AM PM चा फुल फॉर्म काय ? | AM PM Full Form in Marathi

वेळ ही एक मौल्यवान गोष्ट आहे, ज्याचा आढावा घेण्यासाठी आपण घड्याळ या उपकरणाचे सहाय्य घेतो. घड्याळ हे साधारणतः १२ तासांचे आणि २४ तासांचे या दोन स्वरूपात आढळते. २४ तासांच्या घड्याळाच्या अगदी विपरीत १२ तासांच्या घड्याळामध्ये वेळे सोबतच AM आणि PM या शब्दांचा देखील प्रयोग केला जातो.

आपल्यापैकी अधिक तर लोकांना AM आणि PM हे शब्द का वापरले जातात, या संबंधित पूर्ण कल्पना आहे, परंतु या शब्दांचा म्हणजेच AM आणि PM चा नेमका फुल फॉर्म काय आहे, याबद्दल काहीच कल्पना नाही, म्हणून या लेखात आपण AM आणि PM चा फुल फॉर्म व त्या संबधित इतर विविध माहितीचा आढावा घेणार आहोत,


AM PM म्हणजे काय ?

AM आणि PM हे मुळात लॅटिन भाषेतील शब्दांचे संक्षिप्त रूप आहे. या शब्दांचा प्रयोग वेळेची स्थिती दर्शविण्यासाठी केला जातो. पूर्वी म्हणजेच घड्याळाचे अस्तित्व नव्हते, तेव्हा वेळेचा अंदाज हा दोन पद्धतीने लावला जात होता. यातील पहिली पद्धत म्हणजे सूर्य स्थितीनुसार वेळेचा अंदाज लावणे आणि दुसरी पद्धत म्हणजे अंधारात अथवा सूर्यास्तानंतर आकाशातील ताऱ्यांच्या सहाय्याने वेळेचा अंदाज लावणे.

am pm full form in marathi

१५ व्या शतकात घड्याळाचा शोध लागला, त्यानंतर वेळ जाणून घेण्याची पद्धतच बदलली. जेथे पूर्वी नैसर्गिक संसाधन म्हणजेच सूर्य, तारे यांच्या आधारे वेळेचा अंदाज लावला जात होता, तेथे घड्याळाचा शोध लागल्यानंतर वेळ जाणून घेण्यासाठी माणूस लहान सुयांवर अवलंबून राहू लागला.

दिवस आणि रात्र ही वेगळी स्थिती दर्शविण्यासाठी am आणि pm या शब्दांचा प्रयोग सुरु झाला.


AM PM Full Form in Marathi

A – Ante
M – Meridiem

P – Post
M – Meridiem

AM आणि PM चा फुल फॉर्म “Ante Meridiem” आणि “Post Meridiem” हा आहे. हे दोन्हीही लॅटिन भाषेतील शब्द आहे. इंग्रजी भाषेत Ante Meridiem करिता Before Noon आणि Post Meridiem करीता After Noon या शब्दांचा प्रयोग केला जातो.

Before Noon चा मराठी अर्थ दुपारच्या आधीची वेळ आणि After Noon चा मराठी अर्थ दुपारच्या नंतरची वेळ असा होतो. अर्थात थोडक्यात सांगायचे झाले तर AM चा उपयोग दुपारच्या आधीची म्हणजेच सकाळी १२ च्या आधीची वेळ दर्शविण्यासाठी तर PM चा उपयोग दुपारच्या १२ नंतरची वेळ दर्शविण्यासाठी केला जातो.


संकल्पना

आपण दैनंदिन जीवनात १२ तासांच्या घड्याळासोबतच २४ तासाचे घड्याळ देखील उपयोगात आणतो. १२ तासाचे घड्याळ म्हणजे हे पारंपरिक पद्धतीचे घड्याळ आहे, ज्यामध्ये एक ते बारा अंकांचा समावेश असतो आणि २४ तासाच्या संपूर्ण दिवसात एक अंकाची दोन वेळा पुनरावृत्ती होते. २४ तास प्रणालीचा उपयोग अधिकतर डिजिटल घड्याळामध्ये दिसून येतो.

२४ तासाच्या घड्याळाला लष्करी घड्याळ म्हणून देखील ओळखले जाते. यामध्ये अंकाची कोणत्याही प्रकारे पुनरावृत्ती होत नाही. या व्यतिरिक्त २४ तासाच्या घड्याळात आपल्याला AM आणि PM या शब्दांचा उपयोगही करावा लागत नाही.

२४ तासाच्या घड्याळात दिवसाची सुरुवात ही ००:०० या अंकांनी होते, तर १२ तासाच्या घड्याळात दिवसाची सुरुवात ही १२:०० AM पासून होते. २३:५९ नंतर २४ तासांचे घड्याळ Reset होते. जेव्हा १२ तासांच्या घड्याळात दुपारचे २ PM वाजतात, तेव्हा २४ तासांच्या घड्याळात त्याचे वर्णन १४:०० असे केले जाते.

१२ तासांचे घड्याळ १२ तासांचे घड्याळ
१२:०० am ००:००
०१:०० am ०१:००
०२:०० am ०२:००
०३:०० am ०३:००
०४:०० am ०४:००
०५:०० am ०५:००
०६:०० am ०६:००
०७:०० am ०७:००
०८:०० am ०८:००
०९:०० am ०९:००
१०:०० am १०:००
११:०० am ११:००
१२:०० pm १२:००
०१:०० pm १३:००
०२:०० pm १४:००
०३:०० pm १५:००
०४:०० pm १६:००
०५:०० pm १७:००
०६:०० pm १८:००
०७:०० pm १९:००
०८:०० pm २०:००
०९:०० pm २१:००
१०:०० pm २२:००
११:०० pm २३:००
१२:०० pm २४:००

इतर फुल फॉर्म

Ante Meridiem आणि Post Meridiem वगळता AM आणि PM चे इतर कोणकोणते फुल फॉर्म आहेत, याचा आढावा आपण खालीलप्रमाणे घेणार आहोत,

AM फुल फॉर्म PM फुल फॉर्म
Amplitude Modulation Private Message
Additive Manufacturing Prime Minister
Air Mass Presentation Manager
Atto Meter Project Management
Asset Management Performance Monitoring
Account Management Post Mortem
Access Method Pico Meter
Accounts Manager Power Management
FAQ
1. AM चा उपयोग केव्हा केला जातो ?

उत्तर : रात्री १२ ते दुपारी १२ या दरम्यानची वेळ दर्शविण्यासाठी AM चा उपयोग केला जातो.

2. घड्याळाचा शोध कोणी लावला ?

उत्तर : “Peter Henlein” यांनी १५ व्या शतकात जगात प्रथम घड्याळाचा शोध लावला.

3. २४ तासांच्या घड्याळात AM PM चा उपयोग का केला जात नाही ?

उत्तर : १२ तासांच्या घडयाळाप्रमाणे २४ तासांच्या घड्याळात अंकांची पुनरावृत्ती होत नसल्याने २४ तासांच्या घड्याळात AM आणि PM चा उपयोग केला जात नाही.

4. PM चा उपयोग केव्हा केला जातो ?

उत्तर : दुपारी १२ ते रात्री १२ या दरम्यानची वेळ दर्शविण्यासाठी PM चा उपयोग केला जातो.

5. Digital घड्याळाचा शोध कोणी लावला ?

उत्तर : “George Thiess” यांनी साल १९७० मध्ये प्रथम डिजिटल घड्याळाचा शोध लावला.

6. २४ तासांचे घड्याळ कोणत्या नावाने ओळखले जाते ?

उत्तर : २४ तासांच्या घड्याळाला लष्करी घड्याळ या नावाने देखील ओळखले जाते.

अधिक लेख –

1. MLC चा फुल फॉर्म काय ?

2. RTE चा फुल फॉर्म काय ?

3. LPG चा फुल फॉर्म काय ?

4. EMI चा फुल फॉर्म काय ?

Leave a Comment