वाचण्यासाठी सर्वोत्कृष्ट मराठी पुस्तके | Best Marathi Books to Read

पुस्तकांचे आपल्या जीवनात अनन्यसाधारण असे महत्व असून, बौद्धिक विकासासाठी देखील पुस्तके फार उपयुक्त असतात. अगदी लहान असल्यापासून आपला पुस्तकांशी संबंध असतो, परंतु शालेय वयात आपण पुस्तकांकडे इतके ध्यान देत नाही. पुस्तके म्हणजेच आपल्या यशस्वी जीवनाची चावी असते. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बिल गेट्स, इलॉन मास्क, मार्क झुकरबर्क हे यशस्वी असून देखील आजही नियमित पणे पुस्तके वाचतात.

पुस्तके तर खूप आहेत, परंतु नेमके वाचायचे कोणते हा प्रश्न नेहमीच अनेकांच्या मनात येत असतो आणि खरंच हे खूप मोठे कोडे आहे. ह्या लेखात आपण अशी ६ मराठी पुस्तकांची नावे (Best Marathi Books To Read) पाहणार आहोत जे जीवनात तुम्हाला खूप काही शिकवून जातील कदाचित तुमच्या यशाचे कारण देखील बनतील.


Best Marathi Books to Read

1. श्रीमान योगी (Shreeman Yogi)

श्रीमान योगी हे पुस्तक रंजीत देसाई ह्यांनी लिहिले असून, ह्यसाठी पुस्तक लेखनासाठी त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात देखील आले आहे. श्रीमान योगी हे पुस्तक महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज ह्यांच्यावर आधारित असून, महाराजांच्या जीवनातील अनेक प्रसंगांचे वर्णन ह्या पुस्तकात करण्यात आले आहे. तसेच महाराजांनी स्वराज्य निर्माण करण्यासाठी केलेली सुरुवात, त्यांची धडपड आणि आपल्या रयते बद्दल असलेल्या जिव्हाळा अशा अनेक गोष्टींची माहिती आपल्याला ह्या पुस्तकातून मिळते. हे पुस्तक वाचतं असताना आपल्याला अचूक नियोजन कसे करावे, ध्येय कसे साधावे, अहंकार करून नये, प्रतिकूल परिस्तिथीत देखील स्वतःला सावरणे, आपल्या ध्येयांची पूर्ती करणे अशा काही गोष्टी शिकण्यास मिळतात. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे पुस्तक वाचून झाल्यावर आपल्यात काहीतरी मोठं करून दाखवण्याची आग पेटते.

2. भगवत गीता (Bhagavad Gita)

भगवत गीता ही महर्षी व्यास ह्यांनी लिहिले असून जीवनाची खरी परिभाषा आपल्याला ह्या पुस्तकातून समजते, म्हणजे अनेकांना असे वाटते कि, भगवत गीता ही केवळ हिंदू धर्मीयांसाठी आहे, परंतु हा निव्वळ गैरसमज असून, भगवत गीता म्हणजे सत्याचा असत्यावर विजयाचे प्रतीक दर्शवते.

महाभारतातील युद्धादरम्यान अर्जुनाने श्रीकृष्ण ह्यांना प्रश्न विचारले, श्री कृष्ण ह्यांनी दिलेली उत्तरे ह्यांचा समूह भगवत गीतामध्ये  वर्णित केला आहे. भगवत गीता ह्या धार्मिक पुस्तकाचे वैशिष्ठ्य म्हणजे जेव्हा तुम्ही हे पूर्ण वाचाल तेव्हा तुमच्या आयुष्याला योग्य दिशा नक्कीच मिळेल. अनेक संशोधनातून असे समोर आले आहे कि, जगातील जवळ जवळ अधिक तर महान व्यक्तींनी भगवत गीतेचा पाठ केला होता, जसे कि अल्बर्ट आईन्स्टाईन, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि अधिक. तसेच हे वाचताना तुम्हाला तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनात न कळत कोणत्या चुका करत आहेत, ह्याची देखील माहिती मिळेल.

भगवत गीता ही मुळात संस्कृत भाषेत लिहिली गेली असली, तरी आज विविध भाषांमध्ये ती उपलब्ध आहे अगदी इंग्रजीत देखील.

3. छावा (Chava)

छत्रपती संभाजी महाराज ह्यांच्या जीवनावर आधारित छावा हे पुस्तक शिवाजी सावंत ह्यांनी लिहिले आहे. संभाजी महाराजांच्या जन्मापासूनचा संघर्ष ह्या पुस्तकाद्वारे लोकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. छावा ह्या पुस्तकातून आपल्याला जगातील सर्वात महत्वाचा बोध मिळतो, तो म्हणजे जो पर्यंत तुम्ही स्वतःपासून हरत नाही तो पर्यंत तुम्हाला जगात कोठेही अपयश नाही. छत्रपती संभाजी महाराज हे न केवळ युद्ध कला तर संस्कृत चे देखील महापंडित होते. आपल्या वडिलांच्या स्वप्नासाठी आणि शब्दांसाठी स्वतःच्या जीवाची परवा न करणारे संभाजी महाराज आपल्याला ह्या पुस्तकातून भेटतील.

4. श्यामची आई (Shyamchi Aai)

श्यामची आई हे एक बाल नाट्य असून ते महाराष्ट्रातील प्रसिद्ध लेखक साने गुरुजी ह्यांच्या द्वारे लिहिले गेले आहे. ह्या नाट्यात श्याम आणि त्याच्या आईचे पवित्र नाते आणि एकमेकांविषयी असलेला जिव्हाळा दर्शविला आहे. बाल मनाच्या संस्कारासाठी हेच पुस्तक खूप उत्तम मानले जाते. हे पुस्तक वाचत असताना वाचणाऱ्याच्या डोळ्यातून अश्रू आल्याशिवाय राहत नाहीत आणि हीच ह्या पुस्तकाची खास बात आहे. ह्या पुस्तकांवरून श्यामची आई नावाचा मराठी चित्रपट देखील तयार झाला आहे, ज्यामध्ये संपूर्ण पुस्तकाचा पाठ केवळ २ तासांच्या चित्रीकरणात दर्शविला आहे.

5. पानिपत (PaniPat)

पानिपत चे युद्ध हे जगातील महायुद्धांपैकी एक आहे. हे युद्ध मराठे आणि मुघल ह्यांच्यात झाले होते. हे युद्ध आजच्या दिल्ली मधील पानिपत येथे लढले गेले होते, ज्यामुळे ह्या युद्धाला पानिपत चे युद्ध असे म्हटले जाते. ह्या युद्धात ७० ते ८०,००० सैनिकांचा बळी गेला होता. युद्धादरम्यान अनेक फितूर मराठ्यांची बाजू सोडून मोघलांना मिळाले, ज्यामुळे हे युद्ध मराठे हरले होते.

पानिपत चा सर्व प्रसंग हा विश्वास पाटील ह्यांनी एका पुस्तकात वर्णविला असून शिवाजी महाराजांचे स्वप्न पुन्हा कसे पेशव्यांनी जगवले, ह्यावर हे पुस्तक असून आपल्या भारताचा अवर्णनीय इतिहास आपल्याला ह्या पुस्तकातून पाहायला मिळतो.

6. रिच डॅड पुअर डॅड (Rich Dad Poor Dad)

रिच डॅड पुअर डॅड हे मुळात एक इंग्रजी पुस्तक असून त्याचे भाषांतर मराठी, हिंदी अशा विविध भाषेत केले गेले आहे. Robert Kiyosaki ह्यांच्या द्वारे हे पुस्तक लिहिले आहे. हे एक Financial एज्युकेशन चे पुस्तक असून व्यावहारिक ज्ञानाबद्दल माहिती आपल्याला ह्या पुस्तकाद्वारे मिळते, जे आपल्याला शाळेत शिकवले जात नाही. आपल्याला शाळेत केवळ पुस्तकी ज्ञान दिले जाते, ज्यामुळे आयुष्याच्या वाटेवर अनेकदा आपल्याला पैशा संबंधित अनेक अडचणी येतात, जर ह्या अडचणींचा सामना तुम्हाला करायचा नसेल, तर हे पुस्तक तुम्ही नक्कीच वाचले पाहिजे. पैसे कसे कमवावे, कोणत्या मार्गाने कमवावे आणि आयुष्यात सेटल कसे व्हावे अशी  अनेक प्रकारची माहिती आपल्याला ह्या पुस्तकातून मिळते. 

हे पुस्तक प्रकाशित होण्यामागे देखील एक संघर्षक कथा आहे. जेव्हा Robert Kiyosaki हे पुस्तक प्रकाशनाकडे आपले पुस्तक प्रकाशित करण्यासाठी घेऊन गेले, तेव्हा कोणत्याही प्रकाशनाने हे पुस्तक प्रकाशित केले नाही, ज्यामुळे हे पुस्तक आपण स्वतःच प्रकाशित करावे असा निर्णय Robert Kiyosaki ह्यांनी घेतला आणि पुस्तक प्रकाशित होताच सर्वाधिक विकले जाणारे पुस्तक रिच डॅड आणि पुअर डॅड हे ठरले, जर Robert Kiyosaki ह्यांनी निराश होऊन जर हे पुस्तक प्रकाशितच केले नसते, तर ते आज इतके यशस्वी झालेंच नसते.  

वरील दिलेल्या नावांपैकी जर तुम्ही कोणतेही पुस्तक वाचले असेल, ते तुम्हाला कसे वाटले तसेच ह्या पुस्तकांद्वारे तुम्हाला काय शिकण्यास मिळाले हे कंमेंट द्वारे नक्की कळवा. 

Leave a Comment