याने हॉकी बॉल चेहर्‍यावर नाजूक ठिकाणी लागू नये.

Throat Protector:- Throat Protector हे कापसापासून बनलेले साहित्य असते, जे मानेभोवती गुंडाळायचे असते ज्याने मानला बॉल लागल्यावर जखम होण्याची शक्यता फार कमी असते.

Cleats:- Cleats ( shoes ) हे एक प्रकारचे बुट असते. ज्याचा तळ भागात काट्याप्रमाणे असते, ज्याने खेळाडू मैदानात पळताना घसरून पडू नये. ही बुटे प्लास्टिक रबर अशा पदार्थांपासून बनवली जातात, ज्यामुळे ही बुट वजनाला हलकी आणि आतून मऊ असतात.

Gloves:- Gloves द्वारे हात व हातांच्या बोटांना होणाऱ्या इजा टळतात तसेच हॉकी स्टिक ची ग्रिप घट्ट होते.

Body Pad:- बॉडी पेड ते साहित्यदेखील बोल की परी साठी असते हे मुळात आपल्या छातीच्या संरक्षणासाठी असते

Kicker:- Kicker हे काहीसे बुटांप्रमानेच असते, पण जरा जाड कापसा पासून बनलेले असते. जे गोलकीपर पायात घालतो.


हॉकी खेळाचे प्रकार

अठराव्या शतकात हॉकी खेळाचा उदय झाल्यापासून हॉकी खेळाचे विविध प्रकार उदयास आले आहेत. त्यातीलच 4 हॉकी खेळाच्या प्रकारांची थोडक्यात माहिती आपण खालील प्रमाणे घेणार आहोत,

1. Bandy Hockey

Bandy हॉकी हा खेळ बर्फावर खेळला जातो. ह्यात खेळणार्‍या प्रत्येक संघात अकरा खेळाडू असतात. Bandy Hockey ह्या खेळाचा उदय अठराव्या शतकात इंग्लंड येथे झाला, असून 1813 मध्ये Bandy Hockey ची पहिली मॅच खेळली गेली होती.

2. Roller Hockey

Roller Hockey हा खेळ फरशी सारख्या सपाट भागावर,  अशा बुटांच्या सहाय्याने खेळला जातो, ज्या बुटांना लहान आकाराची चाके बसवली असतात, ज्यांना आपण स्कॅटर असे देखील म्हटले जाते.

3. Under Water Hockey

Under Water Hockey ला Octopust म्हणून देखील ओळखली जाते. हा Hockey चा प्रकार पाण्यात खेळला जातो. पाण्यात खेळण्यासाठी खेळाडूंना swimming equipment देखील दिले जातात. Under Water Hockey मध्ये वापरली जाणारी हॉकी स्टिक आकाराने अगदी लहान असते. एखाद्या मोठ्या सुमिंग पूलमध्ये हा खेळ आयोजित करण्यात येतो. जगातील पहिली Under Water Hockey मॅच 1954 मध्ये भरविण्यात आली होती.

4. Sledge Hockey

जे लोक सामान्य माणसांप्रमाणे चालू शकत नाहीत व धाऊ शकत नाहीत, त्यांच्यासाठी sledge hockey हा हॉकी खेळाचा प्रकार तयार केला गेला आहे. इथे खेळाडूला बसायला एक साधन देतात, त्यावर बसून खेळाडू स्वतःच्या हातांच्या ताकतीचा वापर करून पुढे मागे जाऊ शकतो. Sledge hockey चा शोध 1960 च्या दरम्यान लागला होता. या खेळाद्वारे अपंगांना एक प्रकारचे प्रोत्साहन दिले जाते.

Leave a Comment